Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3915

मोदी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत.

राज्यपालांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे
मिझोरामचे राज्यपाल पदी हरि बाबू कमभमपति, मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे सध्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. येत्या २ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गेहलोत यांना हटविण्यात आले आहे.

आजची बैठक रद्द
आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. या भेटीनंतर आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून सख्या भावांमध्ये तुंबळ मारहाण

Crime

औरंगाबाद : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा आणि त्याच्या कुटुंबाला सहा ते सात जणांनी मारहाण केल्याची घटना 24 जून रोजी संतोषी माता नगरात घडली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मेहुण्याला रविवारी अटक केले. पोपट हरिभाऊ चव्हाण ( रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी ) असे आरोपीचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला.

या प्रकरणात साहेबराव बन्सी राठोड रा. संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी यांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार वडिलांच्या जमिनीच्या वाट्यावरून फिर्यादी चा लहान भाऊ उत्तम राठोड हा सतत वाद घालत होता. 23 जून रोजी गिरनार येथे याच कारणावरून वाद झाले होते, तेव्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, 24 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उत्तम व त्यांचे मेव्हणे अनिल चव्हाण, पोपट चव्हाण, प्रल्हाद राठोड, बबलू राठोड, अनिल राठोड, यशोदाबाई चव्हाण आणि सुनीताबाई राठोड हे फिर्यादीच्या घरी आले.

दरम्यान, फिर्यादी सही टाईम ची पत्नी मुले व मेव्हणा पंडीत चव्‍हाण यांना मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळाने आरोपी अनिल, पोपट व बबलू हे तिचे फिर्यादीच्या घराच्या छतावरून घरात शिरले लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील समीर यांनी युक्तिवाद केला.

हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.

यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांचा हा आक्रमकपण आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून या सरकारचा निषेध केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू करण्यात आली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला होता.

आजचा दिवस विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते मात्र भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकासुद्धा केली.

दारूची तलब एवढी की.. दारु दिली नाही म्हणून पत्नीचा घोटला गळा

Crime Story
Crime Story

औरंगाबाद : दारु पिण्यासाठी 40 रुपये दिले नाही म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना 7 दिवसांनंतर आज उघडकीस आली आहे. या आरोपीला 7 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना बालानगर येथे घडली.

मीराबाई ढोकळे, वय 35 (रा बालानगर) असे मृताचे नाव असून कैलास ढोकळे, वय 39 असे आरोपीचे नाव आहे. 28 जुन रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास आरोपीने पत्नीला दारु पिण्यासाठी 40 रुपये मागितले परंतु पत्नीने नकार दिला. संतापलेल्या आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून तिचा गळा दाबून खून केला. आईचा खून मी केला आहे हे कोणाला सांगितले तर तुम्हाला पण मारुन टाकेल, अशी धमकी आरोपीने मुलांना दिल्यामुळे ते शांत बसले. माझी पत्नी आजारी होती. अशी खोटी बातमी गावात पसरून दुसर्‍या दिवशी गावातील लोकांच्या समक्ष अंत्यसंस्कार केले.

आपल्या आईचा खून आपल्या वडिलांनी डोळ्यासमोर केला तरीपण आपण शांत बसलो पण आता काय करावे हे मुलांना कळत नव्हते. अखेर सहा दिवसानंतर विहामांडवा येथे जाऊन आजी इंदुबाई धोंडिराम गुंजाळ (55) यांना सांगितले. इंदुबाई यांनी 5 जुलै रोजी पैठण एम आयसीसी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविषयी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दोन तासातच आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना पाटील, बीट जमादार जावळे, संपत दळवी, विजय मोरे, शरद पवार करीत आहे.

