Monday, December 29, 2025
Home Blog Page 2938

7th Pay Commission: सरकार मिनिमम बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्याची शक्यता

Money

नवी दिल्ली । विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांची मिनिमम बेसिक सॅलरी 18 हजार रुपयांऐवजी 26 हजार रुपये असू शकते, असे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढवता येतो
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी फक्त फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचारी संघटना याप्रकरणी सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार असून, त्यानंतर मिनिमम बेसिक सॅलरीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचाऱ्यांची मिनिमम बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढू शकते. अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास त्याची अंमलबजावणी अर्थसंकल्पापूर्वी होण्याची शक्यता आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे
केंद्र आणि राज्य कर्मचार्‍यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे की त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्के करण्यात यावा. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर सरकार विचार करू शकते, असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळू शकते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याचा खर्चात समावेश करता येईल.

सर्व भत्ते वाढतील
जर मिनिमम बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढली तर महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता बेसिक सॅलरीच्या 31 टक्के इतका आहे. DA ची गणना बेसिक सॅलरीने DA दराने गुणाकार करून केली जाते. म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल.

100 एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी, अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा -बावची रस्त्यावरील ओढयालगतच्या शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे सुमारे १०० एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडूनलाखोरुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. ओढयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मुख्यरस्त्यालगतच्या शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन खालील ऊसाने पेट घेतला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या भागात सर्वत्र ऊसशेती असल्याने गळीतास जाणाऱ्या ऊसाचे मोठे क्षेत्र आहे . प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊसाला लागून ऊस असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते घटनास्थळावर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होती परंतु केवळ बघण्यापलीकडे शक्य नव्हते. आदिनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील तसेच खाजगी पाणी पुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांचा असा अंदाजे १०० एकर क्षेत्रातील चालू हंगामात गाळपास जाणारा ऊस भक्षस्थानी पडल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे . तर जळालेला ऊस गाळपास तातडीने कारखान्याने न्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे .

किराणा मालाच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, दुकानातील जीवनावश्यक वस्तूंचा मुद्देमाल गायब

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील तानाजी चौक, हरीमंदिराजवळ आवटी उद्यानासमोर असलेल्या अमोल अरूण ऐतवडे यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी झाली असून दुकानातील ६ हजार रूपयांची चिल्लर व दुकानातील साहित्य असा एकूण ६० हजार रूपयांचा मुद्देमाल गायब झाला आहे. ऐतवडे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली. अमोल ऐतवडे हे रात्रीच्यावेळी दुकानबंद करून घरी गेले. ऐतवडे यांचे घर दुकानाच्या पाठीमागील बाजूस राहतात.

सकाळी सहा ते घराजवळ असलेल्या हरीमंदिरात दर्शन घेवून दुकान उघडण्यासाठी आले. दुकानासमोर साखर सांडलेली दिसली. रात्री ऐतवडे यांनी दुकानासमोरील सर्व कचरा भरून ठेवलेला असताना दुकानाच्या पायरीवर साखर सांडल्याने त्यांना संशय आला. अमोल ऐतवडे यांना दुकानाच्या समोरील शटरचे कुलूप तोडलेले दिसले.दुकानाचे शटर वर उचलून दुकानात गेल्यानंतर त्यांना पैशाचा गल्ला उघडा दिसला. गल्ल्यातील सहा हजार रूपयांची चिल्लर नव्हती.

तसेच साखरेचे तोते, चहा पावडर, शेंगदाणे पंचवीस किलो, दुध चार लिटर, अंड्याचा ट्रे, तांदळाची १७ पोती, मुगडाळ ३० किलोची पोती इतर साहित्य असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ऐतवडे हे नेहमीच सकाळी लवकर दुकान उघडत असतात. दुकानातील निम्मा मालच गायब झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐतवडे यांनी मिरज शहर पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी परिसरातील पाहणी केली.

