Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2905

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार; मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली येथील इंडिया गेट इथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. ट्विट मध्ये मोदींनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र शेअर केल आहे.

संपूर्ण देश नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत असताना मला हे जाहीर करण्यास आनंद होत आहे की त्यांचा ग्रॅनाईटमध्ये घडवलेला पुतळा इंडिया गेटवर उभारला जाईल. भारतावर त्यांचं जे ऋण आहे, त्याचं हे प्रतिक असेल. असे मोदी म्हणाले.

इंडिया गेट आणि राष्ट्रीय स्मारकच्यामध्ये एक रिकामी चबुतरा आहे. याच ठिकाणी नेताजींचा पुतळा उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा चबुतरा रिकामी आहे. याआधी या चबुतऱ्यावर जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. १९६८ साली तो चबुतऱ्यावरुन हटवण्यात आला आणि तो कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आला होता. तेव्हापासून हा चबुतरा रिकामीच आहे.

अमर जवान ज्योत विझवून मोदी सरकारकडून वीर जवानांचा घोर अपमान; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमर जवान ज्योत हि दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली आहे.मात्र, हि ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हलविण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या संघ विचाराच्या सरकारला जवानांच्या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? हि ज्योत विझवून मोदी सरकारने वीर जवानांचा अपमान केला असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योत हलवण्याच्या निर्णयावरून मोदी सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “अमर वीर जवानांचा जो गौरवशाली इतिहास आहे तो पुसण्याचा कृतघ्नपणा भाजपा सरकार करत आहे. ‘अमर जवान ज्योत’ विझवण्यासाठी देण्यात आलेले कारणसुद्धा अत्यंत तकलादू व बालिशपणाचे आहे.

आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व देशाच्या जडणघडणीत काडीचेही योगदान नाही. ते नेहरू गांधी यांचे योगदान नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपा सरकारने आज ‘अमर जवान ज्योत’ विझवली तरी देशवासियांच्या मनात ती कायम तेवत राहील,” असेही पटोले यांनी म्हंटले.

इंदिराजी गांधी यांनी 1971 साली पाकिस्तानला धडा शिकवत दोन तुकडे केले व जगाच्या नकाशावर बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात शहीद जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी ‘अमर जवान ज्योत’ विझवून त्यांचे योगदान पुसण्याचे पातक संघ विचाराचे सरकार करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

भारत-पाक युद्धातील शहीद जवानांचे स्मारक

1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या 3 हजार 843 भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम 1972 मध्ये ज्योत प्रकाशित झाली होती. यानंतर 26 फेब्रुवारी 1972 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचे उद्घाटन केले होते. केंद्र सरकारने 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले होते. 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या 26 हजार 466 भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी 2019 ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

आता यांत्रिक कर्मचारी‌, वाहतूक निरीक्षकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग

ST

औरंगाबाद – एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांचा आता चालक म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वाहतूक नियंत्रकाकडे वाहकाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर एसटीचालक म्हणून त्यांना कर्तव्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यांच्याकडून आरटीओ कार्यालयात अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञाप्ती बिल्ला काढण्यात येईल. सात दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

अहवाल समाधानकारक असलेल्या कर्मचाऱ्यांना चालक म्हणून कर्तव्य दिले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांचा खोचक सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन भाजपने अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण करत भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले असा खोचक सवाल शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, भाजप गांधीवादी कधीपासून झाले? भाजप आणि संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे., असं पवार म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून ती भूमिका केली. अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी रामायण आणि मुघलांच्या इतिहासाचा दाखल दिला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले.

कोल्हेंनी गोडसेला हिरो बनवू नये, महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका एका चित्रपटात शहारली आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हे हे एक लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेला हिरो बनवण्याचे काम करु नये. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमोल कोह्ले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. नथुराम गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षात घ्यावे. आणि यामध्ये लक्ष घालावे.

चित्रपटाच्या माध्यमातून नथुराम गोडसे सारख्या प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचे आहे. या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेले आहे, असे पटोले यांनी सांगितले.

EPFO ​​ने नोव्हेंबर 2021 मध्ये जोडले 13.95 लाख सदस्य, ऑक्टोबरच्या तुलनेत झाली 25 टक्क्यांनी वाढ

EPFO

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ​​या रिटायरमेंट फंडशी संबंधित संस्थेने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये 13.95 लाख नवीन ग्राहक EPFO ​​मध्ये सामील झाले आहेत. जे मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 2.85 लाख निव्वळ ग्राहकांची वाढ दर्शवते.

गुरुवारी माहिती देताना, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की,”नोव्हेंबर 2020 मध्ये 10.11 लाख नवीन ग्राहक जोडले गेले. त्याच वेळी, नोव्हेंबर 2021 मध्ये 13.95 लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. म्हणजेच थेट सुमारे 3.84 लाख नवीन सदस्यांची वाढ झाली आहे.”

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ग्राहकांच्या संख्येत 2.85 लाखांनी वाढ झाली आहे
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जोडलेल्या नवीन ग्राहकांच्या संख्येत 2.85 लाख (किंवा 25 टक्क्यांहून अधिक) वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ही संख्या 11.1 लाख होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जोडलेल्या एकूण 13.95 लाख निव्वळ सदस्यांपैकी 8.28 लाख नवीन सदस्य पहिल्यांदाच EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा कव्हर अंतर्गत आले. EPF आणि MP कायदा, 1952 अंतर्गत समाविष्ट असलेल्या संस्थांमधील नोकऱ्या बदलून सुमारे 5.67 लाख निव्वळ सदस्य EPFO ​​मधून बाहेर पडले, मात्र ते पुन्हा EPFO ​​मध्ये सामील झाले.

18-25 वयोगटातील सदस्य जास्त
पेरोल डेटानुसार, 22-25 वर्षे वयोगटातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. या वयाच्या ग्राहकांची संख्या 3.64 लाख आहे. यानंतर, 18-21 वयोगटातील 2.81 लाख ग्राहक जोडले गेले. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, पहिल्यांदाच नोकरीत सहभागी होणारे बहुतांश ग्राहक संघटित क्षेत्रातील आहेत. नोव्हेंबर महिन्यात या दोन वयोगटातील ग्राहकांचे योगदान 47.39 टक्के आहे.

या राज्यांमध्ये सर्वाधिक रोजगार
राज्यांच्या योगदानाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. लिंग बाबत बोलायचे तर महिला ग्राहकांची संख्या 2.95 लाख आहेत .

भारतीय रेल्वेच्या बैठकीत रेल्वे मंत्री नक्की असे काय म्हणाले की, ज्यानंतर रेल्वे बोर्डाच्या सदस्याने घेतला VRS

नवी दिल्ली । रेल्वे बोर्ड, ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉकच्या सदस्यांना बैठकीत रेल्वे मंत्री असे काय म्हणाले की, ज्यानंतर त्यांनी VRS साठी अर्ज केला. रेल्वे बोर्डाने त्यांचा अर्ज स्वीकारून VRS दिला आहे. जरी सदस्य ट्रेक्शन आणि रोलिंग स्टॉक मार्चमध्ये रिटायर होणार होते, त्यापूर्वी त्यांना VRS घेऊन कामावरून मुक्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नुकतीच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक घेत होत्या. या दरम्यान ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉकचे सदस्य राहुल जैन (IRSME) यांच्या कामावर समाधानी नव्हते. राहुल जैन यांनी दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी त्यांना स्वेच्छानिवृत्तीचा सल्ला देऊन रजेवर पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेलवे बोर्ड द्वारा जारी किया गया लेटर.

राहुल जैन यांनी 10 जानेवारी रोजी रेल्वे बोर्डाकडे VRS साठी अर्ज केला आणि तीन महिन्यांच्या नोटिस कालावधीतून सूट मिळावी यासाठी प्रार्थना केली. कारण ते 15 मार्च 2022 रोजी रिटायर होत होते. अर्ज स्वीकारताना रेल्वे बोर्डाने त्यांना VRS रेल्वे बोर्डाचे उपसचिव एचसी जैन यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’

aurangabad Airport
aurangabad Airport

औरंगाबाद – राज्माची पर्यटन राजधानी औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेला वेग दिला जात आहे. निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमानतळाचा नकाशा तयार होताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात रायपूरसोबत औरंगाबाद अशा एकत्रितपणे विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर 2021 मध्ये देशातील 13 विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला. या 13 विमानतळांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. देशातील अमृतसर, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी या 6 मोठ्या विमानतळांचे आणि हुबळी, तिरुपती, औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर, गया या 7 छोट्या विमानतळांचे खासगीकरण करण्याचे ठरले.

