Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2973

शहरात कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ‘या’ शाही हॉटेलवर कारवाई

औरंगाबाद – औरंगाबादसह राज्यातील वाढत्या कोविड 19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. या निर्बंधाचे उंल्लघन केल्याप्रकरणी मेसर्स सात्विक फुड शाही भोज थाली रेस्टॉरंट (टाउन सेंटर, सिडको, औरंगाबाद) बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

50 टक्के पेक्षा जास्त ग्राहक आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य औरंगाबाद या कार्यालयामार्फत मेसर्स सात्विक फुड शाही भोज थाली रेस्टॉरंट, टाउन सेंटर, सिडको, औरंगाबाद या आस्थापनेची Covid Appropriate Behaviour बाबत तपासणी करण्यात आली.

तपासणी वेळी सदर आस्थापनेत आसन क्षमतेच्या 50 टक्के पेक्षा जास्त ग्राहक आढळून आल्याने सदरची आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गाडीला ओव्हरटेक करण्याचा नादात बॅडमिंटनपटू तरुणीचा मृत्यू

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कश्मिरा प्रशांत भंडारी असे मृत्युमुखी पडलेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे, ती पुण्यातील नामवंत फटाके व्यापारी प्रशांत भंडारी यांची मुलगी होती. मृत कश्मिरा ही एक गुणवान बॅडमिंटनपटू होती. तिने अनेकदा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा घडला नेमका अपघात ?
मृत कश्मिरा सुजय गार्डनहून काही कामानिमित्त लक्ष्मीनारायण चौकाच्या दिशेने जात होती. यावेळी तिच्या समोर एक कचऱ्याचा ट्रक होता. यावेळी कश्मिराने डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण डाव्या बाजूला आधीच एक चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. त्यामुळे तिला डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करता आले नाही त्यामुळे तिने स्कूटरचे अचानक ब्रेक दाबले.

तिने अचानक ब्रेक लावल्याने स्कूटर घसरली आणि कश्मिरा थेट धावत्या ट्रकखाली पडली. यानंतर काही क्षणात ट्रकने 20 वर्षीय कश्मिराला चिरडले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. या दुर्घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस सध्या या फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

धक्कादायक ! बाईकला धक्का लागल्याच्या रागातून तरुणावर चाकूने सपासप वार

jitendra chopde

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विधी संघर्ष बालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. जितेंद्र चोपडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
जितेंद्र चोपडे हा आपल्या मित्रांसोबत त्रिमूर्ती धाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यासाठी गेला होता. यानंतर जेवण करून येत असताना जितेंद्र हा गाडी चालवत होता, तर त्याचे दोन मित्र पाठीमागे बसले होते. घरी येत असतांना चंद्रकिरण नगर गल्ल मध्ये आरोपी विजय उगरेजा व रवी उगरेजा यांच्या गाडीला जितेंद्रच्या गाडीचा धक्का लागला. यावरून दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला. यावेळी आरोपी विजय उगरेजाने गाडीच्या किचनला असलेला चाकू काढून जितेंद्रच्या छातीवर वार केले. हा वाद सोडवायला गेलेल्या मित्रांवरदेखील आरोपी विजय उगरेजा याने वार केले.

या घटनेच्या सुरूवातीला आरोपी विजय उगरेजा हा एकटाच होता मात्र त्यांनी फोन करून आपल्या साथीदारांना या ठिकाणी बोलावून घेतले. सुरुवातीला यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी विजयच्या दुचाकीला चेन होती, त्याला एक छोटासा चाकू लागलेला होता, त्याचा वापर करून विजयने जितेंद्र, सौरभ व प्रकाश या तिन्ही मित्रावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्रच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जितेंद्रच्या दोन मित्रांनी वाद सोडून त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय व त्याच्या साथीदारानने दोन मित्रावर देखील हल्ला केला.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुन्ह्यात तीन आरोपी सहभागी असल्याचे दाखवले. मात्र या प्रकरणात तीन पाच आरोपी आहेत पोलीस त्या दोन आरोपींना पोलीस वाचवत असल्याचा आरोपी मृत जितेंद्रच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे काही हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास हुडकेश्वर पोलीस करत आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यात कडक निर्बंध लागू; जाणुन घ्या काय सुरु अन् काय बंद?

uddhav thackarey

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात काय-काय सुरु राहणार?

  • राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • पहिल्या लाटेमध्ये सलून चालकांचं आणि कामगारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता 50 टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची मुभा
    खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
  • शॉपिंग मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास परवानगी

राज्यात काय काय बंद राहणार?

  • खेळाची मैदानं, उद्यानं, बागा, बंद
    राज्यातील सगळी पर्यटन स्थळ टोटली बंद राहणार
  • स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णत: बंद राहणार
  • एंटरटेन्मेंट पार्क, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, गडकिल्ले पुढील आदेशापर्यंत बंद
  • शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी काय नियमावली?

  • लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
  • अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
  • सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी

हे राहणार सुरु मात्र नियम पाळून :

– दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.

– रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

– ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह, सिनेमागृह सुरू राहणार

– राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद, दिवसा ५० टक्के क्षमतेने सुरू रहणार.

– बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक

– हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार

– विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

– सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

– अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल

हे राहणार बंद :

– स्विमिंग पूल, जिम, स्पॉ, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद

– मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– इंटरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रालय, वस्तूसंग्रालय, पर्यटक ठिकाणी कार्यक्रम बंद

दुसऱ्या पत्नीला मुलगी नकोशी झाल्यामुळे जन्मदात्या बापाने मुलीला दिला गळफास अन्…

crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये धक्कादायक म्हणजे आपल्यावर हत्येचा आरोप येऊ नये म्हणून तिच्या बनाव देखील रचला. यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी बापाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. राम माधव धनगरे असे या नराधम बापाचे नाव आहे. या आरोपीने आपल्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यानेच पोलिसांत तक्रार देऊन हा सगळा बनाव रचला होता.

हि पीडित मुलगी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी परिसरात निर्जनस्थळी झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर या चिमुकलीला गळफास कोणी आणि का दिला असावा असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि कुटुंबीयांना बोलावून या मुलीची ओळख पटवली. यानंतर मुलीच्या बापाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता फिर्याद देणाऱ्या बापानेच आपल्या मुलीला फासावर लटकविण्याच कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या मुलीच्या माहितीनंतरच आरोपी कोण आहे हे समजणार होते. यादरम्यान मुलीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुलीच्या खाना खुणांवरून बापावर संशय बळावला आणि त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. यानंतर पोलीस अधिक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत स्वत: याचा तपास केला. तेव्हा हि घटना मुलीच्या नराधम बापाने घडवून आणल्याचे पोलीस तपासात निपन्न झाले. यानंतर पोलिसांनी या नराधम बापाला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

पॉर्न VIDEO दाखवून पतीने पत्नीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

porn video

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील पिंपरी या ठिकाणी पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी पतीकडून हा भयंकर प्रकार सुरू होता. यानंतर पतीच्या या कृत्याला वैतागून पीडित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात पती, सासू, दीर आणि नणंद यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

पीडित महिलेने आपल्या पतीसह सासू, दीर आणि नणंद यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींनी पीडित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच पीडीत महिलेला काळी, बुटकी असं बोलून सतत टोमणे दिले आहेत. याचबरोबर लग्नात सोनं कमी दिल्याच्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोपसुद्धा पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

तसेच सासू आणि नणंद यांनी पीडित महिलेचे डोक्यावरील केस पकडून मारल्याचंही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. इतकेच नाहीतर पीडित महिलेच्या पतीने तिला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसताना, अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. हा सगळा धक्कादायक प्रकार 28 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील देवळाली कॅम्प या ठिकाणी घडला. यामध्ये आरोपींनी पीडितेला नरक यातना दिल्या. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दाखल केली.

