Friday, December 19, 2025
Home Blog Page 4914

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ; कृषी कायद्यावरून नारायण राणेंचा काँग्रेसवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात पण त्यांना शेतीमधलं काय कळतं? असा जळजळीत सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर प्रहार केला. तसेच मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत . या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. असे नारायण राणे यांनी म्हंटल आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथ भाजप कडून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले,  पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर, दुसऱ्या बाजूला नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे.

७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. कोण आहेत विरोधक? स्वतः करू शकले नाहीत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. माल कुठं विकायचा? कसा विकायचा? कोणा मार्फत विकायचा? का दलाल मार्फत विकायचा मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. ही गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला याचं शेतकऱ्यांना समाधान मिळालं पाहिजे. म्हणून असा कायदा पंतप्रधान मोदींनी आणला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

बाळासाहेब थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली ; भाजप नेत्याची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचा नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्येच ठिणगी पडली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फेसबुक पोस्ट करत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराला आपला तीव्र विरोध आहे असे स्पष्ट केले आहे.

औरंगाबादच्या नामकरणाला कडाडून विरोध करून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली आहे. मालकीण इटालियन असल्याचे परिणाम दुसरं काय?, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात –

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार का??? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील मोठी निवडणूक असून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी समोर भाजपचे बलाढ्य आव्हान असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी खरंच मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार की स्वबळावर असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांना चर्चा करुन निर्णय घेतली. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असतं तर चाललं असता का? ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली असताना आता भाजप आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला

औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस वर देखील टीका केली आहे. कृषी विधेयकाला विरोध कुठे आणि काशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. असेही नितेश राणे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

चक्क पोलिसांवरच केला चाकू हल्ला ; धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एका फरार चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने पोलिसांवरच चाकू हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज आता व्हायरल झालं आहे. दिल्लीमधील टिळक नगर भागातला हा प्रकार आहे. या भागात बुधवारी रात्री पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. त्यावेळी त्या भागातील एक चोर सागर उर्फ चंपा त्यांनी दिसला. पोलिसांनी त्याच्या गाडीला थांबण्याचा आदेश दिला. त्यावेळी सागरनं पोलिसांवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मुकेश हे जखमी झाले.

सागरला रोखण्यासाठी त्या जखमी अवस्थेमध्येही कॉन्सेटबल मुकेश यांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी त्यानं मुकेश यांच्या हातामधील बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या बचावासाठी सागरच्या पायावर गोळी मारावी लागली.

या घटनेमध्ये कॉन्स्टेबल मुकेश आणि त्यांच्यावर हल्ला करणारा सागर हे दोघंही जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेच्या CCTV फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर हा 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर चोरीसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

अखेर ‘दादा’ ठणठणीत ; सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयातून (Woodlands Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर गांगुलीची तब्बेत सुधारल्यानंतर सहा दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एनएआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. तसेच माझ्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलीत, मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सौरव गांगुलीने डिस्चार्जनंतर दिली.

गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना डोळ्यांसमोर अंधारी आली. यानंतर त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशभरातुन गांगुली यांच्या प्रकृती साठी प्रार्थना करण्यात येत होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाउन गांगुलीच्या तब्बेतीची चौकशी केली होती तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गांगुलीच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

राहुल गांधी फिनिक्सप्रमाणे भरारी घेतील ; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांचा देशातील विरोधी पक्षांना फायदाच होणार आहे.काँग्रेस पक्ष आजही देशातील मजबुत विरोधी पक्ष आहे. प्रत्येक गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठं आहे. त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे एक देशातील मोठं पद आहे. आणि राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

प्रत्येक घराण्याच्या नावाने पक्ष चालत असतो. गांधी आडनावाने जसा काँग्रेस पक्ष चालतो तसेच ठाकरे आडनावाने शिवसेना चालते. प्रत्येक घराणं हा त्या पक्षाचा चेहरा असतो, असं सांगतानाच गांधी कुटुंबाने देशाचं नेतृत्व करावं अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे, असं राऊत म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणं चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला लगावतानाच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

यावेळी त्यांनी ईडी कारवाई वरून केंद्र सरकार वर निशाणा साधला. विरोधकांना त्रास देण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात आहे. केवळ त्रास देण्यासाठीच या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

धक्कादायक !! पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन मुलाचा दुर्दैवी मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कापलेला पतंग पकडण्याच्या नादात 12 वर्षाचा मुलाचा रेल्वेला धडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. एन्टा विनोद सोलंकी असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एंटा पतंग पकडण्यासाठी रेल्वे मार्गावरून धावत होता. तेवढ्यात समोरून ट्रेन आली एन्टाला काही समजण्यापूर्वी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटा हा आपल्या आजीसोबत पुलाखाली उघड्यावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती. त्याचे खरे नाव कुणालाही माहिती नाही. त्याला एंटा म्हणूनच ओळखल्या जाते. तो गेल्या आठ दिवसांपासून आजीला पतंग विकत घेऊन मागत होता. मात्र, त्याच्या आजीची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पतंग मिळाली नाही.

त्यामुळे तो रस्त्यावरील किंवा अडकलेल्या पतंग आणि तुटलेला मांजा जमा करून आपला शोक पूर्ण करीत होता. एंटा सोळंकी हा मंगळवारी सकाळपासूनच कटलेल्या पतंग जमा करीत होता. दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारात तो कटलेल्या पतंगाच्या मागे धावत होता. पतंगाकडे लक्ष ठेवत धावताना तो शिवकृष्णधाम झोपडपट्टीजवळील दिल्ली ते नागपूर रेल्वे लाइनवर गेला. या दरम्यान रेल्वे येत होती.

रेल्वेची जबर धडक एंटाला लागली. त्याच्या शरीराचे चेंदामेंदा झाला. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. त्यांनी कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मेयोत रवाना केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

निलगिरीच्या तेलाचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला जास्त महत्व आहे. आयुर्वेदात माहिती दिली गेलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर आपल्या दररोज च्या कार्यकाळात होत असतो. सुगंधी निलगिरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा वापर हा सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. हे झाड मुख्यतः जंगली भागात आढळते आदिवासी लॉकच्या प्रदेशात अश्या दुर्मिळ झाडांची संख्या जास्त आहे. कुळातील सदापर्णी, सुगंधी, उंच अशा वनस्पतींपैकी निलगिरी ही उबदार प्रदेशातील वनस्पती आहे. या वनस्पतीपासून सुगंधी आणि मसाल्याचे सुद्धा काही पदार्थ बनवले जातात.

— द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.

— संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन
चोळतात.

— भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो.

— हाड वगैरे मोडले असता. त्या वेळेस निलगिरी च्या तेलाचा वापर केला जातो.

— श्‍वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे.

— नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे.

— हे तेल टॉनिक म्हणून सुद्धा अनेक आजरांवर वापरले जाते.

— निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो.

— संसर्गजन्य आजारानावर निलगिरीच्या तेलाचा वापर होतो.

— प्रसाधने तयार करताना सुद्धा याचा वापर केला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

CMO कडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; बाळासाहेब थोरातांनी ‘अशा’ प्रकारे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’