Friday, December 26, 2025
Home Blog Page 2893

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री शहरात दाखल

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली. शिवप्रेमींची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून चौथऱ्यावर पुतळा कधी बसवायचा याचा मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.

मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून औरंगाबाद कडे निघाला. त्यानंतर शनिवारी रात्री नेवासा येथे मुक्कामी पुतळा थांबवण्यात आला. रविवारी पहाटे वाळुज पासून पुढे एका पेट्रोल पंपावर पुतळा थांबवण्यात आला होता. दिवसा शहरातील वाहतूक लक्षात घेता, मध्यरात्री पुतळा आणण्याचे ठरले. पुतळा आणताना क्रांती चौक परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

ट्रेलर मधून पुतळा खाली उतरवण्यासाठी मोठ-मोठे क्रेन मागवण्यात आले. पुतळ्याची लांबी 21 फुटांपेक्षा जास्त आहे. क्रांती चौकात पुतळ्याचे उर्वरित काम संबंधित कलाकाराकडून पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर चौथऱ्यावर पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही, असेही मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात पुतळा –
– 31 फुटांचा नवीन चौथरा
– 21 फूट पुतळ्याची उंची
– 2.5 कोटी चौथऱ्याचा खर्च
– 1 कोटी नवीन पुतळ्यासाठी खर्च

धक्कादायक ! लातूरमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील विशाल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या विशाल नगर परिसरामध्ये काही अज्ञात तरुणांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भरदिवसा विद्यार्थ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव राहुल सुरेश उजळंबे असे आहे. या तरुणावर कोणी आणि कोणत्या कारणावरून हल्ला केला हे अजून समजू शकले नाही. यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.

‘एक चुम्मा’ गाण्यावर लग्नात डान्स करताना अचानक खाली कोसळला तरुण अन्…

death video

बैतूल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात डान्स करत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलं की हा तरुण मस्करी करत आहे. यानंतर लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही त्यामुळे लोक घाबरले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेच्या वेळी लग्नाचे रिसेप्शन सुरू असताना सर्व नातेवाईक डान्स करीत होते. यानंतर हा तरुण स्टेजवर पोहोचला आणि ‘एक चुम्मा तो मुझको उधार दे दे’ या गाण्यावर डान्स करू लागला. तो खूप एन्जॉय करीत होता. यानंतर डान्स करत असताना अचानक नाचता नाचता खाली कोसळला. यावेळी सगळ्यांना वाटले कि तो नाटक करत आहे. यानंतर लोकांना संशय आल्याने लोकांनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही जागा झाला नाही.

यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या तरुणाने यावेळी दारूसुद्धा प्यायली होती. या तरुणाचा मृत्यू हृदयविकाऱ्याच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेने विवाहाच्या घरात शोककळा पसरली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तरुणाने सहज गंमत म्हणून 112 नंबरवर कॉल केला आणि मग…..

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जर आपण कोणत्या संकटात सापडलो असेल तर 112 हा पोलीस नियंत्रण कक्षाचा टोल फ्री नंबर डायल करून पोलिसांची मदत घेता येते. मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील एका तरुणाने याचा दुरुपयोग केला आहे. त्याने 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना खोट्या भांडणाची माहिती दिली आहे. पोलिसांचा वेळ वाया घालवून दिशाभूल केल्यामुळे त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.

आधी नागरिकांच्या मदतीसाठी 100 नंबर देण्यात आला होता. मात्र, लहान मुले, दारुडे आणि समाजकंटकांमुळे ठाणे अंमलदाराला यामुळे त्रास होत होता. यामुळे शासनाने 100 नंबर बंद करून 112 हा टोल फ्री नंबर सुरू केला होता. यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात करण्यात आली आहेत. अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भिल या तरुणाने 22 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 112 नंबरवर कॉल करून गावात वाद झाल्याची तक्रार केली आणि मदतीची मागणी केली. यावेळी नियंत्रण कक्षाकडून 112 च्या कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे यांना घटनेची माहिती देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी धनराज याने मी सहज मजाक मजाकमध्ये 112 ला कॉल केला. भांडण वगैरे नाही. पोलीस खरंच मदतीला येतात की नाही हे पाहत होतो, असे सांगितले. तसेच आरोपीने यावेळी दरदेखील प्यायली होती. यानंतर पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हकीकत यांना या घटनेची माहिती देताच आरोपीवर भादंवि कलम 182 आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आरोपी धनराज याला पोलिसांशी केलेली मस्करी महागात पडली आहे.

भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्याचा खून

लातूर – इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लातुरातील विशाल नगर भागात असलेलया श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर विद्यार्थ्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (20) हा मुळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, विशाल नगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारा तो थांबवला होता. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. काही समजायच्या आतच मारेकरी मोटरसायकलवरुन पासर झाल्याचे प्रत्यक्षर्शींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भरदिवसा घडलेल्या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली. घटनेमुळे दुकानदारांनी तातडीने दुकानंही बंद केली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली असता, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी घटनास्थळी भेट दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहन उजळंबे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोलापूरमधील ‘त्या’ मायलेकींच्या आत्महत्येचे कारण आले समोर; तिघांना अटक तर दहा जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये दोन मुलींसह विवाहितेने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नव्हते. त्यानंतर आता या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास तालुका पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून शेततळ्यात दोन्ही मुलींस उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पती आणि सासऱ्यासह तिघांना अटक केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे, दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत तर अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सासरच्यांकडून सतत मानसिक आणि शारिरीक छळ होत होता
मृत सारिका अक्षय ढेकळे हीचा चार वर्षांपूर्वी अक्षय ढेकळेसोबत विवाह झाला होता. यानंतर सासरच्या लोकांकडून सारिकाचा छळ करण्यात येत होता. सारिकाच्या माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून तिला सतत अपमानित करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, माहेरी फोनवर बोलू न देणे, दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे, मारहाण करणे असा छळ सुरू केला.

शेततळ्यात उडी घेऊन केली आत्महत्या
यानंतर या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर मृत सारिकाने आपल्या दोन मुलींसह घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत सारिकाची आई लक्ष्मीबाई व्यंकट सुरवसे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे या तिघांना शनिवारी न्यायदंडाधिकारी आर. ए. मिसाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

FD मध्ये चांगल्या रिटर्नसह पैसेही सुरक्षित राहतात; आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट (FD) खाते ही सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीसाठी लोकप्रिय योजना आहे. FD मध्ये, एखाद्याला ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. फिक्स्ड डिपॉझिट खात्यात जमा केलेल्या रकमेवर फिक्स्ड इंटरेस्ट तर मिळतोच पण सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात पैसे सुरक्षित राहतात. बाजारातील सर्व चढउतारांचा FD वर कोणताही परिणाम होत नाही.

FD वर पूर्व-निर्धारित दराने व्याज मिळते. जेव्हा FD मॅच्युर होते, तेव्हा मूळ रकमेसह व्याज दिले जाते. येथे गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदर आणि भांडवलाच्या सुरक्षिततेची गॅरेंटी दिली जाते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा पहिला पर्याय फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD दिसतो. वेगवेगळ्या बँकांच्या FD वर वेगवेगळे व्याजदर मिळतात.

FD चे प्रकार
तुम्ही FD मध्ये वेगवेगळ्या प्रकारे देखील गुंतवणूक करू शकता. तुमच्याकडे क्युम्युलेटिव्ह किंवा नॉन-क्युम्युलेटिव्ह FD मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. क्युम्युलेटिव्ह FD वरील व्याज डिपॉझिट्सच्या कालावधी दरम्यान जमा केले जाते आणि नंतर मुदतपूर्तीवर पूर्ण रिटर्न दिला जातो. तर नॉन-क्युम्युलेटिव्ह FD वर तुम्हाला मासिक, सहामाही किंवा वार्षिक व्याज मिळते.

सरकारी बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ठेवता येतात. बँकेत तुम्ही तुमच्या पैशाची FD 7 दिवसांसाठी देखील करू शकता आणि 10 वर्षांसाठी देखील पैसे गुंतवू शकता. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल तितके जास्त व्याज मिळेल.

FD चे फायदे
FD मध्ये, तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढण्याची संधी आहे. मात्र , जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढले तर तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. FD च्या या फिचरमुळे याला लिक्विड इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात. अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, यातून तुम्ही ताबडतोब पैसे काढू शकता.

