Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2917

‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ आले. तुमचे सगळे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी पिच्छा सोडवून घेतला. शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांनी मांडलेला ठिय्या चांगलाच रंगला.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळकरी विद्यार्थी जमले. ठाणेदारांना भेटण्यासाठी त्यांनी हट्ट धरला. ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. आमच्या शाळा सुरू करा, आमच्या शाळाच बंद का ?असे प्रश्न विचारत होते. त्यावेळी पोलीस त्यांना, शासनाने तुमच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवलेल्या आहेत अशी उत्तरे दिली. महामारीची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये, विद्यार्थी सुरक्षित राहावा यासाठी शाळा बंद ठेवल्याचे सांगितले. पण विद्यार्थ्यांनी त्यानंतर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आम्हाला आमच्या भविष्याची चिंता वाटत असून गेल्या दोन वर्षापासून आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रही पोलिसांना सादर केलं. ‘हम बच्चो का नारा है, शिक्षा अधिकार हमारा है’ असा शेवट करणारे हे पत्र पोलिसांना देऊन आमच्या शाळा लवकरात लवकर सुरू करा असे म्हणत त्यांनी ठिय्या मांडला. तब्बल तासभर विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे ठाण्यात दाखल झाले. त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेत तुमच्या सर्व मागण्या आणि तुमचे हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पोहोचवतो, निर्णय ते घेतील असे म्हणत पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांतपणे घरी जाण्यास सांगितले.

शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या हा ठिय्या मराठवाड्यात आज चर्चेचा विषय बनला आहे. एरवी पोलिसांच्या रुबाबाला घाबरणारे विद्यार्थी आज मात्र आपल्या अधिकारासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते आणि पोलीस मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे खरे आहे असे म्हणत त्यांची समजूत काढत होते.

शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी SEBI ने लॉन्च केले सारथी अ‍ॅप

नवी दिल्ली । सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. बोर्डाचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी सारथी हे मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले.

या अ‍ॅपद्वारे, गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या गोष्टींची माहिती उपलब्ध होईल.

‘अ‍ॅप तरुणांमध्ये लोकप्रिय होईल’
हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर वापरू शकता. म्हणजे तुम्ही ते Play Store आणि App Store या दोन्हीवरून डाउनलोड करू शकता.

अ‍ॅप लाँच करताना त्यागी म्हणाले, “हे मोबाइल अ‍ॅप गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटबद्दल ज्ञान देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने SEBI चा एक उपक्रम आहे. अलीकडेच अनेक गुंतवणूकदारांनी बाजारात प्रवेश केल्यामुळे, बहुतांश व्यापार हा मोबाईल फोनवर आधारित आहे, हे अ‍ॅप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जनतेपर्यंत सहज उपलब्ध करून देण्यात मदत करेल. मला खात्री आहे की येत्या काळात हे अ‍ॅप गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.”

मुंबईत आयोजित अ‍ॅपच्या लॉन्च इव्हेंटमध्ये, त्यागी यांनी अ‍ॅप कन्टेन्ट सतत अपडेट करण्याच्या आणि प्रादेशिक भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध करून देण्याची आवश्यकता यावर भर दिला. सेबीचे पूर्णवेळ सदस्य एसके मोहंती, कार्यकारी संचालक आणि नियामक संस्थेचे इतर अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वडूज नगरपंचायत भाजप की राष्ट्रवादीकडे, निकालानंतरही अस्पष्ट : सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीमध्ये निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. वडूज नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी कोणत्याही पक्षास बहुमत मिळाले नसल्याने आता अपक्ष कोणाच्या हाती सत्ता देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपा की राष्ट्रवादी कोणाची सत्ता येणार हे आता अपक्षांच्या हातात आहे.

वडूज नगरपंचायत भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या गटाला 6 जागांवर विजय मिळाला आहे. सर्वात जास्त जागा या भाजपाला मिळाले आहेत, मात्र या विजयामुळे सत्ता मिळण्यासाठी अजूनही 3 जागांची आवश्यकता भाजपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांना याठिकाणी 5 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. त्याच बरोबर अपक्ष चार उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे 9 चा सत्तास्थापनेचा आकडा गाठण्यासाठी अपक्ष कोणाला मदत करणार यावरती वडूज नगरपंचायत सत्ता कोणाची स्थापन होणार हे ठरणार आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/342987960777492/

वडूज नगरपंचायत मध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी पॅटर्न राबविला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून केवळ 6 जागा होत आहेत. त्यामुळे 4 अपक्ष विजयी उमेदवारांनी पैकी 3 विजयी उमेदवार कोणाचा गळाला लागणार त्याची सत्ता स्थापन होणार हे निश्चित आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आहेत. तेव्हा भाजप की राष्ट्रवादी सत्ता स्थापन होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

