Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4617

दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दररोज किमान एक ते दीड हजार रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा देखील पुरती कोलमडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटी ) व जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटा फुल्ल झाल्या आहेत. परिणामी एकाच खाटावर तीन ते चार रुग्णांवर उपचार केले जात आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. वयाने कमी असलेले लोक देखील मृत्यूमुखी पडत आहे.

या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील ८५ टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत. यामुळे ८५ टक्के रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून देखील उपचार केले जाऊ शकतात. केवळ १५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. असेही पाण्डेय म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

तीन हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारा मध्ये करण्यासाठी तलाठ्याने चार हजारांची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने देवळाई येथील तलाठ्यास रंगेहात अटक केली आहे.भरत दत्तू दुतोंडे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

एसीबी कार्यालयाकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, देवळाई बीड बायपास भागात तक्रारदाराने नवीन प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लॉटची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराने देवळाई येथील तलाठी कार्यालयात अनेक चकरा मारल्या मात्र त्यांचे काम होत नसल्याने त्यांनी तलाठी दुतोंडे यांची भेट घेतली असता त्यावेळी दुतोंडे यांनी सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली.…

पथकाने आज कार्यालयात सापळा रचला असता तडजोडी अंती दुतोंडे यांनी तीन हजार रुपये स्वीकारले. तक्रारदाराने इशारा करताच पथकाने दुतोंडे यांना ताब्यात घेतले या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार,उप अधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, अरुण उगले, दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागून यांच्या पथकाने केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

केवळ 7 दिवसच शिल्लक आहेत … PAN-Aadhaar 31 मार्चपर्यंत लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा आकारला जाईल दंड

adhaar Card Pan Card Link

नवी दिल्ली । आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आपले पॅन कार्ड 1 एप्रिलपासून इनएक्टिव्ह होऊ शकते, जर आपण ते आपल्या आधार कार्डशी लिंक केले नाही.

पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने कित्येक वेळा वाढविली आहे. सध्या आपण ही लिंक 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करू शकता. प्राप्तिकर अधिनियमान्वये जर पॅनकार्ड निर्धारित कालावधीत आधारशी जोडले गेले नाही तर दंड भरावा लागेल.

1. आपण वेबसाइटद्वारे लिंक कसे करू शकतो?
>> पहिले इनकम टॅक्स वेबसाइटवर जा
>> आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक एंटर करा
>> आधार कार्डमध्ये, जन्माच्या वर्षाचा उल्लेख केल्यावर फक्त चौकोनावर टिक करा
>> आता कॅप्चा कोड एंटर करा
>> आता Link Aadhaar वर क्लिक करा
>> आपला पॅन आधारशी जोडला जाईल.

2. SMS पाठवून पॅनला आधारशी जोडण्याची पद्धत
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर टाइप करावा लागेल- यूआयडीपीएएन, त्यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि नंतर 10-अंकी पॅन नंबर लिहा. आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.

इनएक्टिव्ह पॅन ऑपरेटिव्ह कसे करावे ?
इनएक्टिव्ह पॅन कार्ड ऑपरेटिव्ह करत येऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS करावा लागेल. आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवरून 12-अंकी पॅन नंबर प्रविष्ट एंटर केल्यानंतर, आपल्याला 10-अंकी आधार क्रमांक एंटर करावा लागेल आणि मेसेज बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Stock Market Today: सेन्सेक्समध्ये 871 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटींचे नुकसान; बाजारात का विक्री झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात वाढत्या कोरोना प्रकरणांचा फटका पुन्हा एकदा बाजारावर पाहायला मिळत आहे. आज दिवसभरातील व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 871 अंकांनी घसरून 49180 च्या पातळीवर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक 265 (BSE Nifty) अंक घसरून 14549 च्या पातळीवर आला आहे. आजच्या विक्रीनंतर गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत.

सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्स पैकी फक्त 2 शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. याशिवाय 28 शेअर्स मध्ये विक्री दिसून आली आहे. आजच्या व्यापारानंतर, एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीडचे शेअर्स वाढले आहेत.

शेअर्स विकले

याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी, ओएनजीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, टीसीएस, एचयूएल आणि आयटीसीच्या शेअर्स मध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.

सेक्टरल इंडेक्समध्ये झाली विक्री

सेक्टरल इंडेक्स बद्दल बोललो तर सर्व क्षेत्रे आज रेड मार्क बंद आहेत. ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, पीएसयू या सर्व कंपन्यांच्या विक्रीवर वर्चस्व आहे.

स्मॉलकॅप-मिडकॅप इंडेक्स

स्मॉलकॅप-मिडकॅप आणि सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सही रेड मार्क वर बंद झाले. स्मॉलकॅप इंडेक्स 332.13 अंकांनी घसरत 20440.92 च्या पातळीवर बंद झाला आहे. मिडकॅप इंडेक्स 344.70 अंकांनी घसरून 20090.53 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याशिवाय सीएनएक्स इंडेक्स 473.40 अंक घसरून 23335.00 च्या पातळीवर बंद झाला आहे.

लॉकडाउननंतर Personal Loan ची मोठी मागणी, 25% लोकांनी सुरू केला स्वत: चा व्यवसाय

नवी दिल्ली । देशात Personal Loan ची मागणी वेगाने वाढत आहे. मुंबईत 25 टक्के लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्सनल लोन घेण्याचे निवडले आहे. त्याच वेळी, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदीसाठी 17 टक्के लोनसाठी अर्ज होते. त्याच वेळी, कोरोना काळातील वर्क फ्रॉम होममुळे, 15 टक्के लोकांनी लॅपटॉप, टॅब्लेट सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस खरेदीसाठी लोन घेतले. बॉरोअर पल्स रिपोर्ट बाए इंडियालेंड्स (Borrower Pulse Report by Indialends) च्या रिपोर्टमधून हे तथ्य समोर आले आहे.

इंडियालेंड्स हे एक आधुनिक डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म आहे जो एक वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या काळापासून कर्जदाराच्या वागणुकीचा स्टडी करीत होता. हा देशव्यापी स्टडी 25 मार्च 2020 ते 20 मार्च 2021 दरम्यान पहिल्या आणि द्वितीय श्रेणी शहरांमध्ये घेण्यात आला आणि 21 ते 55 वर्षे वयोगटातील 1.5 लाख कर्जदारांच्या आकडेवारीवर आधारित आहे.

25% लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला
या देशव्यापी आकडेवारीनुसार 25 टक्के लोकांनी स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्सनल लोन घेतले तर 18 टक्के लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी लोन घेतले आणि 17 टक्के लोकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहन विकत घेतले आणि त्यापैकी बहुतेक लोन हे कोविड 19 साथीच्या आजाराच्या आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे घेतले गेले.

दिल्ली एनसीआर प्रदेशात सर्वाधिक लोनसाठी अर्ज आले होते, तर दुसऱ्या स्तरीय शहरांमध्ये कर्जाच्या अर्जांमध्ये 38 टक्के वाढ दिसून आली. लक्झरीवरील खर्च कमी झाल्यामुळे प्रथम स्तरीय शहरांमधून कर्जाचे अर्ज कमी केले गेले.

कोणत्या राज्यातील लोकांनी जास्तीत जास्त कर्ज घेतले ते पहा

>> दिल्लीमध्ये 3 टक्के कर्जाचे अर्ज हे वॉशिंग मशिन आणि डिशवॉशर सारख्या घरगुती वापराच्या वस्तू खरेदीसाठी करण्यात आले आहेत, तर 25 टक्के कर्जाचे अर्ज महामारीमुळे उघडकीस आलेल्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी करण्यात आले आहेत.

>> बंगळुरूमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 28 टक्के कर्जाचे अर्ज आले, तर 12 टक्के कर्जाचे अर्ज स्वतःची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोर्स करण्यासाठी आले. याचा अर्थ असा आहे की, अनेक लोकांनी या मोकळ्या वेळेचा उपयोग स्वत: ची कार्यक्षमता वाढविण्यासाठी केला.

>> 19 टक्के कर्जाचे अर्ज चेन्नईमध्ये दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदीसाठी आले होते, तर 17 टक्के लोकांनी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी कर्जाची मागणी केली.

>> हैदराबादमध्ये 20 टक्के लोकांनी वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी कर्जाची मागणी केली, तर 15 टक्के लोकांनी आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोर्स करण्यासाठी कर्ज मागितले.

इंडियालेंड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव छपरा म्हणाले की, “कोविड १९ या जागतिक साथीच्या आजारांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने गेल्या 12 महिन्यांपूर्वी आपल्या जीवनातील सर्वात कठीण परिस्थिती बनवली आहे. आर्थिक मंदी आणि नोकरी गमावल्यामुळे बर्‍याच जणांना हा मोठा धक्का बसला. तथापि, इंडियालेंड्स बाॅरोअर प्लस रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की,” नवीन पिढीने त्यांचे आर्थिक भविष्य पूर्णपणे नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मोठे सामर्थ्य दाखविले.”

साथीच्या नंतर, आर्थिक परिस्थिती वेगाने बदलेल
इतक्या मोठ्या संख्येने व्यवसाय सुरू करण्याचे धैर्य दाखवून जागतिक साथीच्या काळात उद्योजकताही चव्हाट्यावर आली आहे आणि ही अतिशय सकारात्मक परिस्थिती आहे. हे पाहून देखील आनंद झाला की, कर्जाचे बरेच अर्ज हे दुसऱ्या स्तरीय शहरांतून आले आहेत. या अस्पृश्य बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे हे स्पष्टपणे दर्शवते. आमचा अभ्यास मला खात्री देतो की,” जागतिक महामारी नंतर आर्थिक परिस्थिती वेगाने बदलेल. ”

मनोरंजक बाब अशी आहे की,”46 टक्के कर्जाचे अर्ज हे पहिल्या स्तरीय शहरांमधून आले आहेत, तर दुसऱ्या स्तरीय शहरांकडून 54 टक्के कर्जाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. दुसर्‍या स्तरावरील शहरांमध्ये सर्वाधिक कर्जाचे अर्ज कोयंबटूर, चंडीगड, लखनऊ, इंदूर आणि कोची येथून आले आहेत. या सर्वेक्षणातील इतर प्रमुख निष्कर्षांमध्ये असेही समोर आले आहे की, लग्न आणि प्रवासाच्या खर्चात घट झाली आहे. हे दर्शविते की, नवीन पिढी आता कमी किमतीच्या विवाह आणि बजेटवर फिरायला प्राधान्य देत आहे.”

स्टडीमध्ये सामील झालेले सुमारे 52 टक्के कर्जदार हे 25 ते 35 या वयोगटातील होते, अशाप्रकारे हा रिपोर्ट नवीन पिढीवर आधारित रिपोर्ट होता. या रिपोर्टमध्ये त्या पुरुष आणि महिला कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे, जे 10 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज शोधत होते.

इंडियालेंड्स बद्दल
इंडियालेंड्स एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे जी क्रेडिट उत्पादने, विमा आणि फ्री क्रेडिट रिपोर्ट देतात. इंडियालँड्सने अलीकडेच डिजिटल लेन्डिंग 2.0 लॉन्च केले आहे, टचलेस आणि नॉन-कॉन्टॅक्ट उत्पादनांची श्रेणी, ज्यात लोन, विमा आणि लाइन ऑफ क्रेडिटचा समावेश आहे. वेब आणि मोबाइल दोन्हीवर उपलब्ध, इंडियालेंड्स आपल्या ग्राहकांना इन्स्टंट क्रेडिट देते ज्यात बहुतेक उत्पादने पूर्णपणे डिजिटल आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

जिल्ह्यात आणखी नऊ कोविड केअर सेंटर सुरू, जिल्हा परिषद आरोग्य विभागाची माहिती …

औरंगाबाद | शहरात दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात आणखीन नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत दोन हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दर दिवशी तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यात औरंगाबाद, गंगापूर, कन्नड वैजापूर, पैठण तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात रुग्णांना त्याच ठिकाणी योग्य उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून आणखी नऊ सेंटर सुरू केले आहेत.

या अगोदर 15 covid-19 केअर सेंटर सुरू होते. त्यात नवीन 99 सेंटर सुरू करण्यात आले आहेत, नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये औरंगाबाद दिल्ली पब्लिक स्कूल शरणापूर, वैजापूर शासकीय मागासवर्गीय मुलींची निवासी शाळा, फुलंब्री तालुक्यात राजश्री शाहू पाथरी, गंगापूर तालुक्यात राजापूर सैनिक स्कूल, सिद्धांत वडगाव कन्नड तालुक्यात विनायकराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

पेट्रोल आणि डिझेलला GST अंतर्गत आणणे कठीण होणार, त्यासाठी 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागेल; जाणून घ्या

नवी दिल्ली । बुधवारी राज्यसभेत भाजप नेते सुशील कुमार मोदी म्हणाले की,” पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कर (GST) अंतर्गत येत्या आठ ते दहा वर्षांत आणणे शक्य नाही कारण यामुळे राज्यांना दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल.” सुशील कुमार मोदी यांनी वरच्या सभागृहात वित्त विधेयक 2021 च्या चर्चेत भाग घेताना सांगितले की,”केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे पेट्रोलियम उत्पादनांवर पाच लाख कोटी रुपये मिळवतात.”

त्यांचे विधान खूप महत्वाचे आहे कारण काही राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपये झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी होत आहे.

राज्यांचे 2 लाख कोटींचे नुकसान होईल
पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मागणीचे वर्णन करताना भाजप नेते म्हणाले की,” यामुळे राज्यांना सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल आणि त्याची भरपाई कशी होईल.” ते पुढे म्हणाले की,”पुढील आठ ते दहा वर्षांसाठी जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आणणे शक्य नाही कारण यामुळे दरवर्षी राज्यांना दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल.”

राज्य आणि केंद्राला किती रुपये मिळतात?
ते म्हणाले की,” सध्या जीएसटीमधील कराचा जास्तीत जास्त दर 28 टक्के आहे. आतापर्यंत 60 रुपयांवर 100 रुपयांवर कर आकारला जातो. या 60 रुपयांमधील केंद्राला 35 रुपये आणि राज्यांना 25 रुपये मिळतात. याशिवाय केंद्र सरकारच्या 35 रुपयांपैकी 42 टक्केही राज्यांनाच मिळतात.

भाजपा सदस्य म्हणाले कि,” जीएसटीला “गब्बरसिंग टॅक्स” असे संबोधले जात होते आणि नवीन यंत्रणेवर टीका केली गेली होती, पण कॉंग्रेस शासित राज्यांनी जीएसटी बैठकीत कधी विरोध दर्शविला नाही.” ते पुढे म्हणाले की,” जीएसटी परिषदेत राज्यात जीएसटीच्या कर संरचनेचा त्यांनी विरोध केला. जीएसटी परिषदेच्या कार्यवाहीद्वारे याची पुष्टी होऊ शकते.” ते असेही म्हणाले की,” याची अंमलबजावणी करणे हि धैर्याची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने ते अंमलात आणले आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

यंदाही होळीवर कोरोनाचे सावट; रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका

औरंगाबाद | होळी सण हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. अनेकजण मोठ्या उत्साहात होळी सण सामूहिकरित्या साजरा करतात. मोठ्या प्रमाणावर शहरात रंगांची उधळण करत विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना देखील दिसते. परंतु त्यावर देखील आता मयार्दा आल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि होळीवर कोरोनाचे सावट पसरले. तेच सावट यंदाही कायम असून रंग विक्रेते, पिचकाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.

मागील वर्षी कोरोनाने सर्वत्र विळखा घातला होता. त्यामुळे धुलीवंदन अगदी साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते त्यामुळे सर्वच व्यवसाय पूर्वपदावर येत होते. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे त्यामुळे चिंता तर वाढली आहेतच. मात्र याशिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन आणि शनिवारी आणि रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे यंदा देखील होळी अगदी साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. धुलीवंदनाच्या निमित्ताने दरवर्षी शहरातील ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र मागील वषीर्पासून कोरोनामुळे धुलीवंदनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यंदा देखील कोरोनाचे सावट असल्याने रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांनी रंग आणि पिचकाऱ्या बाहेरून विक्रीसाठी शहरात आणल्या नाहीत. मागील वषीर्चेच रंग, पिचकाºया विक्री झाल्या नाहीत. त्या या वर्षी तरी विक्री होतील अशी अपेक्षा रंग, पिचकाºया विक्रेत्यांना होती. परंतु यंदा देखील मागणी काहीच नसल्याने कोरोनाचे सावट यंदाही धुलीवंदनाच्या सणावर आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान रंग, पिचकाºया विक्रेत्यांचे झाले असल्याची खंत रंग विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मागणी नाहीच : रंग विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धुलीवंदनाच्या सणावर कोरोनाचे सावट पसरलेले आहे. मागील वर्षी देखील रंग विक्री झाला नाही तोच रंग किमान यंदा तरी विक्री होईल असे वाटले होते परंतु आता तर रुग्णांची संख्या प्रतिदिन हजारांहून अधिक वाढत असल्याने यावर्षी देखील धुलीवंदनाच्या सणावर सावट पसरले आहे. रंग आणि पिचकाऱ्याला मागणी नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा पुढच्या वषीर्ची वाट पहावी लागणार असल्याची खंत देखील रंग विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसलेलेही रूग्णालयात, तपासणीसाठी आता समिती गठीत

औरंगाबाद | शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना काही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसतानाही रूग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. यात कुठल्याही प्रकारची लक्षणे नसलेले व ठणठणीत असलेले रूग्ण घाटीसह खासगी रूग्णालयात दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे धनाढ्य लोक पैशाच्या जोरावर तसेच काही जण सेटिंग करून रूग्णालयात जागा मिळवत आहेत. तर काही जण केवळ काढलेल्या इंश्युरन्सचे पैसे मिळावेत, याकरिता खासगी रूग्णालयात दाखल होत आहेत. खुद्द पाण्डेय यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये याचा उल्लेख केला आहे.

शहरातील एमजीएम, धूत, हेडगेवार, वायएसके आदी रूग्णालयांत समिती गठीत करण्यात आली आहे. यात डॉक्टर्स तसेच अधिकाºयांचा समावेश आहे. संबंधित समिती त्या रूग्णालयांची तपासणी करेल, जर त्यात असा प्रकार आढळून आला तर संबंधित रूग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पाण्डेय यांनी दिला आहे.

घाटी रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी, नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश

औरंगाबाद | कोरोनाचा आकडा वाढत असताना  मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्ण तर नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने जाहीर केली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद घाटी रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यात सिडको औरंगाबाद येथील ५९ वर्षीय स्त्री, मुजफ्फरनगर औरंगाबाद येथील ७१ वर्षीय पुरुष, बीड बायपास बंबाटनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, तापडियानगर येथील ७७ वर्षीय पुरुष, पैठण वाडलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, आप्पावाडी, मिटा औरंगाबाद येथील ५१ वर्षीय पुरुष, रशीदपुरा औरंगाबाद येथील ४५ वर्षीय पुरुष, पुंडलिकनगर ६० वर्षीय पुरुष, सिल्लोड आंभी येथील ६० वर्षीय स्त्री, शिवशंकर कॉलनी, पेठेनगर येथील ६० वर्षीय स्त्री, नक्षत्रवाडी औरंगाबाद ७५ वर्षीय पुरुष, जायकवाडी,  पैठण ७० वर्षीय पुरुष, बेगमपूरा ५५ वर्षीय पुरुष, सातारा परिसर, अकोलानगर येथील ४५ वर्षीय पुरुष, रामनगर, मुकुंदवाडी येथील ५७ वर्षीय स्त्री, सिडको एन-४ येथील ३५ वर्षीय पुरुष, गजानन कॉलनी गारखेडा येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

तर नाशिक, मनमाड येथील ६० वर्षीय स्त्री रुग्णाचा देखील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत एकूण ११८२ रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद घाटी रुग्णालयात करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group