Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2982

विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत काल भाजप पदाधिकारी जितेन गजारियाने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “गृहमंत्री साहेब अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण ‘हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला? हेडमास्तर कुठे हरवले आहेत ?, असा सवाल वाघ यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना थेट पत्र पाठवले आहे. वाघ यांनी म्हंटले आहे की, “मुळात गृहमंत्री म्हणून आपलं काही चालतंय का? सबळ पुरावे असताना कारवाई करत नाही. एवढी हतबलता का आहे? गृहमंत्रालय नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय. जर जितेन हजारिया दोषी असेल तर राऊत आणि गुलाबराव पाटीलही दोषी आहेत. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्या तत्काळ गुन्हा दाखल करावा.”

जितेन गजारिया यांच्या भाषेचं समर्थन करता येणार नाही. महिलाबाबत अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी यात दुमत नाही. पण, मग संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीरपणे शिव्या दिल्या. लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आक्षेपार्ह वक्तव्य पोहोचले. त्यावर गृहमंत्रालय मूग गिळून गप्प का बसलंय?” असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

तसेच वाघ यांनी पत्रातून महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, गुलाबराव पाटील यांनी महिला खासदाराबद्दल अपशब्द वापरला होता. ते महिला लोकप्रतिनिधींची मानहानी करणारे नाही का? मग गुलाबराव पाटलांवर अद्याप कारवाई का केली नाही? गृहमंत्री साहेब कायदा सर्वांसाठी समान आहे, तर मग तो आपल्या वर्तवणुकीतून दिसत का नाही? गुलाबराव पाटलांना पाठीशी का घातले जात आहे. कारवाई करण्यासाठी आणखी किती दिवस वळसे घेणार आहात? हेच आहे का महाविकास आघाडीचे शिवशाहीर सरकार?” असा सवाल पत्राच्या माध्यमातून वाघ यांनी विचारला आहे.

प्रवाशांना दिलासा ! औरंगाबादेतून ‘या’ मार्गांवर सुरू आहे ‘लालपरी’

st bus

 

औरंगाबाद – मागील दोन महिन्यांपासून तिचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती परंतु मागील काही दिवसांपासून काही कर्मचारी कर्तव्यावर हजर होत असल्यामुळे एसटीने ठराविक मार्गांवर नियमित बससेवा सुरू केली आहे. यामुळे काही प्रमाणावर का होईना प्रवाशांना महामारी च्या काळात दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक अशी एसटीची दोन बसस्थानके आहेत. या दोन्ही बस स्थानकावरून सध्या काही प्रमाणात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज सुमारे शंभर ते दीडशे लालपरीच्या फेऱ्या होत असून, यातून एसटी महामंडळाला काही प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. तसेच हजारो प्रवाशांना आपले गंतव्यस्थान गाठण्यास मदत होत आहे.

शहरातील सिडको बसस्थानकातून दिवसभरात अंबड, जालना, पाटोदा, बीड, उस्मानाबाद या आगारातून दोन बसेस येत आहेत. त्याचबरोबर सिडको आगारातून उस्मानाबाद, तुळजापूर, जालना, पुणे, बीड, गेवराई या मार्गावर दररोज पाच ते सहा लालपरी सोडण्यात येत आहेत. यामुळे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे.

संजय राऊत गोव्यात का येतात? इथं त्यांचा एक सरपंचही नाही; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणूक सध्या चर्चेत आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस मध्ये लढत असताना शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने निवडणूक लढवत रंगत आणली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच गोव्यात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. तसेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही मग ते इथं का येतात असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनी शी संवाद साधताना प्रमोद सावंत म्हणाले की , गोव्यात 2022 मध्येही भाजपचे सरकार येईल. संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असा सवाल प्रमोद सावंत यांनी केला.

गोव्यातील जनतेचा भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. गोव्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या 60 वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे. तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत, असं प्रमोद सावंत म्हणाले.

