Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2960

गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर भरावा लागणार टॅक्स; पहा काय आहेत नियम

Gold Price Today

नवी दिल्ली । जगात सर्वाधिक सोन्याचा वापर आपल्या देशात केला जातो. गुंतवणूक असो वा सौंदर्य, सोने सर्वोपरि आहे. लग्नाच्या एकूण खर्चापैकी सर्वांत मोठा हिस्सा सोन्यावर खर्च होतो. लग्न किंवा नातेवाइकांच्या वाढदिवसानिमित्तही सोने भेट म्हणून दिले जाते. कोरोना महामारीने संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त केली असली तरी लोकांच्या सोन्याच्या वेडावर अजिबात परिणाम झालेला नाही.

भारतात भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स नसला तरी सोने या कक्षेबाहेर आहे. गिफ्ट केलेले सोने टॅक्सफ्री नसते. एका ठराविक मर्यादेनंतर गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावर टॅक्स भरावा लागतो. डिजिटल गोल्ड, फिजिकल गोल्ड, पेपर गोल्ड, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट अशा विविध मार्गांनी सोन्यात गुंतवणूक केली जाते. सोन्यातील गुंतवणुकीवर आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स भरावा लागतो.

सोन्याच्या गुंतवणुकीवर गुंतवणुकीवर टॅक्स आकारला जातो
तुम्ही दागिने, बिस्किटे, कॉईन किंवा गोल्ड बार यांसारख्या फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास, त्यावरील टॅक्सचे नियम वेगळे आहेत. सोने खरेदी करताना GST भरावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीने सोने विकले तर त्याला 20 टक्के दराने टॅक्स भरावा लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) च्या आधारावर सोन्याच्या विक्रीवर 4% सेस आहे. सोने खरेदी केल्यानंतर, तुम्ही ते 36 महिन्यांच्या आत विकल्यास, ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स STCG अंतर्गत येईल आणि 36 महिन्यांनंतर, सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो.

या प्रकरणात टॅक्स नाही
काही प्रकरणांमध्ये, भेट म्हणून दिलेले सोने पूर्णपणे टॅक्सफ्री असते. कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू म्हणून मिळालेले सोने कराच्या अधीन नाही. वडिलांनी मुलीच्या वाढदिवसाला दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. तसेच गिफ्ट मध्ये मिळालेल्या सोन्याला कोणतीही मर्यादा नाही.

या सोन्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही
लग्नात सोन्याचे दागिने देणे ही परंपरा आहे. आई तिच्या मुलीच्या लग्नात सोन्याचे दागिने भेट देते. मग तीच मुलगी नंतर आपल्या मुलीला सोने भेट देते. भेट म्हणून सोने देण्याची ही प्रक्रिया खूप पुढे जाते. अशा भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही.

कुटुंबातील पुढच्या पिढीला सोने देण्याची परंपराही खूप जुनी आहे. याला इनहेरिटिंग गोल्ड म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सोन्याचा वारसा मिळाला असेल तर त्यावर कोणताही टॅक्स नाही.

जर तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा दूरच्या नातेवाईकाकडून सोने भेट म्हणून मिळाले असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागेल. या कराची नोंद ‘इनकम फ्रॉम अदर सोर्स’ मध्ये केली जाते. भेट दिलेल्या सोन्याचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच या सोन्यावर टॅक्स आकारला जाईल.

लहान दुकानदारांचे आपत्तींमुळे होणारे नुकसान वाचवण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली । किराणा दुकानदारांप्रमाणेच छोट्या व्यावसायिकांसाठी विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) लवकरच यासाठी सहमती घेण्यास सुरुवात करेल. सरकारने प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणामध्ये (national retail trade policy) विमा योजनेचाही समावेश केला जाऊ शकतो. देशातील लहान व्यावसायिकांना मदत आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नॅशनल रिटेल ट्रेंड पॉलिसी आणली जात आहे.

नवीन रिटेल ट्रेड पॉलिसीमध्ये स्वस्त क्रेडिट फॅसिलिटी, डिजिटायझेशन आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यासारख्या गोष्टी जाहीर केल्या जातील. देशातील किरकोळ विक्रेते तक्रार करत आहेत की, त्यांना मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.

वाईट काळात मदत करण्यासाठी विमा
बिझनेस स्टँडर्डच्या एका बातमीनुसार, सरकारच्या नवीन रिटेल पॉलिसीमध्ये किराणा दुकानदारांप्रमाणेच छोट्या व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी विमा संरक्षण आणले जाईल. अपघात किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत लहान व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरून काढणे हा त्यामागचा उद्देश आहे. बड्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या अवैध धंद्यामुळे दिवसेंदिवस त्यांना व्यवसाय करणे कठीण होत असल्याची तक्रार देशातील छोटे व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे सरकारने आपल्या हितासाठी काहीतरी केले पाहिजे. ही मागणी लक्षात घेऊन सरकार आता रिटेल ट्रेड पॉलिसी आणत आहे.

