Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2871

इगतपुरीमध्ये दोन गटांत तुफान राडा, एकाचा मृत्यू

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे इगतपुरी तालुक्यात गुन्हेगारीने परिसिमाच गाठली आहे. या तालुक्यात दिवसाढवळ्या गँगवार पाहायला मिळत आहे. इगतपुरीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गॅंगवारमुळे इगतपुरीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. यामुळे इगतपुरीतले नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा गदारोळ होतो तोपर्यंत पोलीस कुठे असतात, पोलिसांना याबाबत कोनोकान खबरही लागत नाही? याशिवाय आरोपींना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेमुळे इगतपुरीच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा अशाप्रकारच्या घटना तरी कशा घडू शकतात? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. हे आरोपी गुंड इतक्या भयानक पद्धतीने एकमेकांना भिडतात त्यावेळी कुणी सर्वसामान्य तिथे आजूबाजूला असला तर त्याचाही जीव घ्यायला ते गुंड मागेपुढे बघणार नाहीत, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये या गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस आतातरी गंभीर दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इगतपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन व्हेरिएन्ट NeoCoV ज्याद्वारे संक्रमित दर 3 पैकी 1 व्यक्तीचा होऊ शकतो मृत्यू; त्याबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जग ओमिक्रॉनच्या धोक्याचा सामना करत आहे तर अनेक ठिकाणी डेल्टा व्हेरिएन्ट देखील दहशत निर्माण करत आहेत. अशा स्थितीत चीनकडून नवीन व्हेरिएन्ट समोर आल्याची चर्चा होते आहे. हा व्हेरिएन्ट मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) चे म्यूटेशन असल्याचे म्हटले जाते. MERS-CoV हा तो विषाणू आहे ज्यामुळे 2012 आणि 2015 मध्ये मिडल ईस्ट मधील देशांमध्ये उद्रेक झाला. NeoCoV नावाच्या या व्हेरिएन्टबाबत शास्त्रज्ञांनी चीनमध्ये चेतावणी जारी केली आहे.

‘या’ विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, NeoCoV आणि त्याचा जवळचा साथीदार PDF-2180-CoV वटवाघुळांच्या अँजिओटेन्सिन एन्झाइम 2 आणि मानवांच्या ACE 2 विषाणूचा वापर करून मानवी शरीरात प्रवेश करू शकतो. शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की, हा नवीन कोरोना विषाणू ACE2 रिसेप्टर कोविड-19 पेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त असू शकते. असे मानले जात आहे कि याची लागण झालेल्या दर तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकेल, .

मात्र, NeoCov विषाणूसंदर्भात वेक्टर रिसर्च सेंटरमधील काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, चीनमधील डेटा पाहता असे दिसते की, सध्या हा विषाणू मानवांमध्ये पसरण्याचा कोणताही धोका नाही.

शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत
आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही. शास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करण्यात गुंतले आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन विषाणू म्यूटेशनच्या रिपोर्टला प्रतिसाद दिलेला नाही. मात्र हा रिपोर्टआल्यानंतर जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले

पत्नीने न विचारता नवा मोबाईल घेतला म्हणून पतीने उचलले हे’ पाऊल

kolkata crime

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकातामध्ये एक अजब प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पतीची परवानगी न घेता नवा मोबाईल खरेदी केला. या गोष्टीचा पतीला राग आला त्यामुळे त्याने थेट पत्नीच्या हत्येचीच सुपारी दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पतीची मोबाईल खरेदी करण्याची इच्छा नव्हती मात्र पत्नीने त्याला न विचारता मोबाईल खरेदी केल्याने तो भडकला आणि त्याने पत्नीच्या हत्येची सुपारी दिली.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि धक्कादायक घटना कोलकाताच्या नरेंद्रपूर या परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि सुपारी किलर या दोघांना अटक केली आहे. पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीजवळ आपल्याला मोबाईल खरेदी कऱण्याची इच्छा आहे. मात्र आरोपी पतीने फोन घेऊन देण्यास नकार दिला. यानंतर या महिलेने स्वतःच फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या महिलेने लहान मुलांचे ट्यूशन घेऊन पैसे जमा केले आणि एक नवीन फोन खरेदी केला.