DMart Q3 Results : DMart कडून तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर, नफा 23.6% वाढून ₹552.53 कोटी झाला

मुंबई । DMart नावाची रिटेल स्टोअर चेन चालवणाऱ्या Avenue Supermarts Ltd ने शनिवारी चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 23.6 टक्के वाढ नोंदवली गेली. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 552.53 कोटी रुपये होता.

परिचालन उत्पन्न 22.22 टक्क्यांनी वाढले
यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 446.95 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. BSE ला दिलेल्या सूचनेत, कंपनीने सांगितले की, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 7,542 कोटी रुपयांच्या तुलनेत तिचे परिचालन उत्पन्न 22.22 टक्क्यांनी वाढून 9,217.76 कोटी रुपये झाले आहे.

कंपनीचा एकूण खर्चही या तिमाहीत 21.72 टक्क्यांनी वाढून 8,493.55 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6,977.88 कोटी रुपये होता. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेव्हिल नोरोन्हा म्हणाले, “डी-मार्ट स्टोअर्सच्या उत्पन्नात तिमाहीत 22 टक्के वाढ झाली आहे. मात्र, एकूण मार्जिनमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.”

झुनझुनवालाचे ‘गुरु’ राधाकिशन दमानी हे DMart चे संस्थापक आहेत
विशेष म्हणजे देशातील प्रसिद्ध अब्जाधीश राधाकिशन दमाणी हे DMart चे संस्थापक आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरन बफे म्हटले जाते, ते त्यांना आपले गुरू मानतात. फोर्ब्सच्या देशातील श्रीमंतांच्या यादीत दमानी चौथ्या क्रमांकावर आहेत. दमाणी हे रिटेल बिझनेसचे राजा मानले जातात. ते नेहमी पांढरे कपडे घालतात आणि शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांनी 1980 च्या दशकात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमाणी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते, मात्र 21 मार्च रोजी सकाळी त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवताच त्यांच्या संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ झाली. वास्तविक, DMart चा शेअर 604.40 रुपयांवर लिस्टेड झाला होता, तर इश्यूची प्राईस 299 रुपये ठेवण्यात आली होती.

संप मिटेना अन् 2 महिन्यांपासून पगार नाही या विवंचनेतून ST कर्मचाऱ्याने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या संपामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. याच हलाखीच्या परिस्थितीतून नांदेड जिल्ह्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पंधरा दिवसापूर्वी याच जिल्ह्यातील भीमराव सदावर्ते या एस टी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच यापूर्वी साताऱ्यातील मेढा या ठिकाणच्या एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

मागच्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव संभाजी गुट्टे असे असून ते कंधार आगारात चालक म्हणून कार्यरत होते. संभाजी गुट्टे हे देखील या आंदोलनात सक्रिय होते. मागील दोन महिन्यापासून पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते चिंतेत होते. यानंतर त्यांनी आपल्या शेतात जाऊन विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.

एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका नांदेडच्या एसटी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. या आंदोलनामुळे सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद आहे. देगलूर आणि कंधार आगारातून मात्र एक-एक बस धावत आहे. शिवाय लातूर-नांदेड ही एक बस सध्या लातूर आगारातून सुरू आहे. तरीदेखील एसटी संपाबाबात अजून कोणताच तोडगा निघाला नाही. या आंदोलनामुळे कित्येक एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. त्यातच आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीच्या कारवाया केल्या जात आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवरील तणाव वाढला आहे. याच परिस्थितीतुन एसटी कर्मचारी आत्महत्या करण्यासारखे धक्कादायक पाऊल उचलत आहे.

सत्या नडेला यांनी फिनटेक युनिकॉर्न Groww मध्ये केली गुंतवणूक, अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww ने शनिवारी घोषणा केली की, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला गुंतवणूकदार म्हणून कंपनीत सामील झाले आहेत. नडेला यांनी फिनटेक युनिकॉर्न Groww मध्ये फक्त गुंतवणूकच केली नाही, तर ते कंपनीला व्यवसायाशी संबंधित समस्यांवर सल्लाही देतील. युनिकॉर्न म्हणजे एक असे स्टार्टअप ज्याचे मूल्य किमान एक अब्ज डॉलर्स आहे.

म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीची सर्व्हिस देणाऱ्या Groww या फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ललित केशरे यांनी शनिवारी, 8 जानेवारी रोजी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, “गुंतवणूकदार आणि सल्लागार म्हणून Groww ला जगातील सर्वोत्तम सीईओ मिळाले आहेत. सत्या नाडेला यांच्यासोबत भारतात आर्थिक सेवा सुलभ करण्याच्या आमच्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे.”

यापूर्वी 2021 मध्ये, कंपनीने दोन फंडिंग राऊंड आयोजित केल्या होत्या. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये पहिल्यांदाच $1 बिलियन पेक्षा जास्त मुल्यांकन करून 8.3 कोटी उभे केले होते. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये, पुन्हा ई-सिरीज फंड अंतर्गत 25.1 कोटी डॉलर्स जमा केले. यासह, त्याचे मूल्यांकन 3 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.

नडेला व्यतिरिक्त, ‘हे’ देखील आहेत Groww चे गुंतवणूकदार
Groww मधील इतर गुंतवणूकदारांमध्ये टायगर ग्लोबल, रिबिट कॅपिटल, सेक्वॉइया वाय कॉम्बिनेटर, प्रोपेल व्हेंचर पार्टनर्स, आयकॉनिक ग्रोथ, अल्केन, लोन पाइन कॅपिटल आणि स्टेडफास्ट यांचा समावेश आहे.

‘ही’ कंपनी 2016 मध्ये सुरू झाली
ललित केश्रे यांच्यासह ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या चार माजी अधिकाऱ्यांनी 2016 मध्ये ही कंपनी सुरू केली होती. कंपनीचे 2 कोटींहून जास्त युझर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे. Iझेरोधा, अपस्टॉक्स, पेटीएम मनी, एंजेल ब्रोकिंग, धन आणि फिस्डम सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते.

औरंगाबादची पिटलाईन जालन्याला पळवली ? फौजिया यांनी दाखवले थेट रेल्वेमंत्र्याचेच पत्र

औरंगाबाद – चिकलठाण्यात होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन अचानकपणे जालन्यात होणार, अशी घोषणा रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर मराठवाड्यात चांगलेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याला आधीच ड्रायपोर्ट असताना रेल्वेची पीटलाईन तेथे नेण्याची गरज काय, असा सवाल केला जातोय. तसेच औरंगाबादची पीटलाईन जालन्याला वळवणाऱ्या दानवेंवर खासदार इम्तियाज जलील यांनीही तोंडसुख घेतले होते. तुम्ही देशाचे मंत्री आहात की जालन्याचे, जालन्याचे असाल तर नगरसेवकाची निवडणूक लढवा, असेही खा. जलील म्हणाले.

आता या वादात आणखीच पुराव्यादाखल उतरल्या आहेत, परभणीच्या खासदार फौजिया खान मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनीच औरंगाबाद येथे रेल्वे पीटलाइनची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने औरंगाबादेतील पीटलाइनला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्री दानवे यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य खासदार फौजिया खान यांनी केलं आहे.

खासदार फौजिया खान म्हणाल्या, ‘ रेल्वेच्या बैठकीत औरंगाबादेत व लातूरमध्ये पीटलाइन उभारणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मी दिले होते. लातूरची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. मात्र औरंगाबादची मागणी मान्य करून तसे लेखी पत्र मला मिळालेले आहे. आता रेल्वे राज्यमंत्री दानवे काहीही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला अर्थच नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. यात कुणाचेही दुमत नसेल’.