Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2904

मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला इमारतीला आग; 15 जखमी तर 2 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाचं असून अग्निशमन बचावकार्य करत आहे. या घटनेत 15 जण जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 13 फायर इंजिन आणि 7 जंबो टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर आणि स्थानिक आमदारांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सहा वृद्धांना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग नियंत्रणात आली असून सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावर बापलेकास टेम्पोने उडविले, जमावाची चालकास मारहाण

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार येथे एका आयशर टेम्पोची दुचाकी स्वाराला ठोकरले असल्याची घटना शनिवारी आज दि. 22 रोजी सकाळी घडली. या घटनेत बापलेक गंभीर जखमी झाले असून त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कराडहून- कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाठार येथे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील गणेश मोहिते व त्यांचा बारा वर्षाचा मुलगा जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जमावाने टेम्पो चालकांस चांगलाच चोप दिला.

वाठार येथे टेम्पो (क्र. एमएच-43- ईएक्स-2934) या ट्रकने दुचाकीला ठोकरले. अपघातात दुचाकीवरील बापलेक गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

शिवसेना- आप ची ऑफर का स्वीकारली नाही? उत्पल पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अखेर पणजी मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकर याना भाजपने पणजीतून तिकीट देण्याचे नाकारल्या नंतर त्यांना शिवसेना आणि आम आदमी पक्षाने ऑफर दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसेना आणि आपची ऑफर का नाकारली असा सवाल त्याना केला असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले.

उत्पल पर्रीकर म्हणाले, मी माझ्याच पक्षाच्या दुसऱ्या ऑफर स्वीकारल्या नाहीत, तर इतरांच्या ऑफर काय स्वीकारणार.’ माझ्या वडिलांच्या मूल्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. मला कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, हे भाजपला पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे संधीसाधू उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान, उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष लढणार असतील तर त्यांच्या उमेदवारी ला पाठिंबा देऊन त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार उभा करू नये असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे पणजी मतदारसंघात नेमकं कोणाकोणात सामना होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

लस न घेणारे हजारावर नागरिक कोरोनाबाधित

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार 340 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल एक हजार 75 जणांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वीस दिवसांत सुमारे सहा हजार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान अनेकांना तीव्र लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वॉररूममधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी दिवसांतून तीनवेळा संपर्क साधला जात असून, त्यासाठी वॉररूममध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या तीन हजार 340 रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यात लस घेतली आहे का? असा प्रश्‍नही रुग्णांना करण्यात आला असता दोन हजार 44 रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले तर लसीचा एक डोस घेतलेला आहे, असे 221 जणांनी सांगितले. एक हजार 75 जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे सांगितले.

मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून साखरेने गच्च भरलेल्या ट्रकला अपघात; वाहक ठार!

परभणी प्रतिनिधी :  मद्यधुंद ट्रक चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरीजवळ घडली आहे. राज्यरस्ता क्रमांक 61 वर पोहेटाकळी जवळ गोलाईमध्ये शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला आहे.

परभणीतील पाथरी तालुक्यात येणाऱ्या राज्यरस्ता 61 वर असणाऱ्या पोहेटाकळी ते रेणापुर दरम्यान तीव्र वगळण्याचा रस्त्यावर शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाथरी कडून परभणीच्या दिशेने साखरेचे पोते घेऊन जात असलेल्या एम एच 15 सीके 0519 ट्रक चालकाचा मद्यधुंद अवस्थेत गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जात अपघात झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये ट्रक चा समोरील भाग शेताच्या धुऱ्याला आदळल्याने त्याचा चेंदामेंदा झाला. घटनेवेळी गाडीत असणारे साखरेचे पोते केबिनवर गेल्याने वाहक ज्ञानेश्वर शिवाजीराव पावडे वय 45 रा झरी ता. परभणी अडकून गंभीर जखमी झाला.