या महिलेने फोन खरेदी केल्याचे तिच्या पतीला समजताच तो रागावला आणि त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पत्नीच्या हत्येची सुपारीसुद्धा दिली. यासाठी आरोपी पतीने एका किलरला पैसेदेखील दिले होते. यानंतर या किलरने त्या व्यक्तीच्या पत्नीवर हल्ला केला. या महिलेवर घटनेच्या दिवशी दोन अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसानी या प्रकरणी हल्ला कऱणारा व्यक्ती आणि महिलेच्या पतीला अटक केली आहे तर अजून एकजण फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यावर्षी पगारात होणार 10% पेक्षा जास्त वाढ, जाणून घ्या काय म्हणतायत कंपन्या

SIP

नवी दिल्ली । 2022 हे वर्ष कोरोनाच्या काळात आधीच पगार कपातीमुळे आणि नोकऱ्यांच्या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या पगारदारांसाठी मोठी बातमी घेऊन आले आहे. यावर्षी कंपन्यांनी पगारात 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची तयारी केली आहे. असे झाल्यास पगारातील वाढ कोरोनाच्या कालावधीपूर्वीच्या पातळीवर पोहोचेल.

कॉर्न फेरी इंडियाने आपल्या वार्षिक सर्वेक्षण रिपोर्ट्स मध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये सरासरी पगार वाढ 9.4 टक्के असण्याचा अंदाज आहे तर 2021 मध्ये सरासरी वाढ 8.4 टक्के होती. एवढेच नाही तर 2019 मध्ये कोरोना कालावधीपूर्वी पगारात सरासरी 9.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सर्वेक्षणातील बहुतांश व्यावसायिकांनी या वर्षी व्यवसायावर साथीच्या रोगाचा फारसा परिणाम दिसणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळे कंपन्यांना त्यांचा नफा वाढण्यासही मदत होईल.

त्यामुळे वाढीव पगारवाढीची अपेक्षा आहे
गेल्या काही तिमाहीत, कंपन्या मजबूत फायदेशीर निकाल जाहीर करत आहेत. पगारातील वाढ मुख्यत्वे व्यवसायाची कामगिरी, इंडस्ट्री मेट्रिक्स आणि बेंचमार्किंग ट्रेंडवर अवलंबून असेल. याशिवाय कंपन्यांना टॅलेंटला गुंतवून ठेवण्यासाठी पगारात मोठी वाढ करायची आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 40 टक्के कर्मचारी ऍक्टिव्हपणे नवीन नोकरी शोधत आहेत.

आयटी क्षेत्र सर्वात जास्त पगार वाढवेल
टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात यावर्षी 10.5 टक्के आणि कंझ्युमर क्षेत्रात 10.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यानंतर लाइफ सायन्समध्ये 9.5 टक्के, सर्व्हिस, ऑटो आणि केमिकल कंपन्यांमध्ये 9 टक्क्यांपर्यंत पगार वाढू शकतो. सर्वेक्षण केलेल्या 786 कंपन्यांपैकी 60 टक्के कंपन्यांनी सांगितले आहे की,” ते आपल्या कर्मचाऱ्यांना वाय-फाय कव्हरेज भत्ता देणार आहेत.” केवळ 10 टक्के कंपन्यांनी प्रवास भत्ता कमी किंवा रद्द केल्याचे सांगितले.

रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांत डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात येत आहे तसेच रुग्णालयाची तोडफोडदेखील करण्यात येत आहे. नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये नागपूर येथील मानकापूर परिसरात असलेल्या कृणाल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या मृत्यू नंतर संतप्त झालेल्या जमावाने डॉक्टरांवर हल्ला करत रुग्णालयाची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कृणाल रुग्णालयात एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला करून रुग्णालयाची तोडफोड केली.

हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यावेळी हा जमाव रुग्णालयात तोडफोड करत होता त्यावेळी त्या ठिकाणीच रुग्णावर उपचार सुद्धा सुरू असल्याचे दिसत आहे. या रुग्णालयातील एका बेडवर वयोवृद्ध रुग्णावर उपचार सुरू होते आणि त्याच्याच शेजारी हा जमाव तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय काय मिळू शकेल ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । 2022 च्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांनाही मोठ्या आशा आहेत. कोरोना महामारी आणि महागाई या दुहेरी जखमांनी ग्रासलेल्या देशातील जनतेच्या जखमा भरून काढण्याचे काम सरकार नक्कीच करेल. यामध्ये इन्कम टॅक्स सूट, बचत आणि रेल्वे भाडे यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात.

इन्कम टॅक्सचा नवीन स्लॅब आकर्षक बनवण्यासाठी त्यात काही सवलती जोडल्या जाऊ शकतात. या नवीन स्लॅबमध्ये उच्च उत्पन्नाची मर्यादा 15 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते. नवीन स्लॅबमध्ये होम लोनसवलत देखील समाविष्ट केली जाऊ शकते. जुन्या स्लॅबमधील काही सेगमेंट मध्येही टॅक्स सूटीची मर्यादा वाढवता येऊ शकते.