आता सरकारी दुकानातून रेशन घेण्यासाठीच्या पात्रतेचे निकष बदलणार, नवीन तरतुदी कधी लागू होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभाग (Department of Food & Public Distribution) सरकारी रेशन दुकानांतून रेशन घेणाऱ्या पात्रतादारांसाठी (eligible) असलेल्या मानकात बदल करणार आहे. यासंदर्भात विभागाने राज्यांसमवेत चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या आहेत. मानक बदलण्यासाठीचे स्वरूप आता जवळजवळ अंतिम केले आहे. या महिन्यात बदललेली मानके लागू केली जातील आणि भविष्यात पात्रतेचा निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानुसार, देशभरातील 80 कोटी लोकं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) फायदा घेत आहेत. अशी अनेक लोकं आहेत जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. हे लक्षात घेऊनच सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सचिव सुधांशु पांडे यांचे म्हणणे आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून मानकांमधील बदलाबाबत राज्यांसमवेत बैठक आयोजित केली जात आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. या महिन्यात मानके निश्चित केली जातील. नवीन मानकांच्या अंमलबजावणीनंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र लोकांना त्याचा लाभ मिळू शकणार नाही. हा बदल गरजूंना लक्षात घेऊनच करण्यात येत आहे.”

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केली
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC) योजना लागू केली गेली आहे. NFSA अंतर्गत सुमारे 86 कोटी लाभार्थी या योजनेत सामील झाले आहेत. दरमहा सरासरी दीड कोटी लोकं एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जावून लाभ घेत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Cryptocurrency : बिटकॉइनच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, आता पैसे गुंतवणे किती फायदेशीर आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बिटकॉईनच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. मंगळवारी 34000 डॉलरच्या खाली राहिली. Coinmarketcap.com इंडेक्समध्ये जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी गेल्या 24 तासांत 1.89 टक्क्यांनी घसरून 33,813.12 डॉलरवर पोहोचली. जगभरात क्रिप्टोकरन्सीच्या कारवाई दरम्यान एप्रिलच्या मध्ये उंच पातळीवरून हे जवळजवळ 50 टक्के कमी झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत, बिटकॉइन जवळजवळ 40 टक्के घसरला, क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासात या तिमाहीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. जणकारांनी गुंतवणूकदारांना असा इशारा दिला आहे की, 30,000 डॉलर्सच्या पातळी पेक्षा खाली जाणे त्रासदायक ठरू शकेल.

बिटकॉइन गुंतवणूकदारांच्या आवडीची करन्सी
Zebpay ट्रेड डेस्क म्हणाले की, “बिटकॉईन गेल्या काही दिवसांपासून बराच मर्यादीत आहे आणि 32,500 ते 36,500 डॉलर्सच्या पातळीवर ट्रेड करीत आहे. बिटकॉइन टॅप्रूट अपग्रेड लवकरच होणार आहे आणि त्याच किमतींचा परिणाम अजून पाहायला मिळणार आहे.” तरीही, या विकासाचा मालमत्तेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. व्हॉल्यूम चांगला राहीला आहे आणि नेटवर्कवरील घडामोडी देखील चांगल्या आहेत. बिटकॉइन हा सर्वात आवडीचा राहिला आहे. ”

टॉप क्रिप्टोकरन्सी आणि त्यांच्या 6 जुलै रोजीच्या किंमती पहा
– Bitcoin $ 33,930 (24 तासात -1.89 टक्के बदल)
– Ethereum $ 2235.90 (24 तासात -1.10 टक्के बदल)
– Binance Coin $305.16 (24 तासात 1.95 टक्के बदल)
– Cardano $ 1.42 (24 तासात -1.95 टक्के बदल)
– Dogecoin $ 0.235 (24 तासात -2.95 टक्के बदल)
– XRP $0.664 (24 तासात -2.16 टक्के बदल)
– Polkadot $15.43 (24 तासात -1.23 टक्के बदल)
– Bitcoin Cash $512.23 (- 24 तासात -0.95 टक्के बदल)
– Litecoin $138.74 (24 तासात -1.86 टक्के बदल)

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीदेखील बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा उधळवली

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली.

भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष कालीदास कोळमकर यांना करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे, मात्र माईकाचा वापर करणे योग्य नाही, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर आक्षेप घेतला होता. यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने भाजपची विधानसभा बंद करण्याचे आदेश सुरक्षाअधिकाऱ्यांना दिले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेत जाऊन माईक बंद पाडला आणि सभा घेण्यास मनाई केली. या कारवाईमुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले.

रवी राणा यांनी राजदंड पळवला, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही- भास्कर जाधव यांनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत.

दरम्यान आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष यांनी संताप व्यक्त करत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही असे ठणकावून सांगितले.

