Friday, January 2, 2026
Home Blog Page 3009

बर्थ डे पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत केले विकृत कृत्य; मग ‘हे’ विचित्र कारण देत मोडले लग्न

rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीच्या वाढदिवसादिवशी आरोपीने तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. यानंतर आपला साखरपुडा झाला आहे, लवकरच आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं पीडितेचे लैंगिक शोषण केले. शरीर संबंध ठेवल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने ठरलेले लग्न मोडले. पीडित तरुणी आपल्याला अनुरूप नसल्याचे म्हणत त्याने हे लग्न मोडले. यानंतर या प्रकरणी पीडित मुलीने उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीनं आपल्यावरी गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर म्हटलं की, आरोपीने उपस्थित केलेला अनुरूपतेचा मुद्दा खरा असता तर त्याने लग्नाला होकार दिला नसता. पीडिता शारीरिक संबंधास तयार नसताना त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं. लग्न ठरलेलेच होते. त्यामुळे युवतीनेही आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवला आणि शारीरिक संबंधास होकार दिला. मात्र, आरोपीनं शारीरिक संबंधांनंतर लग्न मोडलं. त्यामुळे गैरसमजातून दिलेला होकार हा संमती म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. आरोपीने केलेली फस‌णूक ही साधीसुधी नसून हा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी या गुन्ह्याचा सखोल तपास होणं आवश्यक असून हा गुन्हा रद्द करता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे.

आरोपी तरुण हा भंडारा येथील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जानेवारी 2020 मध्ये दोघंचं लग्न ठरलं होतं. दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोघंही लग्न करणार होते. पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने दोन्ही कुटुंबीयांनी हे लग्न पुढे ढकलले. यादरम्यान मे महिन्यात तरुणीला कोरोनाची लागण झाल्यामुळे हे लग्न पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले. यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडित तरुणीचा वाढदिवस होता. यावेळी आरोपीनं एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन केले होते. या पार्टीला आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं. पार्टी झाल्यानंतर आरोपी पीडितेच्या खोलीत गेला आणि त्याने पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी केली. तेव्हा पीडितेने त्याला नकार दिला. यानंतर आरोपीने काही दिवसांतच आपलं लग्न होणार असल्याचं खोटं आमिष दाखवले. शरीर संबंध ठेवल्यानंतर काही दिवसांनी आरोपीनं पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला.

मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम,पकडल्यावर आरोपीने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

बंगळुरू : वृत्तसंस्था – नुकतेच एक अजब प्रकरण समोर आले आहे. मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव देवदास देसाई असे आहे. येशूचा संदेश देण्यासाठी आपण हे करत असून त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचा आरोपी देवदास याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले आहे. जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी देसाई मंदिर परिसर आणि तिथे ठेवण्यात आलेल्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकून निघून जायचा.

प्रत्येक वेळी पोलिसांना देत होता चकवा
62 वर्षीय आरोपी देवदास देसाईने मंगळुरूच्या अनेक मंदिरांमध्ये हे कृत्य केले आहे. पोलीस बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत होते. पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी होत होता. मागच्या वर्षी 27 डिसेंबर रोजी कोरजना कट्टे गावातील एका मंदिराच्या दानपेटीत वापरलेला कंडोम मिळाल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर आणि परिसरात बसवलेले कॅमेरे तपासले. तेव्हा पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसला. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत देवदास देसाईने अशाप्रकारे अनेक मंदिरे अस्वच्छ केल्याचं मान्य केलं. एकूण 18 मंदिरांमध्ये त्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितलं. मात्र यापैकी केवळ पाच मंदिरांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

पत्नी आणि मुलांना सोडून दिलं
आरोपी देवदास देसाईने त्याच्या पत्नी आणि मुलांना फार पूर्वीच सोडून दिलं आहे. तो ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, पण म्हातारपणामुळे त्याने ड्रायव्हिंग सोडून प्लास्टिक पिकरचं काम करायला सुरुवात केली. आरोपीने सांगितले की, वडिलांच्या काळापासून हे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करत आहे अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांनी दिली आहे.

या कारणामुळे दानपेटीत टाकायचा कंडोम
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो मंदिरांमध्ये वापरलेले कंडोम फेकत असे जेणेकरून त्यांची विटंबना करून तो लोकांना त्याच्या धर्माकडे वळवू शकेल. केवळ मंदिरातच नाही तर काही गुरुद्वारा आणि मशिदींमध्येही आरोपींनी हे कृत्य केले आहे. तसेच त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. तो फक्त येशूचा संदेश पसरवत होता. कारण बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असे म्हटले आहे. मी कंडोम फेकत असे कारण अशुद्ध वस्तू फक्त अशुद्ध ठिकाणीच टाकल्या पाहिजेत असे आरोपीचे म्हणणे आहे.

चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामधील कोंढवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चप्पल चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या करत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. कोंढव्यातील मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णांनाग्र या ठिकाणी हि घटना घडली आहे. या प्रकरणी घर मालकिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
पायल बाबू चव्हाण असे आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय तरुणीचे नाव आहे. मृत पायल मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी पल्लवी अग्रवाल हिने पायलवर पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतला होता. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी पायलला अत्यंत अपमानकारक वागणूक देत तिला त्राससुद्धा दिला.

आपल्यावर घरमालकिणीने चोरीचा आळ घेतल्याने पायल नैराश्यात गेली. पायलला चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने , पायलने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याबाबत पायलच्या आईने कोंढवा पोलीस स्थानकात घर मालकीण पल्लवी अग्रवाल हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पल्लवी रितेश अग्रवाल हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घरच्यांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही, म्हणून एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचे होते. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. यामुळे हे दोघे अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

काय आहे नेमके प्रकरण ?
उत्तर प्रदेशातील औरेया भाागात राहणाऱ्या एका तरुणाचं त्याच भागातील तरुणीवर प्रेम होते. दोघंही एकमेकांना आवडत होते आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. तसेच आपलं एकमेकांसोबत लग्न झालं नाही, तर इतर कुणाशीही लग्न करायचं नाही, असेदेखील त्यांनी ठरवले होते. लवकरच आपण घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडू आणि सर्वसहमतीने लग्न करू, असे स्वप्न त्यांनी बघितले होते. यानंतर या दोघांनी जेव्हा घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा घरच्यांनी लग्नाला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. हे लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ शकणार नाही, असं दोघांच्याही घरच्यांनी ठामपणे सांगितलं आणि एकमेकांना यापुढे भेटण्यास मनाई केली. त्यानंतर हे दोघे चोरून एकमेकांना भेटत राहिले आणि एकमेकांशी लग्न करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत राहिले. काही वेळा घरातून पळून जाऊन लग्न करण्याचाही त्यांनी विचार केला. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चरितार्थ कसा चालणार, हा प्रश्न त्यांना पडला होता.

आत्महत्येचा निर्णय
या नंतर त्यांनी आपलं एकमेकांशी लग्न होण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने एकत्र मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या दोघानींही एकाच वेळी रेल्वेखाली जीव द्यायचा निर्णय़ घेतला. हा निर्णय पक्का झाल्यावर दोघंही रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडले. एकमेकांना ठरलेल्या जागी भेटले आणि रेल्वे स्टेशनकडे गेले. त्यांनी ती रात्र एकत्र घालवली आणि पहाटेच्या वेळी रेल्वेखाली जीव देऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नववर्षाला गालबोट ! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 17 वर्षीय युवकाची हत्या

crime

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. मृत 17 वर्षीय तरुणाचे नाव नाविद असे आहे. तो शहरातील भोईगल्ली परिसरातील रहिवासी होता. आज सकाळी परभणी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात नाविदचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी नाविदचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता मृत नाविदच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत नाविद याची नेमक्या कोणत्या कारणातून हत्या झाली? हे अजून समजू शकलेले नाही. चारही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

‘त्या’ महिला सरपंचाच्या हत्येचे गुढ उलघडले, ‘ऑस्कर’च्या मदतीने आरोपीला पकडले

crime

रायगड : हॅलो महाराष्ट्र – तीन दिवसांपूर्वी महिला सरपंचाची हत्या करून तिचा मृतदेह विवस्त्र जंगलात टाकण्यात आला होता. हि महिला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाच्या ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानाची मोठी मदत झाली. मृत महिलेवर हल्ला करण्यासाठी आरोपीने जी फळी वापरली होती, तीचा वास या श्वानाला दिल्यानंतर या श्वानाने आरोपीचा माग काढत त्याला पकडून दिले.

अशा प्रकारे काढला माग
जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये पडल्यची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात तपास सुरू असताना आरोपीचा माग काढण्यासाठी श्वान पथकाच्या ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानाची मदत घेण्यात आली. ज्या ठिकाणी या महिलेवर लाकडी फळीने हल्ला करण्यात आला होता, त्या लाकडी फळीचा वास या श्वानाला देण्यात आला. यानंतर हा श्वान माग काढत जवळच असलेल्या गोठ्यात शिरला, त्यामुळे आम्हाला आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली अशी माहिती रायगड बॉम्ब शोधक पथकाचे कॉन्स्टेबल दर्शन सावंत यांनी दिली आहे.

