Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2906

Yes Bank चे माजी एमडी राणा कपूर यांचा जमीन अर्ज दिल्ली कोर्टाने फेटाळला; पहा काय आहे प्रकरण

नवी दिल्ली । दिल्लीतील एका न्यायालयाने येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना बँकेचे 466.51 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला.

विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी राणा कपूरला दिलासा देण्यास नकार देताना सांगितले की,”त्यांच्यावर खूप गंभीर आरोप आहेत. सध्याच्या प्रकरणातील एकूण तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, आरोपीवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने, या टप्प्यावर त्यांच्या जामीनासाठी कोणतेही कारण तयार केले जाऊ शकत नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी राणा कपूरचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

राणा कपूर काय म्हणाले ?
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर कपूर यांनी हा अर्ज दाखल केला होता. कपूर यांनी न्यायालयाला सांगितले की,”तपासादरम्यान त्यांना ED ने अटक केलेली नाही आणि आरोपपत्र आधीच दाखल केले असल्याने, त्यांना या प्रकरणात कोठडीत पाठवण्याचा कोणताही हेतू साध्य होणार नाही.”

राणा कपूर सध्या ED च्या अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. ED चे विशेष सरकारी वकील एनके मट्टा यांनी या अर्जाला विरोध केला आणि कपूर यांनी गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे न्यायालयाला सांगितले.

15 आरोपींना जामीन मिळाला आहे
मात्र, न्यायालयाने या प्रकरणात बी हरिहरन, अभिषेक एस पांडे, राजेंद्र कुमार मंगल, रघुबीर कुमार शर्मा, अनिल भार्गव, तापसी महाजन, सुरेंद्र कुमार खंडेलवाल, सोनू चढ्ढा, हर्ष गुप्ता, रमेश शर्मा, पवन या इतर 15 आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. कुमार अग्रवाल, अमित ममतानी,आशिष अग्रवाल, अमित कुमार आणि विनोद बाहेती यांना जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायाधीशांनी सांगितले की,”तक्रारीच्या तथ्यांमध्ये असे दिसते की हे 15 आरोपी या प्रकरणातील अन्य आरोपी गौतम थापर किंवा राणा कपूर यांच्या निर्देशानुसार काम करत होते.” “या आरोपींनी तपासादरम्यान नेहमीच सहकार्य केले आणि तपास यंत्रणेने बोलावल्यानंतर ते तपासात सहभागी झाले,” असेही न्यायालयाने म्हटले आहे.

ट्रायल कोर्टाने यापूर्वी अवंथा ग्रुपचे प्रमोटर उद्योगपती गौतम थापर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. थापर यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. थापर यांना ED ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

गोवा निवडणूक : शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर; आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली असून आज आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच गोव्यात आदित्य ठाकरे हे पक्षाच्या प्रचारासाठी येतील असेही राऊत म्हणाले.

आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. संजय राऊत म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय.

शिवसेने कडून पणजीतून शैलेश वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर जर पणजी मधून अपक्ष लढले तर शिवसेनेचा उमेदवार अर्ज मागे घेईल असे राऊत यांनी म्हंटल. याशिवाय पेडणेतून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, परयेमधून गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि  केपेमधून अॅलेक्सी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा शिवसेने कडून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात प्रचाराला येतील,  युवासेनेचे प्रमुख नेते येतील, तर काही मतदार संघात शिवसेनेचे युवा मंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचारात उतरतील अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.

अखेर लेबर कॉलनी होणार इतिहासजमा; ‘या’ तारखेला होणार कारवाई

dangerous buildings in Aurangabad
dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – प्रशासन विरुद्ध नागरिक असा अनेक वर्षांपासूनचा वाद सुरु असलेल्या लेबर कॉलनीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हं आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी रहिवाश्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने रहिवाश्यांना दोन महिन्यात घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कॉलनी रिकामी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुदत संपताच जिल्हा प्रशासन कॉलनीतील घरे पाडण्याची कारवाई हाती घेईल.