महाराष्ट्राला लॉटरी!! मोदींच्या मंत्रिमंडळात राणेंसह ‘या’ 4 खासदारांना मंत्रिपदाची संधी ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून भाजप नेते नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलवलं असून राणे यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जातं असून फक्त राणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल 4 खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातुन राज्यसभा खासदार डॅा. भागवत कराड आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही मोदी 2.0 मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, रणजित निंबाळकर यांनाही केंद्रात स्थान मिळणार असल्याचे समजते. तर, बीडच्या खासदार प्रितम मुंडेंच्या नावाची केवळ चर्चाच झाल्याचे दिसून येते.

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची स्कॉलरशिप मानली जाते. आणि या स्कॉलरशिप साठी राजू केंद्रे याची निवड झालीय.या स्कॉलरशिपसाठी 160 देशांतील 63 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास 45 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळते. राजूला जगातील 18 नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेणयासाठी आमंत्रित केले असून, लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूनं गाठलाय. यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नामांकित शिक्षण संस्थांतून शिक्षण
राजू केंद्रे चा जीवन प्रवास हा थक्क करणारा असून अवघ्या हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात राजू राहतोय. राजूने शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या नामांकित संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेय. मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू आता मात्र नव्या वळणावर प्रवासाला सुरुवात करतोय. तो जगातील टॉप 100 विद्यापीठातील इंग्लंडच्या विद्यापीठात शिक्षाणासाठी निघालाय. पद्व्यूत्तर शिक्षण झाल्यावर राजुला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिप सुद्धा मिळालीय. समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्ह्णून काम करत असताना नेट सेट सारख्या परीक्षा ही पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण केल्या. तर या तरुणाने आय – पॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसोबत ही काम केलेय.

राजूच्या निवडीचा आई वडिलांना आनंद
राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम आहे.आई – वडील शेतकरी असून त्यांचं राहणीमान अगदी साधं आहे. मात्र, आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केलेत. राजूचा मोठा भाऊ सुद्धा सिक्युरिटी संस्थेत नोकरीला आहे. तर, आता राजूला सुद्धा शिकवायचे आणि त्याला त्याच्या पाययावर उभे करायचे म्हणून आई वडिलांनी शेतीत काबाड कष्ट करून राजुला शिकविले. त्यामुळे राजू आज छोट्याशा गावातून लंडनला जातोय याचा त्याच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजू सारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी इच्छा राजूचे वडील आत्माराम केंद्रे आणि आणि आई जिजाबाई केंद्रे यांनी व्यक्त केलीय.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
राजूने मागील तीन ते चार वर्षात 100 युवकांना देशातील चागंल्या कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन ही केलेय. राजू करिअर विषयी मार्गदर्शन ही करतो. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करणायचा प्रयत्न ही राजू करत असतो. आई -वडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केले असून त्याचा आदर्श इतर युवकांनी घेण्याची गरज आहे.

राजू केंद्रे यांचे समाजकार्य
राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी नावाने शैक्षणिक चळवळ सुरु केली. मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पारधी बेड्यांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना ना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तकं संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.ब्रिटनमध्ये शिकून परत मायदेशी येऊन काम करू पाहण्याऱ्यांना नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळविणारा राजू हा कदाचित पहिला असा विद्यार्थी असावा जो पदवीपर्यंत मराठी माध्यमात आणि पदवीनंतर मुक्त विद्यापीठातून शिकलेला आणि भटक्या प्रवर्गातून आलेला आहे. त्याने एक वर्षापूर्वी या शिष्यवृत्तीकरीता तयारी सुरू केली होती. आजपर्यंत त्याला जागतिक स्तरावरील १८विद्यापीठांच्या विविध मास्टर्स अभ्यासक्रमासाठी ऑफर आल्या आहेत. यातली बहुतेक विद्यापीठे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार पहिल्या २०० मधील आहेत आणि नऊ विद्यापीठे पहिल्या १०० मधील आहेत. या विद्यापीठांत मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करायला वर्षाला जवळपास ४० लाख रुपये लागतात.

या शिष्यवृत्तीमुळे राजू केंद्र याला यापैकी कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे. परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर आपल्यासारख्या अभावाचे जगणे जगणाऱ्यांना आणि शैक्षणिक संधी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तींच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचा निश्चय केला असल्याचे राजू केंद्र याने सांगितले. राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ हा प्रवास संघर्षातून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे यवतमाळ येथील मार्गदर्शक प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केली.