Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2869

पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता मिळणार नाही

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.

तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अशीही अट आहे. नोंदणीसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या रेशनकार्डचे डिटेल्स अपलोड करावे लागतील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

तुम्ही अशाप्रकारे नोंदणी करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

“पलूस-कडेगावचा पुढील आमदार भाजपचाच होणार” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. 2019 मधील विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र, आम्ही युती धर्म पाळत शिवसेनेला जागा दिली. सेनेने हा मतदारसंघ कॉंग्रेसला विकल्याने कॉंग्रेस कडेगावमध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेतील सदस्य, पदाधिकाऱ्यांत वसंत बंगल्यावर झालेल्या हाणामारीची पक्षीय पातळीवर चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली येथे खासगी कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील आले होते. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कडेगाव-पलूस तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे कडेगाव नगरपंचायतमध्ये भाजपने घवघवीत यश मिळविले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. कडेगाव विधानसभा जर भाजपने लढवली असती तर भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. मात्र, आम्ही युती धर्म पाळला त्यामुळे ती जागा शिवसेनेला सोडली होती. परंतू शिवसेनेने हा मतदारसंघ कॉंग्रेसला विकला. सेनेला अवघी साडेचार हजार मते मिळाली. तर 50 हजार मते नोटाला गेली. त्यामुळेच कडेगावमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला. गतवेळी झालेली चूक पुन्हा होणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जावयाच्या खूनप्रकरणी सासू अन मेहुण्यास आजन्म कारावास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मुलीस जाळून मारल्याच्या संशयावरून जावई सुनील बाबुराव इंगळे याचा खून केल्याप्रकरणी सासू लिलाबाई अशोक साठे व मेहुणा श्रीकांत अशोक साठे यांना पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांनी अजन्म करावासाची शिक्षा ठोठावली. मयत सुनील बाबुराव इंगळे याने आरोपी लिलाबाई साठे हिच्या मुलीशी 21 जुलै 2010 साली आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर इंगळे याची पत्नी सुवर्णा ही पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाली. ती नोकरीत असताना वाटेगाव येथे 6 फेब्रुवारी 2015 रोजी स्टोव्ह पेटवित असताना त्याचा भडका होवून भाजून गंभीर जखमी झाली. तीला उपचारासाठी कराड येथे दाखल केले.

14 फेब्रुवारी 2015 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुवर्णा हीला पतीनेच जाळून मारले असेल असा साठे व नातेवाईकांचा संशय होता. दरम्यान 17 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 वाजता वाटेगाव ते भाटवाडी रोडवर श्री मायाक्का मंदिराशेजारी श्रीकांत साठे व लिलाबाई साठे यांनी सुनील इंगळेस दगड व विटांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सुनील इंगळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात श्रीकांत साठे व लिलाबाई साठे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या केसची सुनावणी एस.एम.चंदगडे यांच्या कोर्टात सुरू होती. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पंच, प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार, मेडिकल ऑफिसर व तपासी अंमलदार विक्रांत हिंगे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पूर्वनियोजित कट करुन स्वतःच्या जावायाचा निर्घृणपणे स्वतःच्या फायद्यासाठी निर्घृण खून करण्यात आला आहे. असा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

नंदुरबार मध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये घबराट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नंदुरबार रेल्वे स्थानकावर गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी भीषण आग लागली आहे. रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.

पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने, आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, भीषण आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी ….; सीताराम कुंटेंचा धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काही धक्कादायक खुलासे ‘ईडी’समोर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी त्यांना अनधिकृत याद्या पाठवायचे. कुंटे यांच्या या गौप्यस्फोटा नंतर देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत असे त्यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अंडर काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

बँकिंगसह अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर किती परिणाम होईल जाणून घ्या

Bank

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2022 पासून बँकिंगसह अनेक नियम बदलणार आहेत. तुमच्या आयुष्याशी संबंधित या नियमांमधील बदल तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात बँक ऑफ बडोदा, एसबीआय बँक आणि पीएनबी बँक ट्रान्सझॅक्शनशी संबंधित नियम बदलतील. तसेच 1 फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.

ट्रान्सझॅक्शन लिमिट वाढली
SBI च्या म्हणण्यानुसार, IMPS द्वारे रु. 2 लाख ते रु. 5 लाख दरम्यान पैसे ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​शुल्क आकारले जाईल. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने IMPS द्वारे ट्रान्सझॅक्शनची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या ट्रान्सझॅक्शनची लिमिट वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार आहेत
1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम फॉलो करावी लागेल. म्हणजेच चेकशी संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.

पीएनबीने दंड आणला आहे
पंजाब नॅशनल बँक जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा इन्व्हेस्टमेंट फेल झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 1 00 रुपये होता.

LPG सिलेंडरची किंमत
LPG च्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी सिलेंडरच्या किमती वाढतात का हे पाहावे लागेल.