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 1952 मध्ये औरंगाबादसह नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर येथे लेबर कॉलनी बांधण्यात आली. उद्योग जगतातील कामगारांसाठी या वसाहती बांदण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेऊन ही घरे कर्मचाऱ्यांना दिली. मात्र रहिवाश्यांनी निवृत्तीनंतरही घरांचा ताबा सोडला नाही. इतर ठिकाणी रहिवाशांच्या नावे घरे करण्यात आली, तसा निर्णय येथेदेखील लागू करावा, अशी रहिवाशांची भूमिका होती. मात्र निवृत्तीनंतर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना घरांवर हक्क नाहीच, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. याविरोधात रहिवाश्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. नोव्हेंबर महिन्यात 8 नोव्हेंबरपर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने बजावली होती. मात्र त्यानंतर नागरिकांनी मोठे आंदोलन उभारले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणही केले. अखेर दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने रहिवाश्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश गुरुवारी दिले.

उच्च न्यायालयाने रहिवाश्यांना दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. या काळात घरे रिकामी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ही मुदत संपल्यानंतर लगेच 21 मार्च पासूनच लेबर कॉलनीतील मोडकळीस आलेली सर्व घरे पाडण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

चौथ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण, छोट्या गुंतवणूकदारांसाठी आता बाजारात पैसे टाकण्याची योग्य वेळ आहे का?

Stock Market

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स कालच्या पातळीपासून सुमारे 450 अंकांनी घसरत होता. एक वेळ अशी होती की, तो सुमारे 750 अंकांनी घसरला होता. आजच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी आणि इतर निर्देशांकांनी थोडी सुधारणा केली असली तरी गुंतवणूकदारांनी आनंदी होता कामा नये. ही घसरण आणखी काही काळ सुरू राहू शकते.

इकॉनॉमिक टाईम्समधील एका बातमीनुसार, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी यूएस फेडरल बँकेने 2022 मध्ये दर चार वेळा वाढवण्याची चर्चा आणि भौगोलिक-राजकीय तणावामुळे डॉलरच्या मागणीत झालेली वाढ भारतीय बाजारासाठी वाईट ठरत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला आणि हेच या मोठ्या घसरणीमागे कारण आहे.

FPI ने आधी शेअर्स खरेदी केले, आता विकले
जर आपण आकडेवारी पाहिली तर हे समजण्यासारखे आहे की, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारात 4,197 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. इंडिया विक्स (India VIX) मधील वाढीचाही हाच ताण तुम्ही पाहू शकता. इंडिया VIX निर्देशांकाचा वापर बाजारातील भीती मोजण्यासाठी केला जातो. भीती जितकी जास्त तितकी VIX जास्त आणि भीती कमी झाली की VIX सुद्धा थंड होतो किंवा कमी होतो.

इंडिया VIX 8.3 वरून 19.28 पर्यंत वाढला आहे. ही खूप उच्च पातळी आहे. येत्या 30 दिवसांत बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

‘खरेदीची घाई नको’
व्हीके विजयकुमार, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणाले, “FPI (फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) जानेवारी 2020 च्या सुरुवातीला खरेदीदारांच्या भूमिकेत होते, मात्र आता ते पुन्हा एकदा विक्रेते किंवा विक्रेत्याच्या भूमिकेत आले आहेत. गुरुवारपर्यंत त्यांनी 4 हजार कोटींहून जास्त पैसे खेचले आहेत. जर आपण शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून बोललो, तर गुंतवणूकदारांसाठी हा कठीण काळ आहे. हा काळ आणखी काही काळ टिकू शकतो.”

विजयकुमार यांनी काल सांगितले की,”भारतातही असेच असेल असे नाही, मात्र जागतिक चलनवाढ वाढत असल्याने आणि सरकार आर्थिक पातळीवर कडक होत असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. वर्षाच्या उत्तरार्धात ही परिस्थिती थोडी बरी होईल. अशा स्थितीत लहान गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीसाठी घाई करू नये.”

पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निणर्य राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी घेतला आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारल्याबाबत आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. 5 वर्षानंतर पर्रीकरांना पुन्हा पणजीमध्ये आणू. मात्र, पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाह, असे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील दिवंगत जेष्ठ नेते मनोहर पर्रीकर हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे. उत्पल पर्रीकर यांच्याशी आम्ही चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करू. आम्ही त्यांची स्वतः भेत घेऊन नाराजी दूर करणार आहोत. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाले तर हे हिंदूविरोधी आहे. याचे उदाहरण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हे समोर आले आहार. कुणाचे कुणासोबत साटलोते आहे हे आमच्यासह सर्वांना माहित आहे. उत्पल पर्रीकरांच्या बाबतीत शिवसेनेकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

…म्हणून संधी मिळताच केले 36 वार; ‘त्या’ गॅंगवॉरमधील मुख्य आरोपीची खळबळजनक कबुली

औरंगाबाद – शहरातील मिसारवाडी भागात बांधकाम व्यवसायिक हसन साजेद पटेल याच्यावर चाकूने 36 वार करून हत्या करण्यात आली होती. हसन याची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्याचे नेमके काय कारण असेल, याचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तालेब सुलतान चाऊस याला पकडल्यानंतर हे हत्याकांड जुन्या वादातून घडल्याचे समोर आले आहे. आरोपी तालेब चाऊसनं दिलेल्या कबुलीतून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हसन पटेल याने आधी माझ्यावर 25 वार केले होते, त्याचा काटा काढण्यासाठी मी 36 वार केल्याची कबुली चाऊसनं दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन आणि तालेब हे दोघेही जुने मित्र होते. मागील वर्षी दोघांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. याच वादातून हसन पटेल यांनी तालेबवर चाकूहल्ला केला होता. या प्रकरणी सिडको पोलीस स्टेशनमध्ये 14 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आळा होता. हे प्रकरण मिटवण्याचे हसनचे प्रयत्न होते. गुन्हा मागे घेण्याची विनंतीही त्याने तालेबकडे केली होती. पण तक्रार मागे घ्यायची असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी चाऊस कुटुंबियांनी हसनकडे केली होती. हा समझोता झाला नाही आणि वाद आणखीच चिघळत गेला. तसेच हसन नेहमीच चाऊस कुटुंबियांकडे पाहून थुंकायचा. विशेषतः तालेबचे वडील सुलतान चाऊस यांच्याकडे पाहून थुंकणे, सिगारेटचा धूर त्यांच्या दिशेने सोडणे असे प्रकार हसन करत होता.

दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तालेब चाऊसला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

अजब प्रकार : पैशांसाठी खासगी सावकाराने दिड महिन्याच्या बाळालाच पळवले

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोनामुळे कितीतरी सामाजिक स्थित्यंतरे घडत असताना सातार्‍यात देखील धक्कादायक प्रकार कधी कधी समोर येत आहेत. असाच धक्कादायक व वेदनादायी प्रकार एका कुटुंबाबाबत घडला असून खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी राहणार्‍या कुचेकर कुटुंबियासमवेत हा प्रकार घडलेला आहे. अभिषेक कुचेकर या युवकाने काही आर्थिक अडचणीमुळे सदरबझार येथील संजय बाबर व अश्‍विनी पवार-बाबर या खासगी सावकारी करणार्‍या दांम्पत्याकडून गतवर्षी 30 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर एक वर्षभरात अभिषेक कुचेकर याने बाबर दांम्पत्याला 60 हजार रुपये परत केलेले आहेत. एका वर्षात दुपटी, चौपटीने व्याज वसूल करुन देखील बाबर दांम्पत्याची भूक थांबली नाही.