दरम्यान यावेळी लोकांनी एकच गर्दी केली होती. उपस्थित लोकांनी सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर केबिन मधून गंभीर जखमी वाहकाला बाहेर काढण्यास यश आले. अपघातात मात्र चालक सुखरूप वाचला असून घटनास्थळी तो मदधुंद अवस्थेमध्ये दिसून आला. जखमी असलेल्या व्यक्तीस घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले .

वार्ष‍िक सर्वसाधारण योजनेत 385 कोटी रूपयांस अजित पवारांची मंजुरी

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा वार्ष‍िक सर्वसाधारण योजनेत 315 कोटीच्या मर्यादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने 500 कोटी रूपयांचा 184 कोटी रूपयांच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला. परंतु कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला 70 कोटी रूपये अधिक देत 385 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंजुरी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) 2022-23 प्रारूप आढावा बैठक व्हीसीद्वारे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचीही उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह मराठवाड्याला लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांचे रूग्णही घाटीत उपचारासाठी दाखल होतात. कोरोना सारख्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याशिवाय इतर विकासकामे करणे निधीअभावी करणे शक्य होत नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरूस्ती करणे आहे. तसेच रस्त्यांचेही नुकसान झालेले आहे. पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलिस वाहने, शाळा दुरूस्ती आदी बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याचेही त्यांनी वाढीव 184.16 कोटी निधी मंजूर करावा असे वित्तमंत्री पवार यांना सांगितले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) 2022-23 चा प्रारूप 184.16 कोटीच्या अतिरिक्त मागणीसह 500 कोटींचा जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला आराखडा सादर केला. यामध्ये कृषी व संलग्न सेवांसाठी 19.25, ग्रामविकास 11.74, सामाजिक व सामुहिक सेवा 69.95, पाटबंधारे व पूरनियंत्रण 17.53 कोटी या एकूण गाभा क्षेत्रासाठी 118.47 कोटी आणि अपारंपरिक ऊर्जा 7.35, परिवहन 11.95, सामान्य सेवा 32.32 आणि सामान्य आर्थिक सेवा यांसाठी 4.86 अशा बिगर गाभा क्षेत्रासाठी 56.48 कोटी, तर इतर योजनांसाठी 9.21 कोटी असे एकूण 184.16 कोटी रूपयांची 315.84 कोटीच्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार अति‍रिक्त मागणी 184.16 कोटी रूपयांचा 22-23 चा प्रारूप आराखडा सादर केला. आमदार बंब, जयस्वाल, दानवे यांनीही यावेळी अर्थसंकल्पात जिल्ह्यातील बाबींचा समावेश करण्याबाबत विचार मांडले.

कितीही गुन्हे दाखल झाले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

औरंगाबाद – खासगी कोचिंग क्लासेसकडे शॉप ऍक्टचा परवाना असल्यामुळे हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यवसाय सुरू असताना केवळ कोचिंग क्लासेस बंद ठेवणे म्हणजे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यातील 27 जिल्ह्यात नियमांचे पालन करून आम्ही ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच ठेवणार आहोत. क्लासेसला लटारू दरोडेखोरांसारखी वागणूक देवू नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष पी. एम. वाघ यांनी पत्रकार परीषदेत दिला.

14 मार्च 2020 पासून राज्यातील कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्र बंद आहेत. त्यावर अवलंबून संचालक, खासगी शिक्षक, कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे आता जगणे शक्य नाही. जेंव्हा इतर सर्व क्षेत्र बंद होतील, तेंव्हाच क्लासेस बंद ठेवले जातील, असे वाघ यांनी सांगीतले. नववीतील अभ्यास, क्रीया विद्यार्थ्यांना अकरावी आल्यावर सुद्धा येत नाही. वर्गोन्नतीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी घसरली असताना कोचिंग क्लासेस बंद ठेवणे चुकीचे आहे. सभा, निवडणूका, मिरवणुका, मॉल, बाजारपेठेतील गर्दीतून फिरताना कोरोना होत नाही का? असा सवाल राज्य उपाध्यक्ष संदिप म्हस्के यांनी उपस्थित केला.

