Friday, January 2, 2026
Home Blog Page 3005

पुण्यात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू; माजी खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे असे आढळराव पाटील यांनी म्हंटल, तसेच शिवसैनिकाला सुखाने जगू द्या असेही ते म्हणाले

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, लांडेवाडी येथे होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीली परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळं कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केले आहे. शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. शिवसैनिकांना जगू द्या, आमचं अस्तित्व राहू द्या असे ते म्हणाले.

आम्ही कोणाच्या नादी लागत नाही. पण गृहमंत्र्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर आम्ही सगळ्या गोष्टी सांगत आहोत असेही ते म्हणाले. आता आढळराव पाटील यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागेल.

पेशंट महिलेला गुंगीचे औषध देऊन डाॅक्टर बनवायचे अश्लिल व्हिडिओ; त्यानंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या डॉक्टरला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश साठे (रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक जुना उमरसरा) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील जुन्या उमरसरा येथे आरोपी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीकडून उमरसरा परिसरात निसर्गोपचार केंद्र चालवले जात होते. त्यांच्या केंद्रात अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असत. मधुमेहाचा त्रास असल्याने एक पिडीत महिला २०१७ मध्ये डॉक्टरच्या नॅचरोपॅथी केंद्रात उपचारासाठी गेली होती. यावेळी तिला सलग बारा महिने उपचार घेतल्यावरच आराम मिळेल, असे डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

त्यामुळे पिडीत महिलेने बारा महिने उपचार घेण्यास सुरुवात केली. ज्यावेळी महिला उपचारासाठी त्याठिकाणी जात असे त्यावेळी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केले जात होते.अत्याचार केल्यानंतर संबंधित महिलेचे मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले.

त्यानंतर तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला असता पीडित महिलेने डॉक्टरविरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी डाॅक्टरसह तिच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली आहे. सध्या आरोपी डॉक्टर पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडील मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत.

…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे

पश्चिम बंगाल येथे शाळा वगैरे सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पण रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात देखील पश्चिम बंगाल सारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. काही ठिकाणी कँटोनमेन्ट झोन तयार केली जातील आणि त्याच्या बाहेर लोकांना प्रावेश करता येणार नाही तसेच गर्दी कुठेही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शाळा आणि रेल्वे हे निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. रेल्वेमध्ये गर्दी होत आहे. त्यावर मुख्यमंत्री गंभीर आहेत पण तो निर्णय कॅबिनटेमध्ये होईल. कॅबिनेटमध्ये चर्चा होईल परंतु निर्बंधांबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून काल १० हजार रुग्णसंख्या झाली होती. अशा परिस्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने या मुलांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

ऊसाच्या शेतात 25 वर्षीय युवतीच्या डोक्यात दगड घालून खून, चेहराही ओळखता येईना..

कराड | उसाच्या शेतात एका २५ वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामध्ये युवतीच्या चेहऱ्याला जबर मार बसला असून ओळख पटवणेही अवघड झाले आहे. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात सदर घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे असून घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिरानजीक उसाच्या शेतात 25 वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यात दगड घातल्याने युवतीच्या चेहऱ्याला जबर मार बसला आहे. अद्याप युवतीची ओळख पटलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. खुनामागील कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कराड तालुक्यातील कार्वे भागात झालेल्या खुनामुळे तालुक्यात खळबळ उडाली. कराड तालुक्यातील नववर्षात पहिलाच खून हा या भागात झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून खूनाची मालिका ही सतत घडत असल्याने पोलिसासमोर मोठे आवाहन आहे. युवतीचा डोक्यात दगड घातल्याने चेहरा पूर्णपणे ओळखत नाही, त्यामुळे युवतीची ओळख पटवणे व मारेकऱ्यांचा तपास पोलिस करत आहेत.

