पवारांबद्दल पोटदुखी असल्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून अशी वक्तव्ये ; हसन मुश्रीफांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत एकजूट राहिली आहे. याची पोटदुखी असल्याने चंद्रकांत पाटील हे पवारांवर टीका करणारी वक्तव्ये करत आहेत.” अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात आहेत. या चर्चेतून मार्ग निघत आहे. अशावेळी पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते?” हे समजत नाही.

वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महाविकास आघाडी घट्ट राहिली आहे. आणि याच कारणाचे मोठे दुःख चंद्रकांत पाटील यांना आहे. त्यामुळे कदाचित त्याच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध आहे. विनय कोरे यांच्या भूमिकेमुळे संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पुढे काय होणार हे पाटील यांना माहीत नाही का? चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात काहीच कळत नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

Leave a Comment