रिटेल बिझनेसचा GDP मध्ये 12% वाटा आहे
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CCI) आणि ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म कार्नी यांनी तयार केलेल्या रिपोर्ट्स नुसार, रिटेल हे भारतीय अर्थव्यवस्थेतील तिसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे, जे सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) एकूण मूल्याच्या 12 टक्क्यांहून जास्त योगदान देते. हे क्षेत्र पाच कोटींहून जास्त लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी केंद्राने घाऊक आणि किरकोळ व्यवसायाचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) श्रेणीत समावेश केला होता. लहान उद्योगांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वर्गीकृत प्राधान्य क्षेत्रांतर्गत कर्ज मिळावे म्हणून हे केले गेले.

RAI ने रिटेल पॉलिसी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणतात की,” नॅशनल रिटेल ट्रेंड पॉलिसी ही एक सुविधा योजना आहे. देशातील अंतर्गत व्यापाराच्या विविध पैलूंमध्ये त्याची मदत होईल. या धोरणाव्यतिरिक्त, DPIIT ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ONDC) लाँच करण्याचे नेतृत्व करत आहे, ज्याचा उद्देश डिजिटल मक्तेदारीला आळा घालणे आणि रिटेल इंडस्ट्रीना फायदे देणे आहे.

जिल्ह्यात धावल्या 126 बसेस, तर 950 कर्मचारी परतले कामावर

st bus

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत 950 कर्मचारी कामावर परतले आहेत. काल दिवसभरात औरंगाबाद विभागातून 126 बस धावल्या. या बसेसने 364 फेऱ्या करत 4 हजार 497 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 8 खाजगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या.

सिडको बसस्थानकातून 1 हिरकणी, 29 लालपरीने 74 फेऱ्या केल्या. यातून 601 प्रवाशांनी प्रवास केला. तर मध्यवर्ती बस स्थानकातून 23 शिवशाही बस ने नाशिक व पुणे मार्गावर 33 फेऱ्या केल्या. तर 18 लालपरीने 42 फेऱ्या केल्या. याचा लाभ 2001 प्रवाशांनी घेतला. पैठण डेपोने 17 लालपरी चालवत 48 फेऱ्या केल्या. यात 597 प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड डेपोतून 4 लालपरी चालवत 16 फेऱ्या झाल्या यातून 238 प्रवाशांनी प्रवास केला.

वैजापूर डेपोतून 5 बसने 24 फेऱ्या केल्या असून, त्याचा लाभ 120 प्रवाशांनी घेतला. तर कन्नड डेपोतील 23 बसने 103 फेऱ्या करून 682 प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडले. गंगापूर डेपोने 3 बसच्या माध्यमातून 16 फेऱ्या केल्या. त्याचा लाभ 189 प्रवाशांनी घेतला. सोयगाव डेपोतून 1 हिरकणी आणि 3 लालपरीच्या माध्यमातून 63 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले.

Gold Price : सणासुदीच्या हंगामात वाढले सोन्या-चांदीचे दर, आजची किंमत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.17 टक्क्यांनी वाढला आहे, तर चांदीचा भाव 0.23 टक्क्यांनी वाढला आहे.

आज सोन्याचा दर 48 हजारांपेक्षा कमी आहे
फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.17 टक्क्यांनी वाढून 47,543 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.23 टक्क्यांनी वाढून 60,804 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,610 रुपये
पुणे – 45,850 रुपये
नागपूर – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,610 रुपये
पुणे -48,350 रुपये
नागपूर – 48,610 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4585.00 Rs 4585.00 0 %
8 GRAM Rs 36680 Rs 36680 0 %
10 GRAM Rs 45850 Rs 45850 0 %
100 GRAM Rs 458500 Rs 458500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4835.00 Rs 4835.00 0 %
8 GRAM Rs 38680 Rs 38680 0 %
10 GRAM Rs 48350 Rs 48350 0 %
100 GRAM Rs 483500 Rs 483500 0 %

राज्याचे मुख्य सीईओ, शिक्षणाधिकारी यांना खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. डिगे यांनी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि जनमाहिती अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिला आहे. माहितीचा अधिकार अधिनियमानुसार दिलेल्या राज्य माहिती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मिटमिटा येथील मोहम्मद अजिमोद्दीश मोहम्मद हमीद्दोदीन यांनी ॲड. सईद शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्याने 11 ऑक्टोबर 2019 रोजी जन माहिती अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत अर्ज देऊन माहिती मागितली होती. विहित कालावधी मध्ये माहिती न मिळाल्याने याचिकाकर्त्याने जि. प. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे प्रथम अपील दाखल केले. मात्र तरीही माहिती न मिळाल्याने याचिकाकर्त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठात दुसरे अपील दाखल केले होते. 2 मार्च 2019 रोजी अंतिम सुनावणीत राज्य माहिती आयुक्तांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांना शहानिशा करून 30 दिवसांच्या आत मोहम्मद अजीमोद्दीन यांना विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते.

