Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2951

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. अशात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यातून त्यांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात लवकर निर्णय घ्यावा यासह महत्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात आपण तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते, मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिफारशींचे पत्र पाठवले आहे.

राज्यातील एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. अशात गेल्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. २० जानेवारीला समितीचा दिलेला १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आई परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि विलीनीकरणाच्या मुद्यांवरून संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेत चर्चा केली. मात्र, यावर तोडगा निघाला नाही.

थरारक दरोडा 80 हजार डाॅलरचा : अपहरण करून फंड ट्रान्सफर करणारे 9 जण जेरबंद

सातारा | कराड तालुक्यातील उंब्रज येथील एकाचे खटाव तालुक्यातील चितळी येथून अपहरण करुन त्यांचा मोबाईल आणि टॅबचा पासवर्ड अनलॉक करुन क्रिप्टोकरन्सीचा 64 लाख रुपयांचा फंड (80 हजार डॉलर) दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर करणाऱ्या 9 जणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चाैघांसह कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील संशयितांचा समावेश आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, कराड तालुक्यातील उंब्रज येथील ऋषीकेश राजेंद्र शेटे यांचा क्रिप्टोकरन्सीचा 64 लाख रुपयांचा फंड मोबाईल आणि टॅबच्या माध्यमातून दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील चितळी गावच्या हद्दीत पंढरपूर ते मल्हारपेठ जाणाऱ्या रस्त्यावरील मोहितेमळा या रस्त्याने ऋषीकेश राजेंद्र शेटे उंब्रजकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या चारचाकीला दुचाकीवरुन आलेल्यांनी पाठीमागून धडक दिली आणि शेटे यांना थांबवले. यानंतर दुचाकीवरील दोघे आणि अन्य दोघांनी शेटे आणि त्यांचे मित्र यांचे तोंड बांधून चारचाकीत घालून अपहरण केले. यावेळी त्यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करत मारहाण केली. तसेच शेटे यांच्याकडील 95 हजार रुपये किमंतीचा मोबाईल हॅण्डसेट, टॅब, घड्याळ असा ऐवज चोरुन नेला. यावेळी चोरट्यांनी शेटे आणि त्यांच्या मित्राला पुसेसावळी येथील एका शेतात सोडून दिले आणि त्यांनी पलायन केले.

याबाबतची तक्रार शेटे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्याबाबत एलसीबीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने तपास सुरु केला होता. या प्रकरणी किरण गुलाब गावीत (वय- 32 वर्षे, रा. विद्यानगर कराड), प्रवीण बाळासोा शेवाळे (वय- 26 वर्षे, रा. घोगाव, ता. कराड), बाळु तुकाराम भोसले (वय- 31 वर्षे, रा. दुर्गामाता चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), किशोर अंबादास निलंगे (वय- 27 वर्षे, रा. शहापूर, पाटील मळा, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल आनंदा शेवाळे(वय- 30 वर्षे, रा. मलकापूर, ता. कराड), बिरजू उर्फ सतीश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय- 38 वर्षे, रा. शांतीनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय- २९ वर्षे, रा. सोमंथळी, ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे, (वय- 31 वर्षे, रा. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), अभिजीत सुरेश खंडागळे (वय- 35 वर्षे, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा.निपाणी) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, गर्दी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कोरोनाचा हाहाकार : सातारा जिल्ह्यात नवे 925 पाॅझिटीव्ह, ओमिक्राॅनचे 3 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 925 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 122 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 925 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 18.6 टक्के आला आहे. कोरोना सोबत अोमिक्राॅनच्या रूग्णात वाढ झालेली असून बुधवारी सातारा जिल्ह्यात तीन रूग्ण वाढलेले आहेत. तर जिल्ह्यात अोमिकाॅन बाधितांची संख्या 13 वर पोहचली आहे.

युवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे : पालकमंत्री

जिल्हयात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस त्वरीत घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

कुऱ्हाडीने वार करून तरुणाची निर्घृण हत्या  

crime
औरंगाबाद – जिल्ह्यातील पैठण जवळील बालानगरातील 27 वर्षीय युवकावर कुर्‍हाडीने वार करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संतोष भानुदास गल्हाटे (27) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे खून करणाऱ्या आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
बालानगर येथील दारू दुकानाच्या समोरील मैदानावर काल रात्री गावातील संतोष गल्हाटे व भावकीतील दिनेश गल्हाटे यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणातून वाद सुरू झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दिनेश गल्हाटेने संतोषच्या डोक्यात, हातावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला ठार करत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. मी संतोषला कायमचा खल्लास केला आहे असे त्याने सांगितल्यावर पोलिसांनी धक्काच बसला. पोलिसांनी विचारपूस करून सर्व घटना त्याच्याकडून समजून घेतली.
दिनेशने खुनाची कबुली दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांना घटनेची माहिती दिली. नागरगोजे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदर्गे, नामदेव कातडे, गणेश खंडागळे, कर्तारसिंग सिंघल, दिनेश दाभाडे यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलिस करत आहेत.

पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या रचलेल्या कटामागे काँग्रेस हाय कमांडसह पंजाबचे मुख्यमंत्री सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफ्यात अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेस विरुद्ध वातावरण तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊ पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना तत्काळ अटक करावी. पंतप्रधानांची हत्या करण्याच्या रचलेल्या कटामध्ये चन्नी यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्याच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. या घटनेतील पुरावे पाहिले तर सर्व पुरावे हेच दर्शवत आहेत की काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा कट रचला होता.