“लिव्ह इन रिलेशन शिपला परवानगी देणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे” – संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मॉल आणि दुकानांमधून वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेल्या परवानगीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारचं हे पाऊल समाजाला विघातक दिशेकडे घेऊन जाणारं आहे. हा निर्णय रद्द करावा, यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं. याच पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्यही केलं आहे.

लिव्ह इन रिलेशनशीपचा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना भिडे म्हणाले की, महाभारत काळात यादवांच्यात प्रचंड भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता वाढली होती. त्यामुळे यादव एकमेकांचा जीव घेऊ लागले. त्यांना रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना नरसंहार करावा लागला. महाराष्ट्रात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पण आता श्रीकृष्ण नाहीत, हे लक्षात असू द्या. राज्य सरकारने घेतलेला निर्णय संतापजनक, राष्ट्रघातक आणि सर्वनाश करणारा आहे. या मंत्रिमंडळात राग येणारा कोणी भीम जिवंत नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एकही मंत्री किंवा आमदार बोलत नाही हे लांच्छनास्पद आहे, अशी खरमरीत टीका भिडे यांनी केली आहे.

आर. आर. पाटील यांचा दिला दाखला

यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी माजी मंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी केलेल्या डान्स बार बंदीचा दाखला दिला. आज आर.आर. आबा असते तर त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला असता. चिन्यांनी देश खाल्ला तरी तेच चायनीज चवीने खाणारा हिंदू समाज आपल्यात आहे. अनेक जातीच्या संस्थांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उठलं पाहिजे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

मुंबईतील नाईट लाईफवरही संभाजी भिडे यांनी टीका केली. मुंबईला नाईट लाईफ देण्याची भाषा ही समाजाला व्यभिचाराकडे घेऊन जाणारी आहे. आज दारूला परवानगी दिली. उद्या गांजा आणि आफूलाही परवानगी द्याल, असं म्हणत भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

अर्थसंकल्पाच्या अवघ्या 3 दिवस आधीच नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. त्याचवेळी, अर्थसंकल्पाच्या केवळ 3 दिवस आधी, केंद्र सरकारने डॉ. व्ही अनंथा नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजेच CEA म्हणून नियुक्ती केली आहे. केव्ही सुब्रमण्यम यांचा डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. सुब्रमण्यन हे 3 वर्षे देशाचे CEA होते.

नागेश्वरन कोण आहे ते जाणून घ्या
डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांना व्यवसाय आणि आर्थिक बाबींचा मोठा अनुभव आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद येथून 1985 मध्ये एमबीए केले. त्यानंतर, 1994 मध्ये, त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून वित्त विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली. स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अनेक खाजगी संवेल्थ मॅनेजमेंट इंस्टीट्यूशंससाठी रिसर्च मध्ये मोठी भूमिका बजावली आहे.

ते ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2019 पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. ऑक्टोबर 2019 मध्ये, त्यांची भारतातील पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी 2 वर्षे सांभाळली. ते क्रेडिट सुइस एजी आणि ज्युलियस बेअर ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह देखील आहेत.

धोरण तयार करण्याची जबाबदारी
नागेश्वरन यांची CEA म्हणून नियुक्ती झाल्यास, भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर परतण्यासाठी महत्त्वाचे धोरण तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. CEO पद हे अर्थ मंत्रालयातील सचिवाच्या समकक्ष आहे. आर्थिक प्रश्नांवर सरकारला मत देणे तसेच अर्थव्यवस्थेच्या मार्गातील अडथळे ओळखणे आणि ते दूर करण्याचे मार्ग सुचवणे हे त्यांचे काम आहे.

पुण्यातील शाळा, कॉलेज ‘या’ तारखे पासून सुरू; अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत घट होत असून आगामी १ फेब्रुवारी पासून पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पहिली ते ८ वीचे वर्ग ४ तास भरवले जातील तर ९ वि पासून पुढील वर्ग पूर्णवेळ भरवण्यात येतील असेही अजित पवार यांनी सांगितलं

एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल. जर करोना रुग्णसंख्या कमी राहिली तर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि इतर बाबी शाळा प्रशासनातर्फे पाहिल्या जाणार आहेत.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करणार आहोत. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे. आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर 7 वर्षांच्या उच्चांकावर, पेट्रोल डिझेलचे आमची किंमत तपासा

नवी दिल्ली । ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सात वर्षांच्या उच्चांकावर आहेत. ब्रेंट क्रूडचे भाव सध्या प्रति बॅरल 20 डॉलरवर आहेत. हा दर ऑक्टोबर 2014 नंतरचा उच्चांक आहे. असे असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL ने शनिवार 29 जानेवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

आजपर्यंतच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दरात वाढ केली जात नसल्याचे मानले जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतशनिवारी पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी किमती बदलल्या होत्या. त्यानंतर सरकारने दर कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल डिझेलची किंमत
>> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीन किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.