तसेच प्रथम आपल्यावर सुनावणी घेतली नसल्यामुळे माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम 19 (6) चा भंग केल्यामुळे प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या 31 मार्च 2003 च्या परिपत्रकानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदरील आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून याचिकाकर्त्यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशावरून अंमलबजावणीसाठी खंडपीठात याचिका दाखल केली.

आत्ताच करा पॅन कार्ड आधारशी लिंक नाहीतर येऊ शकाल अडचणीत!

PAN-Aadhaar Link

नवी दिल्ली । जर तुमच्याकडेही पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पॅन कार्डधारकांनी 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या पॅनशी आधार लिंक केले गेले नाही तर तुमचे अनेक नुकसान होऊ शकते. सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे पॅन कार्ड इनव्हॅलिड होईल.

31 मार्च 2022 नंतरही पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाऊ शकते, मात्र या तारखेनंतर तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करायचा असेल, तर तुम्हाला लेट फीस म्हणून ₹ 1000 भरावे लागतील. 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयकर कलम 234H मध्ये 1000 रुपये लेट फीसची तरतूद करण्यात आली होती.

कलम 234H नुसार, या कायद्याच्या तरतुदींनुसार, जिथे एखाद्या व्यक्तीने कलम 139AA च्या उप-कलम (2) अंतर्गत आपला आधार नंबर सूचित करणे आवश्यक आहे आणि शेवटच्या तारखेपर्यंत तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, तो लेट फीस भरण्यास जबाबदार असेल. त्यासाठी 1000 भरावे लागतील.

पॅन-आधार लिंक न केल्याने काय तोटे आहेत ?
पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड इनव्हॅलिड होईल. याचा अर्थ असा कि तुम्ही म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. तुम्ही कोणतेही बँक खाते उघडू शकणार नाही. या सर्व कामांसाठी पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.

10,000 रुपये दंड होऊ शकतो
आयकर कायद्याच्या सेक्टर 272B अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने इनव्हॅलिड पॅन कार्ड दिल्यास, मूल्यांकन अधिकारी त्या व्यक्तीला दंड म्हणून 10,000 रुपये जमा करण्याचे निर्देश देऊ शकतात. तसेच, इनव्हॅलिड पॅन कार्ड धारक ITR भरण्यास सक्षम असणार नाही.

पॅन-आधार दोन प्रकारे लिंक करता येते
1. वेबसाइटद्वारे लिंक करा
सर्वप्रथम इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा
आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका
आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष मेन्शन असेल तरच स्क्वेअर टिक करा
आता कॅप्चा कोड टाका
आता Link Aadhaar बटणावर क्लिक करा
तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

2. SMS पाठवून लिंक करा
यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर – UIDPAN टाइप करावा लागेल, त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाइप करावा लागेल आणि त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहावा लागेल. आता चरण 1 मध्ये मेन्शन केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

डाॅक्टरनेच केला नर्सवर बलात्कार? दिवस गेल्य‍नंतर गर्भपात अन् पुन्हा..

औरंगाबाद – शहरातील गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये काम करत असताना डॉक्टरने परिचारिकेवर अत्याचार केला. तिला दिवस गेल्यानंतर डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. त्या डॉक्टरच्या तीन मित्रांनी तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकरणी दामिनी पथकाने केलेल्या मदतीनं तर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी सांगितले.

या प्रकरणातील आरोपी मध्ये डॉ. प्रसाद संजय देशमुख, रेस्टॉरंटचा मालक दीपक पाटील, मेडिकल दुकानदार सचिन शिंदे यांच्यासह आणखी एकाचा समावेश आहे. देशमुख ने तिच्याशी मैत्री करून अनेकदा बलात्कार केला. ती गरोदर राहिली डॉक्टरने तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. यात पीडितेला प्रचंड वेदना झाल्या. त्यामुळे ती पुन्हा डॉक्टरांकडे गेली त्याने तिला मुकुंदवाडी भागातील नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये घेऊन त्या परिस्थितीतही बलात्कार केला. त्याचा मावसभाऊ दीपक पाटीलने पीडितेवर जबरदस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून ती सिडको बस स्थानकात जाऊन बसली.