FD वर कर्ज
तुम्ही केलेल्या FD वर बँकेकडून कर्जही सहज उपलब्ध होते. काही बँका त्याच्या आधारे ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील देतात. तुमची FD बँकांसाठी गॅरेंटी म्हणून काम करते, जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर कर्जाचे पैसे तुमच्या FD द्वारे कव्हर केले जातील.

कर सवलतीचा लाभ
तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी FD केल्यास, त्यावर आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूटही मिळते. या अंतर्गत तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळू शकते. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD केली तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.

तुमच्या आधारकार्डला किती मोबाईल सिम लिंक आहेत; ‘अशा’ प्रकारे करा चेक

Aadhaar Card

नवी दिल्ली । आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे आयडेंटिटी प्रूफ आहे. बँक खाते उघडण्यापासून ते मोबाईल सिम खरेदी करण्यापर्यंत आधार कार्ड जवळपास सर्वत्र आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर कोणी आपल्या आधारचा गैरवापर करत असेल तर आपल्याला कळतही नाही.

मोबाईल सिमकार्डच्या बेकायदेशीर वापराच्या पार्श्वभूमीवर, टेलिकॉम डिपार्टमेंट (DoT) ने अलीकडेच टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) टूल लॉन्च केले आहे. या ऑनलाइन टूल/पोर्टलच्या मदतीने युझर्स आपल्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

TAFCOP वेबसाइटद्वारे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम जारी केले आहेत हे सहजपणे शोधू शकाल. याशिवाय, तुम्ही ते नंबर देखील काढू शकता जे तुमच्या आधारवरून जारी केले आहेत. जर तुमच्या नकळत तुमच्या आधार क्रमांकाशी कोणताही मोबाइल क्रमांक जोडला गेला असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे ऑनलाइन करू शकता
1. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला पहिले https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जाणे आवश्यक आहे.
2. येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल.
3. यानंतर तुम्हाला ‘Request OTP’ बटणावर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल.
5. आता तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
6. जेथे युझर्स वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर नोंदवू शकतात आणि ब्लॉक करू शकतात.

बलात्कार करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी भररस्त्यावरून काढली धिंड

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विविध प्रकारचे गुन्हे करून परिसरातील लोकांच्या मनात आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या गावगुंडांची लोकांच्या मनातून भीती कमी व्हावी, यासाठी पोलिसांनी त्याची भररस्त्यावरून धिंड काढली आहे. तुळींज पोलिसांनी संबंधित गावगुंडाच्या हातात हातकडी आणि साखळी बांधून त्याची तब्बल दोन तास पायी धिंड काढली आहे. नागरिकांसोबत गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी या गावगुंडांची धिंड काढल्याचे सांगितले आहे.

मोनू रायडर असे या आरोपी गावगुंडाचे नाव आहे. आरोपी मोनू याने बळजबरीने घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली होती. यानंतर आरोपी मोनूच्या काही साथीदारांनी पीडित महिलेच्या पतीला दुचाकीवर बसवून एका अज्ञातस्थळी नेले व त्याला काही तास डांबून ठेवले. यानंतर मोनू रायडर या आरोपीने पीडित महिलेला धमकावून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा केल्या.

यानंतर या आरोपीने या महिलेच्या घरातील रक्कम लुटून नेली. तसेच या आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला आचोळे परिसरात दोन तास ओलीस ठेवले होते. या आरोपींनी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 च्या सुमारास संबंधित महिलेच्या पतीची सुटका केली होती. यानंतर पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार, अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या आरोपी मोनू रायडरवर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. यानंतर पोलिसांनी लोकांच्या मनातून या आरोपीची भीती कमी व्हावी म्हणून त्याची प्रगतीनगर परिसरातून धिंड काढली.

भीमराव माने यांचे निधन

कराड । किरपे, (ता. कराड) येथील ज्येष्ठ नागरिक भीमराव अनंत माने (90) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. किरपे गावसह परिसरामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून भीमराव माने यांना ओळखले जाते.

भीमराव माने यांचा परिवार खूप मोठा असून त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, अकरा नातवंडे, परंतुडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दि. 25 रोजी सकाळी नऊ वाजता किरपे येथे होणार आहे.