पोलिसांकडून मोबाईल लंपास करणारी टोळी जेरबंद, 3 लाख 50 हजारांचे मोबाईल केले जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

रस्त्यावरून बोलत निघालेल्यांचा माेबाईल हिसडा मारून पळवणाऱ्या टोळीस सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ पोप्या गौतम माने व महेश विद्याधर बाबर अशी संशयितांची नावे असून, श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा त्यांचा साथीदार पसार झाला आहे. दरम्यान, या टोळीकडून जबरी चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले असून, तीन लाख ४७ हजार ५०० रुपयांचे २३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सांगली शहर पोलिसांनी गस्त वाढवत तपास सुरू केला होता. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार पोप्या माने शहरातील गणेश मार्केटमध्ये मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने गणेश मार्केट परिसरात सापळा लावून पोप्यासह साथीदाराला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ विनाक्रमांकाची मोपेड मिळून आली. पोप्याची झडती घेतली असता, चार मोबाईल मिळून आले, तर मोपेडच्या डिक्कीत १३ मोबाईल मिळाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यात पोप्याने सांगली शहर व कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे केल्याची कबुली दिली. पोप्यासह बाबर आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. कलढोणे पसार झाला आहे. या टोळीने २३ गुन्हे केले असून, त्यातील १२ गुन्हे पोलिसात दाखल आहेत.

शहरचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर ढोरे, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत, अभिजित माळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, धूम स्टाईलने मोबाईल पळवणारा पोप्या माने प्रत्येकवेळी नवीन साथीदार सोबतीला घेऊन हे गुन्हे करीत होता. त्याने बायपास रोड, वारणाली रोड, यशवंतनगर, भारत सूतगिरणी रोडवर चालत निघालेल्या विशेषत: मोबाईलवर कॉल अथवा चॅट करत निघालेल्या कॉलेजच्या तरूण-तरूणींवर वॉच ठेवून त्यांचे मोबाईल हिसडा मारून लांबवले आहेत.

कोरोनाने डोकेदुखी वाढली : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 964 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 21.9 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 567 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 964 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 21.9 टक्के आला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 178 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 2 हजार 927 जण उपचार्थ आहेत.

गृह विलगीकरणातील नागरिकांनी प्रकृतीची माहिती यंत्रणेला कळवावी
रॅपिड ॲन्टेजन चाचणी अथवा होम किटद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या आणि गृह विलगीकरणातील नागरिकांनी आपल्या प्रकृतीची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याने बरेचसे नागरिक रॅपिट ॲन्टीजन चाचणी करुन घेतात. पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणात उपचार घेतात. मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येवू शकतो. त्यामुळे या नागरिकांच्या दैनंदिन प्रकृतीवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा स्थानिक आरोग्य यंत्रणेला आपली माहिती कळवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

रोज 14 रुपयांची गुंतवणूक करताच दरमहा मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो, ज्यांच्याकडे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

अटल पेन्शन योजना काय आहे?
अटल पेन्शन योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 10,000 रुपये मिळतील
जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाली, तर वयाच्या 60 व्या वर्षी, त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी केवळ 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. त्याच वेळी, 39 वर्षांपेक्षा कमी वयाचे पती-पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून 60 वर्षांचे झाल्यानंतर, दोघांना एकत्र करून त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

टॅक्स बेनिफिट
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.

APY चे डेथ बेनिफिट
जर या प्लॅनच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी बाय डिफॉल्ट नॉमिनी होईल आणि पत्नीला योजनेचे सर्व फायदे मिळतील. पत्नीलाही ग्राहकाप्रमाणेच पेन्शन मिळते. जर पत्नी हयात नसेल तर, सबस्क्राइबरने केलेल्या नॉमिनीला यासाठी निश्चित केलेल्या कॉर्पसचा लाभ मिळतो. म्हणजेच नॉमिनीला निश्चित पेन्शन मिळते.

Petrol Diesel Price : IOCL ने जारी केले पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली ।  सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सध्या इंधनाच्या दरात आजही बदल करण्यात आलेला नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक लिटर पेट्रोल 98.52 रुपये दराने विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेलचा दर 91.56 रुपये प्रति लिटर आहे. झारखंड सरकारने जाहीर केले आहे की, 26 जानेवारी 2022 पासून, मोटरसायकलस्वार आणि स्कूटर स्वारांना प्रति लिटर 25 रुपये कमी दराने पेट्रोल मिळेल.

पेट्रोल डिझेलची किंमत
>> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीन किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दहिसरमध्ये तडीपार गुंडाची भरदिवसा तरुणाला मारहाण

dahisar crime

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील दहिसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका तडीपार तरुणाने आपल्या काही गुंडांसोबत मिळून परिसरात मोठ्या प्रमाणात राडा घातला आहे. दहिसर पूर्व मधील वीर संभाजी नगर या भागात हा सगळा प्रकार घडला आहे. आरोपी तरुणाला दहिसर पोलीस स्टेशन परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी तरुण हा दहिसर या ठिकाणी असलेल्या संजय सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरी आपल्या काही गुंडांसोबत जबरदस्तीनं घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने संजय सिंह याला मारहाण केली तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर या तरुणाला तातडीने उपचारासाठी दहिसर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणाची तब्येत अधिक गंभीर असल्यामुळे त्याला नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या मारहाणीप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये काही गुंड घराची तोडफोड करताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. काल सगळ्यांना मकर संक्रांतीची सुट्टी होती. यादरम्यान काही लोकांनी नशेमध्ये मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी तक्रार दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.

किरण माने शरद पवारांची भेट घेणार ?? चर्चाना उधाण

Kiran Mane Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मिडीयावर राजकारणाविषयी मत मांडल्यामुळे मराठी अभिनेते किरण माने यांची मराठी सिरीयल ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण देखील तापलं असून महाविकास आघाडीने किरण माने याना पाठिंबा दर्शवत भाजपवर हल्लाबोल केला. त्यातच आता किरण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

किरण माने याना राजकीय विषयांवर भाष्य केल्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण राज्यात वाऱ्यासारखं पसरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांनी किरण माने याना पाठिंबा दर्शवत भाजपवर टीका केली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असेही म्हंटल. या सर्व घडामोडीनानंतर किरण माने हे पवारांना भेटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र याप्रकरणी भाजपवर केलेले आरोप फेटाळले आहेत. एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. ‘स्टार प्रवाह’चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा ‘स्टार प्रवाह’ स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी ‘स्टार प्रवाह’चा अधिकार आहे, असे दरेकर यांनी सांगितले

देशाचा परकीय चलन साठा $87.8 कोटीने घटला, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई | देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा घट झाली आहे. 7 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $87.8 कोटीने घसरून $632.736 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $1.466 अब्ज डॉलर्सने घसरून $633.614 अब्ज झाला होता. 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $ 58.7 कोटीने घसरून $ 635.08 अब्ज झाला होता. त्याच वेळी, 17 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $ 16 कोटीने कमी होऊन $ 635.667 अब्ज झाले.

FCA $49.7 कोटीने कमी झाला
शुक्रवारी आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 7 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात झालेली ही घसरण मुख्यत्वेकरून एकूण चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या परकीय चलन मालमत्तेत (Foreign Currency Assets) घट झाली आहे. आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की रिपोर्टींग वीकमध्ये भारताचा FCA $ 49.7 कोटीने घसरून $ 569.392 अब्ज झाला आहे. डॉलरमध्ये नामांकित, FCA मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यामध्ये वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.

सोन्याचा साठाही कमी झाला
याशिवाय, रिपोर्टींग वीकमध्ये सोन्याच्या साठ्याचे मूल्य $36 कोटीने कमी होऊन $39.044 अब्ज झाले. रिपोर्टिंग वीकमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील देशाचा स्पेशल ड्राइंग राइट (Special Drawing Rights) 1.6 कोटीने कमी होऊन $19.098 अब्ज झाला. IMF मधील देशाचा चलन साठा देखील 50 लाख डॉलर्सने घसरून $5.202 अब्ज झाला आहे.