Monday, December 29, 2025
Home Blog Page 2941

राज्याला अजूनही 40 लाख लसींची आवश्यकता – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशासह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याबरोबर लोकांना लशीचा पुरवठा करण्याचा आव्हान राज्यापुढे आहे. यादरम्यान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाची माहिती दिली. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला 40 लाख लसींनी गरज आहे, मात्र सध्या राज्यात दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा स्टॉक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला. यावेळी बैठकीत कोविड 19 प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन लसीचे 40 तर कोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस द्यावेत, अशी केंद्राकडे मागणी केली. मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे वाढीव लसीच्या पुरवठ्याचीहि बैठकीत मागणी केली आहे.

दरम्यान, काल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीस उपस्थित लावली. या कारणावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले.

Share Market : सेन्सेक्स 12 अंकांनी घसरला तर निफ्टी 18200 च्या वर बंद झाला

मुंबई । दिवसभराच्या तेजीनंतर, शुक्रवारी ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 12.27 अंकांच्या किंवा 0.02 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह 61,223.03 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 2 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी घसरून 18,255.80 वर बंद झाला.

शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये आयटी, रियल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर, युटिलिटी सेक्टर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आजच्या ट्रेडिंग एशियन पेंट्स, एक्सिस बँक, यूपीएल, एचयूएल आणि ओएनजीसी हे निफ्टीचे टॉप लुझर्स ठरले. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, आयओसी, टीसीएस, इन्फोसिस आणि एल अँड टी हे टॉप गेनर ठरले.

एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 61 हजारांच्या पुढे बंद झाला

आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सेन्सेक्स 85.26 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 61,235.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 45.45 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 18,257.80 वर बंद झाला.

NELCO ला सॅटेलाइट ब्रॉडबँड एक्सपेरिमेंटल लायसन्स मिळाला

सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवांच्या चाचणीसाठी सरकारने NELCO ला एक्सपेरिमेंटल लायसन्स दिले आहे. कंपनी ISRO सोबत चाचणी सुरू करू शकते. सॅटेलाइट पॉलिसी आल्यानंतर कंपनी कॅनेडियन कंपनी टेलिसॅटसोबत सर्व्हिस देऊ शकते. NELCO ला सॅटेलाइट ब्रॉडबँड एक्सपेरिमेंटल लायसन्स मिळाले आहे. सरकारने 3 महिन्यांसाठी लायसन्स दिले आहे. आवश्यक असल्यास, कंपनी 6 महिन्यांसाठी चाचणी घेऊ शकते.

अर्थसंकल्पापूर्वी Zerodha चे निखिल कामत यांनी छोट्या गुंतवणूकदारांना दिला घाई न करण्याचा सल्ला

Success Story

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प येणार असून भारतीय शेअर बाजार गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वरच्या दिशेने जात आहे. अशा वेळी झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना सावध राहण्यास सांगितले आहे. याशिवाय इतर अनेक मुद्द्यांवर निखिलने आपले मत मांडले आहे.

निखिल कामत म्हणाले की,”अलीकडच्या काही दिवसांप्रमाणे बाजारातील रिटर्न वेगळ्या प्रकारे असू शकतो. तुम्ही तुमचे रिसर्च करून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारात प्रवेश केला पाहिजे.” त्यांनी किरकोळ किंवा लहान गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, कोणताही स्टॉक निवडताना तुम्ही निवडक असले पाहिजे.

परदेशात लिस्टिंगसाठी नियम नरमले
अनेक कंपन्या आणि त्यांच्या सल्लागारांनी अलिस्टेड भारतीय कंपन्यांना परदेशात लिस्टिंग करण्याची परवानगी देण्यासाठी सरकारकडून सध्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. सरकारने 2020 मध्ये जाहीर केले होते की, ते कंपन्यांना परदेशी चलनात थेट लिस्टिंग करण्याची परवानगी देणारे नियम लागू करेल.

निखिल कामत यांना मात्र असे वाटते की, परदेशात लिस्टिंग होण्यासाठीचे नियम पाहण्याऐवजी, कायद्यांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद कडक करतानाच भारतातील यादीचे निकष सोपे करण्याची गरज आहे. ते म्हणाले कि,”भारतातील कंपन्यांना लिस्टिंग होण्यापूर्वी बराच काळ वाट पहावी लागते आणि त्यात अनेक अडथळे आहेत. मात्र एकदा लिस्टिंग झाल्यानंतर, जर एखाद्या कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले तर त्यावरील दंड खूपच कमी आहे. यामुळे लहान गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते.”

बजटमधून काय हवे आहे?
लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स (STCG) दोन्ही लागू असल्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) रद्द करावा अशी कामत यांची इच्छा आहे. ते म्हणाले की,” जर सरकारला STT ठेवायचा असेल तर ते लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्सवरील LTCG टॅक्स काढून टाकण्याचा विचार करू शकते.”

निखिल कामत यांनी ETMarkets.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी असे म्हणेन की ट्रेडिंगच्या दृष्टीने STT द्वारे वाढलेला लाभ LTCG वरील टॅक्स काढून टाकण्याची भरपाई करू शकतो.” कामत पुढे म्हणाले की,” STT आणि LTCG च्या आसपासच्या कर सुधारणांचा अर्थव्यवस्थेला खूप फायदा होईल.”

बजटमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल चर्चा होणे चांगले
कामत म्हणाले की,”सरकार जे क्रिप्टोकरन्सी बिल आणत आहे ते कदाचित असेल क्लासच्या आसपासच्या बहुतेक समस्यांचे निराकरण करेल. मात्र जर ते बजटमध्ये आणले तर सरकार क्रिप्टोकरन्सीला कसे ओळखेल तसेच क्रिप्टोकरन्सीच्या वापराबद्दल आणि टॅक्स कसा आकारला जाईल हे स्पष्ट होईल.

एलन मस्कच्या ट्विटमुळे Dodgecoin च्या किंमतीत झाली 25% वाढ

नवी दिल्ली । बिटकॉइनसह जगभरातील क्रिप्टोकरन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्याच वेळी, क्रिप्टोकरन्सी Dogecoin ची किंमत 25 टक्क्यांहून जास्तीने मजबूत झाली आहे. वास्तविक, Dodgecoin च्या किमतीतील ही वाढ SpaceX चे मालक आणि Tesla CEO एलन मस्क यांच्या ट्विटनंतर झाली आहे ज्यात त्यांनी घोषणा केली होती की, Dodgecoin द्वारे टेस्ला वाहने देखील खरेदी करता येतील.

मस्कचे ट्विट येताच Dodgecoin ला पंख मिळाले. Dodgecoin ने शुक्रवारी स्वयंघोषित Dogefather च्या ट्विटद्वारे $0.1623 ते $0.2029 पर्यंत उडी घेतली.

मस्कला क्रिप्टोकरन्सीचे वेड आहे
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन लॉन यांना क्रिप्टोकरन्सीचे वेड आहे. गेल्या वर्षी, मस्कने गुंतवणूकदारांना Dodgecoin सारख्या क्रिप्टो असेट्स ताब्यात ठेवण्याच्या कल्पनेचे समर्थन केले. Dogecoin हे त्यांचे आवडते कॉइन असल्याचे मस्कने सोशल मीडियावर अनेक ट्विट केले आहेत. यामुळे हे डिजिटल करन्सी जास्त लोकप्रिय झाली.

पवारांबद्दल पोटदुखी असल्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून अशी वक्तव्ये ; हसन मुश्रीफांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत एकजूट राहिली आहे. याची पोटदुखी असल्याने चंद्रकांत पाटील हे पवारांवर टीका करणारी वक्तव्ये करत आहेत.” अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात आहेत. या चर्चेतून मार्ग निघत आहे. अशावेळी पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते?” हे समजत नाही.

वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी घट्ट राहिली आहे. आणि याच कारणाचे मोठे दुःख चंद्रकांत पाटील यांना आहे. त्यामुळे कदाचित त्याच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध आहे. विनय कोरे यांच्या भूमिकेमुळे संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पुढे काय होणार हे पाटील यांना माहीत नाही का? चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात काहीच कळत नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

बिटकॉइनचे मायनिंग करणाऱ्यांसाठी जॅक डोर्सीची कंपनी तयार करणार ओपन सिस्टीम

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीचे मोठे समर्थक आणि ट्विटरचे माजी सीईओ असलेल्या जॅक डोर्सी यांनी डिजिटल करन्सीमध्ये एंट्री घेण्याची तयारी केली आहे. जॅक डोर्सीची कंपनी ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टीम तयार करण्यावर काम करत आहे. जॅकच्या कंपनीचे नाव ब्लॉक इंक आहे जिथे ते सीईओ म्हणून काम करत आहे.

जॅक डोर्सी यांनी स्वतः पुष्टी केली आहे की त्यांची कंपनी, पूर्वी स्क्वेअर म्हणून ओळखली जात होती, आता ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टीम तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. री-ब्रँड झाल्यानंतर, कंपनी आता आपल्या पेमेंट बिझनेसच्या पलीकडे जाऊन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.

कंपनीची काय योजना आहे ?
जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. डोर्सी यांनी ट्विटद्वारे सांगितले की,” ते ऑफिशिअली ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टीम तयार करण्यावर काम करत आहेत.” कंपनीने पहिल्यांदा जाहीर केले की ते ऑक्टोबरमध्ये या योजनेचा विचार करत आहे.

ब्लॉक कंपनीचे महाव्यवस्थापक (हार्डवेअर) थॉमस टेम्पलटन यांनी या योजनेची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे लक्ष्य बिटकॉइनला मार्केटकॅप नुसार सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी बनवणे आहे.

स्क्वेअर ही एक फायनशील सर्व्हिस कंपनी आहे जी सध्या पेमेंट बिझनेसमध्ये कार्यरत आहे. कंपनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी काम करत आहे. ते क्रिप्टोकरन्सीची खरेदी, मायनिंग, मेन्टनन्स यासारखे काम सुलभ करण्यासाठी काम करत आहेत. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे उद्याचे भविष्य आहे असा कंपनीचा विश्वास आहे.

