Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3906

सातारा कनेक्शन : कोल्हापूर जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

Crime

कोल्हापूर | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर तालुक्यातील घुणकी फाट्यावर गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या प्रतीक उर्फ सोन्या संजय यादव (वय 20, रा. कोरेगाव जि. सातारा) आणि दाजी (रा. कोल्हापूर. संपूर्ण नावाचा उल्लेख नाही) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. दरम्यान 16 किलो वजनाच्या गांजासह, मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 16 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयीत प्रतीक व दाजी हे दोघे मोटरसायकलवरून (एम एच – 11- सीएफ- 4900) बेकायदेशीरपणे पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन जात होते. दरम्यान घुणकीजवळील भगव्या चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने त्यांना पकडले. तपासणी केली असता पोत्यात हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान सुमारे 16 किलो 150 ग्रॅम वजनाचा 1 लाख 45 हजार 350 रुपये किंमतीचा मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 16 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस कर्मचारी किरण गावडे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

crime

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे.

काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आला होता. या बैलाची हत्याच करण्यात आली, अशी चर्चा सुरू होती. या घटनेचा शोध घेवून संबधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांच्यातून होत होती. त्यामुळे मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किकली येथील या शर्यतीच्या बैलाचा अपघातात मृत्यू झाला होता. संबंधिताने बैलाची भरपाईसुद्धा घेतली. पण आता या बैलाचा मृतदेह टाकायचा कुठे? असा प्रश्न संबंधितांना पडला.

सरतेशेवटी एका टेम्पोमधून बैलाचा मृतदेह सरताळे येथे आणून टाकला. महामार्गावरून रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळ शोधून बैल टेम्पोतून खाली टाकला. मात्र, रस्त्यापासून मृतदेह बाजूला नेताना त्यांनी बैलाच्या पायाला दोर बांधला. त्यानंतर टेम्पोने ओढत नेला. त्यामुळे या बैलाचे पाय मोडले. याप्रकरणी संबंधितांवर मेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्रिंबके हॉस्पिटलकडे जाणारी वाट अडविल्याने सहा जणांवर पोलिसांत गुन्हा

Karad Hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

चार चाकी वाहन आडवे लावून रुग्णालयाकडे जाणारी वाट अडवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि. 7 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्रिंबके हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला. याबाबत डॉ. स्नेहल अनिल त्रिंबके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवाजी रघुनाथ सूर्यवंशी, रोहिणी शिवाजी सूर्यवंशी, यश शिवाजी सूर्यवंशी, आदित्य शिवाजी सूर्यवंशी तसेच शिवाजी यांचा मेहुणा व मेहुणी (नाव, गाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील बुधवार पेठेत शिवाजी क्लॉथ मार्केट समोर असलेल्या त्रिंबके हॉस्पिटलच्या यशवंत बिल्डिंग समोर शिवाजी सूर्यवंशी याने त्याच्या ताब्यातील त्याच्या मालकीची चारचाकी गाडी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या जिन्या जवळील मोकळ्या जागेमध्ये आडवी लावली. त्यामुळे हॉस्पिटलकडे येण्या-जाण्याच्या रस्त्यात अडथळा निर्माण करून संबंधितांनी दाराजवळ कोंडी केली होती.

तसेच संबंधित गाडी शेजारी वाटेत बसून रुग्णालयाकडे कोणालाही जाऊ देत नाहीत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनाही बाहेर येऊ देत नाहीत. याशिवाय रुग्णालयातील स्टाफला ही आत मध्ये येऊ देत नाहीत, असेही डॉ. स्नेहल त्रिंबके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याकडे देशाचे आरोग्य राज्यमंत्रीपद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

यामध्ये भारती पवार यांना आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ भारती पवार महाराष्ट्र च्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात. दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत मतदारसंघ आहे. डॉ. भारती पवार पेशानं वकील आहेत. त्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीतून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या 2019 ला आदिवासी बहूल दिंडोरी मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या आहे. आज पवार यांनी केंद्रीयमंत्रीपदाची शपथ घेतली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नारायण राणेंना मिळाली ‘या’ केंद्रीय मंत्रीमंडळाच्या खात्याची जबाबदारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

