Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2865

भाजपमध्ये दारू पिणारे असंख्य लोक, पिल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही; मलिकांचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक याच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या टीकेला मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी वाईनबाबत निर्णय घेतला. यावरून भाजप मधील लोकांकडून वारंवार टीका केली जात आहे. मी विचारतो कि तुम्ही तुमच्या वायनरी बंद करणार का? भाजपमध्ये असंख्य लोक हे दारू पिणारे आहेत. ती पिल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून वाईनच्या निर्णयाबाबत वारंवार बोलले जात आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊन देणार नाही. मात्र, भाजपमध्येच असंख्य लोक हे दारू पिणारे आहेत. ती पिल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. जे काही बेवडा बेवडा हे शब्द वापरत आहेत. ते रात्री कुठे बसतात हे आम्हालाही चांगले माहिती आहे, असे मलिक यांनी म्हंटले.

अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये अत्यंत घाणेरडे शब्द वापरण्यात आले आहेत. त्याच्या या ट्विटबाबत मला काही बोलायचे नाही. असेही यावेळी मलिक यांनी सांगितले. काल अमृता फडणवीसांनी ट्विट करीत “संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. फडणवीसांनी या तिन्ही नेत्यांचा उल्लेख नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा केला आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना जाणार?? राजेश टोपेंनी सांगितला तज्ज्ञांचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

करोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिल्याचं टोपे म्हणाले. न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट चीन मधून आला आहे. याबाबतची जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप माहिती नाही. मात्र, या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. पण, सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात मास्कमुक्ती करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.मास्कमुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातल्या देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली”, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं होतं.

SBI डेबिट कार्ड पिन कशी तयार करावी ‘हे’ अशाप्रकारे जाणून घ्या

Bank

नवी दिल्ली । जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुम्हाला डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही हा पिन घरबसल्या वापरु शकता. ग्राहक हा पिन फक्त एका फोन कॉलने मिळवू शकतात.

अलीकडेच SBI ने ट्विट केले होते की, “तुम्ही टोल-फ्री IVR सिस्टीमद्वारे डेबिट कार्ड पिन किंवा ग्रीन पिन सहजपणे जनरेट करू शकता. 1800 1234 वर कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका.”

तुम्ही SBI डेबिट कार्ड पिन अशा प्रकारे जनरेट करू शकता-
>> सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.
>> कॉल आल्यावर, तुम्हाला एटीएम/डेबिट कार्ड संबंधित सेवांसाठी 2 दाबावे लागेल.
>> आता पिन तयार करण्यासाठी 1 दाबा.
>> IVR तुम्हाला प्रकारे मोबाइल क्रमांकावरून कॉल करण्यासाठी 1 दाबण्यास सांगेल किंवा ग्राहक एजंटशी बोलण्यासाठी तुम्हाला 2 दाबण्यास सांगितले जाईल.
>> IVR तुम्हाला तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 5 अंक टाकण्यास सांगेल.
>> शेवटचे 5 अंक निश्चित करण्यासाठी 1 दाबावे लागेल.
>> तुमच्याकडून काही चूक झाल्यास, एटीएम कार्डचे शेवटचे 5 अंक पुन्हा एंटर करण्यासाठी पुन्हा 2 दाबा.
>> यानंतर तुम्हाला तुमच्या खाते नंबरचे शेवटचे 5 अंक टाकण्यास सांगितले जाईल.
>> एंटर केलेले नंबर बरोबर असल्यास 1 दाबा अन्यथा खाते क्रमांकाचे शेवटचे 5 अंक पुन्हा एंटर करण्यासाठी 2 दाबा.
>> आता तुम्हाला तुमचे बर्थ ईअर टाकावे लागेल.
>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा ग्रीन पिन तयार होईल.

Budget 2022: सरकार करदात्यांना देऊ शकते मोठा धक्का, करात मिळणार नाही सूट

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । या अर्थसंकल्पात करमाफीच्या आशेवर असलेल्या करदात्यांना सरकार मोठा धक्का देऊ शकते. सातत्याने वाढणाऱ्या खर्चामुळे वित्तीय तूट नियंत्रित ठेवण्यासाठी या अर्थसंकल्पात करात सूट मिळण्याची शक्यता नाही.

RBI चे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव म्हणतात की,” 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात सरकारने अर्थव्यवस्थेतील व्यापक असमानता कमी करण्यावर आणि रोजगार वाढवण्यावर भर दिला पाहिजे. मात्र, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावरील खर्च वाढवण्याची गरज पाहता यावेळी कर कपातीला वाव नाही.”

अर्थसंकल्पाचा उद्देश विकासाला गती देणे हा आहे
माजी गव्हर्नर म्हणाले की,” विकासाचा वेग वाढवणे हे प्रत्येक अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असते. हाही या अर्थसंकल्पाचा उद्देश असावा. मात्र, या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेतील व्यापक विषमता दूर करण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.” अलीकडील जागतिक असमानता अहवालाचा दाखला देत ते म्हणाले की,”अशी व्यापक असमानता केवळ नैतिकदृष्ट्या चुकीची आणि राजकीयदृष्ट्या हानिकारक नाही, तर ती आपल्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यतांवरही परिणाम करेल. अशा परिस्थितीत आपल्याला रोजगारावर आधारित वाढीची गरज आहे. या अर्थसंकल्पाचा विषय असेल तर तो रोजगार असावा.”

साथीच्या रोगाने गरिबांवर संकट निर्माण केले
सुब्बाराव म्हणाले की,”महामारीमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी अधिकच वाढली आहे. अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या अल्प उत्पन्न गटासाठी यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याच वेळी, उच्च उत्पन्न गट केवळ त्यांची कमाई वाढवू शकला नाही तर महामारीच्या काळात त्यांची बचत आणि मालमत्ता वाढली आहे.”

