Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2978

मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

परंतू ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु राहतील. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत तातडीने शिक्षण विभागाला लेखी आदेश काढण्यात आले. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आल्याने त्या सुरुच राहतील असे पाटील यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही राज्यातील सर्व जिल्ह्यात शाळा बंद होत्या. सांगली जिल्ह्यातील पालकांनी कोरोना कमी होताच शाळा सुरु करण्यासाठी शाळांना सहमती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 977 शाळा जुलै महिन्यांपासून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. शाळा सुरु करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर होता. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अवघ्या चार महिन्यात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागात कोरोनाने जोरदार संक्रमण केले आहेत, त्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. शाळांमध्ये कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबतची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

औरंगाबाद शहरात आज कोरोनाचे ‘दीडशतक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज दीडशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 183 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 151 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 285 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 469 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 28 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 24 तर ग्रामीणमधील 4 रुग्णांना सुटी देण्यात आली.

आधी चिमुकल्याला गळफास..नंतर वडीलांनी स्वत:लाही संपवलं; पत्नीनं दरवाजा उघडला अन्..

फैजपूर : वृत्तसंस्था – शुक्रवारी दुपारी 12. 30 वाजण्याच्या सुमारास जळगावमधील फैजपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही गळफास घेवून आत्महत्या केली आहे. फैजपूर येथील बसस्थानकाच्या मागे असलेल्या आराधना कॉलनीमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. निलेश घनश्याम बखाल असे वडिलांचे तर आर्यन बखाल असे मृत सहा वर्षीय मुलाचे नाव आहे. मात्र यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजूनही समजू शकले नाही.

मृत नीलेश बखाल हे पत्नी व सहा वर्षीय मुलगा आर्यनसह फैजपूर येथील आराधना कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी नीलेश यांनी आपल्या पत्नीला दुपारी बाराच्या सुमारास किराणा आणण्यासाठी पत्नीला बाजारात सोडले आणि ते घरी परतले. घरी परतल्यानंतर निलेश यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर मुलगा आर्यन याला गळफास दिला नंतर त्यांनी स्वतः सुद्धा गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

जेव्हा निलेश यांची पत्नी घरी परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर निलेश आणि आर्यन यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर शेजारच्यांच्या मदतीने त्यांना खाली उतरवण्यात आले आणि तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा उलघडा करण्यात पोलिसांना यश

dead

पुणे : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला होता. यावेळी आरोपीने कोणताच पुरावा मागे सोडला नव्हता. या खुनाचा उलघडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुजित जगताप असे आहे. त्याच्या चुलत भावानेच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट
सविस्तर माहिती अशी कि, सहा महिन्यांपूर्वी इंदापूर लातुक्यातील शेटफळगडे गावात सुजित जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या खुनाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. हा खून करताना आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र तरीदेखील पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे. या हत्येमागे मृत तरुणाच्या चुलत भावाचा हात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी किशोर जगताप याला अटक करण्यात आली आहे. त्याने मृत सुजित जगतापची हत्या का केली याचे कारण अजूनही समोर आले नाही.

यापूर्वीही आरोपीची केली होती चौकशी
या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच पोलिसांना मृताचा चुलत भाऊ किशोर जगताप याच्यावर संशय होता. त्याला चौकशीसाठी अनेकदा पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते. मात्र त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडून काही ठोस माहिती मिळाली नव्हती. मात्र आता पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी किशोर जगताप याला अटक केली आहे.

