Friday, December 19, 2025
Home Blog Page 3924

कोरोना नंतरच्या पहिल्या सहामाहीत विलीनीकरण आणि संपादनाचे सौदे 44% वाढले, 49.34 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले

मुंबई । कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा सामान्य जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. मात्र असे असूनही, आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत विलीनीकरण आणि अधिग्रहण (Mergers & Acquisitions) सौद्यांमध्ये चांगली वाढ झाली. उद्योग अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत विलीनीकरण आणि अधिग्रहण सौद्यांमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. यासह, अशा सौद्यांचे मूल्य (Valuation of Deals) 49.34 अब्ज डॉलर्सवर वाढले. त्याच वेळी सन 2020 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हा आकडा 34.3 अब्ज डॉलर्स होता.

आर्थिक वर्ष 2020 दरम्यान 693 सौदे झाले
LSE समूहाचे युनिट रिफिनिटव्हच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 21 मध्ये विलीनीकरण आणि अधिग्रहण सौद्यांची संख्या 5 टक्क्यांनी वाढून 730 झाली. एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत अशा सौद्यांची संख्या 693 होती. 210 सौद्यांमध्ये सीमा पार आणि विलीनीकरणाचा आकडा 21.73 अब्ज डॉलर्स इतका आहे. गेल्या वर्षी याच काळात 195 सौद्यांमध्ये ही आकडेवारी 16.02 अब्ज डॉलर्स होती. जागतिक स्तरावर, विलीनीकरण आणि अधिग्रहण सौद्यांच्या संख्येने सलग चौथ्या तिमाहीत 1,000 अब्ज डॉलर्सचा आकडा ओलांडला. पहिल्या सहामाहीत जागतिक पातळीवर विलीनीकरण आणि अधिग्रहणांची नोंद 132 टक्क्यांनी वाढून 2,800 अब्ज डॉलरवर गेली.

अमेरिकेबरोबरील सौद्यांमध्ये 264% वाढ
जागतिक पातळीवर, पहिल्या सहामाहीत पहिल्या सहामाहीत, 10 अब्ज डॉलर्सच्या सौद्यांमध्ये 94 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि 1-5 अब्ज डॉलर्सच्या सौद्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमेरिकेशी विलीनीकरण आणि अधिग्रहणचे सौदे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 264 टक्क्यांनी वाढून 1,400 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहेत. त्याशिवाय युरोपियन देशांशी असलेले सौदे 33 टक्क्यांनी वाढून 556 अब्ज डॉलर्स आणि आशिया पॅसिफिकमधील देशांमधील सौदे 83 टक्क्यांनी वाढून 551.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

दहावीच्या निकालाचे 99.87% काम पूर्ण

result of the assessment
result of the assessment

औरंगाबाद |23 जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास सुरुवात झाली होती. यापैकी 2 जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील 99.87 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले आहे. जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अजुन बाकी असून, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले आहे. परंतु, त्यांची अजून ऑनलाईन निश्चिती केली नाही. त्याचबरोबर 62 हजार 741 विद्यार्थ्यांचे निकाल भरल्याची माहिती शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.

विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये 2560 शाळांंमधून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी 1 लाख 76 हजार 193 नियमित विद्यार्थ्यांनी, आणि 7 हजार 418 पुनर्परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 62 हजार 731 नियमित, तर 22 हजार 80 पुन:परीक्षार्थी असे एकूण 65 हजार 11 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी 62 हजार 741 विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती करण्यात आली. 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अपूर्ण आहे, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले, पण, त्यांची ऑनलाईन निश्चिती केली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ज्यांचे निकाल अपूर्ण आणि निश्चित केले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच निकालाचे अभिलेखे जमा करण्याचे काम 6 जुलैपर्यंत केले जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनूसार, विभागातील 99 टक्केपेक्षा अधिक निकाल ऑनलाईन भरून झाले आहेत. फार थोड्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन येणे बाकी आहे. दहावी निकालाची ऑनलाईन निश्चिती व अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी मुदतवाढीबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणत्याही सूचना मिळाली नाही.

महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या कामाला वेग; लवकरच होणार भूमिपूजन

Women and neonatal
Women and neonatal

औरंगाबाद | शहरात तब्बल सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी दूध डेअरी येथील जागेतील जुने बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु हे काम संथगतीने सुरू होते. आता आठवडाभरात या जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे.

दूध डेअरी येथील नियोजित २०० खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी जुने बांधकाम पाडण्याच्या कामाला वेग आला आहे. आठवडाभरात जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार असून त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

या जागेमध्ये मोठमोठ्या मशीन होत्या. तसेच जुने बांधकामात लोखंडी भाग होते. त्यासाठी गॅस वेल्डिंगची मदत घेतली जात होती. या कामासाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते. त्यामुळे काम संथगतीने सुरू होते. परंतु आता ऑक्सिजनची उपलब्धता झाल्याने 8 तारखेपर्यंत सपाटीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

….म्हणून ‘ते’ पत्रं लिहिलं; प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर आघाडीत एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आपला पक्ष फोडत असून मोदींशी जुळवून घ्या अस पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होत. दरम्यान आता त्यांनी हे पत्र लिहिण्याचे नेमकं कारण सांगितले आहे.

जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं, असं सांगून प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे . आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं असे प्रताप सरनाईक यांनी म्हंटल.

अर्णब गोस्वामीने अलिबागची केस दाबली होती, त्यावर आवाज उठविला. कंगना राणौतने जे मुंबई पोलिसांवर वक्तव्य केले. या काळात मी पक्षाच्या प्रवक्ते पणाचे काम केले होते. गोस्वामीची केस पुन्हा बाहेर यावी यासाठी आवाज उठविला. कंगनाविरोधात मी विधानसभेत प्रस्ताव मांडला, त्यामुळे मी विरोधकांसाठी टार्गेट होतो असे ते म्हणाले. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

हे काय धमकी देताहेत काय? मुनगंटीवारांच्या ‘त्या’ विधानावरून नाना पटोले संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.  पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. “अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते ते आता आत जात आहेत,” अशी धमकी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिल्यानंतर त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहेत? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

मुंबईत पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीका यांचा भडीमार केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

मुनगंटीवार बोलत असतानाच सत्ताधारी सदस्यांनी मुनगंटीवार यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुनगंटीवार यांनी देशमुखांवर केल्या जात असलेल्या कारवाईचा सभागृहात उल्लेख केला. यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. हे कारवाईचे विधान संसदीय कामकाजातून वगळावे, अशी मागणी पटोले यांनी केली. मुनगुंटीवारांच्या देशमुखांवरील कारवाईच्या उल्लेखानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला.

आता सरकारी विमा कंपन्यांचेही होणार खाजगीकरण ! केंद्र सरकार करत आहे कायद्यात सुधारणा करण्याची तयारी

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे (PSUs) खासगीकरण (Bank Privatisation) करण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सामान्य विमा कंपन्यांच्या खासगीकरणासाठीही (Insurance Companies Privatization) योजना आखत आहे. यासाठी केंद्र जनरल विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) अधिनियम (GIBNA) मधील सुधारणांवर काम करत आहे. यासंदर्भातील एक विधेयक (Amendment Bill) संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) मांडले जाऊ शकते.

कायद्यानुसार या शेअर्सचे अधिग्रहण-हस्तांतरण होऊ शकते
19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. जनरल विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) कायदा 1972 मध्ये अस्तित्त्वात आला. याअंतर्गत, भारतीय विमा कंपन्यांचे शेअर्स आणि इतर विद्यमान विमा कंपन्यांच्या उपक्रमांचे अधिग्रहण आणि हस्तांतरण (Share Transfer) करता येईल, जेणेकरुन सामान्य विमा व्यवसायाच्या विकासाद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील. GIBNA मधील दुरुस्ती प्रगतीपथावर आहेत. सामान्य विमा कंपन्यांच्या खासगीकरणास मदत करण्यासाठी हे संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात ठेवता येतील.

केंद्र सरकारने 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे आणि एका सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण जाहीर करण्यात आले. वित्तीय क्षेत्राच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाचा एक भाग म्हणून, सरकारने जीवन विमा कॉर्पोरेशनची इनिशिअल पब्लिक ऑफर (LIC IPO) आणण्याचे आणि आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) उर्वरित हिस्सेदारीची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये भागभांडवलातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

जिवे मारण्याची धमकी देत सैन्य दलातील शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape

औरंगाबाद : माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सैन्य दलातील एका शिपायाने बलात्कार केल्याची घटना 2 जुलैला हॉटेल नंद्राबादनजीक क्रिस्टॉल या ठिकाणी घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मनोज संजय सतूके, वय 21, (रा,दहेगाव .ता कन्नड) हा सैन्य दलात शिपाई आहे. तो सध्या राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील नसिराबाद येथे कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी तो दोन महिन्यांच्या सुट्टीवर आला होता. त्या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगाबाद जवाहर कॉलनीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली त्यानंतर मोबाईल नंबर मिळवला. मला तु खुप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असे बोलून 2 जुलै रोजी खुलताबाद जवळीक नंद्राबादनजीक क्रिस्टॉल हॉटेलमध्ये आरोपीने मुलीला बोलवून घेतले. त्यानंतर या हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघांनी जेवण केले.

यानंतर मनोज तिला बळजबरीने एका रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोणाला सांगितले तर तूला मारून टाकेल अशी धमकी दिली. व बाबा पेट्रोल पंपावर आणून सोडले. घरी आल्यावर घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आरोपीविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर हे करत आहेत.

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Sudhir Mungantiwar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे सरकारला सत्तेत येऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी त्यांना अजूनपर्यंत एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकर या तरुणाने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही यामुळे खचून जाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली आहे.

एमपीएससीमध्ये पदे भरता येत नाहीत. तो मुलगा आईला सांगतो मी प्रिलिम पास केली, मेन पास केली, पण इंटरव्ह्यू झाला नाही आणि आत्महत्या करतो. किती गंभीर विषय आहे. हे कठोर, दगडी मनाचे सरकार आहे. स्वप्निलच्या आईच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुम्ही सभागृहात दाखवा, असे आवाहनदेखील सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला केले आहे.