यामध्ये नारायण राणे यांना मध्यम आणि लघुउद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नारायण राणे यांचा प्रवास शिवसेना कॉंग्रेस आणि भाजप असा राहिलेला आहे. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमधून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2005 मध्ये शिवसेनेला राम राम करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज राणे यांनी केंद्रीयमंत्रीपदाची शपथ घेतली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विजय शिवतारेंची प्रकृती ठणठणीत; घेतली आदित्य ठाकरेंची भेट

Aditya thackey and vijay shivtare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या ICUमध्ये होते. याची माहिती विजय शिवतारे यांच्या मुलीने फेसबुक वर एक भावनिक पोस्ट लिहून दिली होती. यामध्ये तिने भावाकडून संपत्तीसाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील केला आहे. कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम केले जात असल्याचा आरोपदेखील शिवतारे यांच्या मुलीने केला होता.

शिवतारे यांच्या मुलीचे नाव ममता शिवदीप लांडे- शिवतारे असे आहे. ममता यांनी भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम करत असल्याचा आरोपदेखील तिने केला आहे. यामुळे विजय शिवतारे यांच्या घरातील वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ममता या आयपीएस शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. विजय शिवतारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते आता ठणठणीत बरे झाले आहेत.

विजय शिवतारे यांनी आज महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, युवासेनाप्रमुख व मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई या ठिकाणी भेट घेतली. या भेटीमध्ये पुंरदर हवेली विधानसभा मतदार संघातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या ठिकाणचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदित्यजींनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘या’ सर्वांचा महाराष्ट्रासाठी फायदा होईल; मंत्रीपदी शपथ घेतलेल्यांचे रोहित पवारांकडून अभिनंदन

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये ४३ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून या सगळ्यांचे अभिनंदन केले आहे. रोहित पवार म्हणाले, ‘केंद्रात मंत्रीपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब,कपिल पाटील साहेब, डॉ. भागवत कराड साहेब आणि भारतीताई पवार या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! केंद्रात काम करत असताना या सर्वांचा महाराष्ट्रासाठी अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा! या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. आता या मंत्रिमंडळाचा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खळबळजनक ! पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

रायगड : हॅलो महाराष्ट्र – अलिबाग शहरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव प्रशांत जगजीवन ठाकूर आहे. त्याने अचानक केलेल्या सुसाईडमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत जगजीवन ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.

प्रशांत यांने अलिबाग-शिवाजी नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सकाळी नियमीतपणे प्रशांत कामावर आला नाही. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला माेबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन उचलला नाही.

यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी प्रशांतचे घर गाठल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रशांतचा मृतदेह अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अलिबाग पाेलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी अजूनपर्यंत कोणत्याही ओपनरची निवड करण्यात आलेली नाही.

टीम इंडियाकडे ओपनर म्हणून आता फक्त मयंक अग्रवालचाच पर्याय उपलब्ध आहे. तसेच स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन आहे. केएल राहुलसुद्धा टेस्ट ओपनर आहे, पण टीम मॅनजमेंटने त्याला ओपनिंगची जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो आता मधल्या फळीत खेळणार आहे.

टीम इंडियाच्या मॅनजमेंटने शुभमन गिलऐवजी कोणत्याच खास खेळाडूची मागणी केली नव्हती.म्हणजेच टीमने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची कधीही मागणी केली नसल्याचे समोर आले आहे. गिलला पर्याय शोधण्याची जबाबदारी निवड समितीवरच सोडण्यात आली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे मोदी सरकारची अपयशाची कबुली; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यानाही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही समावेश आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयशाची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे, असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्थार कार्यक्रम पार पडला. यावेळी ४३ भाजप नेत्यांनी शपथ घेतली. मोदींच्या शपथविधीवरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शपथविधी पार पडत असताना महत्वाचे ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे कि, “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्धवस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे.” असे सावंत यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीत भाजप नेते नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. बारा वर्षे काँग्रेसला समजलं नाही ती भाजपला दीड वर्षात समजले. जे काँग्रेसने करून दाखवलं नाही ते भाजपने ते करून दाखवलं,” असा टोला निलेश राणेंनी काँग्रेसला लगावला. राणेंच्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार व डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.