आयात शुल्क कमी करणे आवश्यक आहे
माजी गव्हर्नर पुढे म्हणाले की,”अनुभवावरून असे दिसून येते की, संरक्षणवादी भिंती असलेल्या निर्यातीला चालना देण्याचे धोरण क्वचितच स्पर्धात्मक असते, त्यामुळे आयात शुल्क कमी करण्याची गरज आहे. अनौपचारिक क्षेत्र पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाल्याने यावर्षी देशाच्या कर संकलनातील उडी पुढील वर्षी संपेल, असे ते म्हणाले.”

निर्यात वाढल्याने दुहेरी फायदा
ते म्हणाले की,”मंदीमुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत. श्रमकेंद्रित अनौपचारिक क्षेत्रातून भांडवल गहन औपचारिक क्षेत्राकडे आर्थिक क्रियाकलाप स्थलांतरित झाल्यामुळे रोजगाराचे संकट देखील उद्भवले. रोजगार निर्मितीसाठी वाढ आवश्यक आहे, परंतु ती पुरेशी नाही. त्यासाठी निर्यातीवरही भर द्यावा लागणार आहे. यामुळे परकीय चलन तर मिळेलच पण रोजगाराच्या संधीही वाढतील.:

संजय राऊतांनी वाईन उद्योजकांसोबत करार केला; सोमय्यांचा आरोप

raut somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद अजूनही सुरू आहे. दरम्यान वाईनबाबत ठाकरे सरकारने नुकताच एक निर्णय घेतला. यावरून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला. वाईनबाबत बोलणाऱ्या राऊतांचे अशोक गर्ग यांच्यासोबत अनेक दिवसांपासून संबंध आहे. गर्ग याच्यासोबत पार्टनशिप असलेल्या राऊतांचे अनेक उद्योग आपण बाहेर काढणार आहोत, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,“संजय राऊत परिवाराने 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. यानंतर 12 जानेवारी 2022 रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती मंत्रालयाला दिली आहे. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात” आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने वाईनला परवानगी देऊन महाराष्ट्रातील अस्मितेला ठेस पोहचवली आहे. या वाईनला परवानगी दिल्यानंतर राऊत म्हणाले की वाईन म्हणजे काय? वास्तविक वाईन उद्योजकाशी राऊत कुटूंबियांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे. वाईन निर्मितीची मॅगपी कंपनी असलेल्या उद्योगात राऊत कुटूंबियांची भागीदारी आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

दरम्यान आज सोमय्या यांनी वाईन विषयावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करीत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे त्यानंतर सोमय्या यांच्या आरोपांना राऊत काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.

औरंगाबाद गारठले ! जानेवारीत दोन वर्षांतील नीचांकी तापमान

औरंगाबाद – शहरात गेल्या दोन वर्षातील जानेवारी येथील नीचांकी किमान तापमानाची (8.0) शनिवारी चिकलठाणा वेधशाळेने नोंद घेतली.

शहरात 17 जानेवारी 2020 रोजी 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर 30 जानेवारी 2019 रोजी 12.8 किमान तापमान नोंदविले आहे. या दोन वर्षांच्या तुलनेत शनिवारी नोंद झालेले किमान तापमान जानेवारीतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. शहरात 23 जानेवारीपासून किमान तापमानात झपाट्याने घसरण होत गेलेली थंडीची लाट आली. आगामी दिवसात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

तर शहरातील एमजीएम वेधशाळेत काल 7.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

आज नवे 804 कोरोना पाॅझिटीव्ह, सातारा जिल्ह्यात केवळ 408 उपचार्थ

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 804 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 20. 28 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 964 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 20 टक्क्यांवर आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी दिवसभरात 1537 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 6698 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 408 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत. रिकव्हरी रेट 94. 58 टक्के इतकी आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसची महाआघाडी हेच महाराष्ट्राचे राजकीय भविष्य- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसची महाआघाडी हेच महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपला डिवचले आहे. तसेच आगामी काळात भाजप आणि शिवसेना एकत्र येतील या शक्यतेनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीस केलेल्या भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे. असे संजय राऊत यांनी म्हंटल.

23 जानेवारीच्या भाषणात श्री. उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला. भाजपच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे श्री. ठाकरे यांनी कधीच काढले नव्हते. भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीत आम्ही सडलो, असे विधान त्यांनी पुन्हा केले. यावरून दोन पक्षांत आता टोकाचे भांडण सुरू झाले. महाराष्ट्रात कोण कोणाच्या आधाराने आणि मदतीने वाढले याचे संदर्भ देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोर होता व त्यांच्या भाषणाने भाजपास मिरच्या झोंबल्या हे त्यामुळे नक्की झाले. श्री. देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलार यांच्यापर्यंत सगळे नेते शिवसेनेवर तुटून पडले. असे संजय राऊत यांनी म्हंटल.

यापूर्वी कधीच भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे मुख्यमंत्र्यांनी काढले नव्हते – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद अजूनही सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यामधली 25 वर्षांची युती तुटतयामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. “भाजपाच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते”, असे विधान यावेळी राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. भाजपाबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच राज्याचे भविष्य आहे, असा संदेश त्यांच्या भाषणातून मिळाला आहे. त्यामुळे भाजपाच्या बोलणी चालल्याच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार मुद्दे मांडले. फडनवीसांचे मत म्हणजे ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म 1966 सालातला. भाजपाने 1980 साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपाच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कुणाच्या आधी जन्माला आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे राऊत यांनी म्हंटले.

पुणे- मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई- पुणे महामार्गावर एका कार चा भीषण अपघात झाला असून गाडीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कार्ला फाटा सोडल्यानंतर  रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरखाली ही कार घुसली. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली असून बाकीच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.