Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2952

राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार मराठी पाट्या; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दुकानावरील पाट्या या मराठीत असण्यासंदर्भात ठाकरे सरकारने आज महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ठाकरे सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ठाकरे सरकारने मराठी भाषे संदर्भात चर्चा करताना एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबतचा. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियमावर चर्चा करत मराठी पाट्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे आता राज्यात मराठी पाट्या दुकानांवर झळकणार आहेत. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या मुलाला पोलिसांकडून अटक

wasim saudagar

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद परांडा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वसीम जाकीर सौदागर याच्यावर जमिनीवर शासकीय आरक्षण असताना देखील जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज कारवाई करत वसीम जाकीर सौदागर याला अटक केली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूकच्या पूर्वी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे.

काय आहे नेमके प्रकरण
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील जमीन सर्वे नं.234 /ब यांचे खरेदी खत करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आरक्षित जमिनीचे बेकायदेशीररित्या नावे केल्याप्रकरणी वसीम जाकीर सौदागर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज परंडा पोलिसांनी कारवाई करत आरोपी वसीम सौदागर याला बेड्या ठोकल्या आहेत.

परांडा शहरातील 234 गट ब मधील जमिनीवर शासकीय आरक्षण आहे. पण तरीदेखील हि जमीन खरेदी केल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. जाकीर सौदागर आणि वसीम जाकीर सौदागर या बापलेकांवर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याअगोदरसुद्धा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नगरपालिका मधील कर्मचारीसुद्धा दोषी आढळून आले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारी दाखल होऊन बराच काळ लोटला यानंतर आज हि कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊतांना कोण ओळखत, ते कोणाचे प्रवक्ते आहेत ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “राऊतांना गोव्यात कोण ओळखतं?, त्यांना महत्व देण्यात काही अर्थ नाही. राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत, हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे,” असे फडणवीसांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार रींगणात आले. त्यांनी इतरांचा हातात हात घेत फोटोही काढले. महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आताही ते तसेच करीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचार करून बोलावे. संजय राऊत आज शरद पवारांविषयी जे बोलले हाच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना करावा. आपली उंची किती आणि पंतप्रधान मोदी यांची उंची किती, हे त्यांनी लक्षात घ्यावे,असे फडणवीस म्हणाले.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राजकीय निवडणुकीसाठी वापरणे योग्य नाही. तो मुद्दा हा खऱ्या अर्थाने सुरक्षेचा आहे. त्यामुळे या मुद्यांवर राजकारण केने योग्य नाही. भाजपमधून जे लोक बाहेर जात आहेत, त्यांना माहिती आहे कि भाजप त्यांना यावेळेस उमेदवारीचे तिकीट देणार नाही. म्हणून ते दुसऱ्या पक्षात जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आम्ही लग्नाळू ! महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून स्टेटस ठेवले, अन् मग…

WhatsApp

औरंगाबाद – ओळखीच्या विवाहित महिलेची छायाचित्रे आपली भावी पत्नी म्हणून स्वतः च्या व्हॉट्सॲपवर आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या दोन लग्नाळू तरुणांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रवीण मदन तुपे (27, रा. मिसारवाडी) आणि सुमित धीरज मोरे (19, रा. पृथ्वी पार्क, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सायबर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार विवाहितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या लहान बाळासह शहरात राहते. वाहनचालक आरोपी तुपेसोबत तिची गतवर्षी ओळख झाली होती. यातून पुढे काही दिवसांनी त्यांची मैत्री झाली. तुपेने तिला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. एवढेच नव्हे तर मोरे यानेही तुपेप्रमाणेच तिची छायाचित्रे स्वतः च्या इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड करून तिला भावी पत्नी असे संबोधित करण्यास सुरुवात केली.

या प्रकारामुळे तिची समाजात बदनामी होऊ लागली. या दोघांमुळे आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार तिने 27 डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, कर्मचारी गोकूळ कुतरवाडे, राम कवडे आणि अमोल सोनटक्के यांच्या पथकाने तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले आणि मंगळवारी त्यांना अटक केली.