यावेळी शर्मा यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील गोंधळाच्या प्रकरणानंतर केलेल्या स्टींग ऑप्रेशनचाही संदर्भ दिला. पंतप्रधानांना जीवे मारणार असल्याची माहिती पंजाबमधील पोलिसांना दोन जानेवारी रोजीच मिळाली होती. या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यापद्धतीची वक्तव्य केली त्यावरुन त्यांना या कटाचा अंदाज होता, असा धक्कादायक खुलासाही यावेळी शर्मा यांनी केला.

कोरोनाचे मृत्युसत्र थांबले ! मात्र नव्या रुग्णात मोठी वाढ

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेचारशेच्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 484 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 410 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 74 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 16 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1839 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 71 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 60 तर ग्रामीणमधील 11 रुग्णांना सुटी देण्यात आली.

नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकले आणि….

rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नराधमांनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर ह्या आरोपींनी मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. यानंतर स्थनिक लोकांनी या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. हि पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

या नराधम आरोपींना लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जयपूरला पाठवले आहे. या मुलीच्या गुप्तांगाला धारदार वस्तूने दुखापत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. हि मुलगी फक्त आई आणि बाबा एवढेच बोलत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 5 टीम तयार केल्या आहेत.

पीडितेच्या काकांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. हि मुलगी जेव्हापासून बेपत्ता झाली तेव्हापासून तिचा शोध सुरु होता मात्र तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. देशात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारावरही कडक कायदा करण्यात आला असतानादेखील मुलींवरील बलात्काराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. या घटनेतील पीडित मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

लग्न करण्यासाठी पठ्ठ्याने केला जबरदस्त कांड; मंडपाऐवजी पोहोचला जेलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील कटनी या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. स्वतःच्या लग्नासाठी पैशाची गरज भासल्याने आरोपीने हि चोरी केली. या चोरीसाठी आरोपीने एक प्लॅनसुद्धा आखला होता. तो आमलात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये पाठवले. या आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कमेशिवाय मोबाईल, दुचाकीही जप्त केली. या आरोपीने कटनी जिल्ह्यातील बडवारा तालुक्यात मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून 1 लाख 27 हजार 212 रुपये चोरी केले होते. यानंतर बँकेचे मॅनेजर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या 72 तासांत अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाच्या आधारे रोहनिया गावातील सुभाष यादव या 29 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. हा व्यक्ती आपल्या मित्रांना पार्टी देत होता. यानंतर पोलिसांनी आरोपी सुभाषला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच बँकेत चोरी केली असल्याचे कबुल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नासाठी ही रक्कम चोरी केली होती. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे संधी मिळताच त्याने 6 आणि 7 जानेवारीला रात्री मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून त्यातून 1 लाख 27 हजार रुपये लंपास केले होते. चोरलेल्या रक्कमेपैकी पोलिसांनी 1 लाख 14 हजार रोकड आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल,तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बाईक, सुटकेस जप्त केली. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीची आत्महत्या ! आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्…

राजगढ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगढमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या अफेअरला कंटाळून आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला असून या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या पत्नीचे मुस्लिम तरुणासोबत अफेअर असल्याचे सांगितले. पत्नीच्या या अफेअरला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर पोलिसांनी या तरुणाची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही घटना राजगढ जिल्ह्यातील बमलाबे गावामध्ये घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या मुकेश सेन नावाच्या तरुणाने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत मुकेशने पूजा नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. काही वर्षांपूर्वी मुकेश पूजासोबत घरातून पळून गेला होता. त्यावेळी पूजा ही अल्पवयीन होती. या प्रकरणी मुकेशविरोधात न्यायालयात खटलासुद्धा सुरु आहे अशी माहिती राजगढच्या एसपीनीं दिली आहे.

मुकेशची पत्नी पूजाचे नदीम अन्सारी नावाच्या तरुणासोबत अफेअर आहे. तसेच पूजाचे कुटुंबीय मुकेशला धमक्या देत आहेत आणि पत्नीचा प्रियकर नदीमनेही त्याच्यावर हल्ला केला होता. असे त्याने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. यामुळे या सगळ्या प्रकाराला वैतागून मुकेशने विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. राजगढ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारू दुकानाचा परवाना द्या’; विद्यार्थ्यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद – ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार याने uuu मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याने हे पत्र पाठवलं आहे.

“ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात 40 विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी त्यावर उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये शिक्षण कसे घ्यायचे?,” असा प्रश्न जगडमवार याने उपस्थित केला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही होत आहे. करोना, ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र निर्धास्तपणे सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

“राज्यात शिक्षणापेक्षा दारूला जास्त महत्वाचे स्थान प्राप्त झाले. ऑनलाइन शिक्षण शिकून तरी काय फायदा, कारण त्यात प्रात्यक्षिक ज्ञान काहीच मिळत नाही. त्यामुळे अशा शिक्षणापेक्षा दारूचा परवाना मिळाल्यास उपाशी मरणार नाही,” असं या विद्यार्थ्याने पत्रात म्हटलं आहे. सर्व नियमांचे पालन करून दारूचा व्यवसाय करेन, योग्य दरातच त्याची विक्री करेन, निवडणुकीच्या काळात व बंदीत ज्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते त्याचा दुरुपयोग करणार नाही,” असेही या विद्यार्थ्यांने पत्रात म्हटले आहे.