चिकलठाणा विमानतळावरील सोयी-सुविधा आता चांगल्या आहेत. खासगीकरणामुळे त्यात पुढे आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, विमानतळाचे खासगीकरण होणार आहे. सध्या विमानतळ जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरु आहे.

Share Market : सेन्सेक्स 427 अंकांनी घसरला तर निफ्टी 17650 च्या खाली बंद झाला

Recession

नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली आणि शेवटी सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर बंद झाले. शुक्रवारी ट्रेडिंग अंती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 427.44 अंकांनी म्हणजेच 0.72 टक्क्यांनी घसरून 59,037.18 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 109.75 अंकांनी म्हणजेच 0.79 टक्क्यांनी घसरून 17,617.15 वर बंद झाला.

गुरुवारही खाली आला
एका दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ट्रेडिंग संपल्यावर सेन्सेक्स 634.20 अंकांनी किंवा 1.06 टक्क्यांनी घसरून 59,464.62 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 181.40 अंकांनी किंवा 1.01 टक्क्यांनी घसरून 17,757 वर बंद झाला.

फॉर्च्युन ऑइल निर्माता कंपनी अदानी विल्मार शेअर बाजारात लिस्ट होणार आहे
फॉर्च्युन ऑइल निर्माता अदानी विल्मर लिमिटेड म्हणजेच AWL ने शुक्रवारी त्यांच्या 3,600 कोटी IPO साठी 218-230 रुपये प्रति शेअर प्राईस कॅटेगिरी निश्चित केली. कंपनीचा IPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 31 जानेवारीला बंद होईल. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. अदानी विल्‍मार ही अहमदाबादस्थित अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्‍मार ग्रुपची जॉइंट व्हेंचर कंपनी आहे. यामध्ये दोघांचे 50:50 स्टेक आहेत.

रिफाइंड तेलाच्या किमती वाढू शकतात; ‘हे’ आहे कारण

edible oil

नवी दिल्ली । आगामी काळात स्वयंपाकघर आणि उद्योगांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाई चा झटका बसणार आहे. खरं तर, भारताला पाम तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाने आपली शिपमेंट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील पामतेलाची आवक कमी होणार असून, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठ आणि ग्राहकांवर होणार आहे.

खाद्यतेल उद्योगाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,”मलेशियातून आयात वाढवून आम्हाला इंडोनेशियातील कमी पुरवठ्याची भरपाई करायची आहे, मात्र तिथून इतके पामतेल मिळणे शक्य नाही ही समस्या आहे. इंडोनेशियाने देशांतर्गत बिलाद्वारे पाम तेलाची निर्यात कमी करण्याबाबत बोलले आहे, जेणेकरून देशांतर्गत किमती खाली आणता येतील.”

इंडोनेशियामधून 60 टक्के आयात
भारत इंडोनेशियामधून 60 टक्के पामतेल आयात करतो. त्यामुळेच इंडोनेशियातून कमी तेल आल्याचा थेट परिणाम भारतीय देशांतर्गत बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. भारत दरवर्षी खाद्यतेलाच्या एकूण गरजेपैकी दोन तृतीयांश आयात करतो, जे सुमारे 1.5 कोटी टन आहे. मलेशिया हा इंडोनेशियानंतरचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, जो भारताच्या पामतेलाच्या वापराच्या 40 टक्के निर्यात करतो.

भारत ही रणनीती अवलंबणार आहे
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आयात धोरणात बदल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाम तेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल यासारख्या तेलांनी आपण आपल्या गरजा भागवू. अमेरिका सोया तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे.

50 वर्षांनंतर पाम तेलाची आयात कमी होईल
सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तुलनेत पाम तेलाची आयात 50 वर्षांनंतर कमी होईल, असे खाद्यतेल उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पामतेलाची एकूण आयात फेब्रुवारीमध्ये 5 लाख टन, तर सूर्यफूल आणि सोयाबीनची आयात 6 लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

मोहरी तेलाचे भाव कमी होतील
दरम्यान, ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की, पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे विक्रमी 120 लाख टन मोहरी उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाचे भाव पूर्णपणे खाली येण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये मोहरीच्या तेलाची किंमत 200 रुपये प्रति लिटरवर पोहोचली होती. 2020-21 मध्ये सुमारे 87 लाख टन मोहरीचे उत्पादन झाले. यावर्षी मोहरीचे क्षेत्र 90.5 लाख हेक्टरवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी 61.5 लाख हेक्टर होते.