Friday, December 19, 2025
Home Blog Page 3923

सेना- भाजप मधील नात अमीर खान आणि किरण राव यांच्यासारख – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही. आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल होत. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत उत्तर दिले. सेना- भाजप मधील नात अमीर खान आणि किरण राव यांच्यासारख आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

फडणवीस काय म्हणाले होते –

शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान करीत राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय होतात आणि जर-तरला कोणताही अर्थ नसतो, असं प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं.

7th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! DA सोबतच केंद्राने ‘या’ मोठ्या मागण्या देखील केल्या पूर्ण

नवी दिल्ली । शासकीय कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (Dearness Relief) तसेच अनेक सुविधा देण्याची घोषणा केली आहे. 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख पेन्शन धारकांना त्यांचा थेट लाभ मिळणार आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत जाहीर केले की,” सातव्या वित्त आयोगाच्या (7th Pay Commission) नुसार जुलै 2021 पासून DA आणि DR केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू लागतील. आता केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मागण्या उठविणार्‍या JCM च्या नॅशनल कौन्सिलने दावा केला आहे की, सप्टेंबर 2021 च्या पगारामध्ये DA आणि DR उपलब्ध होतील. परंतु, अद्यापपर्यंत शासनस्तरावर कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही.

हाउस बिल्डिंग एडवांसबाबत दिलासा
केंद्रीय कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हाउस बिल्डिंग एडवांसबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने HBA चा व्याज दर कमी करून 7.9 टक्के केला होता. हा दर 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील.

Travelling Allowance संदर्भात केले बदल
केंद्र सरकारमधील रिटायर्ड कर्मचार्‍यांना आता त्यांच्या ट्रॅव्हिंग अलाऊन्स (Travelling Allowance) चा तपशील 180 दिवसात भरावा लागेल. पूर्वीची ही मर्यादा वेळ 60 दिवसांची होती. हा नवीन नियम 15 जून 2021 पासून अंमलात आला आहे.

पेन्शन स्लिप बर्‍याच माध्यमातून उपलब्ध होईल
रिटायर्ड कर्मचार्‍यांना आता पेन्शन स्लिपसाठी बँकांच्या फेऱ्या कराव्या लागणार नाहीत. पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन जारी करणार्‍या बँकांना पेन्शन स्लिप SMS आणि ई-मेलद्वारे पेन्शन धारकांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर आता त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरही पेन्शन स्लिप मिळणार आहे. यासाठी पेन्शनधारकांचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक बँका वापरतील. केंद्राच्या या निर्णयामुळे 62 लाख केंद्रीय पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन नियम 1 जुलै 2021 पासून अंमलात आला आहे.

कौटुंबिक पेन्शनसाठी नवीन नियम
कौटुंबिक पेन्शनच्या नवीन नियमांनुसार आता जीवन प्रमाणपत्र मिळताच पेन्शन सुविधा सुरू होईल. त्यानंतरच्या औपचारिकता नंतर पूर्ण केल्या जाऊ शकतात. यासाठी सरकारने खूप जुना नियम बदलला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

कॅनॉट प्लेसमध्ये उभारणार महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा

maharana pratap
maharana pratap

औरंगाबाद | शहरातील सिडको कॅनॉट प्लेस गार्डनमध्ये महापालिकेकडून महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे हा पुतळा धातूचा असून त्याची उंची 16 फूट असणार आहे. खाली 18 फूट उंच चौथरा बांधून त्यावर हा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सध्या कॅनॉट प्लेस गार्डनमध्ये महाराणा प्रताप यांचा अर्धाकृती पुतळा असून तो काढून तिथेच नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी राजपूत समाजाकडून अनेक वर्षापासून होत आहे. याची दखल घेत काही वर्षापूर्वी महापालिकेने हा निर्णय घेतला. मात्र पुढे याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही. आता महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेचे उपअभियंता राजेंद्र वाघमारे यांनी बोलताना सांगितले, महापालिका प्रशासनाने महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या कामासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. आणि आता निविदा प्रसिद्ध झाली आहे. यात अश्वारुढ पुतळा तयार करून नियोजित स्थळी चौधर्‍याचे सुसंगत डिझाईनचे आरसीसी कॉंक्रिटचे बांधकाम करून तो बसविणे आणि तिथे आवश्यक योजनेचे काम करणे या कामांचा समावेश आहे. कला संचानालयाने यासह इतर आवश्यक परवानगी घेण्याचे कामामध्ये संबंधित एजन्सीकडे राहणार आहे.

केंद्राने ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याबाबत विधानसभेत ठराव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला.

बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी म्हंटल. दरम्यान, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला. यावेळी विरोधकांनी हौदात येऊन प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, फडणवीस व भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सभागृहात बोलताना फडणवीस यांनी छगन भुजबळ यांनी सर्वांना पूर्ण सत्य सांगितलं नसून त्यांनी अर्धसत्य सांगितलं आहे. कोर्टाने काय म्हटलं हे सर्वांनी समजून घ्यावे असे त्यांनी म्हंटल.

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा असा ठराव मांडला. पण त्यांना ठराव मांडू न दिल्याने भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. छगन भुजबळ ठराव मांडत असताना अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रागाच्या भरात हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.

यानंतर भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन माईक खेचण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर भास्कर जाधव जेव्हा दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आल्यानंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एक्सचेंजद्वारे शेअर्सच्या खरेदीवर कंपन्यांना TDS कपात करण्याची आवश्यकता नाही : CBDT

मुंबई । ज्या कंपन्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा कमोडिटी एक्सचेंजमधून ट्रेडिंग करताना कोणत्याही किंमतीचे (अगदी 50 लाखाहून अधिक किंमतीच्या) वस्तू खरेदी करतात त्यांना त्या व्यवहारावर टॅक्स (TDS) वजा करणे आवश्यक नसते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने असे सांगितले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 10 जुलैपासून TDS कपात करण्याच्या तरतूदीची अंमलबजावणी केली आहे. 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना हे लागू होईल.

आर्थिक वर्षातील रहिवाशांकडून 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंच्या खरेदीवर अशा घटकांना 0.1 टक्के TDS वजा करणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटले की,” ही तरतूद स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून शेअर्स किंवा वस्तूंच्या व्यवहारांना लागू होणार नाही.”

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की,” काही विनिमय आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून व्यवहारांमध्ये आयकर कायद्याच्या कलम 194 च्या कलमात TDS च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात व्यावहारिक अडचणी येत असल्याचे आम्हाला दिसले. अशा व्यवहारांमध्ये बर्‍याच वेळा खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात परस्पर करार नसतो.”

CBDT ने 30 जून रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, “अशा अडचणी दूर करण्यासाठी कायद्याच्या कलम 194 मध्ये मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज किंवा क्लियरिंग कॉर्पोरेशनद्वारे सिक्युरिटीज आणि वस्तूंचा व्यवहार केला जातो अशा प्रकरणांमध्ये लागू होणार नाही.” 2021-22 च्या अर्थसंकल्पात कंपन्यांनी TDS वजा करण्यासंबंधीचा कलम 194Q सादर केला होता. ही तरतूद 1 जुलै 2021 पासून अंमलात आली आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

अखेर…या वर्षाच्या शेवटी क्रांतीचौकातील पुतळ्याचे काम पूर्ण होणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद | औरंगाबादेतील क्रांतीचौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम चार वर्षांपासून सुरु आहे. परंतु अजूनही या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झालेले नाही.

1962 मध्ये शिवसैनिकांकडून क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शहरात एकात्मिक रस्ते विकास योजना राबवण्यात आली. यावेळी क्रांतीचौकात उड्डाणपूल उभारण्यात आला. आणि पुलाची उंची जास्त, पण पुतळ्याची उंची कमी झाल्याने शिवसैनिकांनी पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी केली. यानंतर कालांतराने या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी कंत्राटदार निश्चित करून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु त्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने तो सुद्धा पळून गेला. त्याला गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवून परत कामावर बोलावण्यात आले. पण आता हे काम कासवगतीने सुरु आहे.

आता हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु चौथऱ्याचे काम पूर्ण होऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कधी बसवन्यात येईल हे सांगता येणार नाही. या चौथऱ्यावर आकर्षक स्टोन बसवण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचे काम पुण्यात सूरु आहे.

BPCL ने 20 वर्षात मिळविले 80 पेटेंट्स, 50 हून अधिक अर्ज अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत

मुंबई । सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) गेल्या दोन दशकांत 80 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळवले आहेत, तर 53 हून अधिक प्रकरणांमध्ये ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात पेटंटच्या या लिस्टमध्ये सर्वात वेगवान आणि स्वस्त क्रूड ऑईल टेस्टिंग डिव्हाइस बीपी मार्कचाही (BP Marrk) समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे असलेल्या संशोधन आणि विकास केंद्रा (R&D Centre) ने गेल्या 12 महिन्यांत एकुण 18 पेटंट्स मिळविल्याचे कंपनीने म्हटले आहे. BPCL चे R&D चे अंदाजपत्रक वार्षिक 80-100 कोटी रुपये आहे.