दृश्यमची पुनरावृत्ती ! पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी पतीने आखला ‘हा’ प्लॅन

crime

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमधील अररियामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये धोकेबाज पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने आपल्या निष्पाप मुलीचा जीव घेतला आहे. मुलीची हत्या करुन पत्नीच्या प्रियकराला या हत्याकांडात अडकवण्याचा पतीचा प्लान होता. या आरोपी पतीने दृश्यम चित्रपट पाहून हा सर्व प्लान आखला होता. मात्र स्वतःनेच आखलेल्या प्लानमध्ये तो स्वतःच फसला.आरोपीचे नाव राजेश पंडित असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळला
आरोपी राजेश पंडित हा अररियाच्या पलासी पोलीस स्टेशन हद्दीतील उरला गावात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. आरोपीच्या पत्नीचे गावातीलच सूरज नावाच्या एका विवाहित पुरुषांसोबत प्रेमसंबंध सुरु होते. राजेशचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्याने पत्नीच्या प्रियकरालाच आपल्या मार्गातून दूर करण्याचा प्लॅन आखला.

गळा दाबून मुलीची हत्या केली
या प्लॅननुसार आरोपी राजेशने स्वतःच्या 11 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने मुलीच्या कपड्यांममध्ये पत्नी व तिचा प्रियकर सूरजचा फोटो ठेवून त्याने तो मृतदेह चहटपूर गावात सूरजच्या घरामागे टाकला. यानंतर राजेशने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच त्याने आपल्या मुलालाही पोलिसांनी प्रश्न विचारल्यास आपल्या बहिणीला सूरज सोबत घेऊन गेला होता असे सांगण्यास सांगितले होते.

तपासात धक्कादायक खुलासा उघड
राजेशने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. यानंतर पोलिसांनी तपास केला असता प्रियकर सूरजचे ठिकाण घटनास्थळापासून दूर दुसऱ्या गावात असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी राजेशला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी चहटपूर गावातून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर आरोपी राजेश पंडितला पोलिसांनी अटक केली आहे.

महिलांची ऑनलाइन बोली लावायचा, बुल्ली बाय अ‍ॅपच्या मास्टमाइंडबद्दल झाला ‘हा’ मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील बहुचर्चित बुल्ली बाय अ‍ॅपचं कनेक्शन राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले आहे. या हा अ‍ॅप डेव्हलप करणारा मास्टर माइंड 21 वर्षीय नीरज विश्नोई नागौर येथील रोटू गावातील आहे. नीरज इंजीनियरिंगचा विद्यार्थी आहे. तो या अ‍ॅपच्या माध्यमातून महिलांची ऑनलाइन बोली लावत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आसाममधील जोरहाटमधून अटक केली आहे. नागौरच्या रोटू गावात राहणारा नीरज आपल्या जन्मानंतर कुटुंबासह आसामच्या जोरहाटमध्ये राहत होता. नुकताच तो नोव्हेंबर महिन्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये गेला होता.

यादरम्यान त्याने बुल्ली बाई अ‍ॅप तयार केला होता. या अ‍ॅपशी संबंधित ट्विटर हँडलदेखील नीरजने तयार केले होते. नीरज वेल्लोर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, भोपालमध्ये B.Tech विद्यार्थी होता. या प्रकरणाचा उलघडा झाल्यानंतर युनिवर्सिटी मॅनेजमेंटने नीरजला कॉलेजमधून सस्पेंड केले. नीरजने बुल्ली बाई नावाचा हा अ‍ॅप नोव्हेंबर 2021 मध्ये डेव्हलप केला होता. डिसेंबर 2021 मध्ये हा अ‍ॅप अपडेट करण्यात आला. 31 डिसेंबर रोजी या अ‍ॅपचा ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आला होता.

या अ‍ॅपबद्दल ट्वीट करण्यासाठी @Sage0x1 आणि काही अन्य ट्विटर अकाऊंटदेखील तयार करण्यात आले होते. हे अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी नीरजने स्पेशल ट्रेनिंगसुद्धा घेतली होती. नीरजच्या फोन आणि लॅपटॉपमधून याचे पुरावे मिळाले आहे. या पुराव्यांवरून नीरज या प्रकरणाचा मास्टरमांइड असल्याचे समोर आले आहे. या आरोपी नीराजच्या लॅपटॉपमधून अनेक महिलांचे सापडले आहेत. जे अ‍ॅपवर अपलोड करण्यात आले होते. या अ‍ॅपचे अनेक सोशल मीडिया अकाउंटदेखील तयार करण्यात आले होते. त्यावरून आरोपी नीरज हा या अ‍ॅपला प्रमोट करत होता.

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचे मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेमुळे प्रबळ होणार आहे. लस घेतली तरी सर्वांनीच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांनी वारंवार साबणाने हात धुणे, तोंडावर मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही खबरादारी घेतली तर आपला नक्कीच कोरोनापासून बचाव होईल असे सांगूण जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्व सांगितले. यावेळी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्ञानदिप फाऊंडेशनचे संस्थापक गोविंद बद्रीनारायण काबरा, शितल काबरा, आभा गोविंद काबरा आणि फाऊंडेशनचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

रिक्षाचे भाडे द्यायला पैसे नाहीत म्हणून रिक्षाचालकाने 15 वर्षीय तरुणीसोबत केले ‘हे’ कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुन्हा तशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका रिक्षा चालकाने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत 5 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी जात होत्या. मात्र त्यांच्याकडे भाडे देण्यासाठी पैसे नाही असे समजताच आरोपी रिक्षाचलकाने म्हणजे सागरने रेसकोर्स समोरील जंगलात रिक्षा नेली आणि या पीडित तरुणीवर बलात्कार केला. याअगोदरसुद्धा पीडित मुलीच्या ओळखीतल्या विकी आणि अशोक या व्यक्तींनी कामठेचाळ, पावर हाऊस, फुरसुंगी या ठिकाणी जबरदस्ती करून छेड काढण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर या प्रकरणी 3 आरोपींवर कलम 376 आणि 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विभीषण बचूटे, विकी कुमार फुलोपासवान, अशोक बिरबहादूर थाप्पा अशी आरोपींची नावे आहेत. सागर बचूटे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हडपसर पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु आहे.

PM Kisan निधीचा 10वा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर ‘या’ हेल्पलाइन नंबरवर ताबडतोब करा कॉल

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत दहावा हप्ता जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता ट्रान्सफर केला आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला ताबडतोब अलर्ट करणे आवश्यक आहे.

हप्ते जारी झाल्याच्या 6 दिवसांनंतरही तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही सरकारने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने देशभरातील 10.09 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना 20,900 रुपयांहून अधिकची रक्कम ट्रान्सफर केली गेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

पीएम किसान सन्मान निधी हेल्पलाइन क्रमांक
-पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
-पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
-पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401
-पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
-पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
-ई-मेल आयडी: [email protected]

…हा तर पंजाबचा अपमान, भाजपने राजकारण करणे बंद करावे; नवज्योतसिंह सिद्धू यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर मोदींनी आपला पंजाब दौरा रद्द करत पुन्हा भटिंडा विमानतळावर गेले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर टीका केली. यावरून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी चंदीगढमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचे सांगणे हा राज्याचा अपमान आहे. त्यामुळे भाजपने राजकारण करणे बंद करावे,” असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते मार्गाने जाण्याचे नियोजन अचानक का करण्यात आले ? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आले. 70 हजार खुर्च्या आणि फक्त 500 लोक होते.

पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या दौऱ्यावेळी जी काही घटना घडली. यावरून भाजपडून जे राजकारण केले जात आहे. ते आता भाजपने बंद करावे. पंजाबमध्ये लोकांनी भाजपला नाकारले आहे. पंजाबमध्ये राष्ट्रपती शासनाचा मुद्दा उपस्थित करणारे भाजपचे पोपट आहेत.

पंतप्रधान महोदय तु्म्ही केवळ भाजपचे नाही तर सर्वांचे पंतप्रधान आहात. तुमच्या जीविताची किंमत देशातील प्रत्येक लहान मुलही जाणते. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचे तुम्ही म्हणालात. हा या राज्याचा पंजाबियतचा अपमान आहे, असे सिद्धू यांनी म्हंटले आहे.