Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2870

‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज’ स्वीकारण्याचा मान

औरंगाबाद – प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री रॅलीमध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले. या संघातील देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धेश आप्पासाहेब जाधव यांना ‘प्राइम मिनिस्टर्स बॅनर’ (पंतप्रधान ध्वज) स्वीकारण्याचा मान मिळाला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मानाचा ध्वज स्वीकारला.

देवगिरी महाविद्यालयाच्या 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चा कॅडेट सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव यांनी दिल्ली येथे फिल्ड मार्शल करिअप्पा परेड मैदानावर काल झालेल्या पीएम राहिली 2022 मध्ये सहभाग घेतला. राज्याच्या संघाने या रॅलीमध्ये सर्वोत्कृष्टत्तेचा पंतप्रधान ध्वज स्वीकारला. ध्वज स्वीकारण्याचा मान सिद्धेश ला मिळाला आहे. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे प्रमुख उपस्थित होते.

या संघामध्ये निवड होण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शिबीर सुरू होते. त्यातून संघाची निवड केली नऊ जिल्ह्यांच्या औरंगाबाद एनसीसी विभागातुन राज्याच्या संघात तीन कॅडेटची निवड झाली. त्यात सिद्धेश समावेश होता. देवगिरी महाविद्यालयात अकरावीपासून शिकत असून सध्या तो बीएससीच्या प्रथम वर्ष व एनसीसीच्या तृतीय वर्षात आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडा मंत्री सुनील केदार, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, एनसीसीचे अधिकारी कॅप्टन डॉ. परशुराम बाचेवाड यांच्यासह महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

पालकांनो सावधान : आत्महत्या करणाऱ्या नववीतील मुलीने चिठ्ठीत लिहले असे काही

सातारा | सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्हीही विद्यार्थींनी या नववीत शिकणाऱ्या होत्या. त्यातील एका विद्यार्थ्यींने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामधील मजूकराने आता पालकांनी सावध होणे गरजेचे असून मुलांच्यावर अपेक्षाचे अोझे ठेवू नये असाच मजकूर चिठ्ठीत होता.

सातारा शहरातील उपनगरातील धुमाळ आळी येथील एका नववीत शिकणाऱ्या अनुष्का पवार या मुलींन गळफास घेवून आत्महत्या केली. तर दुसरीकडे कराड येथील मलकापूरमध्ये पायल लोंढे या नववीत शिकणाऱ्या मुलींन गळफास घेवून आत्महत्या केली. यामध्ये अनुष्का पवार या मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या चिठ्ठीमध्ये तिने म्हटलं आहे.

जिल्ह्यातील या दोन आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच शाळासह पालकांच्यात भीतीचे वातावरण आहे. अभ्यासावरील ताण आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे अनुष्काने जीवन संपवल्याची चर्चा आहे.

फोन कॉल करुन सेक्सची मागणी; शिवसेनेच्या विभागप्रमुखाला चपलेने चोपले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. जितू खाडे अस सदर व्यक्ती चे नाव असून या संपूर्ण प्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यासंपूर्ण प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओ मध्ये आयटम चाहीये?, असं म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते. पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

दरम्यान, यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे याने काही काळानंतर घटनास्थळावरुन पोबारा केल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त होतो आहे.

सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ते म्हणाले की, सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची विधानसभा असो, “नेशन विदिन नेशन” या तत्वावर चालते. सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीये. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सभागृहाच्या बाहेरील लोकाना लागू होतो.

सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय आहे. असेही ते म्हणाले.