PPF सारख्या योजनांमध्ये वार्षिक ठेव मर्यादा देखील दुप्पट केली जाऊ शकते. सध्या यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. ती 3 लाखांपर्यंत वाढवता येईल. त्यावर जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत कर सवलतीची मर्यादा देखील वाढविली जाऊ शकते.

कोरोना महामारीमध्ये हेल्थ सर्व्हिसेसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, सरकार हेल्थ इन्शुरन्सवर उपलब्ध कर सवलतीची व्याप्ती देखील वाढवू शकते. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा तर मिळेलच, हेल्थ इन्शुरन्सची मागणीही वाढू शकेल.

महामारीच्या काळात संसर्ग होऊ नये म्हणून बहुतेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चरचा अवलंब केला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स, इंटरनेट इत्यादींच्या रूपाने नोकरदार वर्गावर होणारा खर्चही वाढला आहे. वर्क फ्रॉम होमवरील या अतिरिक्त खर्चावर सरकार स्वतंत्र टॅक्स सूट देऊ शकते अशी अपेक्षा आहे.

यावेळी रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सरकार कोणत्याही प्रकारे प्रवासी भाड्यात वाढ करणार नाही, असा विश्वास आहे. किंबहुना, गेल्या वर्षी रेल्वे मालवाहतुकीच्या रूपात रेल्वेच्या कमाईत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे सध्या महसुलावर कोणताही दबाव नाही. त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळू शकतो.

देशातील गरीब आणि कामगार वर्गाची सामाजिक सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी सरकार रोख मदत सारखी योजना आणू शकते. या अंतर्गत शेतकऱ्यांप्रमाणे थेट त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाऊ शकतात. महामारीपासून, सरकार अशा योजनेचा विचार करत आहे आणि लेबर पोर्टलद्वारे मजूर आणि गरीबांचा डेटा देखील गोळा करत आहे.

पॅन- आधार लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ; घरबसल्या करा ‘हे’ काम

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली । आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहेत. आधार कार्डाशिवाय सरकारी योजना, सबसिडी, किसान सन्मान निधी आणि उज्ज्वला योजना यासारखे लाभ मिळू शकणार नाहीत, तर पॅन कार्डशिवाय बँक खाते आणि इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅनला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. जर 31 मार्चपर्यंत तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या सर्व खातेदारांना पॅन-आधार लिंकबाबत अलर्ट जारी केला आहे. 31 मार्च 2022 पूर्वी पॅन आणि आधार लिंकिंग न केल्यास ग्राहकांच्या बँकिंग सर्व्हिस कॅन्सल केल्या जाऊ शकतात. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले होते की,”कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करावे.”

जर पेमेंट तारखेपर्यंत पॅन-आधार लिंक झाले नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. त्यामुळे शेवटच्या तारखेपूर्वी पॅन-आधार लिंक केल्याचे सुनिश्चित करा. यासोबतच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. तुम्ही तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक खालील प्रकारे लिंक करू शकता-

एसएमएसद्वारे करा लिंक
तुम्ही घरबसल्या फक्त एका एसएमएसद्वारे तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 वर मेसेज करावा लागेल.

तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल. मेसेजमध्ये, UIDPAN<space><12 अंकी आधार कार्ड><space><10 अंकी PAN> टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर पाठवा.

इन्कम टॅक्स वेबसाइटद्वारे लिंक:
इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
मेन पेजवर, आपल्याला डाव्या बाजूला क्विक लिंक्स दिसतील.
दुसऱ्या ऑप्शनच्या टॉप वर ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे नाव, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
कॅप्चा कोड एंटर करा आणि OTP साठी बटण दाबा.
OTP एंटर करा आणि लिंक आधार बटणावर क्लिक करा.
असे केल्याने तुमचे स्वतःचे पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाईल.

अभिनंदन! ‘लोकशाही’ वाचली, पण अध्यक्ष महोदय..; उर्मिला मातोंडकरांचा फडणवीसांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर टीका करताना सत्यमेव जयते अस म्हंटल होत. त्यानंतर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यानी फडणवीसांवर पलटवार केला आहे.अभिनंदन! ‘लोकशाही’ वाचली, पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा असे त्यांनी म्हंटल.

यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. “अभिनंदन!आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असे ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले-
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही वाचविणारा आहे. हा ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मविआ सरकारच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली आहे.

अर्थसंकल्पाचा इतिहास माहित आहे का ?? ब्रिटिश काळापासून 2021 पर्यंतच्या अर्थसंकल्पाबाबत जाणून घ्या

नवी दिल्ली । ब्रिटीशांच्या काळात भारतात पहिल्यांदा 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. आता अर्थसंकल्प दुपारी अकरा वाजता सादर होणार आहे. यापूर्वी ब्रिटीशांच्या काळात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे. अर्थसंकल्पावर रात्रभर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचे अर्थसंकल्प सादर करणारे सर्वोच्च पदावरील पहिले व्यक्ती होते, जेव्हा त्यांनी 1958-59 मध्ये वित्त विभागाचा पदभार स्वीकारला होता.

मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी दहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात आठ अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प आहेत. मोरारजी देसाई यांच्यानंतर यूपीएमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी 9 वेळा आणि प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला. यशवंत सिन्हा यांनी 8 वेळा तर मनमोहन सिंग यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला.

केसी नियोगी हे भारताचे एकमेव अर्थमंत्री ठरले ज्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. 1948 मध्ये ते 35 दिवस अर्थमंत्री होते आणि त्यांच्यानंतर जॉन मथाई हे भारताचे तिसरे अर्थमंत्री झाले. 1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत प्रकाशित होत असे, मात्र 1955-56 पासून सरकारने ते हिंदीतही प्रकाशित करण्यास सुरुवात केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. पंतप्रधान असताना त्यांनी अर्थखातेही सांभाळले.

5 जुलै 2019 रोजी निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. म्हणजे निर्मला सीतारामन यांच्या आधी फक्त अर्थमंत्री राहिलेली अशी एकही महिला नव्हती. भाजप सरकारने लाल पिशव्यांची परंपरा संपवली. निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये बजट डॉक्युमेंट ब्रीफकेसऐवजी बही-खतामध्ये (पारंपारिक लाल कापडात गुंडाळलेला कागद) नेण्याची प्रथा सुरू केली.

भारतीय इतिहासात पहिल्यांदाच 2021 मध्ये अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस झाला. ते छापले गेले नाही. सर्व खासदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून मिळते. 2021 मध्ये जाहीर झालेले आर्थिक सर्वेक्षण देखील पूर्णपणे पेपरलेस होते. पहिले, जेव्हा ब्रिटनचे अर्थमंत्री संसदेत सरकारच्या खर्चाची आणि उत्पन्नाची माहिती देत ​​असत आणि ती लाल चामड्याच्या पिशवीत आणली जात असे.

धक्कादायक! विराटच्या ‘या’ सहकाऱ्याला पोलिसांकडून मारहाण

vikas tokas

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांनी मारहाण केली आहे. या पोलिसांनी क्रिकेटपटूच्या चेहऱ्यावर मारहाण केली आहे. यामध्ये या क्रिकेटपटूचा डोळा थोडक्यात बचावला आहे. विकास टोकस असे या क्रिकेटपटूचे नाव असून या प्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विकास टोकस हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमचा सदस्य होता.

विकास टोकस याने दिल्लीतील भिकाजी कामा पोलीस स्टेशनमधील पोस्ट इंचार्जच्या विरूद्ध हि तक्रार दाखल केली आहे. या अधिकाऱ्यानं आपल्याशी गैरव्यवहार केला. तसेच चेहऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत आपला डोळा थोड्यात बचावला असल्याचे विकासने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. विकासने या प्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात याबाबतचा ईमेल केला आहे. ’26 जानेवारी 2022 रोजी माझ्याबाबत जे घडलं त्याची तक्रार करण्यासाठी हा ईमेल करत आहे. मी नॅशनल आणि आयपीएल क्रिकेटपटू आहे. त्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यानं माझ्याशी केलेला व्यवहार निंदनीय होता. एका अधिकाऱ्यानं मला बुक्की मारली. माझा डोळा निकामी होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणाची तुम्ही तातडीने दखल घ्यावी असे तुम्हाला निवेदन करतो. कारण, या घटनेचा मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे,’ असे विकासने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. याबरोबर त्याने स्वतःचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

विकास टोकस याची कारकीर्द
विकास टोकस हा दिल्लीमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो या अगोदर रेल्वेकडून खेळला आहे. विकास टोकस याला आयपीएल 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने करारबद्ध केले होते. त्यावेळी विराट कोहली हा आरसीबीचा कॅप्टन होता. पण विकास टोकसला त्यावेळी एकाही आयपीएल मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने 15 फर्स्ट क्लास आणि 17 टी20 मॅच खेळल्या आहेत.