Friday, January 2, 2026
Home Blog Page 3003

कराडला कोटा अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संंधी : पृथ्वीराज चव्हाण

कराड | अमेरिकेसारखे राष्ट्र फक्त गुणवत्तेची काळजी घेतात तू कुठला मुलगा भारत, चीन, जपान, पाकिस्तान हे न बघता गुणवत्ता किती आहे. गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तू किती भर टाकू शकेल तो किती मदत करू शकेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भर टाकेल, याचा विचार करतात. महेश खुस्पे आणि साै. मंजिरी खुस्पे या दोघांनी चांगला निर्णय घेतला. आपल्या परिसरातल्या जास्तीत जास्त मुला-मुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी कोटा अकॅडमीने दिली असल्याचे उदगार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

कराड येथे कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर काॅलेज आॅफ सायन्य काॅलेजचे नवीन वास्तूत स्थलांतर सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष डाॅ. महेश खुस्पे, संस्थापक उपाध्यक्ष साै. मंजिरी खुस्पे, विशेष सरकारी वकिल व सचिव अॅड. सतिश पाटील, प्राचार्या जयश्री पवार याच्यासह लायन क्लबचे पदाधिकारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

अध्यक्ष डाॅ. महेश खुस्पे म्हणाले, आमच्या संस्थेने शेकडो विद्यार्थी घडविण्याचे काम केले. आयआयटीत 250 च्या वर विद्यार्थी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली सुसज्ज इमारत उभी केल्याचे समाधान आहे. कराड सारख्या शहरात गेल्या 16 वर्षात अनेक चढ- उतार बघितले. परंतु सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची शिदोरी देवून उच्च पदावर बघताना आनंदही होत आहे.

उपाध्यक्षा साै. मंजिरी खुस्पे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही संस्था नविन वास्तूत स्थलांतरित होत आहे, यांचा आम्हांला अभिमान वाटतो. 16 वर्षांनंतर हे यश मिळाले आहे. कोटा अकॅडमीने क्वान्टींटी नाही तर क्वालिटीला महत्व दिले. आमच्या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त आहेत. आता 9 वी ते 12 वी काॅलेजला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परिपूर्ण ज्ञान घेवूनच कोटा अकॅडमीतून बाहेर पडेल.

सुत्रसंचालक नईम कागदी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव ॲड. सतीश पाटील यांनी केले. तर आभार संचालिका मैथिली खुस्पे यांनी मानले.

कोटा अकॅडमीच्या शिक्षकांचा गौरव

कोटा अकॅडमीत गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानदान देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. यामध्ये सारिका पाटील, सन्ना संदे, अष्टमी मडगर, जितेंद्र कुमार, संदिप रानमाळे, विश्वदिप बँनर्जी, अमनराज, महेशसिंग राजपूत यांचा समावेश होता. यामधील अनेक शिक्षक हे परराज्यातील उच्च शिक्षित आहेत.

 

ए आयटम..म्हणत मुलीची छेड काढली, काॅलेजमध्ये राड्यानंतर हवालदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

rape

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद शहरात एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण शहरात रंगू लागली आहे. त्याचे झाले असे कि एमजीएम विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस ‘आयटम’ संबाेधिल्याने पाेलिस हवालदाराच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर संबंधित मुलाने विद्यार्थिनीच्या तिघा मित्रांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित दोघांनी परस्पर विराेधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

एमजीएम महाविद्यालयातील विद्यार्थिनी तिच्या तिघा मित्रांसोबत महाविद्यालय नजीकच्या हॉटेलात चहा घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी संबंधित मुलाने तिला ‘आयटम’ म्हणून हाक मारली तसेच तिच्याकडे पाहून काही हावभाव केले. यावेळी विद्यार्थिनीच्या मित्रांनी संबंधितांस हटकले. त्यानंतर दाेन गटात धक्काबुक्की झाली. यानंतर हवालदाराच्या मुलाने पाेलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार संबंधित विद्यार्थिनीच्या तिघा मित्रांविरोधात मारहाणाची गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनीने देखील हवालदाराच्या मुलाने केलेल्या कृत्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पाेलिसांनी हवालदाराचा मूलगा प्रतीक राजेश भोटकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. प्रतीक याच्याबरोबर पीयूष चंद्रकांत देशमुख आणि आणखी एक जणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सिडको पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल करून घेतले आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक; पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस स्टेशन मध्ये धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच पोलिसांवरच 50 लाखांच्या चोरीचा आरोप केल्यामुळे राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे.

कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या वाजताच्या सुमारास घरून 50 लक्ष रुपयांची रोकड घेऊन तुमसरकडे जात होते. त्यावेळेस गाडी वळवताना इंडीकेटर का दाखवला नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच करेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्र जवळील ५० लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविले असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला. यानंतर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिश उप निरीक्षक राणे यांनी फिर्यादी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.

खराब रस्त्यामुळे टायर फुटल्याने ट्रक उलटला ; पाच वर्षात 30 जणांचा बळी

सांगली : तासगाव – कवठे महाकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर खराब रस्त्यामुळे टायर फुटून आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या राज्यमार्गावर रखडलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर तीन धोकादायक वळणे आहेत. यामध्ये पडून गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूरहून तुरीचे भुसकाटाची पोती घेऊन टाटा आयशर ट्र्क (क्र. केए 57 सी 4556) हा तासगावकडे निघाला होता. तो कवठेएकंद येथे पोती उतरणार होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणार ट्र्क आला असता त्यातील चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. यामध्ये ट्र्क पलटी झाला. या अपघातात ट्र्क चालक अब्दुल मुल्ला हा सुदैवाने बचावला.

ज्यावेळी ट्रकचा हा अपघात झाला. त्यावेळी ट्रकचे टायर फुटून गेले. या अपघातात सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. या अगोदर याच वळणावर फरशीचा ट्रक उलटून दहा जणांचे बळी गेले होते. तर मोटारसायकल व इतर अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.

तासगाव – कवठेमहांकाळ राज्य महामार्गाचे सुमारे तीन वर्षांपूर्वी काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, मणेराजूरी जवळील खंडोबा ओढा ते पवार वस्ती पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. त्यामुळे रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. आणखी किती बळी व नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

पेन्शन धारकांसाठी खूशखबर! पण 28 फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ काम केलं नाही तर होईल नुकसान

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या पेन्शनधारकांनी अद्याप जीवन प्रमाणपत्र संबंधित बँकेत भरले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.अशा लोकांसाठी सरकारने जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्यालयीन मेमोरँडममध्ये म्हटले आहे की, “विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आणि वृद्ध लोकसंख्येच्या कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका लक्षात घेऊन, सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेट्स सादर करण्यासाठी सध्याची ३१.१२.२०२१ ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यात पुढे म्हटले आहे, “आता, सर्व केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक 28.02.2022 पर्यंत जीवन प्रमाणपत्रे सादर करू शकतात. या वाढीव कालावधीत, पेन्शन वितरण प्राधिकरणांद्वारे (PDAs) पेन्शन कोणत्याही व्यत्ययाशिवाय देणे सुरू राहील.” मात्र, तसे न केल्यास पेन्शनधारकांचे पेन्शन थांबू शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?

पेन्शनधारक पेन्शन वितरण बँकेला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. ही सर्वात सामान्य पद्धत आहे. पेन्शनधारकांना बँकेच्या काउंटरवर उपलब्ध असलेला एक फॉर्म भरावा लागेल आणि तो बँक अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. याशिवाय, जर बँक तुम्हाला घरोघरी सेवा देत असेल, तर तुम्ही त्याचा वापर करून तुमचे जीवन प्रमाणपत्र देखील सादर करू शकता.

पुण्यात कडक लाॅकडाऊन लागणार? महापौरांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

murlidhar mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातल्या निर्बंधाविषयीदेखील भाष्य केले.

मागील पाच सहा दिवसांत पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची नेमकी काय तयारी आहे याचा आढावा आम्ही घेतला असे मोहोळ यांनी सांगितले. तसेच, महापालिकेनं व्यवस्थित तयारी केली आहे. बेडची व्यवस्था, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था पुरेशी आहे. चिंतेचं कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

‘पुणे शहरात नव्यानं सापडणारे रुग्ण नेमके कुठल्या प्रकारातील आहेत. त्यातील पहिल्यांदा बाधित झालेले किती आहेत? त्यातील पहिला डोस झालेले आणि दुसरा डोस झालेले किती आहेत? याचीही माहिती घेतली. लहान मुलांसाठी महापालिकेनं विशेष रुग्णालयं सुरू केली आहेत. हडपसर, वारजे आणि बाणेर इथं नवी रुग्णालयं सुरू होत आहेत. त्यामुळं नव्यानं काही निर्बंध लावण्यापेक्षा सध्या असलेले निर्बंध काटेकोरपणे पाळले जातील हे पाहायला हवं. अर्थात, त्याबाबतचा निर्णय उद्या होईल, असं मोहोळ म्हणाले.

अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत लोकांची मागणी, त्यांचा आग्रह, शाळा, उद्याने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सगळ्यावर सारासार चर्चा होईल. जिल्ह्याच्या टास्क फोर्सचे अधिकारीही बैठकीला उपस्थित असतील. शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय देखील उद्या होईल. लोकांचं म्हणणं काय आहे हेच मी उद्याच्या बैठकीत मांडणार आहे, असंही मोहोळ यांनी सांगितलं.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच क्वॉरंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे. याव्यतिरिक्त पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचणे महत्त्वाचे आहे त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत.

पुण्यात 80 टक्के लोकं कोरोनाबाधित
पुण्यात एकूण 80 टक्के लोक कोरोनाबाधित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या लोकांनी आपले दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान या दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये कोरोनाने नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. यापैकी 80 टक्के लोकांनी आपला दुसरा डोस पूर्ण केल्याचे आढळून आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितले. तसेच या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

‘या’ शहरात 10 वर्ष जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द; जाणुन घ्या..

Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली सरकारने राज्यातील 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द केली आहे. आता या वाहनांच्या मालकांना वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचा किंवा इतर राज्यात विकण्याचाच पर्याय आहे. दिल्ली परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. राज्यात अशा पेट्रोल वाहनांची संख्या 43 लाखांहून अधिक आहे. यामध्ये 32 लाख दुचाकी आणि 11 लाख चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

कोणतीही 10 वर्षे जुने डिझेल किंवा 15 वर्षे जुने पेट्रोल वाहन रस्त्यावर धावताना आढळल्यास ते जप्त करून स्क्रॅपिंगसाठी पाठवले जाईल, असा इशारा दिल्ली परिवहन विभागाने दिला आहे. 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांचे मालक परिवहन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेऊन इलेक्ट्रिक किट स्थापित करू शकतात किंवा इतर राज्यांमध्ये विकू शकतात.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) च्या निर्देशानुसार, दिल्ली सरकारने 1 जानेवारी 2022 पासून 10 वर्षे पूर्ण केलेल्या 1,01,247 डिझेल वाहनांची नोंदणी रद्द केली आहे. ज्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे त्यात सुमारे 87,000 कारचा समावेश आहे, तर उर्वरित मालवाहक, बस आणि ट्रॅक्टर आहेत.

कारसाठी 3 ते 5 लाख रुपये खर्च येणार 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्यासाठी आठ इलेक्ट्रिक किट उत्पादकांना पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. विभागाची इतर उत्पादकांशीही चर्चा सुरू आहे. ऑटोमोबाईल तज्ञांनी सांगितले की जुन्या डिझेल आणि पेट्रोल कार आणि चारचाकी गाड्यांचे रिट्रोफिटिंगसाठी बॅटरी क्षमता आणि श्रेणीनुसार 3-5 लाख रुपये खर्च येईल. ते म्हणाले की दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या रेट्रोफिटिंगची किंमत बॅटरी आणि उत्पादकांच्या प्रकारानुसार कमी असेल.

Adult वेबसाईटसाठी आईच माझे ‘तसले’ फोटो काढते; ‘या’ माॅडेलने केला धक्कादायक खुलासा

Lauren Dascalo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल पैसे कमावणे खूप सोप्पे झाले आहे. पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. काही लोक चांगल्या कामाने तर काही लोक वाईट कामाने पैसे कमवत असतात. पैसे कमावण्यासाठी लोक कधी कधी अशा कामे करतात जी समाजाच्या दृष्टीने वाईट असतात. पण जेव्हा लोकांना या कामांमधून पैसा मिळू लागतो तेव्हा ते समाजाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. अशीच काहीशी घटना अमेरिकन मॉडेलच्या बाबतीत घडली आहे. या मॉडेलने पैसे कमवण्यासाठी एका अ‍ॅडल्ट वेबसाइटवर आपले नग्न फोटो विकायला सुरुवात केली. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मॉडेलची आई तिला हे फोटो काढण्यास मदत करते. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी लॉरेन डस्कालो हि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत जे तिच्या बोल्ड आणि सुंदर स्टाईलचे दिवाने आहेत. लॉरेनने तिचे खूप बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अनेकदा बिकिनीमध्ये दिसते. इंस्टाग्रामपेक्षाही ती अ‍ॅडल्ट कंटेंट साइटओन्ली फॅन्सवर खूप लोकप्रिय आहे. यावर ती तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ विकून मोठी कमाई करते.

