Friday, January 2, 2026
Home Blog Page 3004

आता बुट-चप्पल अन् कार यांच्या किंमती वाढल्या, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आधीच महागाईने उच्चांक गाठला असतानाच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून चप्पल-बुटांची खरेदी, नवे वाहन यांच्यात दरवाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर एटीएम मधून पैसे काढणे देखील महागल आहे. कोणत्या वस्तु साधारण किती टक्क्यांनी महाग झाल्या आहेत? तसेच कोणत्या वस्तुंवरील कर सरकारने किती रुपयांनी वाढवला आहे याबाबत आज आपण जाणुन घेणार आहोत.

एटीएम मधून पैसे काढणे महागणार

देशातील ग्राहकांना एटीएममधून व्यवहार करणे आता महाग झाले आहे. आरबीआयने एटीएममधून मोफत व्यवहार केल्यानंतर पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली होती. एटीएममधून महिन्याला फक्त 5 मोफत व्यवहार होतील, मेट्रो शहरातील इतर बँकांच्या एटीएममधून 3 मोफत व्यवहार करता येतील. त्यानंतर जे अतिरिक्त व्यवहार होतील त्या प्रति व्यवहारासाठी 1 जानेवारी 2022 पासून 20 च्या ऐवजी 21 रुपये चार्ज द्यावा लागेल

चप्पल आणि बुटांच्या खरेदीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

बूट आणि चप्पलवर आता ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता चप्पल आणि बुटांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत

कार खरेदी करणं पडणार महागात

नवीन वर्षात कार खरेदी करणे देखील ग्राहकांना महागात पडणार आहे. देशातील अनेक वाहन कंपन्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या कारच्या किमती वाढवणार आहेत. 1 जानेवारी 2022 पासून मारुती सुझुकी, फोक्सवॅगन आणि व्होल्वोची वाहने महाग झाली आहेत. टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% ने वाढवल्या आहेत. टोयोटा आणि होंडाही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत.

कुत्र्याने 7 महिन्याच्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा; पुढे झालं असं काही..

dog small child

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रस्त्यावरील एका कुत्र्याने अवघ्या ७ महिन्याचा मुलाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याची घटना कोटा शहरात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सदर मुलाला जेके लॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तो जीवन मरणाशी संघर्ष करत आहे.

सदर 7 महिन्यांचा मुलगा घरात साडीच्या झुल्यात झोपला होता. यादरम्यान घराचा उघडा दरवाजा पाहून रस्त्यावरील एक कुत्रा घरात घुसला. त्याने दाताने साडीची झूल फाडली. त्यानंतर निष्पाप मुलावर हल्ला करून मुलाच्या प्रायव्हेट पार्ट चा चावा घेतला. त्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील मुकेश आणि त्याची पत्नी धावत आले.

रक्तबंबाळ अवस्थेत होत बाळ

मुलाच्या आई वडिलांनी तात्काळ त्या कुत्र्याला तेथून हाकलून लावलं पण तोपर्यत ते बाळ रक्तबंबाळ अवस्थेत होत. पीडित बाळाला तातडीने कोटा येथील जेके लोन रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जेके लोन हॉस्पिटलच्या बालरोगतज्ञांनी सांगितले की, कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लस आणि रेबीज इम्युनोग्लोबिन लागू केले जाते. वेळेवर अँटी रेबीज लस आणि रेबीज इम्युनोग्लोबिन पूर्णपणे सुरक्षित आहेत.

उपमुख्यमंत्र्यांचा फलदायी दाैरा : अजितदादांनी दिले सातारा सैनिक स्कूलला 300 कोटी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. साताऱ्यातील सैनिक स्कूलसाठी 300 कोटी, विश्रामगृहसाठी 13 कोटी 12 लाख, वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी 12 कोटी 99 लाखांचा निधी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं. गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.

विस्तारीत विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेल

यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा येथे 13 कोटी 12 लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 1 व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.

सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी

सातारचे सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी 100 कोटी या प्रमाणे 300 कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला 12 कोटी 99 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.

जमिनीची वाटणी करुन द्या म्हणत मुलाने केला आईचा खून; वडिलांचा अंगठा तोडला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जमिनीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणातून मुलाने आई-वडिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात आई जागेवरच गतप्राण झाली, तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमित पांडुरंग नरुटे असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे .

शेतात पाईपलाईन जोडायला जाऊ असे म्हणून मुलाने आई अलका पांडूरंग नरुटे यांना शेतात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर कपाळावर वार केले. या हल्ल्यात अलका नरुटे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर वडील पांडुरंग नरुटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. या वडिलांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला.

दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर मुलाचे वडील पांडुरंग नरुटे यांनी मुलाविरुद्ध इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी अमित नरुटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे

कोरोना रूग्णवाढीमुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनचे संकेत, उद्या बैठक

Ajit Pawar Night Curfew

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील 10 मंत्री व २० आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ‘माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळं गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात 10 मंत्री आणि 20 आमदार पाॅझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवलं असतं तर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार करोना पाॅझिटिव्ह झाले असते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नवीन वर्षात सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात? आजचे ताजे भाव चेक करा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खुशखबर आहे. गतवर्षी 2021 मध्ये अनेक वेळा सोन्याच्या किमतीत घट झाल्यानंतर आता नव्या वर्षातील पहिल्याच सोमवारी पुन्हा एकदा सोन्याचा किमतीत थोडीफार घट झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बिनदास्त पणे तुम्ही सोने खरेदी करू शकता.