पुणे- बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी : खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याचे नितीन गडकरीच्या हस्ते उद्घाटन

सातारा | राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगांवकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. वेळेची व पैशाची बचत होणार आहे. पुणे ते सातारा महामार्गाचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. पुणे ते बंगळूर सहा लेनचा नवीन ग्रीन फील्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे. या ग्रीन फील्ड महामार्गालगत नवीन शहरे निर्माण करावेत. त्यामुळे मुंबई व पुणे शहरावरील शहरीकरणाचा भार कमी होईल. सातारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा विकास होण्यास या महामार्गाचा उपयोग होईल. त्याचबरोबर राज्याच्या विकासालाही गती मिळेल. उत्तर भारतातील वाहतूक मुंबई पुणे न जाता सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूरमार्गे दक्षिण भारतात जाण्यासाठी नवीन महामार्ग करीत असल्याचेही सांगितले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, खंबाटकी घाटात नेहमी वाहतूकीची अडचण होत होती. परंतु या नवीन सहा मार्गिकामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोयीची होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक व अन्य वाहतुकीला फायदा होणार आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा आहे. खंबाटकी घाटात नवीन सहापदरी बोगदा (प्रत्येकी तीन पदरी दुहेरी बोगदा) – सदरील बोगद्याच्या ॲप्रोचेस चे काम वेळे येथून किमी 771.730 येथे सुरु होते आणि खंडाळा किमी 782.000 येथे समाप्त होते. बोगद्याच्या प्रत्येक ट्यूबमध्ये 10.5 मीटर रुंदीच्या कॅरेजवेसह तीन पदरी आहेत. बोगद्याची एकूण अंतर्गत रुंदी सर्वसाधारणपणे 16.16 मीटर (कमाल) आहे. कॅरेजवेच्या वरच्या काउन पर्यंत बोगद्याच्या आतील उभा क्लिअरन्स 9.31 मीटर आहे आणि किमान 5.5 मीटर उभा क्लिअरन्स आहे. बोगद्यामधील रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा आहे. बोगद्याची लांबी 1148 मीटर आहे. अडचणीच्या काळात दोन्ही बाजूच्या बोगद्यातून वाहतूक वळविण्यासाठी सिंगल लेन क्रॉस पॅसेज बोगदे 400 मीटर अंतरावर 5.5 मीटर कॅरेजवेसह बनविण्यात येत आहेत.

तडीपारीची कारवाई : उंब्रज, लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील 6 जण 4 जिल्ह्यातून हद्दपार

सातारा | जिल्ह्यातील लोणंद व उंब्रज पोलीस ठाणे हद्दीमधील विविध ठिकाणी गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यामधील 6 जणांना सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने करण्यात आली.

लोणंद पोलीस ठाणे हद्दीत खून, दरोडा, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे तसेच मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या टोळीचा प्रमुख राकेश उर्फ सोन्या भगवान भंडलकर (वय- 21 रा. तांबवे ता. फलटण), सौरभ संजय जगताप (वय- 21, रा. सालपे ता. फलटण) यांना जिल्ह्यातून तडीपार करणेबाबत सपोनि विशाल वायकर यापूर्वीच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बंसल यांनी सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून हद्दपारीचे आदेश दिले.

उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत खूना करीता अपहरण, गर्दीमारामारी तसेच अनेकांच्या जीवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने टोळीचा प्रमुख अक्षय शंकर पाटोळे (वय- 23 रा. पाटोळेवस्ती, शिरसवडी, ता. खटाव हल्ली रा. खडकपेठ मसुर ता. कराड), राहुल चंद्रकांत जाधव (वय- 21 रा. मसुर ता. कराड), शरद संजय चव्हाण (वय- 21, रा. मसुर ता. कराड), प्रसाद श्रीरंग जाधव (वय- 20, मसूर ता. कराड) यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख अजय बंसल यांनी एक वर्षाकरीता सातारा, सांगली जिल्हतील कडेगाव, खानापूर, वाळवा, शिराळा तालुका हद्दीपार करण्यात आले. वरील दोन्ही टोळीतील 6 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचेवतीने अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना. प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, कॉ. अनुराधा सणस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे; संभाजी भिडे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असतानाच आता संभाजी भिडे यांनी यामध्ये उडी घेतली असून राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

राज्याला महसूल मिळावा यासाठी समाजाला विघातक निर्णय घेणे चुकीचे आहे. किराणा दुकानात वाईन उपलब्ध करून राज्य शासनाला नेमके काय साधायचे आहे हा प्रश्नच आहे,” असंही भिडे म्हणाले. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे असे त्यांनी म्हंटल.

