Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3907

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी अजूनपर्यंत कोणत्याही ओपनरची निवड करण्यात आलेली नाही.

टीम इंडियाकडे ओपनर म्हणून आता फक्त मयंक अग्रवालचाच पर्याय उपलब्ध आहे. तसेच स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन आहे. केएल राहुलसुद्धा टेस्ट ओपनर आहे, पण टीम मॅनजमेंटने त्याला ओपनिंगची जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो आता मधल्या फळीत खेळणार आहे.

टीम इंडियाच्या मॅनजमेंटने शुभमन गिलऐवजी कोणत्याच खास खेळाडूची मागणी केली नव्हती.म्हणजेच टीमने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची कधीही मागणी केली नसल्याचे समोर आले आहे. गिलला पर्याय शोधण्याची जबाबदारी निवड समितीवरच सोडण्यात आली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारची अपयशाची कबुली; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यानाही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही समावेश आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयशाची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे, असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्थार कार्यक्रम पार पडला. यावेळी ४३ भाजप नेत्यांनी शपथ घेतली. मोदींच्या शपथविधीवरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शपथविधी पार पडत असताना महत्वाचे ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे कि, “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्धवस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे.” असे सावंत यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीत भाजप नेते नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. बारा वर्षे काँग्रेसला समजलं नाही ती भाजपला दीड वर्षात समजले. जे काँग्रेसने करून दाखवलं नाही ते भाजपने ते करून दाखवलं,” असा टोला निलेश राणेंनी काँग्रेसला लगावला. राणेंच्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार व डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एकाच खून; 4 जणांवर गुन्हा दाखल

murder
murder

कासारशिरसी : हॅलो महाराष्ट्र – निलंगा तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी जमिनीच्या वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुभाष धोंडिबा बिराजदार असे आहे. बुधवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास डोंगरगाव येथील आरोपी सचिन बिराजदार, सदाशिव बिराजदार, वामन बिराजदार, स्वप्निल बिराजदार या चौघांनी संगनमत करून जमिनीच्या वादातून काट्या- लोखंडी सळई, दगडाने सुभाष धोंडिबा बिराजदार यांना मारले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा रुक्मांगध बिराजदार यांच्या फिर्यादीवरून कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, एपीआय रेवनाथ ढमाले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण अजून फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे करत आहेत.

धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

Rape

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच अल्पवयीन आरोपी बांगलादेशामध्ये पळाला आहे. त्याठिकाणी या आरोपीचा आजोबा राहतात.

नदिया कार्यक्षेत्रात येणाऱ्या धनताला पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी आपल्या परिवारासह बांगलादेशात पळाला आहे. त्यामुळे पोलीस त्याला परत आणण्याची तयारी करत आहेत. या आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची छेड काढली होती. तिच्याशी शारीरिक गैरवर्तन करत आरोपीने काही फोटो काढले होते. यानंतर हे फोटो वायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता.

आपल्यासोबत घडणाऱ्या अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली तर बदनामी होईल या भीतीने सातवीत शिकणारी पीडिता आरोपीचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. 13 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने धनताला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी दुसऱ्या देशात फरार झाल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यानंतर आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

काँग्रेसला बारा वर्षात जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं : निलेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी माध्यम प्रतिनिधीना पहिली प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. राणे यांचा प्रशासनावर असलेली पकड ही महत्वाची आहे. बारा वर्षे काँग्रेसला समजलं नाही ती भाजपला दीड वर्षात समजले. जे काँग्रेसने करून दाखवलं नाही ते भाजपने ते करून दाखवलं,” असा टोला निलेश राणेंनी काँग्रेसला लगावला.

दिल्लीत बुधवारी पार पडलेल्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नारायण राणे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. यावेळी राणेंनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यानंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. तर राणेंच्या समर्थकांनी रत्नागिरी, कोकणात जल्लोष साजरा केला.