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कसा असतो?? चला जाणून घेऊया

Stock Market Timing

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाईल, याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेही म्हणतात. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. देशाला कोणत्या मार्गाने आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे हे या अधिवेशनात स्पष्ट होईल. शेअर मार्केट ही अर्थसंकल्पानंतर आपले भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. आज आपण जाणून घेऊया की दिवशी शेअर बाजार कसा असतो

निफ्टी 50 ची अशी आहे रियाक्शन-
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेडच्या रिपोर्ट्सनुसार, 2010 पासून, निफ्टी 50 निर्देशांकात त्या आठवड्यात आणि महिन्यात वाढीच्या आधी अर्थसंकल्पाच्या दिवशी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराचा जास्तीत जास्त रिटर्न 4.7 टक्के तर कमीत कमी 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

अर्थसंकल्पाच्या दिवशी सरासरी रिटर्नमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे, अर्थसंकल्पाच्या दिवसाच्या आधीच्या महिन्यात 1.9 टक्के आणि अर्थसंकल्पाच्या आधीच्या महिन्यात 0.7 टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात, सर्वात मोठी घसरण 7.1 टक्के आहे आणि जास्तीत जास्त रिटर्न 5.6 टक्के आहे.

अर्थसंकल्पावर मिड-कॅप्सची प्रतिक्रिया लार्ज-कॅप्सपेक्षा जास्त अस्थिर आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, निफ्टी 500 अर्थसंकल्पाच्या आधी निफ्टी 50 च्या खाली जातो, मात्र नंतर त्याच्या पुढे जातो.

अर्थसंकल्पात काय होऊ शकते ?
विकासाला आधार देणे हा अर्थसंकल्पाचा मुख्य फोकस असेल, असेही रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. आगामी अर्थसंकल्पातून अपेक्षित असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आश्वासक वित्तीय धोरणांद्वारे वाढ स्थिर ठेवण्यासाठी विशिष्ट उपाययोजना, आक्रमक MSP वाढीसह शेतीमालाच्या किंमतीत सुधारणा आणि फूड सबसिडीचा समावेश आहे. मात्र, कोणतीही मोठी सुधारणा अपेक्षित नाही आणि मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि PLI स्कीमसारख्या योजना सुरू राहतील अशी अपेक्षा आहे.

Cryptocurrency Price: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण सुरूच

Cryptocurrency

नवी दिल्ली । शुक्रवार, 7 जानेवारी, 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही घसरण झाली. जवळपास सर्व प्रमुख करन्सीज रेड मार्कवर ट्रेड करत होत्या. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टो मार्केट 2.96 टक्क्यांनी घसरला. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9:50 वाजता जागतिक क्रिप्टोची मार्केट कॅप $1.98 ट्रिलियन होते. इथेरियममध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. बिटकॉइनमध्येही लक्षणीय घट झाली.

बातमी लिहिण्याच्या वेळी, बिटकॉइनची सर्वात मोठी करन्सी 3.97% ने घसरली होती, तर इथेरियम 7.81% ने घसरले होते. सोलाना 7.72% ची घसरण दिसली, तर Binance Coin 4.25% ने घसरला.

कोणत्या करन्सीमध्ये किती घसरण झाली ?
बिटकॉइन $41,378.22 वर ट्रेड करत होता. गुरुवारच्या $811 अब्जच्या तुलनेत त्याची मार्केटकॅप $791 अब्जपर्यंत घसरले. बिटकॉइनच्या किमतींनी आजचा नीचांक $41,767.75 आणि गेल्या 24 तासात $43,551.83 चा उच्चांक गाठला आहे.

इथेरियमची किंमत आज $3,199.14 वर ट्रेड करताना दिसली. Ethereum ने गेल्या 24 तासात $3,239.16 चा नीचांक आणि $3,478.62 चा उच्चांक केला आहे. त्याची मार्केट कॅप $386 अब्ज पर्यंत खाली आली आहे. Binance Coin $448 वर ट्रेड करत होता. सोलाना $138.54 वर राहिला.

आता इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; ‘अशी’ आहे प्रक्रिया

UPI

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंटसाठी UPI (Unified Payments Interface) सारखी सुविधेद्वारे तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करता येते. यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे इत्यादी UPI सपोर्टिंग अ‍ॅप्सची गरज आहे. UPI पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र, ज्या लोकांकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन नाही ते देखील UPI ट्रान्सझॅक्शन करू शकतात. इंटरनेट नसल्यास, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजेच NPCI ची *99# सुविधा खूप उपयुक्त ठरणार आहे.