पत्रकारांची लेखणीतून न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मजकूर लोकांना कळेल अशा बोलीभाषेत सांगणारा व्यक्ती म्हणजे  पत्रकार असतो. समाजात आपली अोळख निर्माण करण्यासाठी वेगळी वाट निर्माण करावी लागते. पत्रकारांची लेखणीतून न्याय देण्याची भूमिका असली पाहिजेच, परंतु जे वेगळेपण जपतात त्यानाच समाजात एक वेगळी उंची मिळते. तेव्हा लिहते रहा, त्यासाठी वाचत रहा असा सल्ला सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिला.

कराड येथील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये पत्रकार दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, सातारचे जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे, खजिनदार मिलिंद भंडारे, सचिव संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. पाटील म्हणाले, मनापासून केलेले काम हे आयुष्यभर टिकते. पत्रकारांनीही अगदी तळमळीने केलेल्या कामाची समाजाकडून त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच पोच मिळते. समाजाने पाठीवर दिलेली हीच कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची असते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन राजेश शहा यांनी केले.

धायरीत मद्यधुंद डंपर चालकाची लोखंडी दुभाजक तोडून ज्यूसच्या हातगाडीसह रिक्षाला धडक

dhayri crime

धायरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील धायरी या ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर लोखंडी दुभाजक तोडून रिक्षासह ज्यूस सेंटरच्या हातगाडीवर जाऊ आढळला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धायरी येथील मुक्ताई गार्डनजवळ घडली आहे. अविनाश कोंडीबा खंदारे असे या मद्यधुंद डंपर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी कि, धायरी फाट्याकडून भरधाव वेगाने येणारा एक डंपर मुक्ताई गार्डन जवळ लोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्यांमध्ये शिरला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या रिक्षालाही धडकला. या अपघातामध्ये रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात हातगाड्या व टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी केंचाप्पा जनवाड, मनोज राऊत हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकास ताब्यात घेतले.

पाच दिवसांपूर्वीदेखील धायरी येथील गणेश नगर परिसरातील मुक्ताई गार्डनजवळ पाण्याच्या टँकरखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता याच परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यधुंद डंपर चालकाचा थरार पाहायला मिळाला. या परिसरामध्ये डंपर चालक व टँकर चालक आपली वाहने बेदरकारपणे चालवतात. सिंहगड रस्ता पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

स्टँडर्ड टॅक्स डिडक्शन काय आहे ? कर्मचारी त्यात वाढ होण्याची मागणी का करत आहेत हे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आगामी अर्थसंकल्पापासून कर्मचार्‍यांना 2018 च्या बजटमधून पुन्हा एकदा स्टॅंडर्ड डिडक्‍शनच्या फायद्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या, स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वार्षिक 50,000 रुपये आहे. कर्मचाऱ्यांना करसवलत देऊन त्यांना जास्त पैसे मिळावेत, हा सुरू करण्यामागचा उद्देश आहे.

इन्कम टॅक्सचे नियम पगारदार कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिसत नाहीत, असे कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे मत आहे. येथे व्यावसायिक आणि सल्लागार एक्जंप्शन क्‍लेमद्वारे एका महिन्यात विविध खर्चांवर सूट मिळवू शकतात, मात्र पगारदार लोकांसाठी खूप मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी सरकारने 2018 च्या अर्थसंकल्पात त्याची अंमलबजावणी केली. तर, स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय आणि त्याचा हक्क कोणाला आहे ते जाणून घेऊयात.

स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय ?
स्टँडर्ड डिडक्शन ही रक्कम आहे जी थेट तुमच्या स्वतःच्या उत्पन्नातून वजा केली जाते. फक्त उर्वरित उत्पन्नावर टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स मोजला जातो. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये, एक विशिष्ट रक्कम एकूण पगारातून सूट दिली जाते जेणेकरून एकूण करपात्र उत्पन्न कमी होईल.

याचा फायदा कोण घेऊ शकतो ?
स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना घेता येईल ज्यांनी नवीन टॅक्स नियमांची निवड केली नाही. नवीन नियमांमध्ये कमी टॅक्स रेटची तरतूद आहे. याशिवाय पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांनाही हे डिडक्शन मिळण्याचा हक्क आहे. मात्र फॅमिली पेन्शनवर स्टँडर्ड डिडक्शन मिळत नाही. याचा अर्थ असा की, जर एखाद्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेला कोणी त्याच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन घेत असेल तर त्याला हे डिडक्शन किंवा सूट मिळू शकत नाही.

