Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2979

मलेशियाला तस्करीसाठी पाठविण्यात येत असलेली 20 कोटी रुपये किंमतीची स्टार कासवं कस्टम टीमकडून जप्त

नवी दिल्ली । देशातील विमानतळांवर सोन्याची, ड्रग्जची अवैध तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र तस्कर इतरही काही बंदी असलेल्या वस्तूंची छुप्या मार्गाने गुपचूप तस्करी करून कस्टम्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच चेन्नई एअर कार्गोचे ताजे प्रकरण समोर आले आहे.

सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका निर्यात करण्यात येत असलेल्या कन्‍साइनमेंट मधून 1364 स्टार कासवं जप्त केली आहेत. या संकटग्रस्त कासवांना लपून मलेशियाला पाठवले जात होते. या प्रजातींना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापैकी काहींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 20 कोटी एवढी आहे.

सीमाशुल्क विभागाच्या दिल्ली मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,”चेन्नई कार्गोमधून एक कन्‍साइनमेंट मलेशियाला पाठवला जात होता. कस्टम टीमही याबाबत पूर्णपणे सतर्क होती. या टीमने चेन्नई एअर कार्गोमधून 1364 स्टार कासवं जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत 20 कोटी रुपये आहे. कार्गो कस्टमने जप्त केलेली स्टार कासवेही ताब्यात घेतली आहेत, ज्यांना पुनर्वसन आणि पुढील तपासासाठी तामिळनाडू राज्य वन विभागाकडे सुपूर्द केले गेले आहे.

मुलीचा मृतदेह सोबत घेऊन प्रवास करीत होते आई-वडील; धक्कादायक कारण आले समोर

solapur crime

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या 16 महिन्याच्या मुलीच्या मृतदेहासह प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला सोलापूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी गुरुवारी सोलापूर स्टेशनवर गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून बाळाच्या मृतदेहासह दोघांना अटक केली. हे आरोपी ट्रेनमधून लहान बाळाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
संबंधित मृत मुलीचे तिच्या बापाने आधी लैंगिक शोषण केलं आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. या नराधम बापाने 3 जानेवारी रोजी सिकंदराबादमध्ये आपल्या घरात 16 महिन्याच्या बाळाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. या सगळ्या गुन्ह्यात आरोपीच्या बायकोनेसुद्धा त्याला साथ दिली. ट्रेनमधून प्रवास करत असताना बराच वेळ बाळाचा आवाज न आल्याने आजूबाजूच्या लोकांना या दांपत्यावर संशय आला.

यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी तिकीट कलेक्टरला याची माहिती दिली. यानंतर सोलापूर रेल्वे पोलिसांना सतर्क करण्यात आले. यानंतर हि ट्रेन सोलापूर या ठिकाणी पोहोचताच या दोघांना सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले आणि तपास करण्यात आला. या तपासात बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी नराधम बापाने या लहान बाळावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे कबुल केले. बाळाच्या आईने आपल्या पतीला या कामात साथ दिली. तसेच त्यांनी मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी ते ट्रेनने प्रवास करीत असल्याचे चौकशीत म्हंटले आहे. या प्रकरणी या दांपत्याला अटक करण्यात आली आहे.

 चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाणपूलाने औरंगाबादचे रुपडे पालटणार

bridge

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा या २४ किलोमीटर अंतरात एकच उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांंच्याकडे पाठपुरावा सुरू असून भूसंपादनासह अंदाजे 2200 ते 3 हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर निर्णय लवकरच होईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कराड म्हणाले, अखंड पूल बांधण्यापूर्वी त्याला इंटरचेंज कसा असावा, याचा विचार सुरू आहे. सहा ठिकाणी पुलावरून ये-जा करण्यास जागा द्यावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. याबाबत गडकरी यांच्यासोबत पुन्हा बैठक होईल. हा पूल झाल्यास औरंगाबादचे रुपडे बदलून जाईल. वाळूज ते डीएमआयसी नोडमधील सर्व उद्योग वसाहती कनेक्ट होतील. दळणवळणाचा मोठा ताण संपून जाईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. यावेळी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, अभियंता नचिकेत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर काय होईल ?
पूर्ण 24 कि.मी. अंतरात पूल उभारणीसाठी जागा किती लागेल. मालमत्ता बाधित होतील काय, याची माहिती त्यात येईल. तसेच पूर्ण प्रकल्प कसा असेल, त्यातील तांत्रिक बाबी कशा असतील, डिझाईनची सगळी माहिती त्यात असेल. अंतरात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको उड्डाणपुलांचा समावेश आहे. 200 कोटींच्या आसपासचा खर्च या पुलांवर झाला आहे.

या पुलासाठी किती खर्च येईल ?
या पुलासाठी 100 कोटी प्रति किलोमीटर खर्च अपेक्षित आहे. 24 किलोमीटरच्या अंतरासाठी साधारणत: 2 ते 3 हजार कोटी रुपये लागू शकतील. यात भूसंपादन व इतर बाबींचा समावेश नाही. कामाला जेवढा कालावधी लागेल, त्या-त्या वर्षांतील कच्च्या मालाच्या वाढीव दराचा त्यात समावेश नसेल.

ओमिक्रॉन सौम्य की गंभीर? या नवीन व्हेरिएन्टबाबत WHO तज्ञांचे नवीन मत जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमुळे देशात तिसरी लाट आली आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 17 हजारांहून जास्त रुग्ण आढळले. ओमिक्रॉन केसेसचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे, त्यानंतर या नवीन व्हेरिएन्टबाबत तज्ज्ञांचे मतही बदलू लागले आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की,”ओमिक्रॉन हे सौम्य व्हेरिएन्ट म्हणून हल्ल्यात घेणे ही एक मोठी चूक ठरू शकेल.”

ओमिक्रॉनवरील आपल्या नवीन अभ्यासात, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की,”ओमिक्रॉनने पीडित लोकांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कोरोनाच्या याआधीच्या व्हेरिएन्टपेक्षा कमी आहे, मात्र फक्त या कारणास्तव ते सौम्य व्हेरिएन्ट मानले जाऊ शकत नाही. Omicron पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला, नंतर त्याला सौम्य प्रकार म्हणून लेबल केले गेले कारण यामुळे कोणताही गंभीर आजार होत नाही, मात्र आता जगभरात त्याच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांनंतर, आता काही देशांमध्ये या व्हेरिएन्टची लागण झालेल्या लोकांची संख्या रुग्णालयात दाखल केली जात आहे. तज्ञ सतत या व्हेरिएन्टचा अभ्यास करत आहेत आणि ते म्हणतात की,”कोरोनाचे हे रूप कमी गंभीर आहे मात्र ते सौम्य मानले जाऊ शकत नाही.” ओमिक्रॉनबद्दलच्या नवीन निष्कर्षांमध्ये पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत-

WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की,”ओमिक्रॉन आता पूर्वीच्या व्हेरिएन्टप्रमाणे लोकांना रुग्णालयात दाखल करत आहे आणि आता लोकांचा मृत्यू होऊ लागला आहे.” मात्र, त्यांनी असेही सांगितले की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये हे डेल्टा व्हेरिएन्टपेक्षा कमी गंभीर असल्याचे दिसते.

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आणि केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजमधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक असलेले रवींद्र गुप्ता असे मानतात की, ओमिक्रॉनचा सौम्य प्रकार मानणे ही एक मोठी चूक आहे.

या व्हेरिएन्टचा वृद्धांवर काय परिणाम होतो, या प्रश्नाचे उत्तर अजूनही नीटपणे मिळत नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की,” तरुण आणि लसीकरण झालेल्या लोकांवर ओमिक्रॉनचा प्रभाव कमी असेल.” शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनला हलके समजणे हे त्याचे सामान्य वर्तन आहे. या हलक्या वजनाच्या व्हेरिएन्टचे प्रसारण अमेरिकेतही खूप वेगाने झाले आहे.

डॉ.गुप्ता म्हणाले की,”ओमिक्रॉनबाबत अजूनही अभ्यास सुरू आहेत. हा व्हेरिएन्ट फक्त एकच मार्ग का निवडत आहे, फुफ्फुसांना हानी का पोहोचवत नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही.”

मुंबईत नाईट कर्फ्यू लागणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार कडून मुंबईत नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत हा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे टोपे यांनी म्हंटल.

दुसऱ्या लाटेप्रमाणे चिंताजनक परिस्थिती सध्या तरी नाही, पण काळजी घेतली पाहिजे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

जनतेने गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्ग कमी होईल. चित्रपट, नाट्यगृह आणि मंदिर याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील.तसेच मुंबई लोकल बंद करण्याबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटल

 

काय सांगता ! ज़िल्हा परिषदेतील नवे शिपाई एम.एस्सी, एमबीए, एमकॉम झालेले

औरंगाबाद – वर्ग ‘क’ ची शेकडो पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेचा विचार न करता त्यांची सरसकट शिपाई पदावर निवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या निवड यादीतील 15 जण बी.ई, बी.एस्सी., एम.एस्सी., बी.ए.बी.एड, बी.कॉमसह टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आहेत. या उमेदवारांची शासन निर्णयानुसार वर्ग ‘क’ मधील लिपिकासह अन्य पदावर निवड करणे अपेक्षित होते.

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग ‘क’ अथवा ‘ड’ पदावर अनुकंपा तत्त्वावर तात्काळ सेवेत घेण्याची तरतूद आहे. संबंधित कर्मचारी मरण पावल्यानंतर पाच वर्षांत अर्ज करावा लागतो. अशा प्रकारे सुमारे 180 जणांची प्रतीक्षा यादी जि. प.कडे आहे. एकूण रिक्त पदाच्या दहा टक्के पदे अनुकंपाधारकातून भरण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. ही प्रक्रिया नुकतीच झाली. अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांची वर्ग क अथवा ड पदावर निवड करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

प्रशासनाने मात्र अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता सरसकट परिचर पदावर निवड केली. ही निवड यादी जि. प.च्या संकेतस्थळावर 5 जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली. यात 15 जण बी.ई., एम.एस्सी., बी.ए., बीएड, एम.ए. एम.कॉम.,एम.बी.ए., असे पदवीधर आणि टायपरायटिंग, एमएससी सीआयटी परीक्षा उत्तीर्ण आहेत. हे उमेदवार लिपिक पदाची पात्रता धारण करतात. मात्र त्यांना थेट शिपाई करण्यात आले.

सत्तेत आल्यापासून सरकारने खादाड वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांचा पगारही खाल्ला; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत या सरकारला कसलाही विचार नाही. सत्तेत आल्यापासून आपल्या खादाड वृत्तीला कायम ठेवून सरकारने आता कर्मचाऱ्यांचा पगार खायलाही सुरुवात केली आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाविकास आघाडी सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही.

एसटी कर्मचारी सरकारचे विरोधक नसून ते आपल्या न्याय-हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्यावर ही कसली हुकुमशाही ? वेतन सोडा त्यांना आपले घर सांभाळण्यासाठी रेशनची सुविधादेखील तुम्ही करू शकला नाहीत, अखेर भाजपाने एसटी कर्मचारी बांधवांसाठी रेशनाची सुविधा केली. सरकारचा हा निष्काळजीपणाचा कारभार कधी संपेल माहीत नाही, मात्र भाजपा सदैव एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे पाटील यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

Share Market : मार्केट आज वाढीने बंद झाला

नवी दिल्ली । शुक्रवार, 7 जानेवारी 2022 रोजी, कालच्या घसरणीचा परिणाम नाकारून भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा वाढीसह आठवडा संपवला. मात्र, काल, गुरुवारची घसरण बाजार पूर्णपणे सावरू शकला नाही.

निफ्टी 50 0.38% म्हणजेच 66.80 अंकांच्या वाढीसह 17812.70 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 0.24% किंवा 142.81 अंकांनी वाढून 59744.65 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 0.66% किंवा 249.30 अंकांच्या वाढीसह 37739.60 वर बंद झाला.

मोठ्या शेअर्ससोबतच मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही आज वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 25,468.35 वर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.39 टक्क्यांनी वाढून 30,022.29 वर बंद झाला.

निफ्टी 50 टॉप गेनर्स आणि लूझर्स
शुक्रवारी, निफ्टी 50 चे टॉप गेनर्स हे ग्रासिम इंडस्ट्रीज, ओएनजीसी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि श्री बी सीमेंट होते.

जर आपण 7 जानेवारी 2022 च्या टॉप लूझर्सबद्दल बोललो, तर या लॉस्ट मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एल अँड टीआणि एचडीएफसी यांचा समावेश होता.

वडिलांनी 80 व्या वर्षी वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवल्याने मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

rajgurunagar police station

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका मुलाने आपल्या जन्मदात्याची गळा चिरून हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वृद्ध वडिलांनी 80 व्या वर्षी लग्न करण्याच्या हेतूनं वधू वर सुचक मंडळात आपले नाव नोंदवले होते. याचा राग आल्याने मुलाने आपल्या बापाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली.

हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने याबत जर समाजात समजले तर आपला अपमान होईल. तसेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होईल यामुळे रागाच्या भरात आरोपी मुलाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. त्याने कांदा कापण्याच्या सुरीने आपल्या वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला पण बोथट सुरीने गळा कापेना म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांचा खून केला. यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हि घटना गुरुवारी संध्याकाळी खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरामध्ये घडली. मृत वडिलांचे नाव शंकर रामभाऊ बोऱ्हाडे असे होते तर आरोपी मुलाचे नाव शेखर शंकर बोऱ्हाडे असे आहे. माझे वडील शंकर रामभाऊ बोऱ्हाडे यांनी परस्पर वधू -वर सुचक मंडळात पैसे भरून स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली. नोंदणी करुनही ते माझ्याशी खोटं बोलले. याचा राग आल्याने त्याने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली असल्याचे आरोपी शेखर याने आपल्या जबाबात म्हंटले आहे. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.