विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा असा ठराव मांडला. पण त्यांना ठराव मांडू न दिल्याने भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. छगन भुजबळ ठराव मांडत असताना अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रागाच्या भरात हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.

यानंतर भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन माईक खेचण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर भास्कर जाधव जेव्हा दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आल्यानंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment