Friday, December 26, 2025
Home Blog Page 2894

भीमराव माने यांचे निधन

कराड । किरपे, (ता. कराड) येथील ज्येष्ठ नागरिक भीमराव अनंत माने (90) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. किरपे गावसह परिसरामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून भीमराव माने यांना ओळखले जाते.

भीमराव माने यांचा परिवार खूप मोठा असून त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, अकरा नातवंडे, परंतुडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दि. 25 रोजी सकाळी नऊ वाजता किरपे येथे होणार आहे.

सोशल मीडिया फीड्सप्रमाणे आपल्या मेंदूलाही अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो

नवी दिल्ली । एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आपला मेंदू सतत समृद्ध आणि व्हिज्युअल उत्तेजना (visual stimuli) अपलोड करत असतो. या कारणास्तव, रिअल टाइममध्ये नवीन इमेज पाहण्याऐवजी, आपण जुन्या इमेज पाहतो, कारण आपला मेंदू सुमारे 15 सेकंदात रिफ्रेश होतो. अमेरिकेतील कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासातून आपल्या मेंदूमध्ये निर्माण होत असलेल्या चित्रांचीसतत सुसंगतता (continuous harmony) आणि त्याच्या स्थिरतेबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

यूसी बर्कले येथील मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि व्हिजन सायन्सचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक डेव्हिड व्हिटनी यांनी सांगितले की,”जर आपला मेंदू रिअल टाइममध्ये अद्ययावत होऊ लागला, तर सावली, प्रकाश आणि हालचालींच्या चढउतारांच्या बाबतीत हे जग नेहमीच एक भ्रमित स्थिती अनुभवेल.” या अभ्यासाचा निष्कर्ष Science Advances या जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे.

तज्ञ काय म्हणतात ?
या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि स्कॉटलंडच्या अबरडीन विद्यापीठातील मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि यूसी बर्कले येथील व्हिटनी लॅबमधील पोस्टडॉक्टरल फेलो मौरो मानस यांनी सांगितले की,”आपला मेंदू हा टाइम मशीनसारखा आहे. तो आपल्याला वेळेत परत पाठवत राहतो. हे असे आहे की आपल्याकडे एक अ‍ॅप आहे जे आमचे व्हिज्युअल इनपुट दर 15 सेकंदांनी एका इंप्रेशनमध्ये एकत्रित करते जेणेकरून आपण दैनंदिन जीवन हाताळू शकू.”

अभ्यास कसा झाला?
संशोधकांनी त्या यंत्रणेच्या आधारे यासाठी काही प्रयोग केले, कारण सिनेमातील अभिनेता आणि त्याचा डबल स्टंट कलाकार यांच्यातील फरक लोकांना समजत नाही. संशोधनासाठी 100 सहभागींचा समावेश करण्यात आला होता. त्यांचे वय आणि लिंग यावर आधारित चेहरे बदलून त्यांना 30 सेकंदांच्या कालावधीत व्हिडिओ दाखवण्यात आले.

या व्हिडिओमधील इमेज डोक्यावर किंवा चेहऱ्यावरील केस दाखवत नाहीत, मात्र त्यांना काही अंदाज देण्यासाठी फक्त डोळे, नाक, हनुवटी, तोंड आणि घसा दिसत आहेत. जेव्हा त्यांना चेहरे ओळखण्यास सांगितले गेले तेव्हा बहुतेक सहभागींनी अर्ध्या व्हिडिओमध्ये पाहिलेली फ्रेम कॅप्चर केली. शेवटची नाही, जी त्यांच्या मेंदूत अपडेट केलेली इमेज होती. विटनीच्या म्हणण्यानुसार, या आधारावर कोणीही म्हणू शकतो की आपला मेंदू उशिराने काम करतो.

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा

सातारा | जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या तीन दिवसात त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाल्याने त्यांनी रूग्णालयातूनच आपल्या कामास सुरूवात केली आहे. खा. पाटील यांच्या कामाची पध्दत सर्वसामान्य लोकांना माहिती असून त्यांनी रूग्णालयातून कामांचा निपटारा करतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यशील असणारे सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वतः ट्विट करत तब्बेतीची माहिती दिली आहे.

दि. 20 जानेवारीला त्यांचा कोरोना अहवाल बाधित आल्याची माहिती त्यांनी स्वत: त्यांच्या सोशल मिडिया औकांऊटवरुन जिल्हावासीयांना दिली होती. रविवारी पुन्हा त्यांनी आपल्या औकाऊंट वरून रूग्णालयातून कामकाजास प्रारंभ केला असल्याची माहिती फोटोसह शेअर केली आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक करीत ‘साहेब, लवकर बरे व्हा.’अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्यानंतर एमपीएससी आयोगाने मात्र ट्विट करत पेपर फुटलाच नाही असे स्पष्टीकरण दिले.

विद्यार्थी काय म्हणतात-
एमपीएससी पेपर फुटला असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यातील एका विद्यार्थ्याने पेपरसुद्धा दाखवला. विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचे दिसले असाही दावा केला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना एक विद्यार्थ्यी म्हणाला, पेपर फोडला तेव्हा केंद्र प्रमुख नव्हते. जेव्हा मला पेपर पारदर्शक कागदात दिसला तेव्हा शंका आली. आम्हाला मोबाईल हॉलमध्ये नेता येत नाही. त्यामुळे खाली येवून बॅगमधून मोबाईल घेतला आणि अभाविपच्या संपर्क साधून माहिती दिली

पेपर फुटलाच नाही- आयोगाचे स्पष्टीकरण

दरम्यान, आजच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२१ चा पेपर फुटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे.

“मी राजकारणातील कुंभार, अनेक नेते तयार केले आहेत”; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेकवेळा जाते. मात्र, टीका करत असताना त्याच्याकडून अनेक वक्तव्ये केली जातात. असेच एक वक्तव्य आज दानवे यांनी केले. ” मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार  रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य मंत्री दानवे यांनी केले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, या ठिकाणी मी सध्या कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी तयार करायला आलो आहे. आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचे आहे. हे नगरपंचायत निवडणुकीत आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे.

राजकारणातील पक्षांमध्ये कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटं निघते. कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छदा होतो. सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे 3 उमेदवार 15 मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये 15 हजार मतांची आघाडी होती, ती 15 मतांवर आली आहे. अब्दुल सत्तार यांना आव्हान करतो कि आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभा रहावे. मी तयार आहे, असे आव्हान दानवे यांनी सत्तार यांना दिले .

सातारा हादरला ! 24 तासात पाच जणांची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एकाच दिवसात पाच जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे सातारा जिल्हा मोठ्या प्रमाणात हादरला आहे. या पाच जणांनी कौटुंबिक त्रासाला आणि आजारपणाला वैतागून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षांच्या खालील आहेत.

आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे
गणपत कणसे ( वय 35, विहे, पाटण )
सुमित गायकवाड ( वय 28,वडगाव हवेली, कराड )
अमोल पाटील (वय 37, सुपने, कराड)
अक्षय इंगवले (वय 27, किडगाव, सातारा)
पोपट ढेडे (वय 40. वाई, भुईंज)

कशा प्रकारे केली आत्महत्या
सुमित सुरेश गायकवाड या तरुणाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल निवासराव पाटील यांनी जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणपत कणसे यांनी आजारपणाला कंटाळून घरातच गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तर वाई तालुक्यातील भुईज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतल्या एमएसईबीच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. अक्षय हिंदूराव इंगवले यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट, अशाप्रकारे घरबसल्या जाणून घ्या

Aadhar Card

नवी दिल्ली । आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता ते सगळीकडे अनिवार्य देखील झाले आहे. त्याशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. जसजशी त्याची गरज वाढली आहे, त्याच प्रकारे त्याचा गैरवापराची प्रकरणेही वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीत सायबर गुन्हेगार कोणाच्या तरी आधारचा गैरवापर करून गुन्हे करत आहेत.

म्हणूनच, आता तुम्ही तुमच्या आधार कार्डाबाबत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. यासोबतच आधार कार्डची हिस्ट्री वेळोवेळी जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर तर करत नाही ना हे कळू शकेल. बनावट आधार कार्ड बनवून अनेकांना बनावट आधार कार्डही देण्यात आली आहेत. त्यामुळेच आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणे खूप सोपे आहे. UIDAI आधारची माहिती ऑनलाइन मिळवण्याची सुविधा देते. तुमचे आधार खरे आहे की बनावट हे तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन तपासू शकता.

अशा प्रकारे आहे संपूर्ण प्रक्रिया
सर्व प्रथम UIDAI आधारित वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
आता My Aadhar सेक्शनमधील Aadhar Services वर जा.
येथे Aadhar Verification टॅबवर क्लिक करा.
हे तुम्हाला वेगळ्या पेजवर घेऊन जाईल.
या पेजवर तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका. तसेच, कॅप्चा देखील या पेजवर दिसेल, तो बॉक्समध्ये एंटर करा.
हे दोन टाकल्यानंतर Proceed आणि Verify Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक बरोबर असल्यास एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुमचा आधार क्रमांक दिसेल. यासह, तुम्हाला काही डिटेल्स देखील दिसतील.
जर तुमचा आधार क्रमांक खोटा असेल तर हे पेज उघडणार नाही आणि इनव्हॅलिड आधार क्रमांक लिहिलेला दाखवला जाईल.
जर तुमचे आधार कार्ड बनावट निघाले तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता.
आधारशी लिंक केलेला कोणताही टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर करता येतो.

श्रीमती ताराबाई मुळे यांचे निधन

कराड | शहरातील आझाद चाैक येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यशवंत कोंडिबा मुळे यांच्या पत्नी श्रीमती ताराबाई यशवंत मुळे (वय 95) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. श्रीमती ताराबाई मुळे यांचे रविवार पेठ परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य सैनिकांशीही त्यांचा ऋणानुबंध होता.

काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय मुळे यांच्या त्या आई होत. तर काॅंग्रेसचे माजी नगरसेवक श्रीकांत मुळे व दैनिक तरूण भारतचे पत्रकार देवदास मुळे यांच्या आजी होत. त्यांच्यावर कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार सायंकाळी 6.30 वाजता होणार आहेत.

मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील – आदित्य ठाकरे

Aditya Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते घरीच आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना विचारले असता त्यांनी विरोधकांना फटकारत मुख्यमंत्री लवकरच ऍक्शन मोड मध्ये येतील असे म्हंटल आहे

आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले टीका करणे हे विरोधकानाचे कामच आहे.आपण विरोधाकांकडे लक्ष न देता काम करत राहावे. जनता मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या सोबत ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम ठीक आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना ऍक्‍शनमध्ये पाहू, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दरम्यान आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या मुख्यमंत्र्यांच्या तब्बेती वरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत अत्यंत उत्तम आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे, त्याच्याविषयी ते काहीतरी वक्तव्यं करत असतात. हे विरोधी पक्षाच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे”.असा टोला संजय राऊत यांनी लगावला.