Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2950

बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली; मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली. त्याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाल की, काल राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घ्यायला उशीरच झाला. कारण निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला असल्याचा टोलाही यावेळी देशपांडे यांनी लगावला.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला गेला आहे. मुंबईतील हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित राहण्याच्या चर्चेवरूनही देशपांडे यांनी जोरदार टोलेबाजी केली होती. मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले. आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर प्रवास करावा. त्यामुळे तिथलेही रस्ते गुळगुळीत होतील, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला होता.

Gold-Silver Prices :आज सोन्या-चांदीच्या दरात किती घट झाली, आजचे दर येथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे सोने 48 हजार रुपयांच्या खाली तर चांदीचा भाव 62 हजारांच्या खाली आला आहे. जर आपण आजच्या किंमतीबद्दल बोललो, तर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह ट्रेड करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.08 टक्क्यांनी वाढला आहे.

आज सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ते पहा
आज, MCX फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 47,659 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,640 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,950 रुपये
पुणे – 46,130 रुपये
नागपूर – 46,950रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,950 रुपये
पुणे -48,640 रुपये
नागपूर – 48,950 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4612.00 Rs 4584.00 -0.611 %⌄
8 GRAM Rs 36896 Rs 36672 -0.611 %⌄
10 GRAM Rs 46120 Rs 45840 -0.611 %⌄
100 GRAM Rs 461200 Rs 458400 -0.611 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4863.00 Rs 4834.00 -0.6 %⌄
8 GRAM Rs 38904 Rs 38672 -0.6 %⌄
10 GRAM Rs 48630 Rs 48340 -0.6 %⌄
100 GRAM Rs 486300 Rs 483400 -0.6 %⌄

फलटणला एकाचा खून तर एकजण गंभीर जखमी

फलटण | फलटण तालुक्यातील निलेश हिरालाल चव्हाण ऊर्फ (निल्या मच्छली) याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. तर त्याचा मित्र भरत फडतरे याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात मिळालेली अधिक माहिती अशी की, काल बुधवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील शंकर मार्केट येथे टोपी चौकात निल्या चव्हाण व त्याचा मित्र भरत फडतरे घटनास्थळी होते. त्या दरम्यान 4 ते 5 लोकांनी दोघांना मारहाण केली. या मारहाणीत निलेश चव्हाण उर्फ निल्या मच्छली याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे निलेश यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

तर निलेश यांचा मित्र भरत फडतरे हा गंभीर जखमी झाला असून त्यास बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयिताची माहिती पोलिसांना मिळालेली असून गुरूवारी सकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे फलटण शहर पोलीसांनी सांगितले आहे.

मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहणार; राजेश टोपे राहणार उपस्थित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील.

देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.

कधी आहे मोदींची बैठक-
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.

Stock Market : शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, आज इन्फोसिस, विप्रो, टीसीएसवर असणार लक्ष

Stock Market Timing

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार बुधवारी जोरदार उघडला. आज 13 जानेवारीला सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात ग्रीन मार्कने झाली आहे. सेन्सेक्स 30.58 अंक किंवा 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 61,180.62 वर उघडला, तर निफ्टी 4.70 अंक किंवा 0.03 टक्क्यांच्या वाढीसह 18217 वर उघडला.

हे शेअर्स 9.50 ला तेजीत होते
रात्री 9.50 वाजता सेन्सेक्स 108 अंकांनी उसळी घेत 61,258.44 वर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टीत 41.95 अंकांची वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सच्या 30 शेअर्स पैकी 21 शेअर्स वधारले आहेत. यासह, टाटा स्टीलचे शेअर्स 3.97 च्या वाढीसह अव्व्ल स्थानी आहेत.

आज ‘या’ कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल येणार आहेत
आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी Mindtree, Tata Metaliks, Aditya Birla Money, CESC, Athena Global Technologies, Eureka Industries, Gautam Gems, GTPL Hathway, Mega Corporation, Mishtann Foods, Palm Jewels, Plastiblends India, Rotographics (India) आणि सुरक्षे (India) यांसारख्या कंपन्या. सोलर इ. आपले निकाल जाहीर करतील.