दिल्लीत स्फोटकांची बॅग सापडल्याने खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाची राजधानी दिल्ली येथील गाजीपुर भागातील फुल मार्केट परिसरात एका बेवारस बॅगेतून IED हे स्फोटक सापडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्फोटक जप्त करण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, गाजीपुर भागातील फुल बाजारात बेवारस बॅग आढळली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर रिकामाँ करून पोलिसांनी खड्डा खोदून बॉम्ब निकामी केला. हा बॉम्ब फुटल्यानंतर झालेल्या स्फोटाचा व्हिडीओही हाती येत आहे. त्यावरून हा बॉम्ब प्रचंड मोठ्या क्षमतेचा होता हे सिद्ध होत

26 जानेवारीच्या पूर्वीच अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा तपास दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे असे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले.हे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार बजेट सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यात कोरोनाचे संकट आहे. अशात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेतील अधिकारी आणि जवळपास 400 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आता अधिवेशनाची तारीख हि ठरली असून संसदेचे बजेट सत्र दि. 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन सत्रात पार पडणार असून 31 जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 12 मार्चला सुरु होणार आहे. तर, 8 एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होणार आहे.

कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यानंतर मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पार्लमेंट हाऊसची पाहणी केली होती. संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.

Video पवार – गांधी यांची सत्ता आली तरीही जाब विचारणारच : किरण माने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

उद्या शरद पवार- राहूल गांधी यांची सत्ता आली तरी मी जाब विचारणार कारण सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे. मी फेसबुकवरून राजकीय भूमिका घेतो, यामुळे माझं काम थांबविण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली. माझ्यासाठी हे धक्कादायक असले तरी मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार असे अभिनेता किरण माने यांनी सांगितले.

स्टार प्रवाह मराठी चॅनेलवरती मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आलेले विलास पाटील अर्थातच किरण माने यांनी केलेल्या राजकीय पोस्टवर त्यांना मालिकेतून काढण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, काल ‘मुलगी झाली हो’ शूट सुरू असताना मला हिंदी प्रॉडक्शन्स हाउस मधून फोन आला की तुमच्यावर काहीजण नाराज असल्यामुळे तुम्हाला रिप्लेस केले जात आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464021802020360

अभिनेता किरण माने म्हणाले, राजकारणावर बोलू नको, राजकारणावर लिहू नको हे बोलणे योग्य नाही, असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत. बहुजन लोकांचे नाहीतर सामान्य लोकांचे यापुढील काळात जगणे अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर यापुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येणारं आहे. कुणी माझ्या पाठीशी उभे राहू अगर ना राहू मी एकटाच लढणार आहे.

सरकार कोणाचंही असो, विरोधात पोस्ट करणं माझा हक्क

मला याधीही ट्रोल केले जात आहे. अश्लील अर्वाच्च भाषा वापरली जात आहे त्यांना वाटत आहे की मी खचलो आहे. हि विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. यापुढील काळात मला बदनाम केलं जाणार आहे. खोटे आरोप करून बदनाम करणे हे त्यांचे मोठे शस्त्र आहे. मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात तर मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूने मी पोष्ट लीहली आहे. ही राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट आहे. कोणताही सरकार असलं तरी त्यांच्या विरोधात पोस्ट करणार तो माझा हक्क असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.

तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे? अशाप्रकारे शोधा

नवी दिल्ली । आधार कार्ड हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. बँक खात्याद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आयकराशी संबंधित कामासाठीही आधार कार्ड जरुरीचे आहे. मोबाईल वॉलेटच्या वापरातही आधार कार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसल्यास कोणतेही महत्त्वाचे काम करताना त्रास होऊ शकतो.

एका व्यक्तीकडे एक आधार असू शकते, मात्र एखाद्या व्यक्तीचे अनेक मोबाइल नंबर आणि अनेक बँक खाती असतात. त्यामुळेच अनेक वेळा आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी किंवा मोबाइल क्रमांकाशी जोडले गेले आहे हे लक्षात राहत नाही. ज्यामुळे नंतर गोंधळाची स्थिती निर्माण होते.

तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे शोधण्यासाठी बँक किंवा आधार कार्ड केंद्रात जाण्याची गरज नाही. तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्यातून लिंक केले आहे हे तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन शोधू शकाल.

अशा प्रकारे जाणून घ्या-
सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://www.uidai.gov.in वर जा.
येथे Check Your Aadhaar and Bank Account या लिंकवर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.
आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
UIDAI वेबसाइटवर हा OTP टाका.
येथे तुमच्या समोर login चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर, तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांचा तपशील उघड होईल.

आधार कार्ड लॉक करता येते
UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, तुम्हाला तुमचे आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा देखील देते. आधार कार्ड लॉक करण्याचा फायदा म्हणजे तुमचे आधार कार्ड कुठेतरी हरवले तर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारे आधारशी लिंक केलेला तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

आधार कार्ड लॉक करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP संदेश पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला ‘LOCKUID आधार क्रमांक’ टाइप करून हा OTP पुन्हा 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.