Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2981

Paytm युझर्ससाठी खास फीचर; आता इंटरनेट आणि मोबाईल बंद असतानाही करता येणार पेमेंट

Paytm

नवी दिल्ली । सध्याच्या काळात बहुतेक लोकं पेमेंट करण्यासाठी Paytm वापरतात. अशा परिस्थितीत, Paytm देखील आपल्या युझर्ससाठी अनेक चांगल्या ऑफर्स आणत आहे. मात्र यावेळी Paytm ने युझर्ससाठी एक असे खास फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने यूझर्स फोन बंद असतानाही इंटरनेटशिवाय सहजपणे पेमेंट करू शकतील. चला तर मग या फीचरबद्दल जाणून घेऊयात …

Paytm ने गुरुवारी ‘टॅप टू पे’ नावाचे नवीन फीचर लाँच केले आहे. या अंतर्गत Paytm युझर्सना पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा OTP टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी, आता ते फक्त त्यांच्या फोनला PoS मशीन टच करून पैसे देऊ शकतात.

लॉक न उघडता पेमेंट करता येते

खास बाब म्हणजे यासाठी यूझर्सना त्यांच्या फोनचे लॉकही उघडावे लागणार नाही. जरी त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाईल डेटा नसला तरीही ते फक्त PoS मशीनला टच करून पेमेंट करू शकतील.

कशा प्रकारे काम करेल ?

हे पेमेंट युझर्सच्या कार्डवरून केले जाईल, ज्यांचे डिटेल्स Paytm App मध्ये आधीच Save केले जातील. Paytm ची ‘टॅप टू पे’ सर्व्हिस Android आणि iOS दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहे. या अंतर्गत, Paytm च्या ऑल इन वन पीओएससह, युझर्स इतर बँकांच्या पीओएसवर देखील पेमेंट करू शकतील.

अशा प्रकारे वापरू शकता
1. पहिले ‘टॅप टू पे’ होम स्क्रीनवर “Add New Card” वर क्लिक करा किंवा कार्ड लिस्ट मधून सेव्ह केलेले कार्ड निवडा.
2. आता कार्डशी संबंधित आवश्यक माहिती एंटर करा.
3. यानंतर तुम्हाला टॅप टू पेशी संबंधित अटी आणि नियम ‘Accept’ करावे लागतील.
4. कार्डसोबत रजिस्टर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर OTP पाठवला जाईल.
5. OTP भरल्यानंतर, तुम्ही टॅप टू पे होम स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक्टिवेटेड कार्ड पाहू शकता.

देशात पहिला Cryptocurrency Index लॉन्च; गुंतवणूकदारांना ‘अशा’ प्रकारे होईल फायदा

नवी दिल्ली । जगभरात क्रिप्टोकरन्सी बिझनेस वेगाने वाढत आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सी खूप लोकांना आकर्षित करत आहे. क्रिप्टोमधील वाढती गुंतवणूक पाहता, क्रिप्टो सुपर अ‍ॅप क्रिप्टोवायरने देशातील पहिला क्रिप्टोकरन्सी इंडेक्स IC15 लॉन्च केला आहे. IC15 इंडेक्स जगभरातील प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसवर ट्रेडिंग केलेल्या प्रमुख क्रिप्टोकरन्सीवर नजर ठेवेल. यासाठी व्यापारी, डोमेन एक्‍सपर्ट आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश असलेली समिती (Index Governance Committee) स्थापन करण्यात आली आहे. ही समिती टॉप 15 क्रिप्टोकरन्सीची निवड करेल आणि त्यांच्याबद्दल सखोल माहिती गोळा करेल.

क्रिप्टो इंडेक्स IC15 कसे काम करेल?

IC15 इंडेक्समध्ये Bitcoin, Ethereum, XRP, Litecoin, Binance Coin, Solana, Terra आणि ChainLink सारख्या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीचा समावेश आहे. इंडेक्स गव्हर्नन्स कमिटी पहिले मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने टॉप 400 कॉईन्सची निवड करेल. यापैकी, नंतर टॉप 15 कॉईन्स निवडली जातील.