अवघ्या दोन महिन्यावर दहावी, बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे कोचिंग बंद ठेवता येणार नाही. सर्व सुचना, नियमांचे पालन करून ऑफलाईन पद्धतीने राज्यभरातील सीसीए संलग्नीत क्लासेस सुरु राहणार असल्याचे राज्यसरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे म्हणाले. नियमावली करून क्लासेस सुरू होते. सर्व क्षेत्र सुरू आहेत तसेच क्लासेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहू द्या. मनपाने दबावतंत्र वापरु नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

ठरलं तर!! उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार; पणजीतून भरणार उमेदवारी अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघातुन अपक्ष निवडणूक लढणार आहेत. उत्पल पर्रीकर याना भाजपकडून उमेदवारीं मिळाली नव्हती त्यानंतर त्यांनी इतर कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मात्र तरीही मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे’, अशी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी आज केलीय.

भाजपा आणि अपक्ष हे दोन मार्ग माझ्याकडे होते. भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे अपक्ष अर्ज केला आहे. मनोहर पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही मंत्रिपदाची वगैरे अपेक्षा नाही असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला आहे. शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व इतरांसोबत केलेल्या चर्चेनुसार मार्गदर्शक सूचनानूसार महानगरपालिका हद्दीतील फक्त इयत्ता 10 वी व 12 वी चे प्रत्यक्ष वर्ग अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यासंदर्भात आज आदेश पारीत केले आहे.

या आदेशात नमूद केले आहे की, कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केलेले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळा व खाजगी शाळा यांच्या बरोबर चर्चा करून औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी समीती गठीत करण्यात आली आहे. ही समिती नियमांचे पालन करून घेणार आहे.

काय आहे नियमावली – 

– शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच शाळा सुरु करण्यासाठी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोव्हिड 19 आरटीपीसीआर चाचणी करणे बंधन कारक राहील.

– विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

– कोरोनाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी.

– विद्यार्थी किंवा शिक्षक कोव्हिडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निजंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकिय अधिकान्यांच्या सल्लाने वैद्यकिय उपचार सुरु करावेत.

– ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या पहिला डोस घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिला मात्रा घेतलेला नसेल त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.

– ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन/ दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावे.

– सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खाजगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

– विद्यार्थ्यांना आवशयक्तेनुसार शाळेत टप्प्याटप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलविण्यात यावे.

– विद्यार्थ्यांना शाळेत मध्यांतराची सुट्टी न देता वर्गातच सुरक्षीत अंतर ठेवून जेवणाची व्यवस्था करावी.

औरंगाबादेतील प्रस्तावित मेट्रो जालन्यापर्यंत करा

Mumbai Metro

औरंगाबाद – औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेली मेट्रो रेल्वे ही जालन्यापर्यंत व्हावी, अशी मागणी राजकीय क्षेत्रानंतर आता औद्योगिक क्षेत्रातून ही होत आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्ताविक ही मेट्रो जालना शहरापर्यंत आली तर त्याचा जालना औद्योगिक क्षेत्राला ही फायदा होईल. तसेच रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळेल त्यामुळे ही मेट्रो रेल्वे जालन्यापर्यंत आली पाहिजे असा सुरू निघत आहे.

दरम्यान औरंगाबाद येथील वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहत मेट्रो रेल्वे मार्ग विचाराधीन असून याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार होण्यास अजून अवधी आहे. मात्र, या तपशीलवार प्रकल्प अहवालात जालना शहरापर्यंत मेट्रो रेल्वेचा ही विचार केला जावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसीला जोडणारी मेट्रो रेल्वे सेवा प्रस्तावित आहे. त्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी महामेट्रोला देण्यात आले आहे. डीपीआरसाठी लागणारा खर्च औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे केला जाणार आहे. यासोबतच वाळूज ते शेंद्रा एकच उड्डाणपूल तयार करणे व शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार केला जाणार आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यात डीपीआर तयार होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.