बच्चूभाऊ तुम्ही बोलू नका…
सुधीर मुनगंटीवार हे स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी बोलायला सुरुवात केली. बच्चूभाऊनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुनगंटीवार यांनी बच्चूभाऊंना तुम्ही बोलू नका, एवढा गंभीर विषय आहे, तुम्ही एवढे संवेदनशील आहात, कृपया तुम्ही बोलू नका, असे आवाहन केले. यानंतर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे शांत झाले.

Rakesh Jhunjhunwala birthday : आजच्या या ‘बिग बुल’ चा 5 हजार रुपये ते 34 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घ्या

मुंबई । राकेश झुंझुनवाला हे नाव तुम्हांला माहित असेलच. भारताचे वॉरेन बफे म्हटल्या जाणार्‍या झुंझुनवालाचा आज 61 वा वाढदिवस आहे. भारतीय टॅक्स अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुंझुनवालाचा बिग बुल बनण्यापर्यंतचा प्रवास एक रोमांचक प्रवास आहे. चला तर मग या बिग बुल विषयी जाणून घेउयात …

1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये महाविद्यालयात असतानाच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरवात केली. त्यावेळी BSE सेन्सेक्स जवळपास दीडशे गुणांवर होता आणि झुंझुनवाला यांनी 5000 च्या भांडवलासह गुंतवणूक करण्यास सुरवात केली. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, राकेश झुनझुनवाला यांची सध्याची संपत्ती 4.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 34,387 कोटी रुपये आहे.

पहिला विजय – 1986 मध्ये तीन महिन्यांत पैसे तीनपट वाढले
Tata Tea मधून राकेश झुंझुनवालाला शेअर बाजारात पहिला विजय मिळाला. सन 1986 मध्ये झुंझुनवालाला 5 लाखांचा नफा झाला. त्यांनी Tata Tea चे 5000 शेअर्स खरेदी केले. पाहता पाहता ते फक्त तीन महिन्यांत 143 च्या पातळीवर पोहोचले. त्यांचे पैसे 3 पटीपेक्षा जास्तीने वाढले.

हर्षद मेहताच्या काळात बिग बुल झुंझुनवाला bear असायचे
आजचे बिग बुल राकेश झुनझुनवाला हर्षद मेहताच्या काळात bear असायचे. Harshad Mehta Scam 1992 नंतर झुंझुनवालाने शेअर्सची विक्री करुन कमाई केली. एका मुलाखतीत झुंझुनवालाने स्वत: सांगितले की, त्यांनी short selling म्हणजेच शेअर्स विकून खूप पैसे कमावले. तेव्हा ते bear cartel चा एक भाग होते. अशाच एका bear cartel चे नेतृत्व मनु माणेक करीत होते, ज्याला ब्लॅक कोब्रा म्हणून ओळखले जाते. यात राधाकिशन दमानी आणि राकेश झुंझुनवाला यांचा समावेश आहे. हर्षद मेहतावर बनलेल्याScam 1992 या वेब सीरिजमध्येही या सर्वांचा उल्लेख आहे. 1992 मध्ये पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणला, त्यानंतर शेअर बाजार कोसळला.

RARE Enterprises: ‘Ra’ म्हणजे राकेश आणि ‘Re’ म्हणजे रेखा
1987 साली राकेश झुंझुनवालाने रेखा झुंझुनवालाशी लग्न केले. त्या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार होत्या. 2003 साली राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची शेअर ट्रेड फर्म रेअर एंटरप्राइजेस सुरू केली. स्वत:च्या आणि पत्नीच्या नावातील अध्याक्षरे एकत्र करून हे नाव देण्यात आले.

राकेश झुनझुनवालाच्या 37 stocks ची किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये आहे
31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत राकेश झुंझुनवाला आणि त्यांच्या associates च्या 37 stocks मध्ये होल्डिंग्स आहेत. यामध्ये Titan Company, Tata Motors, Crisil, Lupin, Fortis Healthcare, Nazara Technologies, Federal Bank, Delta Corp, DB Realty आणि Tata Communications या प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांची नेट वर्थ 19,695.3 कोटी रुपये आहे. यात त्यांचे सर्वात मूल्यवान शेअर्स म्हणजे watch and jewellery maker Titan Company ( 7,879 करोड़ रुपये), Tata Motors ( Rs 1,474.4 crore), Crisil (Rs 1,063.2 crore) आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

स्पर्धापरिक्षेच्या पलीकडेही एक जग असते, IAS अधिकार्‍यांची ‘ही’ व्हायरल पोस्ट एकदा वाचाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फेसबुक पोस्ट द्वारे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करत विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान ठेवन्यास सांगितले आहे. शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते याची जाणीवही त्यांनी यावेळी युवकांना करून दिली.

काय आहे कौस्तुभ दिवेगावकर यांची फेसबुक पोस्ट –

मी माझा upsc चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही Hero नाहीत. आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे असे कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हंटल.

SBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही. मुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून BA ची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही. पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले.

आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल. आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० % गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९% असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत.

यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल. त्या तरुण मित्रास आदरांजली अशा शब्दांत कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.