Friday, January 2, 2026
Home Blog Page 3007

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार”; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता लक्षात घेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम प्रमुख तथा हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” अशी टीका करीत ओवेसी यांनी हल्लाबोल केला आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एक जानेवारी रोजी एक जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली ओवेसी यांनी टीका केलेला व्हिडिओही ट्विट केला आहे. पायामधे त्यांनी म्हंटले आहे की, मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार हे आहेत. आता अमित शाहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही. समाजवादी पार्टी आझमचे नाव नाही घेणार. मात्र, आम्ही अमित शाह आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी ‘राज’ आहे. त्याचा अर्थ जातीवाद असा होतो. अमित शाह तुमचं कर्ज फिटलं.”

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे आयोजित जाहीर सभेत हरिद्वारच्या धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण वक्तव्यांचा मुद्दाही ओवेसी यांनी उपस्थित केला यावेळी ते म्हणाले की, धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचे सांगितले. देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवत नाही? असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.

राज्यात ऑक्सिजन निर्मितीबाबत अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असून ज्या उद्योगाची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत त्यांनी ती वाढवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यावर्षी पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. कोरोनाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आयोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहे.

आम्ही महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील 20 टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. मात्र, अशा परिस्थितीत सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे जास्त गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस सर्वांनी घ्यावा असा आपला आग्रह होता. पहिल्या डोसबाबत नागरिक जागरुक होते. मात्र, आता दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना गांभीर्य येत नाहीत. ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करुन लसीकरण करावेत, अशा सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे; नक्की ‘असं’ काय घडलं?

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड नजीक रविवारी पहाटे पावने सात वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली. कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टरचा पुढील भाग अचानक महामार्गावर पडला. नेमके याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून जात असलेली आयशर गाडी धडकली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास कराड तालुक्यातील खोडशी गावातून ट्रॅक्टर (क्रमांक MAN 8157) व ट्राॅली (क्रमांक MH 50 C 7128) यामधून चालक गुळ भरुन कराडला घेऊन जात होता. गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टर आला असता अचानक ट्रॅक्टरचा पुढील भाग महामार्गावर तुटून पडला. नेमके याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीचा मागून आयशर गाडी (क्रमांक MH 11 AL 5626) हि जात होती. तीही अचानकपणे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचाल किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी याची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. नागरिकांच्या माहितीनंतर तत्काळ त्या ठिकाणी महामार्ग पोलिसांनी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने ट्रॅकटरचे मोडून पडलेले दोन भाग महामार्गावरून बाजूला केले. याप्रकरणी महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सलीम देसाई, अमीत पवार व कराड शहर पोलिस स्टेशनचे प्रशांत जाधव, खालीद इनामदार, पांडुरंग चव्हाण, दत्ता पाटील खोडशी यांनी मदत केली.

अंकिता पाटील यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मागील आठवड्यात अंकिता पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी विवाह झाला आहे.

अंकिता पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.,”असे ट्वीट अंकिता पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनीही याबाबतची माहिती ट्विट करीत दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे. आपल्या सर्वांच्या व सहकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी मी रूग्णालयात दाखल झालो आहे.

इच्छा असताना देखील ही निर्बंधांमुळे व आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या सर्वांना भेटता येत नाही व आपले प्रश्न सोडवता येत नाहीत. परंतु प्रत्यक्ष मी जरी आपल्या सर्वांना भेटू शकत नसलो तरीही आपण मला दूरध्वनीद्वारे किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निसंकोचपणे सांगू शकता” असे ट्वीट हर्षवर्धन पाटील यांनी 31 डिसेंबर रोजी केले होते.

“भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडून वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीमधील आणखी काही चुकीच्या गोष्टींना एक्सपोज आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करीत म्हंटले होते. दरम्यान आज त्यांनी गंभीर आरोप केले. “एनसीबीच्या फर्जीवाडा, आर्यन खान प्रकरणातील आरोपी, बोगस कागदावरील सही प्रकरण या संदर्भात मी अनेक खुलासे केले. मात्र, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्यावतीने खोट्या स्वरूपात कारवाया करण्यात आलेल्या असून या प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीच्यावतीने केलेल्या अनेक चुकांची पोलखोल केला. मागील एक वर्षांपासून एसीबीच्या माध्यमातून मुंबईत फर्जीवाडा करून लाखो रुपयाची वसुली करण्यात आली. या फर्जीवाड्यात एसीबीचे अनेक मोठं मोठे अधिकारी सहभागी आहेत. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीने आतापर्यंत काय कारवाई केली? असा सवाल मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करताना मलिक म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अजूनही त्यांना एक्स्टेन्शन दिले किंवा नवी जबाबदारी दिली आहे. याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.

वानखेडे अनेक माहिती प्रसिद्ध करत आहेत की मला एक्सटेन्शन नको आहे. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. ३१ तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केले गेले नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केले गेले? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे. अजून निर्णय झालेला नाही”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

‘न्यू इअर सेलिब्रेशन’ भोवले; हॉटेल मालकासह 29 जणांवर गुन्हा

new year

औरंगाबाद – जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असल्याने नव्या वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र, जमावबंदी आणि करून नियमांचे उल्लंघन करत पुंडलिक नगर भागात एका हॉटेलमध्ये रात्री पावणे तीन वाजेच्या दरम्यान आरडाओरड करून न्यू इयर पार्टी साजरी करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह 29 जणांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या विषयी अधिक वृत्त असे की, 31 डिसेंबर रोजी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने, पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यासह अन्य कर्मचारी हे पुंडलिक नगर भागात पोलिस बंदोबस्त करण्यासाठी तैनात होते. पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वरून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल कार्निवल येथे रात्री उशिरापर्यंत अनेक जण एकत्रित येऊन न्यूयर पार्टी साजरी करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह हॉटेल कार्निवल येथे पोहोचले. तिथे नव्या वर्षाची पार्टी जल्लोषात सुरू असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, अंमलदार निलेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात हॉटेल चालकासह 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीत रांजणे व आ. शिंदे यांच्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे गाैप्यस्फोट