काय आहेत आजचे सोन्याचे दर-

मुंबई बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47170 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49170 रुपये प्रतितोळा आहे तर पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46570 रुपये आहे आणि 24  कॅरेट सोन्याचा दर 49100 रुपये प्रतितोळा आहे. दरम्यान आत्तापर्यन्त सोन्याच्या दरात 8000 रुपये घट झाली असून एकेकाळी सोन्याचा सर्वोच्च दर हा 56200 रुपये प्रतितोळा होता

गुड रिटर्न वेबसाईट नुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे- 

मुंबई 24 कॅरेट सोन्याचा भाव -49170
मुंबई 22 कॅरेट सोन्याचा भाव – 47170

पुणे 24 कॅरेट सोन्याचा भाव 49100
पुणे २2 कॅरेट सोन्याचा भाव 46570

नागपूर 24 कॅरेट सोन्याचा भाव – 49170
नागपूर 22 कॅरेट सोन्याचा भाव – 4७170

कोरोनामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता-

दरम्यान गेल्या काही दिवसात जगभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम हा सोन्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीची भीती आणि महागाईच्या चिंतेमुळे 2022 मध्ये सोन्याचा भाव 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता तुमचे बजेट असेल तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता.

जर तुम्हाला घरी बसून सोन्याचा दर पाहायचं असेल तर यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवीनतम दर पाहू शकता.

 

राज्यात आणखी तीन आमदारांना कोरोनाची लागण

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. हिवाळी अधिवेशनात उपस्थिती लावलेल्या दोन आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर ते नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. तर पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक आहे.

सुजय विखे पाटील यांचे वडील व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील 30 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर खासदार सुजय विलगीकरणात गेले आहेत. “आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,” अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/drsujayvikhe/posts/3160439404185522

 

सध्या राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्याकडून विविध कार्यक्रम रद्द केले जात आहेत. तसेच राज्य सरकारकडूनही ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण –

आतापर्यंत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

नांदेड- हडपसर एक्स्प्रेसला ‘हे’ अत्याधुनिक कोच; मराठवाड्यात प्रथमच

lhb

औरंगाबाद – पूर्वीची नांदेड- पुणे द्वी साप्ताहिक एक्सप्रेस चे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करण्यात आले आहे. या एक्सप्रेसला आता एलएलबी कोचेस लावण्यात आले आहेत. मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नांदेड- हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये पहिल्यांदाच थर्ड एसी इकॉनोमी क्लास बोगी देण्यात आली आहे. या बोगी मुळे नियमित थर्ड एसी बोगीच्या तुलनेत अगदी कमी पैशात वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.

नांदेड-पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेसच्या वेळेत आणि रेल्वे स्थानकात आणि काही रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. त्यानुसार आता ही रेल्वे पुणे स्थानकावर ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत धावेल आणि हडपसर वरूनच सुटेल. या रेल्वेला 20 बोगी राहणार आहेत. या सर्व बोगी एलएलबी आहेत. त्यामुळे हडपसर पर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायक होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेत प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर रेल्वे जीपीएस प्रणाली असून प्रत्येक बोगीत स्पीकर ची व्यवस्था आहे. त्यातून रेल्वे नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती प्रवाशांना मिळेल.

औरंगाबाद ते हडपसर 8 तासांत –
ही रेल्वे नांदेड हुन रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. औरंगाबादला रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी दाखल होईल, तर रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी औरंगाबाद येथून सुटून हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. या रेल्वेला दोन्ही दिशेने पुर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड जंक्शन, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

महादेव जानकरांची मोठी घोषणा; ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून कोण कोण निवडणुका लढवणार हे निश्चित झालेले नाही. अशात आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचे जाणकाराने म्हंटले आहे.

माजी मंत्री महादेव जानकर यांच्याकडून नांदेड जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशभरात राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका देखील लढवणार आहोत. म्हाडा, परभणी, सांगली अशा ठिकाणी ज्या ज्या निवडणूक होतील त्या मोठ्या ताकदीने लढवणार आहोत.

मी परभणी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी परभणी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मराठवाडा ही भूमी आमच्यासाठी फर्टाईल लँड आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचे खाते कशा प्रकारे उघडता येऊ शकेल. या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु आहे. संघटना कशी वाढेल यावरही आमचा प्रयत्न सुरु आहे.

सध्या पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही आमच्याकडून दौरे केले जात आहेत. मी स्वत: परभणीमधून स्वत:च्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजयदेखील मिळवू अशी आम्हाला खात्री आहे, असे जानकर यांनी यावेळी सांगितले.

… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

Ajit Pawar Lockdown

सातारा : राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ‘माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळं गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवलं असतं तर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार करोना पाॅझिटिव्ह झाले असते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.