बाबर दांम्पत्य सातत्याने 30 हजारांपोटी आणखीन पैशांची मागणी कुचेकर यांच्याकडे करतच होते. शेवटी शेवटी तर गत चार ते पाच महिन्यापूर्वी अभिषेक कुचेकर यांची दीड महिन्याची मुलगीच या बाबर दांम्पत्याने घरात येवून उचलून नेली आहे. अभिषेक याची पत्नी नुकतेच जन्मलेल्या तिच्या दीड महिन्याच्या मुलीला असे कोणीतरी उचलून नेल्याने मुलीसाठी तिचे आईचे काळीज तडफडत आहे. त्यामुळे कुचेकर कुटुंबियांनी गत चार ते पाच महिन्यात बाबर दांम्पत्याकडे जावून मुलीला परत करण्याची मागणी केली तरी दगडाचे काळीज असलेल्या बाबर दांम्पत्याने छोट्या मुलीला त्यांच्याच ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवले आहे.

अभिषेक त्याच्या मुलीला परत आणण्यासाठी संजय बाबर यांच्याकडे गेल्यावर त्याला व त्याची पत्नी पायलसह कुचेकर कुटुंबियांना बाबर दांम्पत्याकडून थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच ही मुलगी त्यांना विकली असल्याचे सांगून अजून चार ते पाच लाख रुपये द्या व मुलगी घेवून जावा, अशी दमदाटीही बाबर दांम्पत्याकडून कुचेकर कुटुंबियांना केली जात आहे.

चार ते पाच महिन्यापासून एक माता तिची नुकतीच जन्म झालेल्या दीड महिन्याच्या मुलीपासून वेगळी करुन माणुसकी किती खालच्या स्तराला गेलेली याचे धक्कादायक उदाहरण सातार्‍यातील बाबर दांम्पत्याने जगासमोर आणले आहे. कर्जाची मूळ घेतलेली रक्कम भागवून आणखी त्यावर दुप्पट रक्कम एका वर्षात देवून छोट्या मुलीला आणखी पैशांची मागणी करत गहाण ठेवून घेणार्‍या या कलियुगातील प्रकाराला आता नेमके काय म्हणायचे असा प्रश्‍न सातारकरांना ही घटना वाचून निश्‍चितपणे पडल्याशिवाय राहणार नाही.

पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई

केवळ दीड महिन्याचे लेकरु पायल कुचेकर यांच्यापासून तोडण्यात आल्याने ही माता दररोज धाय मोकलून मुलीच्या आठवणीत अश्रु ढाळत आहे. वारंवार तिचा पती अभिषेक याला ती मुलीला घेवून या म्हणून विनवत आहे. मुलीला आणण्यास गेल्यास बाबर दांम्पत्य जीवे मारण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी करत आहे. हा सर्व प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असून अशा प्रवृत्तीविरुध्द तक्रार करुन देखील सातारा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचे कुचेकर कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

सदरबझारमधील खासगी सावकारावर कारवाई करा
सदरबझारमधील संजय बाबर या खासगी सावकाराचा हा अजब कारनामा ऐकून निश्‍चितपणे ही संताप आणणारी व माणुसकीला काळिमा फासणारीच आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार करुन देखील न्याय न मिळाल्याने कुचेकर कुटुंबियांनी थेट अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांचाकडे दि. 20 रोजी कैफियत मांडली. त्यांना लेखी निवेदन दिल्यावर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे.

शहर पोलिसांकडून कारवाईच नाही

वास्तविक चार महिन्याची छोटी मुलगी खासगी सावकाराने पळवून नेली असल्याचा हा प्रकार गंभीर असताना पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करुन धडक कारवाई करण्याची आवश्यकता होती. मात्र, पोलिसांकडून जावून देखील कुचेकर कुटुंबियांना न्याय मिळत

धक्कादायक व वेदनादायी प्रकार एका कुटुंबाबाबत घडला असून खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 रुपये; LIC चा हा प्लॅन जाणून घ्याच

LIC

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना असे या पॉलिसीचे नाव आहे. LIC सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम योजना आहे. ही योजना 1 जुलैपासून सुरू झाली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात …

सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग: LIC सरल पेन्शन योजना दोन प्रकारची आहे पहिला लाइफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइस आणि दूसरा पेंशन योजना जॉइंट लाइफ.