पाचगणी | सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांच्यासोबत राहण्यासाठी माझ्यावर प्रचंड व मोठमोठ्या नेत्यांचा दबाव होता. तरीही मी ज्ञानदेव रांजणे यांच्यासोबत राहीलो. कारण ज्यांनी मला गेल्या 10- 15 वर्षात नेहमी साथ दिली, त्यांना सोडायचे आणि ज्यांनी मला आडचणीत आणले त्यांना साथ द्यायची हे कोणत्या तत्वातं बसते, असा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले केला. तसेच आ. शशिकांत शिंदेच्या विरोधात काम केल्याचा स्वतः पहिल्यांदाच उघडपणे गाैप्यस्फोट केला.

सातारा जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत जावली सोसायटी मतदार संघाची निवडणुक हाय होल्टेज झाली. या निवडणूकीत आ. शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी एक मताने पराभव करुन जावलीत इतिहास रचला. मात्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले याच्यावर सुद्धा या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांना मदत करा, असा प्रचंड दबाव राज्यातील मोठमोठ्या नेत्यांचा असताना देखील आ. शिवेंद्रराजे भोसले ज्ञानदेव राजणे याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमीका का घेतली यांचा गौप्सस्पोट केला. आबेघर (ता. जावळी) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकरी मेळाव्याला बोलताना आ शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जावलीतील 25 मतदारांचा आशिर्वाद वसंतराव मानकुमरे यांची साथ म्हणून आज ज्ञानदेव राजणे याच्यावर गुलाल पडला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी घरातील मुलगा ज्ञानदेव रांजणे जिल्हा बॅकेत जाऊन पोहचले ही महत्वपुर्ण बाब आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? भाजपचा तिखट सवाल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले. मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत की मुंबईचे असा सवाल करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली

मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला. मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही? इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस रहात नाहीत का? मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात? असे एकामागून एक सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी काय केली घोषणा

मुंबईतील ५०० स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुंबईतील तब्बल १६ लाख कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे.

घरफोड्या करून चोरट्यांनी केले नववर्षाचे स्वागत; वाळूज परिसरात सात घरफोड्या

Gharfodi
Gharfodi

औरंगाबाद – वाळूज परिसरात वडगाव (को) येथील गट क्रमांक पाच व गट क्रमांक आठमधील एकूण बंद असलेल्या सात घरांचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने, चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्वजण नववर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव (को.) गट क्रमांक 8 मधील प्लॉट क्रमांक 29 मधील समाधान यमाजी शिरसाट (31) हे त्यांच्या वरच्या खोलीत झोपायला गेले होते. त्यामुळे बंद असलेले त्याचे घर फोडून दोन हजार रुपये रोख, एक ग्रॅमची अंगठी, चांदीचे पाच शिक्के, पाच भारचा कंबर पट्टा व दोन ग्रॅमची नथ तसेच त्यांच्या शेजारी राहणारे रावसाहेब यमाजी शिरसाठ (37) हे नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेले असता त्यांचेही खालच्या मजल्यावरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतील ऐवज लंपास केला. यात दोन हजार रुपये कॅश, गहूमणी पोत, तीन ग्रॅम देवाची चांदीची मूर्ती. तसेच याच गट नंबर आठ मधील प्लॉट क्रमांक 40 मधील विकास सपकाळ हे गावी गेले होते. त्यांच्याही घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.

कालिदास दीपाली गायकवाड (39) यांचेही गट नंबर 5 मधील प्लॉट क्रमांक 41, 42, 43 मधील घर फोडून रजिस्ट्रीसाठी ठेवलेले 50 हजार रुपये लंपास केले. ते शेतकामासाठी 27 डिसेंबर रोजी दरेगाव पाडळी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथे गेले होते. सिद्धार्थ दळवी (40) हे सुद्धा गट नंबर 5 मधील 45 नंबरच्या घरांमध्ये राहतात. ते लग्नाला सोलापूर येथे गेले होते. त्यांच्याही घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. गट नंबर पाच प्लॉट क्रमांक 39 येथील किरण पांडुरंग (36) हे हस्ता (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हे येथे गावी गेले होते. 25 डिसेंबर रोजी एकनाथ साळवे यांनी त्यांना फोन करून घर फुटल्याचे कळविले. त्यांच्या घरातील पाच ग्रॅम कानातील झुंबर असा ऐवज लंपास करण्यात आला. या शिवाय प्रमोद जाधव (34) गट नंबर 5 रो हाऊस क्रमांक 3 यांना कंपनीत सुट्ट्या असल्याने ते डिलिव्हरीसाठी गेलेल्या पत्नीला बुल़डाणा येथे भेटण्यासाठी 29 डिसेंबर रोजी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या सर्व घराचे कडी कोंडी तोडून आतील मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, पोलीस अंमलदार संघराज दाभाडे, प्रकाश गायकवाड, एस.एन.भोटकर, रोहित चिंधले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती; दुर्घटनेचे ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर चौदा जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे कारण समितीच्या चौकशीतून सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर चौदा जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकोशी पूर्ण केली आहे. दरम्यान, वायुसेनेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीने खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे म्हंटले आहे.

लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेमागे काहीतरी वेगळे कारण तर नाहीना अशी शंका उपस्थित केली जात होते.