Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2969

65 वर्षांचा म्हातारा घ्यायचा निरागस चिमुकलीचा गैरफायदा; ‘अशा’ प्रकारे झाला या प्रकरणाचा उलघडा

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एक दहा वर्षांची मुलगी खेळायला जायची तेव्हा तिच्या घराशेजारी राहणार म्हतारा तिला बोलावून घ्यायचा आणि तिला आमिष दाखवून तिच्याशी चाळे करायचा.

काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित चिमुकली ही तिच्या आई-वडिलांना एकुलती एक आहे. तिची आई गृहिणी आहे. त्यांच्या परिसरात गणेश सीताराम कावळे हा राहतो. तो भाजीपाला विक्रीचे काम करतो. हि पीडित तरुणी घरापुढे असलेल्या काही मैत्रिणींसाठी सोबत खेळायची. यावेळी आरोपी गणेश त्याच्या घरी कोणी नसताना तो पीडित तरुणीला घरी बोलवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करीत होता. या चिमुकलीला यासंदर्भात काहीही कळतही नव्हते. मागच्या 4 वर्षांपासून तिच्यासोबत हे कृत्य सुरु होते. या मुलीचे वय लहान असल्याने तिला आपल्यासोबत काय होत आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती.

अशा प्रकारे झाला प्रकरणाचा खुलासा
4 जानेवारी रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास पीडिता ही तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत होती. यावेळी पीडितेची आई त्या ठिकाणी पोहोचली. यावेळी पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण हे दोघेही विचित्र अवस्थेत आढळून आले. यावेळी पीडितेच्या आईने हा काय प्रकार आहे? असा जाब विचारला. यावेळी मुलीने आपल्या घरासमोरील काका असेच करतात असे सांगितले. यानंतर पीडितेच्या आईला आपला राग अनावर झाला. यानंतर पीडितेच्या आईने आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.

’12 कोटी द्या अन्यथा…’ हॅकर्सकडून संजीव बजाज यांना धमकी

पुणे : हॅलो महाराष्ट्र – बजाज फायनन्स कंपनीचे संजीव बजाज यांना मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलद्वारे अज्ञात हॅकर्सने संजीव बजाज यांच्याकडे 12 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. जर त्यांनी खंडणीची रक्कम दिली नाहीतर तर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल. ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी धमकी हॅकर्सने दिली आहे. या ई मेल नंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाज फायनान्स कंपनीतर्फे युवराज मोरे यांनी हि तक्रार दाखल केली आहे.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांना [email protected] या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. या सायबर चोरट्यांकडून खंडणीची रक्कम DOGE COIN या क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून द्यावी, अशी मागणी केली आहे. या आरोपींनी 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये डोजे कॉइन ऍड्रेसवर पाठवण्यास सांगितले होते. हा धमकीचा मेल 28 नोव्हेंबर 2021 रोजी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

खंडणीसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर
डोजे कॉइन ही प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. हि परदेशातील दोन संगणक अभियत्यांनी बनवली आहे. या सायबर चोरटयांनी डोजे कॉइनच्या माध्यमातून 7395373 एवढ्या रकमेची मागणी केली आहे. हि रक्कम भारतीय चलनानुसार तब्बल 11 कोटी 63 लाख 29 हजार 217 रुपये इतकी आहे. जर हि रक्कम लवकरात लवकर दिली नाहीतर कंपनीचा सर्व डेटा हॅक करण्यात येईल, यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी धमकी या ई- मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सातारा शहरात ओमिक्रॉनचे आढळले दोन रुग्ण

omicron

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे 340 रुग्ण संख्या झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात आठ ओमिक्रॉन रुग्ण होते. मात्र, आज सातारा शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्णांचा अहवाल हा ओमिक्रोन पॉझिटिव्ह असा आलेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होता आहे. दरम्यान नव्या ओमिक्रॉनची व्हेरियंटचे रुग्णही सातारा जिल्ह्यात आढळल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता सातारा शहरात आणखी दोन ओमिक्रॉनचे रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. आता सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 340 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 26 टक्के आला आहे. कोरोना सोबत ओमिक्राॅनचे प्रमाण वाढलेले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबरोबर ओमिक्रॉन बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहताना दिसत आहे. कोरोना चाचणी बरोबर बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

4 लेकरांच्या आईचे 6 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाबरोबर झेंगाट, मात्र एका शर्टामुळे…

bhiwandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा ऐकतो प्रेम आंधळे असते अन् प्रेमाला वय नसतं पण ठाण्यातील भिवंडीमध्ये या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. 4 लेकरांची आई असेलेली महिला आपल्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. या प्रेम संबंधामध्ये आपल्या पतीचा अडथळा येत होता म्हणून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने जंगलात नेऊन पतीची हत्या केली. इतकेच नाहीतर तिने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा विद्रुप केला. मात्र गुन्हेगार कितीही शातीर असला तर कोणती ना कोणती चूक नक्कीच करतो. पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टावरून मृतदेहाची ओळख पटवली आणि त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
4 जानेवारी रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या तसेच चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. चेहरा विद्रुप केल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला. तेव्हा बागे फिरदोस या भागात हे दुकान आढळून आले. त्याच्या मदतीने शर्टाची मग मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. हा मृतदेह विठ्ठल नगर येथील सलाउद्दीन मोहम्मद युसूफ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.

यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी केली तेव्हा त्याच इमारतीमध्ये राहणारी असजद अन्सारी ही व्यक्ती मृतदेहाच्या दफनविधी प्रसंगी हजर नव्हती. ही बाब पोलिसांना खटकली आणि त्याचा शोध घेतला असता तो पसार झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला नारपोली परिसरातून अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी असजद अन्सारी या विवाहित व्यक्तीचे मृत व्यक्तीच्या 38 वर्षीय पत्नीसोबत मागील सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये पतीचा अडसर होत होता. यामुळे मृत व्यक्तीची पत्नी आणि आरोपी प्रियकराने त्याला मारण्याचा कट रचला.

मृत सलाउद्दीन मोहम्मद युसूफ याला लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते, ते घेण्यासाठी पत्नीने त्याला गळ घातली. त्यानंतर दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राच्या सहाय्याने सलाउद्दीन याची गळा चिरून हत्या केली. यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तोंडावर दगडाने वार करत चेहरा विद्रुप केला. भिवंडी तालुका पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाने कसून तपास करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अवघ्या दोन दिवसांत अटक केली.

शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या. तसेच पोलिसांना कारवाईची हौस नाही. मात्र, जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले.

गृह राज्यमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे संवाद साधत त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाने रात्रीची संचार बंदी लागू केलेली आहे. विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करावी. शासनाने लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जे कुणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे ही मंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून जनतेनेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन सहकार्य करावे. अत्यावश्यक काम असल्यासच घराच्या बाहेर पडावे तसेच अनावश्यक गर्दी टाळावी. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक पहिली लशीची मात्रा घेतली आहे, परंतु अद्यापपर्यंत दुसरी मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी केले.

व्हिसीद्वारे साधलेल्या संवादावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, नाशिक विभागाचे उप महानिरीक्षक बी.जे. शेखर, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदिप पाटील, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, नागपूरचे पोलीस महानिरीक्षक चेरींग दौडजे, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्यासह सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.

अर्थसंकल्प 2022 : ऊर्जा क्षेत्राबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा

नवी दिल्ली । देशात कोरोनाने परिस्थिती अवघड बनली असतानाच दुसरीकडे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच जगभरातील हवामान बदल आणि पर्यावरणाभोवती निर्माण होणाऱ्या प्रश्नांमध्ये ऊर्जा क्षेत्र हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या अर्थसंकल्पात या क्षेत्राबाबतही अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

आगामी अर्थसंकल्पात सौरऊर्जा क्षेत्राबाबतही मोठी घोषणा होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. नेट झिरो-2070 च्या उद्दिष्टांनुसार देशाला सौरऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेलाही ते पुढे नेणार आहे. त्यावेळी चीनसोबतच्या वाढत्या तणावानंतर भारतातील सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांची निर्मिती करण्यासाठी आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या.

‘या’ क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना
2021-22 पासून पुढील पाच वर्षांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रोत्साहनाच्या पार्श्‍वभूमीवर, काही कंपन्यांनी भारतात सौर पॅनेल इत्यादींचे उत्पादन सुरू केले आहे, मात्र आता भारताने सौर उर्जेच्या क्षेत्रात मोठी उद्दिष्टे ठेवली आहेत.

प्लांटपासून ट्रान्समिशनपर्यंतच्या क्षेत्रात गुंतवणूक होणे आवश्यक आहे
पंतप्रधानांनी 2030 पर्यंत देशातील सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता पाच लाख मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी सौरऊर्जा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर उपकरणे तयार करण्याची गरज भासणार आहे. एका अंदाजानुसार, रीन्यूबल क्षेत्रात आवश्यक क्षमता साध्य करण्यासाठी भारताला 2030 पर्यंत $500 अब्ज गुंतवणुकीची आवश्यकता असेल. ही गुंतवणूक प्लांटपासून ट्रान्समिशनपर्यंतच्या क्षेत्रात आवश्यक आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अर्थ मंत्रालय, NITI आयोग, अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, उद्योग मंत्रालय यांच्यात भविष्यातील घोषणांबाबत चर्चा सुरू आहे. ऊर्जा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची घोषणा हायड्रोजनच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.

