Saturday, December 20, 2025
Home Blog Page 3928

तेव्हा माझा ‘हा’ सल्ला ऐकला असता तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते- रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदाच्या वादातून शिवसेना आणि भाजप मधील 25 वर्षाची युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बळावर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. दरम्यान, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हंटल.

आठवले म्हणाले, सत्तासंघर्षाच्या काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका. त्यांनी तेव्हा माझं ते म्हणणं ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. तसेच तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं तोंडभरून कौतुक केले. कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी उत्तम काम केलं. कोरोनाच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे…’, अशा शब्दात आठवलेंनी राजेश टोपे यांना शाबासकी दिली.

सीरियामध्ये बाल सैनिकांच्या भरतीच्या अहवालाबाबत तुर्कीचा अमेरिकेवर आरोप, पाकिस्तानही झाला नाराज

नवी दिल्ली । सीरियात बाल सैनिकांची भरती करणार्‍या सशस्त्र मिलिशियाला ऑपरेशन, उपकरणे आणि आर्थिक पाठबळ मिळाल्याबद्दल टीका करणाऱ्या मानवी तस्करीच्या अमेरिकेच्या अहवालाचा तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, बाल सैनिकांचा वापर करणार्‍या 15 देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. सीरियन कुर्दिश अतिरेक्यांसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याकडे लक्ष वेधत अमेरिकेचे दुहेरी निकष आणि ढोंगीपणाबाबतही आरोप या निवेदनात केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. त्याच दिवशी तुर्कीची प्रतिक्रियाही आली. या लिस्टमध्ये इतर देशांच्या नावांमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यांनीही याचा इन्कार केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने याला वस्तुस्थितीची चूक म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेला या आरोपांचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे.

तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते हा दावा पूर्णपणे नाकारत आहेत आणि त्यांचे रेकॉर्ड शुद्ध आहेत. सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस अंतर्गत बालकांची भरती आणि शोषण करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचा अहवालही या निवेदनात नमूद करण्यात आलेला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने बाल सैनिकांच्या वापराबद्दल तुर्की आणि अन्य 14 देशांचा हवाला दिला. अशा या लिस्टमध्ये नाटोच्या सहयोगी संघटनेस पहिले स्थान देण्यात आले. जेव्हा अमेरिका एखाद्या देशाला या लिस्टमध्ये स्थान देते, तेव्हा तो देश अनेक अमेरिकन कार्यक्रमांपासून वंचित राहतो. पाकिस्तान म्हणतो की, अमेरिकेने हा अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी कोणत्याही संघटनेशी सल्लामसलत केलेली नाही.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Suside at Home
Suside at Home

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने ‘मम्मी-पप्पा मला माफ करा’ असे वाक्य वहीच्या पानावर लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी 8 वाजेच्या सुमारास घडली. अद्याप तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अंजली काकासाहेब जाधव, वय 21 वर्ष असे मृत तरुणीचे नाव आहे. अश्विनीचे वडील अंतरवाली खांडी, ता. पैठण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. अंजलीनेही नुकतेच पूर्ण केले होते. घरातील सदस्य अंगणात बसल्याचे पाहून अंजलीने घरात गळफास घेतला. आठ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य जेवण करण्यासाठी घरात गेले असताना त्यांना अंजलीने गळफास घेतल्याचे घरच्यांचा निदर्शनास आले.

दरम्यान, घरातील सदस्यांच्या रडण्याच्या आवाजाने शेजारील नागरिक धावत आले. पाचोड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. अंजलीला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मनात प्रामाणिकपणा असेल तर चळवळीला यश मिळते; धनंजय मुंडे यांची संभाजीराजेंवर टीका

बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरत आहे. सुप्रीमकोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे मराठा समाजात आता आक्रोश निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी संभाजीराजे शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते.

या दौऱ्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही?’ त्यावर संभाजीराजे म्हणाले, ‘प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा’.त्यामुळे संभाजीराजे यांच्या मनात नेमके काय चालले आहे यावर चर्चा होत आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले, मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजप सोडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर भानुसे यांनी खा. भोसले यांना दिलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी संभाजीराजेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री मुंडे यांनी परळीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणे कोणाच्याच मनात येऊ नये’, असे मुंडे म्हणाले.