तसेच कॉन्स्टेबल दर्शन सावंत पुढे म्हणाले कि,ऑस्कर तीन वर्षांचा झाला आहे. तो सात महिन्यांचा असताना त्याला बॉम्ब शोधक पथकात दाखल करून घेण्यात आले होते.त्यानंतर त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी ट्रॅकर डॉग म्हणून नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले गेले. या ऑस्करने यापूर्वी वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका खुनाच्या तपासात पोलिसांना मदत केली होती. या प्रकरणातील आरोपीला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

Nawab Malik modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार असेल असे नवाब मलिक यांनी म्हंटल .

नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण भाजपवालेच त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारोंच्या संख्येने लोक जमवत आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान , आगामी निवडणूका रद्द करू नका असे म्हणत डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अशी पद्धत वापरून तुम्ही निवडूक घेऊ शकता असे नवाब मलिक यांनी म्हंटल. तसेच कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लावून राज्याचे अधिकार हातात घेण्याचा डाव करू नका असेही मलिक यांनी म्हंटल

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी धूळ चारली – आंबेडकर

Prakash Ambedekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर शाहिदाना आदरांजली वाहण्यासाठी भीमा कोरेगाव येथे आले होते. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याठिकाणी आज भेट दिली. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. ही लढाई सत्तेसाठी नव्हती तर अस्मितेसाठी,अस्पृश्यता घालवण्यासाठी होती. वर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या क्रांतिकारी सदिच्छा. आज सकाळी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावर जाऊन शूर वीरांना मानवंदना दिली. अशी फेसबुक पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

https://www.facebook.com/225953357432863/posts/5225753584119457/

काय आहे भीमा- कोरेगाव इतिहास

पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल कोरेगावचे गाव . या गावात 1जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली. या लढाईची इतिहासात पेशवे विरुद्ध इंग्रज अशी असली तरी या युद्धात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैन्यबळाचा वापर केला. या लढाईत पेशव्यांच्या सैन्यांची संख्या इग्रजांच्या सैन्यांच्या काहीपट जास्त होती तरीही अवघ्या 16 तासांमध्ये इंग्रजांनी पेशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत त्यांचा पराभव केला. या युद्धात इंग्रजाचा विजय झाला म्हणजेच प्रामुख्याने महार रेजिमेंट जिंकली.

महार रेजिमेंटने लढलेल्या समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली.

राजेंद्र तांबेंना निरोप देण्यासाठी तहसिलदार विजय पवार बनले स्वतः ड्रायव्हर

कराड | शासकीय सेवेत असताना सामान्यांचा न्याय देण्यासाठी व सेवा करण्यासाठी अधिकाऱ्यांने तत्पर असणे गरजेचे असते. कराड येथील नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांनी आपल्या कामातून सेवेचे ब्रीद जोपासले. समाजात केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर त्याच्यातील एक घटक समजून काम केल्याचे उदगार प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी काढले.

कराड तालुक्यातील पाल गावचे असलेले राजेंद्र तांबे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास तहसिलदार विजय पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, विजय माने, आनंदराव देवकर, कार्यक्रम नियोजन युवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, राजेश सपकाळ, महादेव अष्टेकर यांच्यासह सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

राजेंद्र तांबे हे 1990 साली पाटण येथील तहसील कार्यालयात लिपीक म्हणून हजर झाले होते. त्यानंतर 1998 ते 2001 अव्वल कारकून- पाटण कार्यालय, 2001 ते 2007 करमणूक कर निरीक्षक उपविभाग कराड, 2008 ते 2012 अव्वल कारकून पाटण तहसील कार्यालय, 2012 ते 2013 भूसंपादन समन्वयक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, 2013 ते 2018 नायब तहसिलदार, प्रांत आॅफिस पाटण, 2019 ते 31 डिसेंबर 2021 नायब तहसिलदार, प्रांत आॅफिस कराड येथे काम केले.

कराड येथे प्रशासकीय इमारतीत राजेंद्र तांबे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तहसिलदार विजय पवार यांनी स्वतः ड्रायव्हिंग करत शासकीय वाहनाने घरी सोडले. तहसिलदारांच्या या कृतीमुळे नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांचे कुटुंबियांना गहिवरून आले.

सात वर्षात मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

Modi Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना विरोधकांवर निशाणा साधला होता. माझा इतिहास बघा, गेल्या 7 वर्षात जुन्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असून त्यातच माझा सगळा वेळ जात आहे असे म्हंटल होत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून मोदींवर निशाणा साधला. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

या काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. असा आरोप राष्ट्रवादीने केला.

भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. अस म्हणत राष्ट्रवादीने मोदींवर टीकास्त्र सोडलं.