हायड्रोजन मिशन झाले लाँच
गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायड्रोजन मिशन 2021-22 लाँच करण्याची घोषणा केली. नुकतेच ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी भविष्यातील हायड्रोजन धोरणावर सरकारची कसरत व्यक्त केली होती. हायड्रोजन इंधनाचा वापर प्रवासी कार ते विमान आणि जड ट्रकमध्ये करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या योजनेवर काम करण्याचा मानस आहे.

ऊर्जा सुरक्षा आघाडीवर आव्हाने कमी असतील
हायड्रोजन मोहिमेला आतापासूनच गांभीर्याने घेऊन सरकार आणि खाजगी क्षेत्रामध्ये पुरेसा निधी आणि मोठ्या प्रमाणावर सहकार्य प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवळ हायड्रोजन इंधनाचा ग्राहक न राहता निर्यातदार बनण्याचा भारताचा हेतू आहे. असे झाल्यास भारतासमोरील ऊर्जा सुरक्षा आघाडीवरील आव्हाने बऱ्याच अंशी कमी होतील.

डिस्कॉमची स्थिती
देशातील वीज वितरण कंपन्यांची (डिस्कॉम) स्थिती लक्षात घेऊन ऊर्जा क्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांच्या घोषणांवरही लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत सरकारने दोनदा या डिस्कॉम्सची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे कोणतेही सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही डिस्कॉमसाठी तीन लाख कोटी रुपयांची योजना जाहीर करण्यात आली होती. हे प्रभावी होण्यासाठी वेळ लागू शकतो.

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवणे कॉन्स्टेबलच्या आले अंगलट, डिपार्टमेंटने केली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या हटक्या स्टाईलमुळे सतत चर्चेत असतात. मात्र आपल्या ह्याच हटके स्टाइलमुळे एका पोलीस कॉन्स्टेबलला महागात पडले आहे. मध्यप्रदेश पोलिसात चालक म्हणून तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलवर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या मिशां कापण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु त्याने आपली मनमानी दर्शवत मिशा कापण्यास नकार दिला. यानंतर त्याच्या या मनमानीवर कारवाई करत त्याचा डिपार्टमेंटने त्याला निलंबित केले. राकेश राणा असे या कॉन्स्टेबलचे नाव असून ते भोपाळमधील विशेष पोलीस महासंचालक सहकारी फसवणूक आणि सार्वजनिक सेवा हमी यांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. मतदान तपासणीदरम्यान कॉन्स्टेबल राकेश राणा यांचे केस वाढले असून मिशाही लांब असल्याचे आढळून आले.

यानंतर कॉन्स्टेबल राकेश राणा यांना केस आणि मिशा व्यवस्थित कापण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत मिशा आणि केस आहे तसेच ठेवले. अशा स्थितीत युनिफॉर्मवर असताना आदेशाचं पालन न केल्याने ही अनुशासनहीनता मानण्यात आली आणि त्या आधारावर कॉन्स्टेबल राकेश राणा यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.

कोरोनाची लस न घेतल्यास ट्रेनमध्ये प्रवेश नाही; रेल्वेचा नवा आदेश

railway

नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हंटल आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची वाढती प्रकरणे आणि कोविडचा नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तामिळनाडू सरकारने राज्यात 6 जानेवारीपासून अनेक निर्बंध लादले आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा 50 टक्के क्षमतेने धावेल, असे या नियमात म्हंटल आहे.

Indian Railways

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत रेल्वेनेही कडक नियम जारी केले आहेत. रेल्वेने निवेदनात म्हटले आहे की,” प्रवाशांना प्रवासाचे तिकीट किंवा मासिक सीझन तिकीट (MST) देताना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच तिकिटे दिली जातील.southern Railways

 

रेल्वे प्रवास महागणार-
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे आता खासगी शाळांच्या धर्तीवर स्टेशन डेव्हलपमेंट चार्ज (SDF) आकारण्याची तयारी करत आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही फक्त ट्रेनच्या प्रवासासाठीच भाडे द्यायचो, मात्र आता तुम्हाला स्टेशनवर येण्यासाठी आणि तिथल्या सुविधा वापरण्यासाठीही शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हे शुल्क वेगवेगळ्या वर्गातील प्रवाशांसाठी वेगवेगळे असेल. यापासून लोकल ट्रेन आणि सीझन तिकीट वेगळे ठेवण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली रेल्वे हे शुल्क वसूल करणार आहे. ज्या स्थानकाची डेव्हलपमेंट होणार आहे, त्यासाठीही ही कारवाई केली जाणार आहे.