करन्सी निवडीसाठीचे कठोर नियम

400 कॉईन्सच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी, क्रिप्टोकरन्सीमध्ये किमान 90% उलाढाल असणे आवश्यक आहे. तसेच, ट्रेडिंग व्हॅल्यूच्या बाबतीत ते टॉप 100 करन्सीमध्ये स्थान दिले पाहिजे. पात्र क्रिप्टोकरन्सी देखील बाजार भांडवल प्रसाराच्या संदर्भात टॉप 50 मध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर समिती टॉप 15 क्रिप्टोकरन्सी निवडेल. निर्देशांकाची मूळ किंमत 10,000 निश्चित करण्यात आली आहे आणि मूळ तारीख 1 एप्रिल 2018 आहे.

क्रिप्टो मार्केटवर बारकाईने लक्ष

IC 15 इंडेक्स क्रिप्टो मार्केटमधील 80 टक्क्यांहून जास्त हालचालींवर लक्ष ठेवेल. बाजारातील सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर खरी परिस्थिती गुंतवणूकदारांसमोर ठेवली जाईल. त्यामुळे पारदर्शकता वाढेल. क्रिप्टोवायरची समिती प्रत्येक तिमाहीत टॉप 400 कॉईन्सचे पुनरावलोकन करेल.

क्रिप्टो गुंतवणूकदारांना अशा प्रकारे मदत करेल

क्रिप्टोवायरचे व्यवस्थापकीय संचालक जिगिश सोनगारा म्हणतात की,IC15 लाँच करण्याचा उद्देश गुंतवणूकदारांना शिकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या क्रिप्टो मार्केटचे ज्ञान तर वाढेलच शिवाय त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यातही मदत होईल. IC15 या व्यवसायात पारदर्शकतेला चालना देईल. गुंतवणूकदाराला योग्य आणि अचूक माहिती मिळेल. यामुळे धोका कमी होण्यास मदत होईल.

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे. तर अजून 15 जणांचा अहवाल येणं बाकी आहे.

यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमधील २१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये वळसे पाटील यांच्या खासगी सचिवासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अद्याप 15 जणांचे अहवाल बाकी आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे असे सदर माजी नगरसेवकाचे नाव असून कोपरखैरणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत

संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्याबद्दल शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याआधारे गुरुवारी उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे हे यापूर्वी देखील मारहाण प्रकरणात कायद्यात अडकले होते.

दरम्यान, कालच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल देखील भाजप कडून आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. याप्रकरणी भाजपच्या सोशल मीडियाचे काम पहाणाऱ्या पदाधिकारी जितेन गजरिया याना अटक करण्यात आली होती. जितेन गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख ‘मराठी राबडीदेवी’ असा केला होता. यामुळेच वाद निर्माण झाला होता

कोरोनाची लस घेऊनही संसर्ग का होतोय; ‘ही’ असू शकतात कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली होती त्यापैकी बहुतेकांना सुरुवातीला खात्री होती की, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ओमीक्रॉन च्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज पाहून जाणून घेणार आहोत यामागील प्रमुख कारणे …

लस घेऊनही संसर्ग कसा होतो आहे ?

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (US-CDCP) सह इतर मोठ्या संस्थांचे शास्त्रज्ञ, तज्ञांनी लस असूनही संसर्ग होण्याच्या स्थितीला ब्रेक-थ्रू संसर्ग म्हटले आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटनुसार, ब्रेक-थ्रू संसर्ग असलेली लोकं इतर लोकांनाही त्याच प्रकारे संक्रमित करू शकतात, मात्र ते सामान्य संसर्ग असलेल्या लोकांप्रमाणेच ते करत आहेत. कारण लस न घेणाऱ्यांच्या नाकात जितके विषाणू जमा होतात तितकेच विषाणू या लोकांच्या नाकातही जमा होतात. म्हणजेच, दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी परिस्थिती सारखीच असते.

ब्रेक-थ्रू संसर्ग का होत आहे?

