Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2961

रयत शिक्षण संस्थेत नोकरीसाठी 40-40 लाख रूपये मागितले जातात : शिवसेना आ. महेश शिंदे यांचा आरोप

Rayat Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा पदसिध्द अध्यक्ष असला पाहिजे. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. त्यानंतर पारिवारिक 9 जण संस्थेत सदस्यपदी असतात, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये पात्रता असणाऱ्यांना नोकरीसाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात असल्याचे तरूण सांगतात. संस्था सातारची असताना सर्व कामे बारामतीच्या एकाच व्यक्तीला दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेनेचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

जनतेचा विचार करून शरद पवार रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडतील

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत होत असलेल्या चुकीच्या गोष्टीवर आ. महेश शिंदे यांनी जाहीरपणे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपालाही आ. शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंश परंपरा गतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले आहे. त्यामुळे जनतेचा विचार करून पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, अशी आशा आहे.

रयतसाठी योगदान काय

खासदार उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक 9 जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

भाजपचे नाचे मंडळी जमिनीवर काठी आपटून साप साप करत बोंबलत फिरतात

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडून शिवसेनेवर मुंबई कोविड सेंटर मधील घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्या नंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातुन भाजपवर घणाघात केला आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

भाजपच्या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे. असे शिवसेनेन म्हंटल.

अमेरिकेसारख्या देशात करोनाचा विस्फोट होत आहे. आतापर्यंत तब्बल सहा कोटी नागरिक करोनाबाधित झाले असून आठ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात करोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपाच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

 

Stock Market : बाजाराची सपाट सुरुवात, निफ्टी 18,000 च्या वर पोहोचला

Stock Market

नवी दिल्ली । आज मंगळवारी संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सेन्सेक्स 131.31 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 60,526.94 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 45.65 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी घसरून 18,048.95 च्या पातळीवर ट्रेड करताना दिसत आहे. बाजार उघडल्यानंतर बाजार सपाट पातळीवर सुरु आहे.

इंडसइंड बँक, एचडीएफसी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, हिंदाल्को इंडस्ट्री आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले आहेत. तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडिया हे टॉप लुझर्स ठरले आहेत.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
मंगळवार, 11 जानेवारी 2022 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) द्वारे फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) विभागांतर्गत एकूण तीन शेअर्स/सिक्युरिटीजवर बंदी घालण्यात आली आहे. NSE नुसार, या सिक्युरिटीजवर F&O विभागांतर्गत बंदी घालण्यात आली आहे कारण ते मार्केट-वाइज पोझिशन लिमिट (MWPL) च्या 95% ओलांडली आहे.

RBL बँक आणि डेल्टा कॉर्प या खाजगी बँकांचे स्टॉक, जे मागील सत्रांमध्ये F&O बंदी अंतर्गत होते, अजूनही बंदी असलेल्या लिस्टमध्ये आहेत, तर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सला आज स्टॉक एक्स्चेंजने डीलिस्ट केले होते. F&O बॅन स्टॉक लिस्टमध्ये रु. NSE दररोज व्यापारासाठी प्रतिबंधित सिक्युरिटीजची लिस्ट अपडेट्स करते.

VODAFONE IDEA इक्विटीच्या बदल्यात मोरॅटोरियम घेईल
Vodafone Idea ने मंगळवारी माहिती दिली की, सोमवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीच्या थकबाकी स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांमधील संपूर्ण व्याजाची रक्कम आणि थकबाकी AGR इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रूपांतरणाच्या परिणामी, प्रमोटर्ससह कंपनीच्या सर्व सध्याच्या भागधारकांची हिस्सेदारी कमी होईल. या व्याजाचे नेट प्रेझेंट व्हॅल्यू (NPV) अंदाजे 16,000 कोटी रुपये आहे. हा अंदाज दूरसंचार विभागाच्या पुष्टीकरणाच्या अधीन आहे.