नवरीचे 36 लाखांचे दागिने पळवणारा अखेर अटकेत; लग्नाच्या मंडपात ‘अशी’ केली होती चोरी

औरंगाबाद – लग्नातून तब्बल 36 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली बॅग लंपास करणाऱ्यांपैकी एका चोरट्याला चिकलठाणा पोलिसांनी अकोल्यातून शनिवारी रात्री अटक केली. त्‍याला 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर. व्‍ही. सपाटे यांनी रविवारी दिले आहे. अभिषेक विनोद भानुलिया (वय 20, रा. जातखेडी, ता.पाचोर जि.राजगड, मध्‍यप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत प्रकरणात सुनील राधेश्‍याम जैस्‍वाल (रा. नागपूर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, फिर्यादीचा मुलगा नैमीश याचे लग्न औरंगाबादेत संजय जैस्‍वाल यांच्‍या मुलीशी ठरले. 6 डिसेंबर 2021 रोजी सूर्या लॉन्सवर हळदीचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी फिर्यादीने नववधूला डायमंड सेट गिफ्ट केला व उर्वरित दागिने देत असताना व्‍याही संजय जैस्‍वाल यांनी दागिने परत घेऊन, जा असे सांगितले. त्‍यामुळे फिर्यादीने सर्व दागिने एका बॅगेत भरले व ती बॅग एका खुर्चीवर ठेवून ते नातेवाइकांच्या भेटी-गाठीसाठी गेले. हीच संधी साधत चोरट्याने दागिने असलेली बॅग लंपास केली. 10-15 मिनिटांनी फिर्यादी बॅग घेण्‍यासाठी आले असता बॅग चोरीला गेल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले.

फिर्यादीने सीसीटीव्‍हीचे चित्रण तपासले असता, त्‍यात एक मुलगा बॅग घेऊन लॉनच्‍या बाहेर जाताना दिसला. गेटच्‍या बाहेर एक कार उभी होती, त्‍या कारमध्‍ये पूर्वीच एक व्‍यक्ती बसलेली होती. बॅग घेऊन आलेला मुलगा त्‍या कारमध्‍ये बसला आणि कार तेथून निघून गेल्याचे समोर आले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी एका चोरीच्‍या गुन्‍ह्यात आरोपी अभिषेक भानुलिया याला अटक केली असून त्‍याने साथीदारांसह अकोला, वर्धा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी भानुलिया याला ताब्यात घेत अटक केली. न्यायालयात सहायक सरकारी वकील डी. आर. काठुळे यांनी युक्तिवाद केला.

ओबीसी आरक्षणाचा इम्पेरियल डाटा दोन महिन्यात, तोपर्यंत प्रशासक : अजित पवार

सातारा | ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न महाराष्ट्रासह अन्य राज्यातही निर्माण झालेला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात मार्च पर्यंत ओबीसी आरक्षणाचा इम्पेरियल डाटा गोळा केला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारक परिसरात अभिवादन करण्यासाठी ते आले असता बोलत होते. अजित पवार म्हणाले, की ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारने साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण सर्व्हे करण्याबाबत जी समिती नेमली आहे तिचा अहवाल मार्च पर्यंत येणे अपेक्षित आहे. यापुढे आता त्यांना निधीची कमतरता भासू देणार नाही. राज्यात कोरोना संकट वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तोपर्यंत प्रशासक : अजित पवार

ओबीसी इम्पेरियल डाटा गाेळा करण्यासाठी समितीने दाेन महिन्यांची मुदत मागितली आहे. परंतु तीन महिने लागले तरी चालेल. जाेपर्यंत ओबीसी समाजास आरक्षण मिळत नाही ताे पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ताेपर्यंत स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नेमावे लागले तरी चालतील असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे दिले. सातारा शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी बाेलताना हे स्पष्ट केले.

राजकीय चर्चांना उधाण : भाजप आ. जयकुमार गोरे जाहीर कबुली, मी अजितदादांचा फॅन

बारामती | अजित पवार यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, भरसभेत हे सांगायला मला संकोच वाटत नाही, आमची राजकीय भूमिका काहीही असो, पण मी अजितदादा पवार  यांचा फॅन आहे, अशा शब्दांत भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जयकुमार गोरे यांना म्हणाले, “चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा” असे म्हटल्याने पक्षप्रवेशाची आॅफर दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बारामती येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्घाटन अजित पवार यांनी केले. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उद्घाटन उरकून अजित पवार निघून गेले होते. जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोहचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. यावेळी जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

त्यानंतर सभेत राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच त्यांना ऑफर देऊन टाकली. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा. त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरला.

अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अधिक जाणवत आहे. कोरोनाने राजकीय क्षेत्राबरोबर बॉलिवूड क्षेत्रातही शिरकाव केला आहे. बॉलिवूड पार्ट्यांमुळे कोरोनाचा अधिक प्रसार होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. या दरम्यान आता अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया हि देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

विशेष म्हणजे अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांनी दोन्ही लस घेतळी होती. तरी देखील या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जॉन अब्राहमने आपल्या इंट्राग्रामवर मला कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजले. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यात आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही.’ तुम्हीही काळजी घ्या आणि मास्क घाला, असे आवाहन जॉन अब्राहमने केले आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महिम कपूर यांच्यासह अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा पती करण बुलानी, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली.

रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल

औरंगाबाद – आम्हाला पाणीपट्टी जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल 2 हजार 700 व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. योजना पूर्ण करताना शहरातील नळांना मीटर बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मिटर बसविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सुमारे 5 हजार व्यावसायिक नळांना जलमीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्ट्रॉसॉनिक स्मार्ट प्रकारचे हे जलमीटर राहणार आहेत. मोठ्या आकाराच्या नळ कनेक्शनच्या एका जलमीटरची किंमत लाखाहून अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी 5 हजार मिटरसाठी तब्बल 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या 2 हजार 700 एवढे व्यावसायिक नळ आहेत. वर्षभरात शहरातील सर्व व्यावसायिक नळांना मिटर लागतील, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नववर्षाच्या संकल्प अहवालात नमूद केले आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी आता लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. सुमारे पाच हजार नळांसाठी 13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी समांतर जल योजनेत शहरातील नळांना मीटर बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी मीटरच्या किमतीवरून मोठा वाद झाला. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत बसविल्या जाणाऱ्या जलमीटरची किंमत किती असेल, ती रक्कम महापालिका भरणार की व्यावसायिक नळधारकांकडून केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या महापालिकेकडून अर्धा इंची व्यावसायिक नळासाठी वर्षाची 20 हजार रूपये पाणीपट्टी वसूल केली जाते. नळांच्या आकारानुरूप सर्वाधिक पाणीपट्टी रक्कम ही वर्षाकाठी 10 लाखापर्यंतही आकारली जाते. सद्यः स्थितीत पालिका पाचव्या ते सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यामुळे मिटर लागल्यास ग्राहकांना कमी पाणीपट्टी येऊ शकते, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

 

राणेंनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली; शिवसेनेचा चिमटा

Rane Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र सरकार हेच आपलं पुढील ध्येय आहे अशी डरकाळी फोडली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणें यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली असा चिमटा शिवसेनेनं काढला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल नारायण राणेकृत भाजपच्या बाजूने लागला. 19 पैकी 11 जागांवर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीस 8 जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपचे ‘पॅनल’ जिंकले. 11 विरुद्ध 8 हा निकाल. यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही. असे शिवसेनेने म्हंटल.

जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. आता जिल्हा बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत 11 जागा जिंकून येताच “आता लक्ष्य महाराष्ट्र” अशी आरोळी केंद्रीय मंत्री राणे यांनी ठोकली. जिल्हा बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्ताबदल होतो, हे वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा बँक जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच विजय मिळवला, असे भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, तशा महाराष्ट्रातील 31 पैकी बहुसंख्य जिल्हा सहकारी बँकांवर महाविक आघाडीचाच ताबा आहे. रायगडातील जिल्हा बँकेवर मागे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले म्हणून शे. का. पक्षाने काही महाराष्ट्रात सत्ताबदलाची भाषा केली नाही, पण राणे यांनी एक जिल्हा बँक कारा जिंकली तर महाराष्ट्र महागता दलवायची भाषा सरू झाली असा चिमटा शिवसेनेने काढला.