ब्रेक-थ्रू संसर्गाबाबत ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या दोन अभ्यासानुसार, कोरोनाविरुद्धची कोणतीही लस कोणत्याही आजारापासून 100% संरक्षण देत नाही. दुसरे- सध्या जगभरातील कोरोना लस अशा आहेत, ज्याचा प्रभाव फक्त 4-6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे शरीराला दिलेली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. ‘द कॉन्व्हर्सेशन’नुसार, या स्थितीला ‘Waning Immunity’ म्हणतात. तिसरी गोष्ट- जेव्हा जगभरात लस मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती, त्याच वेळी कोरोनाचा सर्वात घातक डेल्टा व्हेरिएन्ट कहर करत होता. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा वेग आणखी वाढला. यावर चौथी गोष्ट- लोकांचा निष्काळजीपणा. कारण लस दिल्यानंतर मास्क न लावणे, सोहळ डिस्टंसिंग न पाळणे, वारंवार हात न धुणे यासारखा निष्काळजीपणा बहुतांश लोकांमध्ये दिसून येत आहे.

त्यामुळे अजूनही धोका आहे का?

होय. कारण लस मिळाल्याचा अर्थ असा होत नाही की कोरोनाचा संसर्ग होणार नाही. जगातील सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणाऱ्या इस्रायलचा डेटा, तेथेही कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याचे दर्शवित आहे. इस्रायलशी संबंधित आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली – डिसेंबर-2020 मध्ये तेथे कोरोना लसीकरण सुरू झाले. 2021 च्या मध्यापर्यंत, तेथे जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले होते. म्हणजे सर्व लोकांना लस देऊन सहा महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. त्यामुळेच तेथे पूर्वीपासून प्रतिकारशक्ती कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पुढे काय शक्यता आहेत?

फक्त दोन मार्ग आहेत. एक- लसीचा प्रभाव 4-6 महिन्यांत संपत असल्याने. म्हणूनच प्रत्येकाला बूस्टर डोस घ्यावा लागेल. कदाचित एकापेक्षा जास्त वेळा. दुसरे म्हणजे लस आणखी प्रभावी बनवण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. भविष्यात नवीन जास्त प्रभावी लस येऊ शकतात. ते कदाचित कोरोनाचा (कोविड-19) प्रभाव पूर्णपणे काढून टाकण्यास सक्षम असतील.

16 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार अन् नंतर खून, क्रुर आई वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी ‘असं’ पकडलं

सोलापूर | बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका मजुराने आपल्याच सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारानंतर वडील अन् आईनेच सदर मुलीचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका जोडप्याने आपल्याच अवघ्या 16 महिन्यांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. सिकंदराबाद येथेच वडीलांनी स्वत: च्या पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ते सदर चिमुकलीचा मृतदेह घेऊन आपल्या राजस्थान येथील मूळगावी निघाले होते.

राजस्थान येथील मूळगावी जाऊन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची अशा नियोजनाने एक २२ वर्षांची तरुणी अन् २६ वर्षांचा तरुण असे जोडपे रेल्वेने प्रवास करत होते. सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करताना सोलापूर जवळ सहप्रवाशांना बाळाची काहीच हालचाल नसल्याने शंका आली.

सहप्रवाशांना जोडप्यावर संशय आल्याने त्यानी रेल्वे पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर सोलापूर स्थानकावर रेल्वे गाडी थांबली असताना महाराष्ट्र पोलिसांनी सदर जोडप्याला शोधून त्यांची झडती घेतली. यावेळी ते एका 16 महिण्याच्या मुलीचा मृतदेह घेऊन निघाले असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयीत आरोपी आणि त्यासोबत त्याच्या पत्नीला देखील ताब्यात घेतले आहे. लोहमार्ग सहायक पोलीस निरीक्षक अमोल सुभाष गवळी यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या सोळा महिन्याच्या मुलीवर वडीलाने राहते घरी अनैसर्गीक पध्दतीने लैगीक अत्याचार केला. आणि त्यांनतर तिचा गळादाबून ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिसांनी कलम 302, 201, 376, 377, 511, 34 भादवि बाल लैगींग अत्याचार अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता हैदराबाद पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