खरं तर, कंपनीच्या शेअर्सची सरासरी किंमत 14 ऑगस्ट 2021 नंतरच्या मूल्यापेक्षा कमी होती. त्यामुळे सरकारला 10 रुपये प्रति शेअरपेक्षा जास्त मूल्याने शेअर्सचे वाटप केले जाईल. हा प्रस्ताव दूरसंचार विभागाच्या मान्यतेच्या अधीन आहे या रूपांतरणानंतर व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची हिस्सेदारी सुमारे 36 टक्के होईल.

जागतिक बाजार
जागतिक बाजारातील सिग्नल कमकुवत दिसत आहेत. आशियामध्ये सुरुवातीची घसरण दिसून येत आहे. SGX NIFTY सुद्धा तिमाही टक्का घसरत आहे. DOW FUTURES मध्ये फ्लॅट व्यवसाय चालू आहे. काल अमेरिकन बाजार मिश्रित बंद होते. नॅसडॅक 4 दिवसांच्या घसरणीनंतर किंचित वाढीसह बंद झाला.

अमेरिकी बाजारात संमिश्र व्यवसाय पाहायला मिळत आहे. Dow आणि S&P कालच्या ट्रेडिंगमध्ये घसरणीसह बंद झाले. Dow 162 अंकांनी घसरून 36068 वर बंद झाला, तर S&P 500 मध्ये 6 अंकांची किंचित घट झाली. 4 दिवसांच्या घसरणीनंतर NASDAQ वाढला आणि NASDAQ 7 अंकांनी वाढून 14942 वर बंद झाला.

शहरातील 9 वी ते 12वी पर्यंतचे वर्ग बंद

औरंगाबाद – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अस्तित्व कुमार पांडेय यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा आदेश काल जारी केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यासिका देखील बंद करण्यात आल्या.

रविवारी शहरात 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर काल ही संख्या अडीचशेच्या वर गेली. 31 डिसेंबर ते 9 जानेवारी पर्यंत रुग्ण संख्या कशा प्रकारे वाढत गेली याचा अभ्यास करून प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्यात येत आहेत. महापालिका आणि खासगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण यापुढेही सुरू ठेवतील. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग यापूर्वीच म्हणजे 6 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहेत. प्रशासकांनी खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भात स्वतंत्र आदेश काढला. यामध्ये शहरातील सर्व कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका बंद करण्यात येत आहेत.

शहरातील काही संस्थाचालक इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावत असल्याची माहिती सोमवारी प्रशासकांना प्राप्त झाली. त्यांनी त्वरित शिक्षणाधिकारी यांना बोलावून शाळा तपासणीचे आदेश दिले. नियमबाह्य एखादी शाळा सुरू असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले.

काय म्हणावे याला ? पाणीपुरीसाठी पैसे न दिल्याने तरुणावर चाकू हल्ला

crime

औरंगाबाद – औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून देखील खून होणे, हल्ला करणे या गोष्टी सऱ्हासपणे घडत आहेत. अशातच काल सिडको परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली.

पाणीपुरी साठी पैसे न दिल्याने चौघांनी एका तरुणाला शिवीगाळ करून चक्क चाकूने हातावर आणि मांडीवर वार केले. ही घटना सिडको परिसरातील छत्रपती महाविद्यालयाजवळ घडली. क्षितिज कांबळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या विरोधात क्षितिज कांबळे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम. महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांदादा पाटील यांनी ट्विट करीत निर्बंधांवरून निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मोदीजी म्हणाले होते की, प्रत्येक जीव वाचवायला हवा. पण कोरोना रोखण्यात मविआ सरकार अपयशी ठरल्याने कठोर निर्बंधांच्या जात्यात भरडलेले जीव आत्महत्या करताहेत. टोपेजी, राजकारण आणि कुरघोडीचा प्रयत्न सोडा. परिस्थिती समजून जनतेला त्रास होणार नाही, हे बघा.

लॉकडाउन, निर्बंध, कठोर निर्बंधांना मी सातत्यानं विरोध केलाय. आरोग्यमंत्री टोपेंनी त्यावरून मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘जान हैं तो जहाँ है’ या वक्तव्याची आठवण दिलीये. टोपेजी, लक्षात घ्या, इतके निर्बंध लादू नका की जीवच नकोसा होईल, हेच मी सातत्यानं सांगतोय.

मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे.

मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वडिलांचा खून; न्यायालयाने मुलाला ठोठावली ‘ही’ शिक्षा

सातारा | फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने मुलाने वडिलास फरशीच्या तुकड्याने 30 मे 2018 रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुलगा शामसुंदर नारायण इंगळे (वय ४६, रा.साठेफाटा) याला शिक्षा सुनावली आहे. तर नारायण भिकू इंगळे (वय- 70) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.

या खटल्याची माहिती अशी, मुलगा शामसुंदर याने 30 मे 2018 रोजी रात्री साडेनऊ वाजता वडील नारायण इंगळे यांच्यासोबत स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व कानावर फरशीचा वर्मी घावबसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत नारायण इंगळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीणचे फौजदार आर. आर. भोळ यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सुनावणीदरम्यान आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायाधिशांनीआरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार उर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते, गजानन फरांदे, रिहाना शेख, राजेंद्र कुंभार यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

पहिल्या दिवशी 150 जणांनी घेतला बुस्टर डोस

vaccine

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिक, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर बूस्टर डोस घेण्यासाठी सरसावले आहेत. काल पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णालयांमध्ये दीडशे नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने काल शहरातील सर्व आरोग्य केंद्र तसेच पाच रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस देण्याची व्यवस्था केली होती. मात्र पहिल्या दिवशी पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

आज पासून मात्र बुस्टर डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, विवाह समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यांमध्ये 50 लोकांची उपस्थितीची मर्यादा आहे. यावर यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवावे. शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले, यामध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसर सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच मॉल्सची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावा. कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये  मालांचा लिलाव दिवसातून वेगवेगळ्या वेळा घेता येईल का याबाबत  विचार करण्यात यावा. वरील आस्थापनांसह रेस्टॉरंट, हॉटेल्स ,खानावळी याठिकाणी दोन्ही लसीकरण पुर्ण झालेल्या कामगारांनाच काम करण्यास मुभा राहिल. तसेच प्रवासासाठी दोन्ही डोस लसीकरण हा नियम वाहन चालक/ क्लीनर्स/ इतर सहयोगी कर्मचारी व मनुष्यबळास पालन करणे बंधनकारक राहील. भाजीमंडई तसेच रस्त्यांवर विक्री करणारे भाजी विक्रेता यांनी 2 डोस पूर्ण केलेले असावेत. जर 2 डोस पूर्ण नसतील तर  त्यांनी  RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील व्यापारी ,हॉटेल/रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, ट्रॅव्हल्स/बस/टॅक्सी, ऑटो असोसिएशनचे पदाधिकारी दूरदृष्य प्रणाली माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

लेकीचा कारनामा ! शेजाऱ्यांच्या मदतीने जन्मदात्या बापालाच लावला चुना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखों रुपयांचा चुना लावला आहे. या मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक खातं रिकामं केलं आहे. तिने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम स्वत:सह शेजाऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. आरोपी मुलीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी आपलं बँक खातं तपासलं असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीसह शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुटीबोरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सिद्धार्थ रामदास गोंडाने असे तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते बोरखेडी येथील रहिवासी आहेत. सिद्धार्थ रामदास गोंडाने हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी वगैरे मिळून त्यांना 22 लाख रुपये मिळाले होते. यातील पंधरा लाखांची त्यांनी एफडी केली होती. तर बाकीचे पैसे त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले होते. यादरम्यान एप्रिल 2021 मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ते रुग्णालयातच उपचार घेत होते.

याचवेळी आरोपी मुलगी शशिकला हिने या संधीचा फायदा घेत शेजारी टोनी थॉमस जोसेफ आणि त्याची पत्नी मोनिका थॉमस जोसेफ यांच्या मदतीने वडिलांच्या खात्यातील सात लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर काही दिवसांनी गोंडाने रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन खात्यावरील रक्कम तपासली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. तेव्हा त्यांच्या खात्यावर फक्त 27 हजार रुपये शिल्लक होते. या आरोपी मुलीने सात लाख रुपयांचं नेमकं केलं काय? आणि तिने शेजाऱ्यांच्या खात्यात पैसे टान्सफर कशासाठी केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. बुटीबोरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.