किती शुल्क आकारले जाईल ?
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढण्यासाठी 10 ते 50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही एसी क्लासने प्रवास करत असाल तर हे शुल्क 50 रुपये असेल. स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि अनारक्षित वर्गासाठी 10 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वेगळे भरावे लागणार नाही, मात्र ज्याप्रमाणे शाळेच्या फीमध्ये डेव्हलपमेंट चार्जचा समावेश केला जातो, त्याचप्रमाणे हा शुल्क रेल्वेच्या तिकिटात समाविष्ट केला जाईल.

टॉप 10 पैकी 8 कंपन्यांची मार्केट कॅप ₹ 2.50 लाख कोटींनी वाढली, RIL ला झाला सर्वाधिक फायदा

Share Market

नवी दिल्ली । देशातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 च्या मार्केटकॅपमध्ये गेल्या आठवड्यात 2,50,005.88 कोटी रुपयांची मजबूत वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे मार्केट कॅपच्या बाबतीत सर्वाधिक वाढले.

गेल्या आठवड्यात, बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,490.83 अंकांनी किंवा 2.55 टक्क्यांनी वर होता. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये फक्त इन्फोसिस आणि विप्रोचे बाजारमूल्य घसरले.या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मार्केट कॅप 46,380.16 कोटी रुपयांनी वाढून 16,47,762.23 कोटी रुपये झाले. TCS ची मार्केट कॅप 43,648.81 कोटी रुपयांनी वाढून 14,25,928.82 कोटी रुपयांवर पोहोचली.

कोणत्या कंपनीला किती फायदा झाला
या कालावधीत, बजाज फायनान्सची मार्केट कॅप 41,273.78 कोटी रुपयांनी वाढून 4,62,395.52 कोटी रुपये आणि HDFC बँकेची मार्केट कॅप 39,129.34 कोटी रुपयांनी वाढून 8,59,293.61 कोटी रुपये झाली. 36,887.38 कोटी रुपयांच्या नफ्यासह ICICI बँकेची मार्केट कॅप 5,50,860.60 कोटी रुपये होती. स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप 27,532.42 कोटी रुपयांनी वाढून 4,38,466.16 कोटी रुपयांवर पोहोचले.

इन्फोसिस आणि विप्रोची मार्केट कॅप घसरली
आठवडाभरात हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केट कॅप 13,333.93 कोटी रुपयांनी वाढून 5,67,778.73 कोटी रुपये आणि एचडीएफसीची मार्केट कॅप 1,820.06 कोटी रुपयांनी वाढून 4,70,300.72 कोटी रुपये झाले. याउलट, इन्फोसिसची मार्केट कॅप 32,172.98 कोटी रुपयांच्या तोट्यासह 7,62,541.62 कोटी रुपयांवर घसरली. विप्रोची मार्केट कॅपही 2,192.52 कोटी रुपयांनी घसरून 3,89,828.86 कोटी रुपयांवर आली.

मार्केट कॅपच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल आहे
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, एसबीआय आणि विप्रो यांचा क्रमांक लागतो.

प्रधानमंत्री जन धन खात्यांमधील डिपॉझिट्स 1.5 लाख कोटींच्या पुढे; 44.23 कोटीं जनतेने उघडली खाती

Jandhan Account

नवी दिल्ली । प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजेच PMJDY अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमधील डिपॉझिट्सची संख्या 1.5 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. सरकारने साडेसात वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती. अर्थ मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, PMJDY अंतर्गत खात्यांची संख्या 44.23 कोटींवर पोहोचली आहे. या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम दीड लाख कोटींहून जास्त झाली आहे.

ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झाली ‘ही’ योजना
आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 7 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.

अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण 44.23 कोटी जनधन खात्यांपैकी 349 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत आणि 8.05 कोटी खाती प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये आहेत. उर्वरित 1.28 कोटी खाती खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. याशिवाय PMJDY च्या 31.28 कोटी लाभार्थ्यांना रुपे कार्ड जारी करण्यात आले आहेत.

पहिल्या वर्षी 17.90 कोटी खाती उघडण्यात आली
या योजनेच्या पहिल्या वर्षात 17.90 कोटी खाती उघडण्यात आली. जन धन खात्यातील बॅलन्स किंवा खातेधारकाने केलेल्या व्यवहारांवर अवलंबून दररोज बदलू शकते. काही दिवस खात्यातील बॅलन्स शून्यावरही येऊ शकते.

सरकारने गेल्या महिन्यात संसदेत सांगितले होते की, 8 डिसेंबर 2021 पर्यंत जन धन खात्यांमध्ये शून्य बॅलन्स किंवा बॅलन्स असलेल्या खात्यांची संख्या 3.65 कोटी होती. एकूण जनधन खात्यांपैकी हे प्रमाण 8.3 टक्के आहे. आकडेवारीनुसार, 29.54 कोटी जन धन खाती ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये आहेत. 29 डिसेंबर 2021 पर्यंत, एकूण जनधन खातेधारकांपैकी 24.61 कोटी महिला होत्या.