*99# ही NPCI ची USSD बेस्ड मोबाइल बँकिंग सर्व्हिस आहे, जी नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही सर्व्हिस फक्त BSNL आणि MTNL युझर्ससाठी उपलब्ध होती. आता *99# द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्याच फोन नंबरवरून भीम अ‍ॅपवर एकदाच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

इंटरनेटशिवाय UPI द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करावे ?
स्टेप 1- सर्वप्रथम फोनचा डायल पॅड उघडा आणि *99# टाइप केल्यानंतर कॉल बटणावर टॅप करा. हे तुम्हाला 7 पर्याय असलेल्या नवीन मेनूवर घेऊन जाईल. या मेनूमध्ये Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN यांसारख्या पर्यायांची लिस्ट असेल.

स्टेप 2- जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर नंबर 1 दाबून Send Money पर्याय निवडा. यानंतर, तुम्ही फोन नंबर, UPI आयडी किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.

स्टेप 3- नंतर रक्कम एंटर करा आणि ट्रान्सझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI पिन एंटर करा. मग तुम्हाला फक्त ‘Send’ वर टॅप करायचा आहे.

UPI म्हणजे काय ?
UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अ‍ॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकापेक्षा UPI अ‍ॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अ‍ॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते.

तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही; राजू श्रीवास्तवचा थेट काँग्रेसला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत थेट कॉंग्रेसलाच इशारा दिला आहे. ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जाते. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही, असे श्रीवास्तवने म्हंटले आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्याने थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. श्रीवास्तवने व्हिडिओत म्हंटले आहे की, ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जाते. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही. कारण मोदीजींवर गुरु, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशिर्वाद आहे.

तसेच श्रीवास्तवने मोदींच्या घातलेल्या या घटनेवरून पंजाबला बदनाम केले जात असल्याने त्याचाही समाचार घेतला आहे. पंजाब बद्दल नकली शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?’ असा सवाल श्रीवास्तवने काँग्रेसला विचारला आहे.

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घडलेल्या प्रकारावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 242 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 242 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्या खाली असलेला कोरोना बाधित होते. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवारी आढळून आले. वातावरण बदल यामुळे व्हायरलचे प्रमाणही आढळून येत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 123 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 242 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 5. 87 टक्के आला आहे. कोरोना सोबत अोमिक्राॅन आणि व्हायरल आजाराचे प्रमाण वाढलेले आहे.

 

Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; आजचे दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही जोरदार घसरण झाली. जर आपण आजच्या दराबद्दल बोलायचे झाले तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत 0.06 टक्क्यांची किंचित वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स MCX वर सोने 47,481 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,719 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या
ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठीची सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह आज 47,481 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.04 टक्क्यांनी घसरली. आज सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 60,402 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,820 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,820 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,820 रुपये
पुणे – 46,110 रुपये
नागपूर – 46,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,820 रुपये
पुणे – 46,130 रुपये
नागपूर – 48,820 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4614.00 Rs 4612.00 -0.043 %⌄
8 GRAM Rs 36912 Rs 36896 -0.043 %⌄
10 GRAM Rs 46140 Rs 46120 -0.043 %⌄
100 GRAM Rs 461400 Rs 461200 -0.043 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4866.00 Rs 4863.00 -0.062 %⌄
8 GRAM Rs 38928 Rs 38904 -0.062 %⌄
10 GRAM Rs 48660 Rs 48630 -0.062 %⌄
100 GRAM Rs 486600 Rs 486300 -0.062 %⌄

देशात दिवसभरात 1 लाख 17 हजार कोरोनाबाधित; ओमायक्रोन रुग्णसंख्या 3 हजारांवर

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनारुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून काल दिवसभरात तब्बल 1 लाख 17 हजार रुग्ण हे कोरोना बाधित आढळले आहेत. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

देशात काल एका दिवसात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील दैनंदिन पॉझिटिव्ही रेट ७.७४ टक्के इतका झाला आहे.

भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रोन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमिक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.