पुण्यात तरुणांची हातात कोयते घेऊन फिल्मी स्टाईल दहशत

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हि घटना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळीने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्याच्या साहाय्याने तोडतोड केली आहे. या आरोपी तरुणांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस परिसरात दोन गटात वाद झाल्यानंतर, तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते आणि अन्य हत्यारे घेत परिसरात दहशत निर्माण केली. यानंतर आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या फोडत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण हातात प्राणघातक हत्यारे घेऊन धावताना दिसत आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयितांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे आठ ते दहा जणांच्या टोळीनं हातात कोयते, तलवारी, दांडके घेऊन अशाच प्रकारचा धिंगाणा घातला होता. यावेळी आरोपींकडून रस्त्यांवरील दुकानं आणि पान टपऱ्यांची तोडफोड करण्यात आली होती.

आ. मकरंद आबांचा बोलबाला : खंडाळा, लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालात लोणंद व खंडाळा या दोन्ही नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या आमदार मकरंद पाटील यांचा बोलबाला असल्याचे दिसून आले. दोन्ही नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादीने दहा जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली.

लोणंद नगरपंचायत राष्ट्रवादीच्या पॅनेलला नऊ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या शिवसेनेला याठिकाणी खाते उघडण्यात यश आले नाही. लोणंद नगरपंचायत एका जागेवर ती समान मते पडली या जागेवर चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीलाच नशिबाचा कौल मिळाला. त्यामुळे आमदार गटाला दहा जागा वरती विजय मिळाला.

लोणंद नगरपंचायतीत अँड. बाळासाहेब बागवान यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये जोरदार सामना होईल असे वाटत होते मात्र काँग्रेस या ठिकाणी पिछाडीवर पडल्याचे दिसून आले तर भाजपनेही तीन जागेवर विजय मिळवला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/459562302323895/?extid=NS-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

 

खंडाळा नगरपंचायत भाजपचे शंकरराव गाढवे यांना सात जागेवरती यश मिळाले तर राष्ट्रवादीला दहा जागेवर यश मिळाल्याने सत्ता राखली. येथे काँग्रेस व शिवसेनेला कोणतेही यश मिळाले नाही. खंडाळा, लोणंद येथील सत्ता मिळाल्याने आमदार मकरंद पाटील गटाचा व राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी बोलबाला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Share Market : सेन्सेक्स 656 अंक तर निफ्टी 18 हजारांच्या खाली बंद

Share Market

मुंबई । आठवडी मुदतीपूर्वी बाजारात घसरण झाली. बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी घसरणीवर बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 656.04 अंकांच्या किंवा 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 60,098.82 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 174.60 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरून 17,938.40 वर बंद झाला.

एशियन पेंट्स, श्री सिमेंट्स, इन्फोसिस, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि एचयूएल हे बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये निफ्टीत टॉप लूझर्स ठरले. तर ओएनजीसी, टाटा मोटर्स, एसबीआय, कोल इंडिया आणि यूपीएल टॉप गेनर ठरले.

मंगळवारीही मोठी घसरण झाली
आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सेन्सेक्स 554.05 अंकांनी किंवा 0.90 टक्क्यांच्या घसरणीसह 60754.86 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 1.07 टक्क्यांनी किंवा 195.10 अंकांच्या घसरणीसह 18113.00 वर बंद झाला.

सेबीने Saa₹thi App लाँच केले
देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी Saa₹thi App हे मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपद्वारे, गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, नवीनतम बाजारातील अस्थिरता याबद्दल माहिती मिळेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर वापरू शकता. म्हणजे तुम्ही ते Play Store आणि App Store या दोन्हीवरून डाउनलोड करू शकता.

कोरोनाचा प्रभाव, 28 फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर बंदी कायम राहणार आहे
ओमिक्रॉनची सतत वाढत असलेली प्रकरणे लक्षात घेता, इंटरनॅशनल फ्लाईट्सवरील बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कोविड-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेंजर सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे.

बीडमध्ये तीन नगरपंचायतीवर भाजपचे ‘कमळ’; तर राष्ट्रवादीचे मातब्बर पराभूत

BJP NCP Logo

बीड – जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचे निकाल आज सकाळी जाहीर झाले. यात वडवणी, केजमध्ये सत्तांतर झाले आहे. आष्टी, पाटोदा, शिरूरकासारमध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. वडवणीत राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले आहे. केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला धक्का दिला आहे. निकालात जिल्ह्यात मातब्बरांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांना पराभव पत्करावा लागला.