‘लोकांच्या भावनिक गोष्टींच्या आधारे चालविली जात आहे KBC’, या आरोपावर निर्माता काय म्हणाला ते जाणून घ्या

मुंबई । टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय क्विझ शो कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) ने शनिवारी म्हणजेच 3 जुलै रोजी 21 वर्षे पूर्ण केली. अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या या गेम शोने आतापर्यंत अनेक लोकांना श्रीमंत केले आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, त्यासह विजयाची रक्कमही वाढते आणि अंतिम रक्कम 7 कोटी रुपये आहे. या शोने लोक लखपति, करोडपती बनवताना अनेकांच्या दुःखद कहाण्याही प्रेक्षकांसमोर ठेवल्या. अशा परिस्थितीत निर्माते लोकांच्या दुःखद कथा दाखवून शो विकत असल्याचा आरोप या शोवर करण्यात आला.

या 21 वर्षात कौन बनेगा करोडपती यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. यावर आता शोच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शोचे निर्माते सिद्धार्थ बासू यांनी ‘शोकाच्या माध्यमातून हा शो विकणे आणि TRP चार्टमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करणे’ अशा आरोपाबाबत भाष्य केले आहे. इंडियन एक्सप्रेसशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले,”केबीसी हा केवळ एक क्विझ शो कधीच नव्हता. मानवी कहाणी नेहमीच महत्त्वाची ठरते आणि यामुळे पहिल्या हंगामात भारतात खळबळ उडाली, ज्याच्या आधारे विकासने त्याचे पुस्तक Q & A लिहिले. ‘

सिद्धार्थ म्हणतो कि- ‘तथापि केवळ भावनाप्रधान कथा केबीसीवर कधीच केल्या गेलेल्या नाहीत. जर लोक भावुक झाले तर ते आम्ही केले नाही. हा एक लाइफ चेंजिंग शो आहे, ज्यात एक मोठा प्रेक्षकवर्ग आणि लार्जर दॅन लाइफ होस्ट उपस्थित आहे. शोमध्ये लोकं भावुक होणे स्वाभाविकच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक लोकं केबीसीमध्ये सामील झाले आहेत, जे त्यांची सामान्य भारतीय असल्याची कथा सांगतात. हा एक असा कार्यक्रम आहे जो केवळ मनालाच नव्हे तर हृदयालाही स्पर्श करतो.”

कौन बनेगा करोडपती 13 वा सीझन लवकरच टीव्हीवर येण्यास तयार आहे. पार्टिसिपेंट्सनी मे महिन्यातच या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी भाग घेतला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

समृद्धी बोगद्याच्या कामामुळे ग्रामस्थ त्रस्त; 1 भिंत कोसळली, 9 घरांना तडे

Samrudhi bogada work
Samrudhi bogada work

औरंगाबाद | सावंगी (हर्सूल) गावाजवळ असलेल्या कोलठाण या ठिकाणी होत असलेल्या समृद्धी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी जिलेटिनच्या काड्यांनी ब्लास्टिंग करण्यात आली. या ब्लास्टिंगमुळे एका घराची भिंत कोसळली असून 9 घरांना तडे पडले आहेत. याबाबत त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार केली परंतु एक महिना उलटला तरीही एमएसआरडीसीने तपास सुद्धा केलेला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील 112 किलोमीटर लांबीचा ‘सुपरफास्ट एक्सप्रेस वे’ म्हणजेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. लॉकडाऊनमुळे चौदा महिन्यापासून या रस्त्याचे काम खोळबले होते. कोलठाणा या गावातून हा मार्ग जात असून या गावाच्या पश्चिमेला डोंगर फोडून तर पूर्वेला असलेल्या डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे दोन डोंगर फोडण्यासाठी कंत्राटदार कंपनीने जिलेटिनच्या काड्यांचे स्फोट घडवले 30 मे रोजी पश्चिमेकडील असलेल्या डोंगराला स्फोट घडवून आणला त्याचवेळी गावातील घरांना जोरदार हादरे बसले. आणि यागावात असलेल्या संतोष जगदाळे यांच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली.

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी ग्रामस्थांनी एमएसआरडीसीकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. त्यानंतर अधिकारी कर्मचारी येऊन पाहणी करतील, कंत्राटदार कंपनीला जिलेटिनच्या वापराबाबत काही निर्देश देतील. अशी अपेक्षा होती. परंतु आता तक्रार करूनही महिना झाला आहे. तरीही एमएसआरडीसीने या गावात पाय ठेवलेला नाही. तसेच सुखदेव दौंड, कचरू भालेराव, धोंडीराम भालेराव, प्रभाकर श्री सुंदर, भानुदास अधाने, मनोज जनार्दन जगदाळे यांच्या घरांना तडे गेले आहे. 30 मे रोजी ब्लास्टिंग वेळी घरांना तडे गेल्यानंतरही दोन्ही डोंगरांमध्ये ब्लास्टिंग सुरूच आहे. यामुळे या ठिकाणी राहणारे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPSC ला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे; फडणवीसांची सरकारवर टीका

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हंटल.

फडणवीस म्हणाले, एमपीएसीची एकूणच जी कार्यप्रणाली आहे, याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती होत नाहीत. आज तिथल्या अनेक जागा देखील रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स देखील आपण भरलेले नाहीत. मला असं वाटतं हे योग्य नाही. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी खडेबोल सुनावले.

स्वप्नीलचा आत्महत्या म्हणजे ठाकरे सरकारने केलेला मर्डर- राणे

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेनंतर सरकारवर गंभीर आरोप केला आहे. निलेश राणे ट्विट करत  म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने केलेली ही मर्डर आहे. हे सरकार स्वतःच्या मस्तीत असल्यामुळे त्यांचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही. एमपीएससी हा विषय इतक्या वेळा ऐरणीवर येऊन सुद्धा राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

Amazon चे संस्थापक जेफ बेझोस उद्या देणार आपल्या सीईओपदाचा राजीनामा, आता पुढे काय करणार आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । ऑनलाइन बुक स्टोअर म्हणून अ‍ॅमेझॉनची (Amazon) सुरुवात करणारे आणि त्याला शॉपिंगच्या जगतातील दिग्गज बनवणारे जेफ बेझोस (Jeff Bezos) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीनामा देणार आहेत. सोमवारपासून (5 जुलै) ते यापुढे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार नाहीत. अ‍ॅमेझॉनचा क्लाऊड कंप्यूटिंग व्यवसाय चालवणारे अँडी जॅसी आता बेझोसची जागा घेतील.

तथापि, जवळपास 30 वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन भूमिका घेतील. बेझोसने फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच सांगितले होते की,” इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडायचे आहे.”

बेझोस स्पेस फ्लाइटच्या मोहिमेवर काम करत आहेत
बेझोस आता नवीन क्षेत्रावर लक्ष देतील. बेझोस आता स्पेस फ्लाइटच्या (Space Flight) मोहिमेवर काम करत आहेत. या महिन्यात चालवल्या जाणार्‍या ‘ब्लू ओरिजिन’ (Blue Origin) कंपनीच्या पहिल्या स्पेस फ्लाइटमध्ये ते जातील.

20 जुलै रोजी न्यू शेफर्ड अंतराळ यान अंतराळात उड्डाण करणार आहे
नुकतेच बेझोसने इंस्टाग्रामवर सांगितले की,” ते, त्यांचा भाऊ आणि लिलावातील विजेत्यांपैकी एक ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेफर्ड’ अंतराळ यानातून 20 जुलै रोजी उड्डाण करणार आहे. या ट्रिपमध्ये टेक्सास येथून अवकाशात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाईल. अपोलो 11 च्या चंद्रावर गेल्याचा वर्धापनदिन देखील 20 जुलै रोजी साजरा केला जातो.

बेझोसने इन्स्टाग्रामवर सांगितले की, “अवकाशातून पृथ्वीकडे पाहिले तर ते तुम्हाला बदलते, या ग्रहाशी असलेला तुमचा संबंध बदलतो. मी या फ्लाइटमध्ये चढू इच्छित आहे कारण मला आयुष्यात नेहमीच असे करायचे होते. तो एक थरार आहे. जो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

एकाच साडीने गळफास घेत दोन बहिणीची आत्महत्या

Suside
Suside

लातूर | नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करून धमकी दिल्याने राहत्या घरी दोन सख्ख्या मावस बहिणीने एकाच साडीने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील विश्वकर्मा कॉलनी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गीतांजली दत्तात्रय बनसोडे, वय 17 वर्षे आणि धनश्री संतराम शिरसागर, वय 30 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या मुलींची नावे आहेत. गीतांजली व धनश्री या धनश्रीच्या घरी एकत्र राहत होत्या. काही दिवसापूर्वी त्या घरातून न सांगता निघून गेल्या होत्या. शोध घेऊनही न सापडल्याने हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

तीन दिवसापूर्वी त्या स्वतः पुणे येथून त्यांच्या घरी परतल्या होत्या. मात्र शनिवारी सकाळी गीतांजली व धनश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तात्रय बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंकज सुतार (रा. गोविंदनगर लातूर) विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठाकरे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट ; नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल

maratha aarakshan 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढत आहे. दरम्यान सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली.

राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असंही नरेंद्र पाटील म्हणाले.