सिंगल लाइफ: यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

जॉइंट लाईफ: या प्लॅनमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये जो दीर्घकाळ जगतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
>> विमाधारकाची पॉलिसी काढताच त्याची पेन्शन सुरू होईल.
>> आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवी आहे. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल.
>> ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही घेता येईल.
>> या योजनेत किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
>> ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे.
>> या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.

असे आहे अफगाणिस्तानच्या एकमेव पॉर्न स्टारचे आयुष्य, माहिती मिळताच तालिबान करेल शिरच्छेद

ब्रिटन । तालिबानने गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. यासह जगातील आणखी एक देश लोकशाहीतून तालिबानी राजवटीत गेला. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळताच पुन्हा एकदा तेथे कहर सुरू केला. ज्यामध्ये महिलांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही महिलेला कामावर जाऊ दिले जात नाही. त्याचबरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला या आतातालिबानच्या निशाण्यावर आहे. अशा स्थितीत पॉर्न स्टारबाबत काय उपाय करतील, याचा अंदाजच बांधता येईल.

अफगाणिस्तानची नंबर वन पॉर्न स्टार यास्मिना हिने सांगितले की, आता तालिबान तिला शोधत आहे. तालिबानला तिची माहिती मिळताच ते तिचा शिरच्छेद करतील. ही पॉर्न स्टार स्वतः घाबरली आहे. यास्मिनाने 1990 मध्येच देश सोडला होता. त्यावेळी काबूल तालिबानच्या ताब्यात होते. देश सोडल्यानंतर ती यूकेमध्ये स्थायिक झाली. तिथे तो लिहायला आणि वाचायला शिकली. आता 30 वर्षांनंतर तालिबानने अफगाणिस्तान परत ताब्यात घेतला आहे. यास्मिनाला याची खूप भीती वाटते.

मात्र, यास्मीनाचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. तिला अफगाणिस्तानची नंबर वन पॉर्न स्टार म्हटले जाते. यास्मिना म्हणाली की, जर तिची माहिती खरी असेल तर ती अफगाणिस्तानची एकमेव पॉर्न स्टार आहे. तिने इस्लाम सोडून दुसरा धर्म स्वीकारला. मात्र, तालिबानला आपल्याबद्दल माहिती मिळाली असल्याचे तिला वाटते आणि हे कळताच ते तिला ठार मारण्याची तयारी सुरू करतील.

आय हेट पॉर्न नावाच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत यास्मिना म्हणाली की,” तालिबानला अफगाणिस्तान पॉर्नमुळे ओळखला जावा असे वाटत नाही. यामुळे तिला शोधून मारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे शरीर तिचे आहे. तिला कोणाला दाखवायचे आहे ही तिची निवड आहे. मात्र महिलांचे हे स्वातंत्र्य तालिबानला खिजवणारे आहे. यास्मिनाच्या मते, तिला शोधणे अवघड नाही. गुगलवर अफगाण पोर्न लिहिताच तिचा फोटो येतो. अशा स्थितीत लवकरच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला तर नवल वाटणार नाही.

शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण; औरंगजेब आणि रावणाचा दाखला देत विषयच संपवला …

Sharad Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांची पाठराखण केली आहे

अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून ती भूमिका केली. अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलाकार म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी रामायण आणि मुघलांच्या इतिहासाचा दाखल दिला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा रामराज्य सिनेमात रावणाची भूमिका केलेल्या कलावंताने सीतेचं हरण केलं होत, याचा अर्थ तो कलाकार रावण होता असं नाही असे शरद पवार यांनी म्हंटल.