यावेळी निलेश व नितेश राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी निलेश म्हणाले कि, मंत्रिपद हा मोठी जबाबदारी आहे. नारायण राणे यांनी नगरसेवक पदापासून ते केंद्रीय मंत्रिपद इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा महत्वाचा आहे. हे येड्या गबाळ्याचे काम नाही. नारायण राणे व राणे कुटुंबियांना संपवण्याची कुणाच्यात ताकद नाही. ते अश्यक्य आहे. अनेक जन्म संपवण्यासाठी विरोधकांना घ्यावे लागतील, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली.

डाळींच्या साठवण मर्यादेमुळे व्यापारी नाराज, 200 ऐवजी दोन हजार टन करण्याची मागणी

pulses

नवी दिल्ली । ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे देशभरातील खाद्यान्न व्यापारी संतप्त झाले आहेत आणि त्याचा निषेध करीत आहेत. देशभरातील धान्य घाऊक विक्रेत्यांसाठी डाळींची साठवण मर्यादा 200 टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन निश्चित करण्यात आली आहे, जी योग्य नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

निषेध व्यक्त करणारे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणतात की,” ही अधिसूचना सरकारच्या स्वत: च्या धोरणाचे उल्लंघन आहे. यासंदर्भात कॅटच्या वतीने केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून ते मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.” कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की,” ही अधिसूचना जारी करताना संबंधित धोरणाने कोणताही धोरणात्मक मुद्दा उपस्थित केला नाही. असे करताना संबंधितांना विश्वासात घेण्यासंदर्भात सल्लामसलतही केली नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्याचे थेट उल्लंघन आहे.”

कॅटच्या वतीने सांगण्यात आले की,” देशभरातील सुमारे 5 लाख व्यापारी अन्नधान्याचा व्यवसाय करतात आणि 23 लाखांहून अधिक लोकं प्रामुख्याने अशिक्षित वर्गातील लोकं वस्तू लोड करणे आणि उतरवणे हे काम करतात. अन्नधान्य व्यापारामधून सुमारे 5 लाख लोकं अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवतात. देशातील विविध डाळींचे वार्षिक उत्पादन सुमारे 256 लाख टन असून सुमारे 20 लाख टन डाळींची आयात केली जाते. देशातील डाळींची उलाढाल सुमारे 140 लाख कोटी रुपये आहे.

2017 मध्ये एका अधिसूचनेद्वारे सरकारने बंधनकारक केले होते की, डाळी, मसूर, हरभरा, तूर, उडीद, मूग आणि काबुली हरभरा अशा 6 प्रकारच्या साठ्याची मर्यादा व्यापाऱ्यांनी पाळलेल्या सरकारच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. …. त्यावेळी सरकारने स्पष्टपणे जाहीर केले होते की, जर डाळींच्या किंमती MSP पेक्षा 50% जास्त असतील किंवा देशात आपत्कालीन परिस्थिती असेल तरच आवश्यक वस्तू कायदा किंवा स्टॉक मर्यादा लागू होईल.

सरकारच्या या घोषणेकडे दुर्लक्ष करीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घाऊक व्यापा-यांना डाळींचा साठा 200 टन पर्यंत मर्यादित ठेवून 2 जुलै 2021 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 100 प्रकारच्या टन डाळींचा साठा केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, इतर डाळींचा साठा उर्वरित 100 टनमध्ये करावा लागेल. हा अन्याय पूर्ण आहे.

आठ प्रकारच्या डाळी असतात, 30 प्रकारे बनल्या जातात
कॅटने म्हटलं आहे की,” मुळात आठ प्रकारच्या डाळी असतात आणि हे 8 प्रकार डाळींचे मिश्रण किंवा साफसफाई नंतर 30 प्रकारच्या जागी डाळींमध्ये रुपांतरित केले जातात. घाऊक विक्रेते केवळ 100 टन्समध्ये 30 पेक्षा जास्त प्रकारच्या डाळी कशा साठवतात हे अकल्पनीय आहे.”