दारूला जर मुक्तता दिली जात असेल तर मग गांजा शेतीला का आडवे लावले जातेय? असा सवालही संभाजी भिडे यांनी केला. गांजा शेतीला परवानगी द्या असे म्हणाणारा हा समाज असल्याचे ते म्हणाले. दारुच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्रिमंडळशी बोलणार आहे. वाईनचा निर्णय मागे घ्यावा याबाबतची मागणी करणार आहे.

मराठवाडा गारठला ! औरंगाबाद @7.2 अंश

winter

औरंगाबाद – औरंगाबाद शहर मराठवाड्याच्या काही शहरी भागात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एमजीएम वेधशाळेत पहाटे किमान तापमान 7.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले परभणीत 8 तर चिकलठाणा वेधशाळेत 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

औरंगाबाद शहरात रविवारी किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस होते. त्यात सातत्याने मोठी घसरण होत असून गुरुवारी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यात 0.7 अंश सेल्सिअस ची घसरण होऊन काल चिकलठाणा वेधशाळेत 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सहा दिवसात तब्बल 7.3 अंश सेल्सिअस इतकी घसरण झाल्याने हुडहुडी भरवणाऱ्या बोचऱ्या थंडीला शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. तर सकाळी आणि सायंकाळी शहरवासीयांना घराबाहेर पडणे ही अवघड बनले आहे.

परभणीत 8, हिंगोली 9 तर नांदेडमध्ये 9.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच आगामी दोन ते तीन दिवस अशाच प्रकारे तापमान राहण्याची शक्यता असल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले आहे.

प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन्…

honey trap

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात हनी ट्रॅपची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एक व्यावसायिक हनी ट्रॅपचा शिकार झाला आहे. यामध्ये आरोपी महिलेने या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून दोन लाख रुपये वसूल केले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे.

काय आहे प्रकरण ?
जगदंबा कॉलनीत राहणारा 55 वर्षीय मुरारीलाल 15 जानेवारी रोजी शहरातील घंटाघर रोडने आपल्या घरी जात होते. त्यावेळी वाटेमध्ये एका महिलेने त्यांना थांबवून ओळख सांगून दोन हजार रुपयांची मदत मागितली. त्यानंतर व्यापारी मुरारीलालने महिलेला पैसे दिले. यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. यानंतर 18 जानेवारी रोजी भोगीराम कॉलनीत राहणाऱ्या 40 वर्षीय महादेवीने या व्यावसायिकाला पैसे परत करण्यासाठी हाऊसिंग बोर्ड कॉलनी मधील घरी बोलावले.

यानंतर या महिलेने जबरदस्तीने स्वतःचे कपडे काढले. यादरम्यान घरमालक सीताराम घरात घुसले. त्यांनी महिला आणि व्यावसायिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर घरमालक सीताराम याने व्यावसायिकाकडे चार लाख रुपयांची मागणी केली. जर त्याने ते पैसे दिले नाहीतर व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने दोन लाख रुपयांत सौदा केला. हे पैसे दिल्यानंतरही आरोपी या व्यावसायिकावर दबाव टाकत होते. यानंतर पीडित व्यावसायिकाने आरोपीं विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या सीतारामला ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला फरार असून पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.

शहरातील आठवी, नववी व अकरावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी

 

औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 8 वी 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग दि. 31 जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे.

काय आहे नियमावली – 

– शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोव्हिड 19 आरटीपीसीआर चाचणी करणे बंधन कारक राहील.

– विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

– कोरोनाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी.

– विद्यार्थी किंवा शिक्षक कोव्हिडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निजंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकिय अधिकान्यांच्या सल्लाने वैद्यकिय उपचार सुरु करावेत.

– जे विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातील आहेत त्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या पहिला डोस घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिला मात्रा घेतलेला नसेल त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.

– ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन/ दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावे.

– सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खाजगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

– विद्यार्थ्यांना आवशयक्तेनुसार शाळेत टप्प्याटप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलविण्यात यावे.

– विद्यार्थ्यांना शाळेत मध्यांतराची सुट्टी न देता वर्गातच सुरक्षीत अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी.