Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4615

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे.

श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे जीव वाचतील.

तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ही परिस्थिती भयावह आहे, अशी टीका श्वेता महाले यांनी सरकारवर केली आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

देवेंद्र फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते, त्यामुळेच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही ; राऊतांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली.

महाविकासआघाडी सरकारने सुचविलेल्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून आम्ही अभ्यास करतोय, असे सांगितले जात आहे. बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी पीएचडी करत असावेत. तसेच 12 आमदारांची नावं किती जास्त काळ मांडीखाली दाबून ठेवता येतील, याचा विक्रम राज्यपालांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा असेल, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

कोरोना नियमांचं उल्लंघन, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील…

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक नसल्यास पेट्रोल देण्यावर निर्बध आहे. अस असताना देखील बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप येथे कोरोना नियमांचं उल्लंघन करत अनेक नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी जमली होती.

यावेळी कोरोना नियमांच पालन होतय का ? हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे शहराचा फेरा मारत होते, त्यावेळी पेट्रोल पंप वर होणार नियमांचं उल्लंघन निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Stock Market Today: बाजारात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स 437 अंकांनी खाली तर निफ्टी 14420 च्या जवळ आला

नवी दिल्ली । आज जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेताने भारतीय बाजारात विक्री सुरू आहे. बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 437.99 अंकांच्या घसरणीसह 48,742.32 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक 127.10 अंकांनी घसरत 14,422.30 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. बँक निफ्टीही 297.10 अंकांनी घसरून 32996.20 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे बाजारपेठेतील चिंता देखील वाढली आहे.

जागतिक बाजारपेठेत आज सकाळी काहीसे चांगले संकेत मिळत आहेत. आजच्या व्यवसायात Dow Futures 50 टक्क्यांहून अधिक दिसत आहे. याशिवाय आशियाई बाजारपेठा देखील जोरात सुरू झाल्या आहे. SGX निफ्टी फ्लॅट आहे पण काल ​​अमेरिकेत टेक्नोलॉजी शेअर्समध्ये नफा बुकिंगचा दबाव होता.

सेन्सेक्सचे 30 शेअर्स
आजच्या व्यापारात सेन्सेक्सचे 29 शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करीत आहेत ONGC 0.91 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करीत आहे. या व्यतिरिक्त सर्व शेअर्समध्ये विक्री होत आहे.

टॉप लूजर्स शेअर्स
विक्री शेअर्स विषयी बोलताना,Bajaj Finance 1.77 % घसरणीसह टॉप लूजर्स शेअर्सच्या लिस्टमध्ये आहे. या व्यतिरिक्त Kotak Bank, Maruti, IndusInd Bank, ITC, TCS, HCL Tech, Bajaj Auto, Reliance, HUL, TechM, HDFC Bank, HDFC, Titan, Sun Pharma हे सर्व रेड मार्कवर आहेत.

सेक्टरियल इंडेक्समध्ये विक्री
आज फक्त मेटल सेक्टर ग्रीन मार्कवर ट्रेड करीत आहे. या व्यतिरिक्त सर्वच सेक्टरमध्ये विक्रीचे वर्चस्व आहे. ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, ऑईल अँड गॅस, पीएसयू आणि टेक क्षेत्रात घसरण होत आहे.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्स
स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सही आज रेड मार्कवर आहेत. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 296.53 अंकांनी खाली घसरत आहे. या व्यतिरिक्त मिडकॅप इंडेक्स 268.65 अंकांनी खाली घसरत 19821.88 पातळीवर आला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

सिग्नलिंग यंत्रणेच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द

औरंगाबाद : मध्य रेल्वेने कळविल्यानुसार लोणी रेल्वे स्थानकावर यांत्रिक सिग्नलिंग यंत्रणा काढून त्या ऐवजी इलेक्ट्राॅनिक सिग्नलिंग यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

हे काम करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे कळविल्यानुसार नांदेड रेल्वे विभागातील पुढील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे : रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी संख्या ०७३१४ नांदेड ते पवनेल विशेष मार्गे औरंगाबाद, मनमाड २५ मार्च, २०२१ गुरुवारी नांदेड येथून सुटणारी गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या ०७३१३ पनवेल ते नांदेड विशेष मार्गे मनमाड, औरंगाबाद २६ मार्च, २०२१ शुक्रवारी पनवेल येथून सुटणारी गाडी पूर्णपणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Gold Price Today: आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी झाले स्वस्त, आजच्या किमती जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण सणासुदीच्या हंगामात सोने (Gold price today) किंवा चांदी (Silver Price Today) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchnage) सोन्याच्या किंमती फ्लॅट पातळीवर ट्रेड करीत आहेत. आज, प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 44,897 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमतही सुमारे 0.16 टक्क्यांनी घसरून 65140 रुपयांच्या पातळीवर आली आहे. याखेरीज सोन्याच्या चांदीमध्ये गेल्या व्यापार सत्रात 0.45 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.

जागतिक बाजारपेठेतील संमिश्रित सिग्नल दरम्यान आज सोन्याचे दर फ्लॅट पातळीवर आहेत. अमेरिकेच्या बाजारात आज स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 1,734.81 डॉलरवर स्थिर राहिले.

24 कॅरेट सोन्याची किंमत
देशातील महानगरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत तपासा. दिल्लीमध्ये 24 कॅरेटची किंमत प्रति 10 ग्रॅम 48070 रुपये आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 46150 रुपये, मुंबईत 45030 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46880 रुपये आहेत.

सोने आतापर्यंत 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे
यावर्षी गेल्या काही महिन्यांत सोने 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना लस लागू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की 2021 मध्ये सोन्याच्या किंमती निश्चितच वाढतील. यावर्षी सोन्याचे दर 63,000 च्या पातळीवर जाईल असा अंदाज आहे. जर असे झाले तर गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळण्याची खात्री आहे.

दिल्ली सराफा बाजाराचे दर
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 149 रुपयांची किंचित घट झाली, त्यानंतर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,499 रुपयांवर पोचले. त्याचबरोबर चांदी 64,607 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

औरंगाबादमध्ये शंभर टक्के लाॅकडाऊन लावायचा की नाही; आज होणार निर्णय

aurangabad

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. रोज एक हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर चार-पाच दिवसांत बळींचा आकडाही शंभरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पुन्हा शंभर टक्के लॉकडाऊन लावण्यावर प्रशासन विचारविनिमय करत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त, मनपा प्रशासक व जिल्हाधिकारी यांच्यात बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तासभर बैठक झाली. यात लॉकडाऊन लावायचा की निर्बंध आणखी कडक करायचे, याबाबत चर्चा झाली. आज पालकमंत्री सुभाष देसाई शहरात येत असून त्यांच्याशी चर्चा करूनच लॉकडाऊनबाबात अंतिम निर्णय घेण्याबाबत तिन्ही अधिकाऱ्यांचे मतैक्य झाल्याची माहिती आहे. शहरात सध्या रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तसेच शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे. तरीही कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी कठोर उपाययोजना करण्याबाबत विचार केला जात आहे.

लोकप्रतिनिधींशी करणार चर्चा खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचा शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यास विरोध आहे. मात्र, १० मार्चपासून अंशत: लाॅकडाऊनचा निर्णय घेताना जिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांनी एकाही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आता पालकमंत्र्यांप्रमाणे स्थानिक आमदार, खासदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Petrol-Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, आज किंमत कितीने कमी झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price)  कमी करण्यात आल्या आहेत. आज डिझेल 20 आणि पेट्रोल 21 पैसे स्वस्त झाले आहेत. यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.78 रुपये आहे तर डिझेलची किंमत 81.10 रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 97.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.20 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत दिल्लीत पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमती खाली आल्या
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 15 दिवसांत 10% खाली आल्या आहेत. युरोपमधील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे तेथे इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर च्या वरून 64 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे.

फेब्रुवारीमध्ये इतके महागले होते
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 4 ते 5 रुपयांची वाढ केली. परंतु, 26 फेब्रुवारीनंतर क्रूडच्या किंमतीत 8 डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे, परंतु या कालावधीत फक्त 27 फेब्रुवारी रोजी थोडीशी वाढ झाली आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 90.78 रुपये तर डिझेल प्रति लिटर 81.10 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 97.19 रुपये तर डिझेल प्रति लिटर 88.20 रुपये आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 91.18 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 84.18 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 92.77 रुपये तर डिझेल 86.10 रुपये प्रति लिटर आहे.
>> बेंगळुरूमध्ये पेट्रोल 93.82 रुपये आणि डिझेल 85.74 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळमध्ये पेट्रोल 98.81 आणि डिझेल 89.37 रुपये प्रतिलिटर आहे.
>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.36 रुपये तर डिझेल 80.80 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रीवर धरणे धरण्यास जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार (दि.२५) आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या शाब्दिक वादावादी झाली.

राजू शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री आपल्या कारखान्याचे एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देत नसतील तर इतर कारखानदारांकडून काय अपेक्षा करायची असा सवाल शेट्टी यांनी यापूर्वीच उपस्थित केला होता. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांनी एफआरपी रक्कम लवकरात लवकर द्यावी, अन्यथा २५ मार्च पासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर धरणे धरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज कारखाना स्थळाकडे जात असताना, मसूर गावाजवळ  त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.

धरणे धरण्यास निघालेल्या कार्यकर्त्यांनी उस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांना पेपर पी रक्कम मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज पासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर एफआरपीचे पैसे मिळण्यासाठी मी बसणार आहे, तुम्ही या असे अवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

कोरोना नियमांचं उल्लंघन : बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील

Petrol Pump

औरंगाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक नसल्यास पेट्रोल देण्यावर निर्बध आहे. अस असताना देखील बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप येथे कोरोना नियमांचं उल्लंघन करत अनेक नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी जमली होती.

यावेळी कोरोना नियमांच पालन होतय का ? हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे शहराचा फेरा मारत होते, त्यावेळी पेट्रोल पंप वर होणार नियमांचं उल्लंघन निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group