45 दिवसांचा क्लीयरन्स स्टॉक देखील एक समस्या आहे
कॅटच्या वतीने असेही म्हटले होते की,” सरकारने या अधिसूचनेत म्हटले आहे की, मिलर्सना 15 मे नंतर मिळालेल्या वस्तूंच्या सीमाशुल्क मंजुरीच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत आपला स्टॉक काढून टाकला जाईल. अन्यथा घाऊक विक्रेत्यांसाठी ठरविलेल्या स्टॉक मर्यादेचे त्यांना पालन करावे लागेल. 15 मे 2021 पूर्वी मिलर्सवर अशी मर्यादा नव्हती. देशभरात 50 हजाराहून अधिक मिलर्स आहेत. कोण डाळींच्या प्रक्रिया आणि शुद्धीकरण कामात व्यस्त आहेत. सामान्यत: मिलर्स 3 हजार ते 5 हजार टन कच्च्या डाळीचा साठा राखतो.”

व्यावसायिकांची ही मागणी आहे
1955 मध्ये देशाची लोकसंख्या केवळ 25 कोटी इतकी होती तेव्हा 200 टनांची साठा मर्यादा निश्चित केली गेली होती. त्यामुळे स्टॉक मर्यादा निश्चित करणारी अधिसूचना तातडीने प्रभावीपणे मागे घ्यावी अशी मागणी कॅटने केली आहे. सध्याच्या लोकसंख्येसाठी ही मर्यादा बर्‍यापैकी तर्कहीन आणि अवास्तव आहे. जर सरकारला असे वाटले की, स्टॉक मर्यादा लादणे आवश्यक आहे, तर देशातील सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 2000 टन साठा मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांसाठी कोणत्याही नाडीसाठी कोणतीही स्टॉक मर्यादा निर्दिष्ट केल्याशिवाय निश्चित केली जाऊ शकते.

तसेच मोठ्या प्रमाणात डाळींची आयात केली जाते, म्हणून आयातदार किंवा मिलर्स यांना स्टॉक मर्यादा निश्चित करता येऊ नये. पोर्टलवर स्टॉक मर्यादा अपडेट करणे केवळ 6 प्रकारच्या डाळींच्या मर्यादीत आहे जे MSP श्रेणीत आहेत तर 2 जुलै रोजी अस्तित्त्वात असलेल्या अधिसूचनेच्या कलम 2 (i) अंतर्गत “मूग वगळता सर्व डाळी” अपडेट करण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेचा कलम 2 (i) मागे घ्यावा आणि स्टॉक अपडेट करण्यापूर्वीची स्थिती कायम ठेवावी, अशी विनंती कॅटने केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; उदयनराजेंना डावलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ नेत्यांचा समावेश केला जाणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंना मात्र मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. अशात मराठा समाजातील नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप राज्य सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कोकणात नारायण राणे यांच्या मदतीने भाजप शिवसेनेला शह देण्याकरता राणेंना रसद पुरवत आहे.

कपिल पाटील यांना मंत्रिपद देऊन भाजपनं डबल गेम केला आहे. पाटील हे ओबीसी समाजातील असून सध्या राज्यात गाजत असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपनं पाटील यांना मंत्रिपद दिले आहे. तसेच भारती पवार या दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या जवळपास दोन लाखांच्या मताधिक्क्यानं निवडून आल्या. तर डॉ. भागवत कराड राज्यसभेचे सदस्य आहेत. संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्षासाठी उत्तम काम केलं आहे.

‘ही’ आहे ४३ मंत्र्यांच्या नावाची यादी

१. नारायण राणे

२. सर्बांनंद सोनोवोल

३. विरेंद्र कुमार

४. ज्योतिरादित्य शिंदे

५. रामचंद्र प्रसाद सिंग

६. अश्विनी वैष्णव

७. पशुपति कुमार पारस

८. किरण रिजाजू

९. राजकुमार सिंह

१०. हरदीप सिंग पुरी

११. मनसुख मंदाविया

१२. भूपेंद्र यादव

१३. पुरुषोत्तम रुपेला

१४. जी. किसन रेड्डी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१६. पंकज चौधरी

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१८. सत्यपाल सिंग बघेल

१९. राजीव चंद्रशेखर

२०. शोभा करांडलाजे

२१. भानूप्रताप सिंह वर्मा

२२. दर्शना विक्रम जरदोश

२३. मीनाक्षी लेखी

२४. अन्नपूर्णा देवी

२५. ए. नारायणस्वामी

२६. कौशल किशोर

२७. अजय भट्ट

२८. बी. एल. वर्मा

२९. अजय कुमार

३०. चौहान देवुसिंह

३१. भगवंत खुबा

३२. कपिल पाटील

३३. प्रतिमा भौमिक

३४. डॉ. सुभाष सरकार

३५. डॉ. भागवत कराड

३६. डॉ. राजकुमार सिंह

३७. डॉ. भारती पवार

३८. बिश्वेश्वर तुडू

३९. शंतनू ठाकूर

४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई

४१. जॉन बारला

४२. डॉ. एल. मुरुगन

४३. निसिथ प्रामाणिक

 

धक्कादायक ! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याच्या बहाण्याने सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आईला बाहेर नेल्यानंतर आरोपीने घरी येऊन हे कृत्य केले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि पीडित मुलगी वाशी सेक्टर 9 या ठिकाणी राहते. सदर मुलगी दुसरीत शिकत असून तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नव्हता.यामुळे तिच्या आईने शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाकडे मदत मागितली. यानंतर शेजारील दांपत्याने त्या महिलेला मोबाईलच्या दुकानात नेले. त्याठिकाणी लोनवर मोबाईल मिळवून देतो असे त्याने महिलेला सांगितले.

यादरम्यान महिलेची मुलगी घरी एकटीच असताना चेक घेण्याच्या बहाण्याने आरोपी परत घरी आला. यादरम्यान त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर काही वेळाने सर्वजण घरी आले. यानंतर मुलीने आपल्याबाबत घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या आईला दिली. परंतु या कुटुंबाने घाबरून पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. मात्र यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने त्यांनी वाशी पोलीसांकडे तक्रार केली. यानंतर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

दहा दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा शासकीय निवासस्थानाचे नळ तोडण्यार असल्याचा मनसेचा इशारा

औरंगाबाद : महानगरपलिकेतर्फे शहरात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करण्यात यावा यासंदर्भात, महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या दहा दिवसात मनपाने निर्णय घेऊन आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करावा तसेच सध्या वसूल करत असलेली पाणी पट्टी कमी करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा मनपा प्रशासक यांच्या शासकीय निवासस्थानाचे नळाचे कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेतर्फे शहरवासियांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. शहरामध्ये आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थती असताना जायकवाडी धरणात पाणी पुरवठ्यासाठी जलसाठा अल्प प्रमाणात असल्यामुळे त्यावेळी मनपा प्रशासनाने चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. कालांतराने पाच दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून मनपा प्रशानतर्फे आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राज्यात किंबहुना देशात सर्वाधिक पाणीपट्टी भरूनही औरंगाबाद तहानेलेलेच !

सिटी वॉटर युटीलीटी कंपनी व महानगरपालिका यांच्यात झालेल्या २०११ च्या करारानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचे ठरले होते. सिटी वॉटर युटीलीटी कंपनीने १ एप्रिल २०१२ पासून काम सुरु करावे अशी नोटीस मनपातर्फे दिली परंतु कंपनीने प्रत्यक्ष काम १ सप्टेंबर २०१४ पासून हाती घेतले याचा अर्थ २०११ ते २०१४ या तीन वर्षात सिटी वॉटर युटीलिटी कंपनी या दोघांनी पाणीपुवठ्यासाठी कोणतेही नवे काम सुरुकेले नव्हते. असे असून देखील २०११ साली १८०० रु. असलेली वार्षिक पाणीपट्टी मनपाने पुढील तीन वर्षात अनुक्रमे रु.२५००, रु.२७५०, रु.३०५० एवढी वाढवली पुढे २०१५ साली या पाणीपट्टीत आणखीन वाढ करून रु. ३३५५ एवढी केली त्यानंतर २०१६ पाणी पुरवठा खाजगीकरणाचा ठराव रद्द केला गेला. यात आज रोजी वार्षिक पाणीपट्टी ४०५० एवढी आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पाणीपट्टी भरूनही औरंगाबादकरांना पाण्यासाठी सतत तरसावे लागत आहे.