अशा प्रकारे समजून घ्या
स्टँडर्ड डिडक्शन लिमिट रुपये 50,000 किंवा एकूण पगार, यापैकी जे कमी असेल. उदाहरणार्थ, ‘A’ नावाच्या करदात्याचा एकूण वार्षिक पगार रु. 5 लाख आहे, अशा परिस्थितीत त्याला रु. 50,000 चे स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. जर ‘A’ व्यक्तीने एका वर्षात फक्त एक महिनाच काम केले आणि त्याला 42000 रुपये पगार मिळाला, तर अशा परिस्थितीत तो 42000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनला पात्र असेल.

नोकरी बदलण्याचा कोणताही परिणाम नाही
नोकरी बदलल्याने स्टँडर्ड डिडक्शन सूटवर कोणताही परिणाम होत नाही. नांगिया अँडरसन एलएलपी पार्टनर सुनील गिडवानी यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की,”येथील एकूण पगारामध्ये नियोक्त्याने दिलेल्या पगाराचे सर्व घटक आणि सर्व भत्ते आणि भत्ते यांचे सर्व करपात्र भाग समाविष्ट आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याने वर्षभरात नोकरी बदलली तरी तो स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळण्यास पात्र आहे.

अर्थसंकल्पामध्ये वाढ अपेक्षित आहे
अर्थसंकल्पापासून 2022 कर्मचार्‍यांना अपेक्षित आहे की, स्टँडर्ड डिडक्शन लिमिट वाढेल. डेलॉइट इंडियाचे भागीदार आलोक अग्रवाल यांनी सांगितले की,”इतर सवलतींव्यतिरिक्त, पगारदार कर्मचार्‍यांनाही अर्थसंकल्पामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे.” अग्रवाल म्हणतात की,” 50,000 रुपयांवरून वाढवण्यापेक्षा कोस्ट इन्फ्लेशन इंडेक्समध्ये ते समाविष्ट करणे चांगले आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे.”

“त्याने कधीच भविष्यवाणी…”; पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यवाणी वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका चांगलीच रंगली आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि भाजपमधील नेत्यांत एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती,” असं आव्हाडांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी पोपटाला आपल्या हातावर घेण्याचा प्रयत्न करत असताना तो मात्र येत नसल्याचं दिसत आहे. तेथील कर्मचाऱ्याने प्रयत्न करुनही तो पोपट मोदींकडे जात नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या जुन्या व्हिडीओवरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांमध्ये वाद होणार यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच थेट निशाणा साधला आहे.

पिकअप गाडीचा भीषण अपघात ! लहान चिमुरड्यांसह 11 प्रवासी गंभीर जखमी

chandrapur crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एका पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात हा अपघात घडला आहे. या पिकअपमधील प्रवासी ओदिशाहून कामानिमित्त निघाले होते. यावेळी कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला.

कशा प्रकारे घडला अपघात ?
या पिकअप गाडीतील नागरिक ओदिशा राज्यातून करीमनगर येथे कामानिमित्त निघाले होते. या दरम्यान आकापूर जवळील वळणावर पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हि पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत ओदिशा येथील कामगार महिला पुतना गजपती धरोहा हिचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सामान्य जिल्हा रुग्णालय चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले.

आकापूर वळणावर रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याने नव्या चालकांना अडचण येत असल्याची मागणीकरूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने या रोडवरील अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अजूनही होतोय जातीभेद ? दलित असल्याने नाकारले घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद – पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबादेत घडली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलाला दलित असल्याने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे महेंद्र गंडले यांना शहरातील उच्चभ्रू सोयायटीत केवळ दलित असल्याने घर नाकारले गेले. यामुळे या प्रकरणातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादेतील हिरापूरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर ॲड. गंडले कुटुंबीयासह गेले होते. त्यांनी बांधकाम विकासकाला घर दाखवण्यास सांगितले. यावेळी एका कर्मचाऱ्याने त्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात असा प्रश्न विचारला. यावर गंडले यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनुसूचित जमातीचा असल्याचे त्यांनी सांगताच कर्मचाऱ्याने त्यांना घर दाखवायला टाळाटाळ केली. आम्ही तुम्हाला घर देणार नाही, असे सांगत त्याने त्यांना जायला सांगितले.

यानंतर ॲड. गंडले यांनी थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्रकरणाचा तपास चिकलठाणा पोलिस करित असल्याचे सांगितले जात आहे