संशयीत आरोपी हा पत्नी सोबत संगणमत करुन त्याची मृत मुलीचा मृतदेह घेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे मुळगावी राजस्थान येथे सिकंदराबाद राजकोट या रेल्वेने घेवून जात होता. सदर गुन्ह्याच्या प्रकारात त्याची पत्नी आरोपीचा बचाव करण्याच्या उद्देशाने तो गुन्हा दडवून ठेवून मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने घेवून जात होते.

लोहमार्ग पोलिसांनी पती पत्नीला अटक केले आहे. सदरचा गुन्हा हा केसरा पोलीस ठाणे जिल्हा रंगारेडडी येथे घडलेला आहे. सदरचे कागदपत्रासह संशयीत आरोपी हैद्राबाद वर्ग करीत आहोत अशी माहिती गणेश शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक यांनी दिली आहे.

भाजप समर्थकांकडूनच पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका?; ‘या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक व्हिडिओ शेअर करीत या घटनेची पोलखोल केली आहे. तसेच भाजप समर्थकांनीच पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? असा सवाल उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मलिक यांनी म्हंटले आहे की, भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घडलेल्या प्रकारावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावेळी घडलेल्या घटनेवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

कोरोना वाढीमुळे कराड नगरपालिकेकडून उद्याने बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रांसह उत्सवावरही निर्बंधाचे सावट असणार आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील प्रीतिसंगम बाग आणि पी. डी. पाटील उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शहरातील बगीचे बंद करण्यात आले होते. संक्रमण मंदावल्यानंतर पुन्हा उद्याने खुली करण्यात आली. गत चार महिन्यांपासून बगीचे नागरिकांसाठी खुले होते. दररोज बगिच्यांमध्ये नागरिकांची फिरण्यासाठी गर्दी होत होती. मात्र, सध्या जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे.

कराडातील उद्याने गुरुवारपासून नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील उद्याने गुरुवारपासून बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

ओमिक्रॉनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का ! इंडिया रेटिंग्सने कमी केला जीडीपी वाढीचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, चालू आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये, भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने कमी केला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, गेल्या 15 दिवसात नवीन प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चौथ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, यापूर्वी वाढीचा अंदाज 6.1 टक्के होता.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे लादलेल्या निर्बंधांचा आर्थिक सुधारणांवर वाईट परिणाम होईल. एजन्सीने म्हटले आहे की, ओमिक्रॉनमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या जीडीपीवर 0.4 टक्के प्रभाव दिसून येईल. त्याच वेळी, संपूर्ण वर्षासाठी जीडीपी मागील अंदाजांच्या तुलनेत 0.1 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, देशभरात लागू केलेल्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.

ICRA रिपोर्ट्समध्ये दावा – चौथ्या तिमाहीत हॉटेल इंडस्ट्रीमधील मागणी कमी होईल
त्याच वेळी, रेटिंग एजन्सी ICRA च्या रिपोर्ट्सनुसार, महामारीच्या नवीन लाटेच्या दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत हॉटेल इंडस्ट्रीमधील मागणी कमी होईल. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात संक्रमणामध्ये झालेली तीव्र वाढ आणि अनेक राज्यांमध्ये लावण्यात आलेल्या आंशिक लॉकडाऊनमुळे, जानेवारी 2022 साठी हॉटेलमधील बुकिंग रद्द केले जात आहेत. तसेच, पुढील काही आठवड्यांसाठी बुकिंगमध्येही घट झाली आहे.

रेटिंग एजन्सीने सांगितले की, गेल्या महिन्याच्या अखेरीपर्यंत केवळ निवडक व्यावसायिक प्रवासात काही कपात झाली होती मात्र डिसेंबरमध्ये सुट्टीच्या प्रवासावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला नाही आणि बुकिंगवर कोणताही मोठा परिणाम दिसून आला नाही.