आई मुलीला अश्लील फोटो काढण्यास करते मदत
अलीकडेच लॉरेनने एका पॉडकास्टमध्ये एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे. यामध्ये तिला विचारण्यात आले कि पालकांना तिच्या कामाबद्दल माहिती आहे का, तेव्हा तिने सांगितले कि की जेव्हा तिच्या पालकांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते लॉरेनला काहीच बोलले नाही. आता तिचे वडील या कामासाठी सपोर्ट करतात तर आई तिला या कामात तिला मदत करते. तसेच लॉरेन पुढे म्हणाली कि, तिची आई कधीकधी तिचे अश्लील फोटो स्वतः काढते आणि फोटो-व्हिडिओसाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी तिला मदत करते.

अनेक लोक टोमणे मारतात
जेव्हा तिने आपल्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा आई तिला म्हणाली तिने नेहमी दर्जेदार राहावे आणि कोणतेही काम करावे. तिच्या कामाबद्दल आम्हाला काही हरकत नाही मात्र कुटुंबातील काही लोकांचा या कामाला खूप आक्षेप आहे. ते टोमणे मारत असतात पण आता आम्ही त्याची पर्वा करत नाही.

मोठी बातमी ! राज्यातील या शहरात 31 जानेवारी पर्यंत शाळा राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रोन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते आठपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या तब्बल 167 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झाले असून पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.

आजपासून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशात उद्यापासून मुंबई महापालिके अंतर्गत येणाऱ्या पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.

राज्यातील शाळांबाबतही निर्णय शक्य?

आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

इतर महत्वाच्या बातम्या –

या’ शहरात 10 वर्ष जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द; जाणुन घ्या..

आता बुट-चप्पल अन् कार यांच्या किंमती वाढल्या, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल..

कुत्र्याने 7 महिन्याच्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा; पुढे झालं असं काही..

… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

नवरीचे 36 लाखांचे दागिने पळवणारा अखेर अटकेत; लग्नाच्या मंडपात ‘अशी’ केली होती चोरी

राष्ट्रवादीत मनभेद : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात “आज भी दूरी”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्याचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाैरा केला. या दाैऱ्यात जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची घोषणाही झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. त्यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकोप्याने जावूया असे म्हणताना, चक्क विधानपरिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांचे नांव घेण्याचे टाळले. त्यामुळे अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यातील दूर अजूनही असल्याचे स्पष्ट दिसून आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दाैऱ्यावर असताना आ. शशिकांत शिंदे हे दोन हात लांबच दिसून आले. त्यामुळे सातारा जिल्ह्या बॅंकेच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे मनभेद आजही पहायला मिळाले. नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही शिंदे व पवार लांबच होते. तर सातारा शहरातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेच्या भूमिपूजन प्रसंगी फोटोत शशिकांत शिंदे दिसलेच नाहीत. तर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांच्या उजव्या बाजूला पालकमंत्री बाळासाहेब पाटील तर डाव्या बाजूला भाजपचे आमदार व अजित पवारांचे विश्वासू आणि सध्या शशिकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी कारणीभूत असलेले राजकीय विरोधक आ. छ. शिवेंद्रसिंहराजे होते. याठिकाणी पालकमंत्र्याच्या शेजारी दोन हात लांब शशिकांत शिंदे होते.

या सर्व घडामोडीनंतर पत्रकार परिषदेत पक्षवाढी संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समितीत आमचे रामराजे नाईक- निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद आबा, दिपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, खासदार श्रीनिवास पाटील आहेत. सातारची खासदारकीची निवडणूक किती गाजली हे उभ्या महाराष्ट्राने बघितले. त्यामुळे आता पुन्हा एकोप्याने जावूया. यावेळी अजित पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव टाळल्याने हा राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरणार आहे.