वडवणीत भाजपच्या राजाभाऊ मुंडे गटाचा पराभव झाला. वडवणीत राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी भाजपला 8, राष्ट्रवादीला 6 व राष्ट्रवादी पुरस्कृत 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

केजमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जनविकास परिवर्तन आघाडीने धक्का दिला. खासदार रजनी पाटील व अशोक पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जनविकास आघाडीला 8 जागा, काँग्रेसला 3, राष्ट्रवादीला 5, स्वाभिमानी एक जागेवर विजय मिळाला. जनविकास आघाडी नेते हारूण इनामदार हे पराभूत झाले. तर बजरंग सोनवणे यांची मुलगी पराभूत झाली. भाजप नेते रमेश आडसकर, हारूण इनामदार, अंकुश इंगळे यांनी जनविकास आघाडी करुन निवडणूक लढविली होती. यात त्यांना यश आले.

आष्टीत भाजपचे माजीमंत्री सुरेश धस गटाला सत्ता राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला. येथे भाजप 10, राष्ट्रवादी 2, अपक्ष 4, काँग्रेस 1 जागा मिळाली. तर पाटोदा नगरपंचायतीतही आमदार सुरेश धस यांनी सत्ता कायम राखली आहे. आमदार आजबे गटाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. भाजपला 9 जागा अपक्षाला 6 काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. सहा अपक्षांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांच्या समावेश आहे.

शिरूरकासारमध्येही सुरेश धस यांनी सत्ता कायम राखली आहे. येथे भाजपने 11 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या.

दहीवडीत सत्तांतर : भाजपला धक्का, राष्ट्रवादीची सत्ता

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील दहीवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे. आमदार जयकुमार गोरे गटाला केवळ पाच जागा निवडून आल्या.

दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये 17 जागा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. भाजपला 5 जागेवर तर शिवसेनेला 3 जागेवर समाधान मानावे लागले.

दहीवडी नगरपंचायत राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने सत्ता मिळवली. तर शिवसेना नेते शेखर गोरे यांनी आपल्या भगिनी सुरेखा पखाले यांना बिनविरोध केल्याने जास्त जागा मिळतील, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली, शिवसेनेला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीने सत्ता मिळवल्याने सत्तांतर होऊन भाजपला व आ. जयकुमार गोरे यांना मोठा धक्का याठिकाणी बसला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/459562302323895

 

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे

प्रभाग 1 – सुरेखा विजय पखाले – शिवसेना
प्रभाग 2 – वर्षांराणी बाळासाहेब सावंत – राष्ट्रवादी
प्रभाग 3 – विजया रविंद्र जाधव – शिवसेना
प्रभाग 4 – महेश जाधव – राष्ट्रवादी
प्रभाग 5 – शैलेंद्र खरात – शिवसेना
प्रभाग 6 – धनाजी जाधव – भाजप
प्रभाग 7 – उज्वला अमर पवार -भाजप
प्रभाग 8 – मोनिका सूरज गुंडगे – राष्ट्रवादी
प्रभाग 9 – नीलम अतूल जाधव – भाजप
प्रभाग 10 – नीलिमा सुनिल पोळ – राष्ट्रवादी
प्रभाग 11 – राणी तानाजी अवघडे – भाजप
प्रभाग 12 – राजेंद्र साळूंखे – अपक्ष
प्रभाग 13 – विशाल पोळ – राष्ट्रवादी
प्रभाग 14 – सागर पोळ – राष्ट्रवादी
प्रभाग 15 – रूपेश मोरे -भाजप
प्रभाग 16 – सुरेंद्र मोरे – राष्ट्रवादी
प्रभाग 17 – सुप्रिया महेंद्र जाधव – राष्ट्रवादी

जगभरात सायबर हल्ल्यात विक्रमी 151 टक्क्यांनी वाढ, प्रत्येक कंपनीला झाले 27 कोटी रुपयांचे नुकसान

Cyber Froud

नवी दिल्ली । साथीच्या रोगाच्या प्रारंभासह, डिजिटलायझेशनच्या वाढत्या ट्रेंडमध्ये सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र, याला तोंड देण्यासाठी जगभरात अनेक पावले उचलली जात आहेत. असे असतानाही सायबर हल्ल्यासारख्या घटना रोखणे अवघड होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये जगभरातील रॅन्समवेअर हल्ल्यांमध्ये 151 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली.

याचा अर्थ कंपनी किंवा संस्थेला सरासरी 270 सायबर हल्ले झाले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या ऑनलाइन दावोस अजेंडा 2022 समिट दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल सायबरसिक्युरिटी आउटलुक 2022’ रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, मागील वर्ष कोणत्याही यशस्वी सायबर हल्ल्यासाठी असुरक्षित होते. त्यात येणाऱ्या प्रत्येक कंपनीला $36 लाख (सुमारे 27 कोटी रुपये)चे नुकसान झाले आहे.

