Friday, January 2, 2026
Home Blog Page 3008

धाकधूक वाढली : सातारा जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह रेट वाढला, आज 65 जण बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 65 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील कमी झालेला आकडा आता वाढू लागल्याने धाकधूक वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 776 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 65 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणी पॉझिटिव्ह रेट हा 1 टक्क्यापेक्षा कमी झाला होता, मात्र आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 2. 34 टक्के आला आहे.

गेल्या महिन्यापासून सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट दिवसेंदिवस कमी होऊ लागला होता. मात्र 2-3 दिवसापासून बाधितांचा आलेला आकडा जिल्हावासियासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. त्यामुळे हळूहळू जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोना डोके वर काढत असून धाकधूक वाढतानाचे चित्र दिसत आहे.

पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णवाढीत लक्षणीय वाढ झाली असून राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे याना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे याना यापूर्वी देखील कोरोनाची बाधा झाली होती

पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. कोरोना बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..असे आवाहन पंकजा यांनी केलं

राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात

दरम्यान, यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, अशा बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांचा आणि 20 आमदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

“घरच नाही तर…” मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी मनसेकडून निशाणा साधला जातो. नुकतीच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार? असा प्रश्न विचारला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वटमध्ये एक चित्र फोटो पोस्ट केला असून त्यावर “घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार?” असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नियमित कामाला देखील सुरुवात केली आहे. शस्त्रक्रियेनंतर शनिवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी देखील संवाद साधला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंत घरे असणाऱ्या सर्वांना मालमत्ता करांमधून सूट देण्याचा निर्णय़ जाहीर केला. यावरीन नशेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

आज एनसीबीच्या आणखी चुकीच्या गोष्टी समोर आणणार – नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एसीबीवर अनेक आरोप केले जात आहे. दरम्यान, आज पुन्हा एसीबीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार असल्याची माहिती मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. रविवारी, अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन एनसीबीमधील आणखी काही चुकीच्या गोष्टींना एक्सपोज करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी आज आपण एसीबीचे अनेक घोटाळे, चुका सर्वांसमोर आणणार आहोत. अनेक चुका आहेत की, त्या आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत. जेणे करून त्यातून सर्वांना समजेल, असे मलिक यांनी म्हंटले आहे.

 

यापूर्वीही मलिक यांनी एनसीबीच्याबाबत महत्वाचे विधान केले होते. एसीबीच्या फर्जिवाड्या विरोधात लढा सुरूच ठेवणार, असा मी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे. 18 कोटींची डील 50 लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे ? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे ? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्य़ांना शिक्षा होणारच आहे. शेवटपर्यंत माझा लढा सुरु राहील, असेही यापूर्वी मलिक यांनी म्हंटले आहे.

नारायण राणे बत्ताशावरील पैलवान : शिवसेनेचे शंभूराज देसाई यांची सणसणीत चपराक

Shamburaj Dasai R

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मतदार हाताच्या बोटावर मोजण्या इतका असतो. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर उन्माद करण्यापेक्षा जनतेच्या मताधिक्क्याच्या जोरावर बोला असे खडे बोल सुनावत ग्रामीण भागात लहान मुलांच्या कुस्त्या बत्ताशावर लावल्या जातात. ती कुस्ती जिकल्यानंतर लहान मुलांना जत्रेतील बत्ताशे खायला मिळतात म्हणून ते खुश होतात. ना. राणे यांनी जिल्हा बँकेची निवडणूकीत आघाडी घेतली म्हणजे बत्ताशावरील कुस्ती जिंकल्याचा त्यांना आनंद झाला आहे. अशा बत्ताशावर कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेच्या नावाने खडे फोडून हिंद केसरीची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा खोचक सल्ला गृहराज्य व वित्त मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

सातारा येथील शासकिय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या दोन वर्षे पुर्तीनिमित्त त्यांनी केलेल्या कामाचा आढावा देताना ना. देसाई बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान ना. देसाई यांनी त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या विभागांसाठी केलेल्या आर्थिक तरतूदीची माहिती दिली. तसेच गृहविभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील मसूर व मल्हारपेठ या दोन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसह पोलीस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लावल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ना. देसाई म्हणाले, जिल्हा बँकेचे मतदार हे अल्प असतात. त्या निवडणूका जिंकताना काय केले जाते हे सांगण्याची गरज नाही. तरीही ना. राणे शिवसेनेच्या नावाने खडे फोडत आहेत. त्यांनी जिंकलेली ही निवडणूक म्हणजे गावातील जत्रेत लहान मुलांची बत्ताशा खायला देण्याच्या बोलीवर कुस्ती लावली जाते, अशी आहे. त्यामुळे बत्ताशावरील कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेला डिवचण्याची गरज नाही. शिवसेना हिंद केसरी आहे, आणि बत्ताशावर कुस्ती खेळणार्‍या पैलवानाने हिंद केसरीची बरोबरी करू नये, असा खोचक सल्ला  ना. शंभूराज देसाई यांनी दिला.

ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी रूग्णालयातील डॉक्टर शनिवारी सहभागी झाले. तत्पूर्वी संपाबाबतचे निवेदन त्यांनी शुक्रवारी वैद्यकीय अधिष्ठातांना दिले होते.

अत्यावश्‍यक सेवा व कोविड सेवा वगळता निवासी डॉक्टरांनी सकाळी नऊ वाजता काम बंद आंदोलनाला सुरूवात केली. सकाळी अकरा वाजता हे डॉक्टर्स घाटीच्या बाह्यरूग्ण विभागासमोर आले व त्यांनी शासन, प्रशासनाकडून काऊन्सलिंग प्रक्रीयेला होत असलेल्या विलंबाबाबत निषेध व्यक्त केला. निवासी डॉक्टरांच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे प्रथम वर्षासाठी निवासी डॉक्टर्स (जेआर – वन) यांचे अजून प्रवेशप्रक्रिया झाली नाही. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे निश्‍चित सांगता येत नसल्याचे निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर म्हणाले. न्यायलयाचा निर्णय आला व काऊन्सलिंग प्रक्रिया सूरू झाली तरीही त्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील.

कोविडची तिसरी लाट बघता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांत डॉक्टरांची संख्या तोकडी पडू शकते. या सर्व कोविड रूग्णांचा भार निवासी डॉक्टरांवर पडेल. कमी डॉक्टरांमुळे नॉन कोविडशिवाय कोविडचाही भार सहन होणार नाही असे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्वरीत काऊन्सलिंग प्रक्रिया पार पाडून निवासी डॉक्टरांची पहिल्या वर्षातील प्रवेशप्रक्रिया त्वरीत व्हावी. नॅशनल व स्टेट काऊन्सलिंगमध्ये नाव नोंदणी, शुल्क आकारणी, कागदपत्रे पडताळणी यात पंधरा ते वीस दिवस जातात. ही प्रक्रिया राज्य पातळीवर करता येईल ती शासनाने तात्काळ करावी ही सुद्धा महत्वाची मागणी आहे.

….तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन; विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सध्या महाविकास आघाडी व भाजपमध्ये एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. ओबीसी आरक्षणाचा कुणी बळी घेतला असेल तर तो केंद्रातील भाजप सरकारने घेतला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी वेळ पडली तर मी मंत्रिपद सोडेन, असे महत्वाचे विधानही त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वडेट्टीवार म्हणाले की, काही जनांनी ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटले होते. त्यांना मी सांगू इच्छितो कि कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसतात. ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा आहे. वेळ पडली तर मी मंत्रिपद देखील सोडू शकतो. जर राज्य सरकारकडून ओबीसींवर अन्याय झाला तर मी काय करावे? हे मुख्यमंत्री यांना विचाराव लागेल, असेही यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणप्रश्नी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्य सरकारचा हा प्रस्ताव नाकारला आहे. निवडणुका निश्चित वेळेनुसारच होणार असल्याचे आयोगाने म्हंटले आहे. ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारी रोजी होणार आहेत.

घर रिकामे करण्याच्या वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

crime

औरंगाबाद – घर रिकामे करण्याच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना शहरातील रमानगरात उघडकीस आली आहे. या विवाहितेला घाटीत दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानपुरा भागातील रमानगरातील रमेश शिरसाठ या कंपनीतील कामगार आहे. गल्लीत बदनामी होत असल्याने त्याने शुक्रवारी सायंकाळी पत्नी सत्यवर्ति शिरसाट (38) हिला खोली रिकामी करण्याचे सांगितले. यावर दोघा पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. त्यातच रागाच्या भरात रमेशने पत्नी सत्यवर्तिला मारहाण करत चाकूने सपासप वार केले. पोटात आणि मांडीवर वार केल्याने सत्यमूर्ति रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे.

या भांडणात रमेश शिरसाट हा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर देखील घाटीत उपचार सुरू आहेत. सहाय्यक फौजदार उपेंद्र कुत्तूर हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मर्सिडीज बेन्झ घेतल्याने आतातरी फकीर म्हणवून घेऊ नये; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवर आणिक कर्णनै विरोधकांकडून टीका केली जाते. या दरम्यान आता मोदींवर एका नव्या कारणांनी टीका केली जाऊ लागली आहे. ती म्हणजे त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या मर्सिडीज बेन्झ गाडीवरून होय. याच कारणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली. गाडी खरेदी केल्याने त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.

खासदार राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर निशाणा साधत म्हंटले आहे की, मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी जगासमोर गंगास्नान केला. तरी देशातील लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही तर तो अजूनही कायम आहे.

स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी करू नये. पंडित नेहरू यांनी हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. जिवाला धोका असताना देखील इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले आहे.

तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले.

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी माहिती देत असताना राजेश टोपे यांनी संगीतल की, राज्यात दोन दिवसात आकडे डबल होत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रोनचा प्रसार वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

तसेच तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही, पण निर्बंध कडक करणार असेही टोपे म्हणाले.