जुलै 2020 पासून 18 पेटंट्स
BPCL चे संचालक (रिफायनरी अँड मार्केटींग) अरुण कुमार सिंह म्हणाले, “गेल्या दोन दशकांत आम्ही 80 पेटंट्स मिळवले आहेत तर 53 प्रकरणांना अजून मंजुरी मिळालेली नाही. 2020 जुलैपासून आमच्या नावावर 18 पेटंट्स आहेत.”

BP Marrk सर्वात प्रसिद्ध पेटंट्स इनोव्हेशन्सपैकी एक
ते म्हणाले की,”केंद्रातील सर्वात लोकप्रिय पेटंट इनोव्हेशन्सपैकी एक BP Marrk आहे, जे क्रूड ऑइल अ‍ॅड्सचे प्रगत टूल आहे. हे पारंपारिक परख पद्धतींपेक्षा कमी वेळेत कच्च्या तेलाचे वैशिष्ट्य आणि मूल्यांकन करते. जुन्या प्रक्रियेत, कच्च्या तेलाची चाचणी घेण्यासाठी किमान एक महिना लागतो.”

सिंग म्हणाले,”कंपनीचे नवीन पेटंट अर्ज हाय-फ्लेम एलपीजी गॅस स्टोव्हसाठी आहेत (चार पेटंट एप्लिकेशन्स आणि इंडियन पेटंट ऑफिसमध्ये चार डिझाईन नोंदणी अर्ज) हे स्टोव्ह सध्याच्या स्टोव्हच्या गॅस-ते-उष्णतेच्या 68 टक्के कार्यक्षमतेपेक्षा सहा टक्के जास्त उष्णता देतात. या इनोव्हेशनमुळे, प्रत्येक कुटुंबासाठी अन्न शिजवताना वर्षाकाठी सरासरी दरात एक एलपीजी सिलेंडर वाचविला जाईल.”

एलपीजी स्टोव्ह ‘भारत हाय स्टार’ लाँच झाला
ते म्हणाले की,”हा उच्च कार्यक्षमता असलेला एलपीजी स्टोव्ह ‘भारत हाय स्टार’ रविवारी R&D केंद्राच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सादर करण्यात आला. या स्टोव्हची कार्यक्षमता 74 टक्के आहे आणि त्याचा प्रखर भाग चांगली फ्लेम देतो.”

सिंह म्हणाले की,”जर हा गॅस स्टोव्ह सर्व घरांमध्ये सुलभ झाला तर त्यात वर्षाकाठी 17 लाख टन एलपीजी म्हणजे सात हजार कोटी रुपयांची बचत होईल.” ते म्हणाले की,”एलपीजीचा वापर दरवर्षी सुमारे 2.8 कोटी टन्स एवढा असतो आणि मागणी सरासरी सहा टक्के दराने वाढत आहे. लवकरच ते 3 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

आमच्यावर आरोप करता मग एवढी वर्ष तुम्ही काय केल ? भुजबळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. विधिमंडळात ओबीसी मुद्द्यांवरील सर्व ठराव हे संमत करण्यात आले आहे. मात्र, यावेळी झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी आरक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप केल्यानंतर भुजबळांनीही त्याला प्रतिउत्तर दिले. आमच्यावर आरोप करता मग एवढी वर्षे तुम्ही काय केलं? केंद्रात तुमची सत्ता आहे ना? असा सवाल भुजबळांनी उपस्थित करीत फडणवीसांवर हल्लाबोल केला.

मुंबईत पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीका यांचा भडीमार केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुनगुंटीवार व पटोले यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर फडणवीस व भुजबळ यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सभागृहात बोलताना फडणवीस यांनी छगन भुजबळ यांनी सर्वांना पूर्ण सत्य सांगितलं नसून त्यांनी अर्धसत्य सांगितलं आहे. कोर्टाने काय म्हटलं हे सर्वांनी समजून घ्यावे. कोर्टाने सेन्सस डेटा बद्दल भाष्य केलेले नाही, असे फडणवीसांनी म्हंटले.

फडणवीसांच्या आरोपानंतर त्याला भुजबळांनीही प्रतिउत्तर दिले. त्यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने देण्याची मागणी करीत ठराव मांडला. त्यानंतर तो संमत करण्यात आला. यावेळी भुजबळांनीही फडणवीसांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. ठरावाच्या समतीनंतर अधिवेशनाचे कामकाज काहीवेळेसाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मागील अधिवेशनदेखील अध्यक्षविनाच पार पडले होते. तेव्हा पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु आता पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. हिवाळी अधिवेशन पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाही, अशी माहिती समजत आहे. तसेच महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळण्यात आली आहे. या अगोदर दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असे पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते. पण राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत असल्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.