शेअर्सही घसरले
या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, जर एखाद्या कंपनीवर सायबर हल्ला झाला तर त्याचा परिणाम त्याच्या शेअर्सच्या किमतीवरही होतो. त्यात म्हटले आहे की, कंपनीवरील सायबर हल्ला सार्वजनिक झाल्यानंतर, सहा महिन्यांनंतरही नॅसडॅक (NASDAQ) वर कंपनीच्या स्टॉकची सरासरी किंमत सुमारे तीन टक्क्यांनी कमी राहिली.

रॅन्समवेअर सार्वजनिक सुरक्षिततेला धोका आहे
WEF ने म्हटले आहे की महामारीमुळे जागतिक डिजिटल अर्थव्यवस्था वाढली आहे. मात्र , सायबर हल्ले देखील तितकेच वाढले आहेत आणि जवळजवळ 80 टक्के सायबर सिक्योरिटीज दिग्गज आता रॅन्समवेअरला सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका आणि इशारा मानतात. त्यांच्या कंपन्या सुरक्षित आहेत असे मानणाऱ्या व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या समजातही मोठा फरक आहे, तर सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट त्यांच्याशी सहमत नाहीत.

कौशल्याचा अभाव धोक्याचा सामना करण्याच्या मार्गात एक आव्हान आहे
या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, सर्वेक्षण केलेल्या सुमारे 92 टक्के व्यावसायिक अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, एंटरप्राइझ जोखीम कंपन्यांच्या मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये सायबर लवचिकता समाकलित केली जाते. मात्र, केवळ 55 टक्के सायबर सिक्योरिटी एक्सपर्टनी सहमती दर्शविली. एक्सेंचरच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, धोका आढळून आल्यानंतरही, जवळपास दोन तृतीयांश लोकांसाठी त्यांच्या टीममधील कौशल्याच्या कमतरतेमुळे सायबर सिक्योरिटीज धोक्याचा सामना करणे आव्हानात्मक असेल.

सोयगाव नगरपंचायतीवर सत्तारांचे वर्चस्व

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी आज बुधवारी मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चार जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मतमोजणीनुसार 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने सहा जागांवर विजय मिळविला आहे. अशा एकूण 17 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात सत्तार यांनी बाजी मारली आहे. हे दोघेही पारंपरिक राजकीय विरोधक आहे. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेतली होती. या प्रसंगी भाजप-शिवसेना युतीवरुन राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले.

वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदाचीच चर्चा सोयगावात सुरु झाली असल्याने सोयगावात पुन्हा नगराध्यक्षपदावरून राजकीय चर्चांचे गुऱ्हाळ रंगले आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या तेरा जागा आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या चार जागा अशा एकूण 17 जागांसाठी अखेरीस सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतीक्षा मंगळवारी संपली आहे. मात्र निवडणूक होताच आता नगराध्यक्षपदाची चर्चा सुरु झालेली आहे. यासाठी मात्र भाजप आणि शिवसेनाच अग्रेसर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातच राजकीय सारीपाट रंगणार आहे. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु त्या आधीच अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप आणि शिवसेनेत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या चर्चेसह आपलाच नगराध्यक्ष होणार असे दावे प्रतिदावे सुरु झालेले आहे.

विजयी उमेदवार –
वॉर्ड क्र. 1 शिवसेना – शाहिस्ताबी राउफ
वॉर्ड क्र. 2 – शिवसेना- अक्षय काळे
वॉर्ड क्र. 3 – शिवसेना- दीपक पगारे
वॉर्ड क्र.4 – शिवसेना- हर्षल काळे
वॉर्ड क्र.5 – भाजप – वर्षा घनगाव
वॉर्ड क्र.6 – शिवसेना – संध्या मापारी
वॉर्ड क्र.7 – भाजप – सविता चौधरी
वॉर्ड क्र.8 – शिवसेना – कुसुमबाई राजू दुतोंडे
वॉर्ड क्र.9 – शिवसेना- सुरेखाताई काळे
वॉर्ड क्र.10 – शिवसेना – संतोष बोडखे
वॉर्ड क्र.11 – भाजप – संदीप सुरडकर
वॉर्ड क्र.12 – शिवसेना – भगवान जोहरे
वॉर्ड क्र.13 – भाजप- ममताबाई इंगळे
वॉर्ड क्र.14 – भाजप आशियाना शाह
वॉर्ड क्र.15 – भाजप सुलतानाबी देशमुख
वॉर्ड क्र.16 – शिवसेना – गजानन कुडके
वॉर्ड क्र.17 – शिवसेना आशाबी तडवी