पीडिता सिडको बसस्थानकात बसल्यावर तिला वेदना असह्य होत असल्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकाने दामिनी पथकाला फोनवर कळविले. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे, गिरीजा आंधळे यांच्या पथकाने येऊन पीडितेची विचारपूस करत तिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

काश्मिर नाही हो ! हे तर आहे महाराष्ट्रातील नंदूरबार; थंडीमुळे होतोय बर्फ तय‍ार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, बर्फामुळे पसरलेली चादर, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी, असे वातावरण काश्मीरमध्ये पहायला मिळते. मात्र, हे सर्व वातावरण महाराष्ट्रातील नंदुरबार इथं पहायला मिळत आहे. सातपुड्यात पारा घसरला असून कडाक्याच्या थंडीनं संपूर्ण परिसर गारठला आहे. नंदुरबार मध्येही तापमानाचा पारा घसरल्याने काही ठिकाणी अक्षरश: बर्फाची चादर पसरली असल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्याने महाराष्ट्र गारठला असून हुडहुडी भरली आहे. अशात नंदुरबार या ठिकाणीही सध्या पारा खाली आल्यामुळे बर्फ तयार होत आहे. या ठिकाणी अजून 3 दिवस अशाच प्रकारे कडाक्याची थंडी राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी येथील लोकांकडून जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

वातावरण बदलाचा परिणाम सध्या सर्वत्र जाणवू लागला आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर काही ठिकाणी बर्फही तयार होत आहे. नंदुरबार या ठिकाणी सध्या वाहने, घरांवर बर्फ साचत असल्यामुळे या ठिकाणी लोकांकडून तो हटवला जात आहे. पारा खालावल्यामुळे लोकांकडून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने त्याचा कयीसा परिणाम महाराष्ट्रातील वातावरण बदलावर झाला आहे.

 

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरड्या स्वरूपाचे राहणार हवामान

बदलत असलेल्या वातावरणामुळे राज्यातील पुढील काही दिवसात हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामध्ये आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरड्या स्वरूपाचे हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा येथील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

12 जानेवारी रोजी मराठवाडा, विदर्भात मेघवृष्टीची शक्यता

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात कोरडे स्वरूपाचे हवामान राहणार आहे. तर मराठवाडा येथे तुरळक आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

13 जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी कोरडे स्वरूपाचे हवामान राहणार आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस पडण्याची हवामान खात्याने वर्तवली आहे.

…म्हणुन रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने मध्यरात्री कॅब बूक करुन चालकाची हत्या केली; पोलिस तपासात खुलासा

police

औरंगाबाद : करमाड जवळील गोलंटगाव येथील तरुणांच्या हत्येचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून लुटमरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी कार जप्त केल्याने जमिनावर बाहेर आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हुबेहूब दिसणारी दुसरी वाहन बुक केली. व त्याच्या चालकाची निर्घृणहत्या करून चारचाकी वाहन पळविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपिना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहन, मोबाईल सह अकराशे रुपये जप्त केले आहे. विशाल राजेंद्र मिश्रा (रा. कादरीनगर, ता.औसा, जि.लातूर), शिवाजी दत्तू बनसोडे (रा. कबीरनगर, ता.औसा,जि.लातूर), सुदर्शन जनकनाथ चव्हाण (रा.उजनी, ता. औसा,जि.लातूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विशाल वासुदेव रामटेके वय-32 (रा.नागपूर) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मिश्रा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो पुणे येथे ओला कंपनित कॅब चालवायचा. मात्र ती कॅब उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी लुटमरीच्या गुन्ह्यात जप्त केली आहे. त्यामुळे त्याने गावाकडील मित्र सुदर्शन आणि शिवाजी यांच्या सोबत मिळून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनासारखी हुबेहूब दिसणारी दुसरी वाहन पळविण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे तिघेही नागपूर येथे गेले. व नागपूरहून जालना येथे जाण्यासाठी त्यांनी एक असेंट गाडी भाड्याने केली. या गाडिवर मृत विशाल रामटेके हे चालक म्हणून होते. नागपूरहून जालना येथे आल्यावर मध्यरात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास अंधारात तिन्ही आरोपीनी लघवीसाठी वाहन थांबविण्याचे चालकाला सांगितले. वाहन घेऊन पसार होण्यासाठी तिघांनी चालक रामटेकेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मात्र रामटेकेने तिघांना विरोध करीत प्रतिकार करण्यास सुरुवात केली. प्रतिकार होत असल्याने आरोपीनि रामटेके यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून नायलॉनदोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता आरोपीनी गाडीतील लोखंडी पट्टीने पोटात भोसकले. रामटेके मृत झाल्याची खात्री पटताच तिन्ही आरोपीनी मृतदेह वाहनात टाकले. व जालन्याच्या पुढे औरंगाबाद रस्त्यावरील गोलटगाव फाटा ते गोलटगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गट क्र-260 च्या झुडुपात फेकून दिले व घटनस्थळावरून तिघेही पसार झाले होते.