टाटा मोटर्स फोकसमध्ये
किरकोळ विक्री 37.6% घसरून 80,126 युनिट्सवर आली, तर चीनमधील विक्री तिमाही-दर-तिमाही आधारावर 6.9% कमी झाली, तर युरोपमधील विक्री 6.8% नी घसरली. चिप समस्यांमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. जेएलआर वाहनांची मागणी चांगली असल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी. तिमाही आधारावर, घाऊक विक्रीत 8% वाढ झाली आहे. JLR कडे 154,000 युनिट्सची ऑर्डर बुक आहे.

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजप तिकीट नाकारणार?? फडणवीसांच्या विधानानंतर चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रिकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ,तर भाजप उत्पल्ल पर्रिकरांच्या उमेदवारीसाठी फारशी उत्सुक दिसत नाही. त्यातच गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाने उत्पल्ल पर्रिकरांच्या आशा मावळाल्याची चिन्हे दिसत आहेत

काय म्हणाले फडणवीस-

उत्पल्ल पर्रिकर याना तिकीट मिळणार का असा प्रश्न फडणवीस याना केला असता ते म्हणाले, केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं. असे सूचक विधान फडणवीसांनी केलं

उत्पल्ल पर्रिकर यांनी धाडस दाखवावे – संजय राऊतांचे आवाहन

उत्पल्ल पर्रिकर याना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी दिसताच शिवसेनेने त्याना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून गोव्यात ठाण मांडून बसलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे राजकारणात टिकण्यासाठी जे एक धाडस असायला लागतं ते उत्पल पर्रिकर दाखवणार का हा सर्वस्वी त्यांना निर्णय घ्यायचाय असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर उत्पल्ल पर्रिकरमोठा निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे

भाजपने गोव्यात जनमतांची चोरी करून सत्ता मिळवली; संजय राऊतांचे फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. “भाजपच्या नोटा महाराष्ट्रातून गोव्यात फार येत आहेत. फडणवीस हे आता गोव्याला आता जायला लागले आहेत. त्यांच्या डोक्यात नोटा नोटा असल्याने त्याचे प्रताप आता दिसत आहेत. भाजपला स्वबळावर आतापर्यत सत्ता मिळवता आली नाही. त्यांनी जनमताची चोरी करून या ठिकाणी सत्ता मिळवली, असा थेट आरोप करीत राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जात आहेत. त्याच्या पूर्वीपासून मी गोव्यात जात आहे. आम्हाला माहिती आहे कि गोव्यात भाजपने कशा प्रकारे सत्ता मिळवली आहे. गोव्यात सध्या भाजपकडून महाराष्ट्रातून नोटा पाठवल्या जात आहेत. या ठिकाणी भाजपला आतापर्यत स्वबळावर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत नोटांच्या साह्याने जनमतांची चोरी करून निवडणूक जिकल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, या ठिकाणी निवडणुकीत शिवसेनेना तब्बल 50 ते 100 जागा लढवणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहे. उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व दाखवले पाहिजे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.

काँग्रेसपुढे आम्ही झोळी घेऊन गेलो नाही – राऊत

आज घेतलेल्या अपत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात काँग्रेस पक्षाबरोबरच्या आघाडीबाबतही मत मांडले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात एकत्र लढण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला माहिती नाही. 40 पैकी 30 जागा काँग्रेसलेल्या लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या 10 जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या 50 वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत, असे राऊत यावेळी म्हणाले.

सातारा पोलिस दलातील पती- पत्नी भडका उडाल्याने आगीत होरपळले

fire
fire

सातारा | सातारा पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या सिटी पोलिस लाईनीत बुधवारी सकाळी घरामध्ये आग लागून पोलिस पती व पत्नी असलेले दाम्पत्य भाजले. या घटनेत महिला पोलिस गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भडका झाल्याने ही घटना समोर आल्याचा प्राथमिक जबाब महिला पोलिसाने दिला आहे. महिला पोलिस संगिता जेटाप्पा लोणार (काळेल) व पती जेटाप्पा लोणार (दोघे रा. पोलिस वसाहत, सातारा) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संगीता या भरोसा सेलमध्ये तर जेटाप्पा हे महामार्ग पोलिस म्हणून कर्तव्य बजावत आहेत. बुधवारी सकाळी सिटी पोलिस लाईनीत ते राहत असलेल्या घरातून धूराचे व आगीचे लोट येवू लागल्याने परिसर हादरुन गेला. आरडाओरडा झाला असता लोणार दाम्पत्य भाजल्याचे समोर आले. यामध्ये पत्नी संगीता या 55 टक्के भाजल्याने व त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे उपचारार्थ हलवले आहे.

जखमी अवस्थेत दोघांना तात्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलवले. सातारा पोलिस दलात या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. महिला पोलिसाचा प्राथमिक जबाब घेतला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, “दोन्ही पोलिसांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक जबाब झाला आहे. उपचारानंतर आणखी दोन दिवसांनी पुन्हा जबाब घेतला जाणार आहे. याप्रकरण कोणतीही तक्रार असेल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला मैत्रिणीवर अत्याचार

rape

औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील बी. कॉम.च्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच 26 वर्षीय मित्राने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार काल उघडकीस आला.

बजाजनगर येथील एका महाविद्यालयात 21 वर्षीय विद्यार्थिनी बी.कॉम, प्रथम वर्ष या वर्गात शिक्षण घेते. तिच्या गावात दिनेश रोहिदास शेलार (26) हा मुलगा राहतो. लहानपणापासून त्यांची ओळख आहे. त्यामुळे एकमेकांशी मैत्री निर्माण झाली. ते एकमेकांना आवडत असल्याने ते एकमेकांना भेटत होते. मी तुझ्याशीच लग्न करीन, असे तो तिला नेहमी आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत होता. 5 मार्च 2021 रोजी दिनेश शेलार याचे नात्यातील मुलीशी लग्न झाल्याचे तिला माहित झाले. त्यानंतर तिने दिनेश शेलारशी सर्व संबंध तोडून टाकले. त्यानंतरही तो तिला वेळोवेळी फोन करुन शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. तेव्हा त्यास विरोध केला असता तो तिला नेहमी तिच्या बदनामीची धमकी देत असे.

त्यानंतर 6 जानेवारी 2022 रोजी दिनेश हा तिला भेटला. यावेळी म्हणाला की, मला तुझ्या सोबत बोलायचे आहे, लॉजवर चल. असे म्हणून त्याने तिला हॉटेल साईकृपा लॉज येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिला शरीरसंबंध करु दे, नाहीतर तुझी बदनामी करील, अशी धमकी दिली व बळजबरीने तिच्या इच्छेविरुध्द लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने अनेक वेळा बदनामी करण्याची भीती घालून इच्छेविरुध्द अत्याचार केले. बदनामी होण्याची भीती वाटत असल्याने तिने कोणाला माहिती दिली नाही. शेवटी आईला हकिकत सांगितली. नंतर आईसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने काल दिनेश रोहिदास शेलार (26) रा. तिसगाव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

रोटी बनवताना चक्क पिठावर थुंकण्याचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ पाहताच संतप्त व्हाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण कधी कधी आवड म्हणून बाहेरच्या हॉटेल वर जातो. पण बाहेरचे पदार्थ हे खरंच आपल्यासाठी सुरक्षित आहेत का याचा विचार आपण कधीही करत नाही. पण आता हा विचार करायला भाग पाडणारी एक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेश येथील एका धाब्यावर आचारी चक्क तंदुरी रोटीवर थुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधील काकोरी पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या परिसरातील इमाम अली ढाब्यामध्ये हा सर्व प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये ढाब्याबाहेर असणाऱ्या तंदुरीमध्ये दोन स्वयंपाके रोटी तयार करताना दिसत आहेत. यापैकी ओल्या कापडावर पीठ ठेऊन रोटीला आकार देणारी व्यक्ती रोटीवर थुंकताना दिसतेय.

हा व्हिडिओवरून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून काकोरी पोलिसांनी हॉटेल मालक याकुब आणि त्याच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.याकुब, दानिश, हाफीज, मुख्तार, फिरोज आणि अनवर अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव असून सध्या या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत