Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5229

खासदार संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा

कोल्हापूर । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली. यानिमित्त पाटगाव ते आदमापूर मार्गावर भव्य बाईक रॅली काढण्यात आली. खासदार संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. मौनी महाराज समाधी स्थळाच दर्शन घेवून आंदोलनाला सुरुवात झाली.

विशेष म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर खासदार संभाजीराजे हे प्रथमच आंदोलनात सहभागी झालेत. काहीही झालं तरी आत्महत्या करु नका अशी शपथ यावेळी खासदार संभाजी राजेंनी मराठा तरुणांना घ्यायला लावली. तसंच EWS नको असं सकल मराठा समाज म्हणतो. फक्त संभाजीराजेंचं हे म्हणणं नाही असं म्हणत प्रवीण गायकवाडांना टोला लगावला.

काय तरी पदरात पडतंय त्यामुळे केंद्राचं १० टक्के आरक्षण घ्या असं म्हणणाऱ्यांनी EWS आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसणार नाही, अस लिहून द्यावे असं जाहीर आव्हान संभाजीराजे यांनी यावेळी दिलं. मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी EWS आरक्षणा संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात भूमिका मांडुन संभाजीराजे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात संभाजीराजे यांनी ही भूमिका यावेळी मांडली .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक! मुलगी झाल्याचे समजून जन्मदात्या आईने अवघ्या चार तासांचा मुलगा फेकला झुडुपात

Newborn child

औरंगाबाद प्रतिनिधी | पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक झुडुपात फेकले. मात्र, हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ‘ते’ आमचेच असल्याचा दावा या दाम्पत्याने केला. ही घटना वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात घडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी.एन.ए चाचणीसाठी पाठविले आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसांत दाम्पत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील टुनकी शिवारातील गट क्रमांक ११० मध्ये बुधवारी सकाळीच अवघ्या चार तासांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. यासंबंधी पोलीस पाटील रावण निकम यांनी सदरील घटनेची माहिती शिऊर पोलिसांत कळवली. त्यांनी त्या अर्भकाला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तातडीने पाठवले. मात्र, पुरुष जातीचे अर्भक सापडले, अशी चर्चा गावात होताच, गावातील सुनीता अशोक साळुके व अशोक चंद्रभान साळंके यांनी दावा करीत आम्हीच हे अर्भक फेकले असल्याची कबुली पोलिसांना दिली.

सुनीता सालुंके यांना अगोदरच पाच मुली होत्या. सहावीसुद्धा मुलगीच झाली, असा संशय आल्याने त्यांनी स्वत: बुधवारी पहाटे अवघ्या काही तासांचे अर्भक परिसरातील शेतात फेकले होते. सकाळी गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली. ही चर्चा साळुके कुटुंबियांपर्यंत पोहोचताच त्यांनी अर्भकाकडे धाव घेत, ते आमचेच असल्याचे पोलिसांना सांगितले.

आम्हीच हे अर्भक फेकले असल्याचे साळुके कुटुंबियांनी मान्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उलगडा व्हावा, तसेच सापडलेले अर्भक खरंच साळुके कुटुंबियाचेच आहे का याचा शोध घेण्यासाठी त्यांना औरंगाबादला डी.एन.ए. चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती साह्ययक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

हाथरस प्रकरण: अखेर राहुल-प्रियांका गांधींना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची मिळली परवानगी

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.

डीएनडीवर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियमांचे आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची माहिती नोएडाचे पोलिस सहआयुक्त रणवीर सिंह यांनी दिली. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराभोवती मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. या मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

‘मुख्यमंत्री आदित्यनाथ डरपोक आहेत’
दरम्यान, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. योगी आदित्यनाथ हे डरपोक असून ते आता लपून बसले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार डरपोक आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही, असे सुरजेवाला म्हणाले. राहुल गांधी हे एकटेच हाथरसला जाऊ इच्छित होते. मात्र त्यांना जाऊ दिले गेले नाही, त्यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत जे अनाचार करत आहेत, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणे चुकीचे आहे का, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही
हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा विषय नाही. हा विषय आहे पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबतचा. पीडित कुटुंबावर दबाव टाकला जात आहे, असे म्हणत मिडियाला प्रवेशापासून का रोखले गेले. राहुल गांधी जर एकटे जाऊ इच्छित होते तर त्यांना का जाऊ दिले नाही, असे प्रश्न विचारत रणदीप सुरजेवाला यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर संशय व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करण्यासाठी कराडकरांचा मोर्चा

suraj gurav

सकलेन मुलाणी । कराड

कराड :- कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडकरांनी एकत्र येवुन मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.

डीवायएसपी गुरव यांनी कराड शहरातील कायदा व सुव्यवस्थेची चांगली अंमलबजावणी केली. त्यांनी शहरातील व कराड तालुक्यातील गुंडरिगी संपवण्यासाठी त्यांचे सहकारी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, किशोर धुमाळ यांच्या मदतीने प्रयत्न केले. मात्र त्यांचा कराड येथील कामाचा कार्यकाळ पुर्ण होण्याअगोदरच बदली झाली. त्यामुळे कराडकर संतप्त झाले आहेत. त्यांनी या राजकीय हस्तक्षेपातुन झालेली बदल तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडमध्ये मोर्चा काढला. कराडच्या मध्यवर्ती असलेल्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास प्रारंभ झाला.

त्यावेळी शहरातील प्रतिष्ठीतांनी मनोगत व्यक्त करुन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केलेल्या चांगल्या कामाची अनेक उदाहरणे दिली. त्याचबरोबर त्यांनी बदली तातडीने रद्द न केल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल, असाही इशारा दिला. त्यानंतर मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांत अधिकारी उत्तमराव दिघे, कराड पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

CBIने सुशांत प्रकरणाचा लवकरात लावर अहवाल द्यावा- गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते. मात्र आज एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्येचा दावा फेटाळला आहे. सुशांतने आत्महत्याचं केली असल्याचा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सुपूर्द केला आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आता लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.

अनिल देशमुख नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना सुशांतच्या एम्स अहवालावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल, असे देशमुख म्हणाले.

एम्सचा अहवाल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

हाथरास: मायावती राजकारण करत असून योगींचा राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार नाही- रामदास आठवले

लखनऊ । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टिप्पणी करत, मायावती हाथरस प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

“हाथरस मधील घटना हा मानवतेवर कलंक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेच्या कुटुंबास न्याय दिला पाहिजे. या मुद्यावरून मायावती राजकारण खेळत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही.” असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लखनऊ येथे म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या मायावती
हाथरस प्रकरणात मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजनीमा मागतांना म्हणाल्या होत्या कि,“माझा १०० टक्के विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं.” असं म्हटलं होतं. तसेच, “योगीजी तुम्ही देखील एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही महिलांचे संरक्षण करू शकत नसाल तर तुम्ही पदावरूवन स्वतःच दूर व्हायला हवं, तुम्ही स्वतःच राजीनामा द्यायला हवा.” असं देखील मायवती म्हणाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर मीडियावाल्यांची अडवणूक का ?? संजय राऊतांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाल्याने सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी देशभरातुन निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय, या प्रकरणी इतर राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकारने काहीच केले नाही तर, माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

“मला कळत नाही का माध्यमांना अडवण्यात आले आहे. जर सरकारने काहीच चुकीचे केलेले नाही, तर या प्रकरणातील तथ्यं बाहेर काढण्यासाठी माध्यमांना त्या ठिकाणी जाऊ दिले पाहिजे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या अगोदर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा देखील संजय राऊत यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींना धक्काबुक्की करणे म्हणजे या देशातील लोकशाहीचा बलात्कार आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सुशांतने आत्महत्याचं केली होती; AIIMSच्या रिपोर्टमधून माहिती आली समोर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते त्यातील हवा काढणारी एक माहिती समोर आली आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.
एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं. सुशांत सिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

पाचगणीत वाधवानचा पाहुणचार केलेली सेट झवेयीर्स शाळा सुरु : महसुल मुग गिळुन गप्प

sent xeviar

सातारा प्रतिनीधी : सामाजिक कार्याचा बडेजावकी दाखवुन “आवळा दाखवून कोहळा काढायचा प्रसाद चारीटेबल ट्रस्टच्या सेट झवेयीर्स शाळेचे व्यवस्थापन करत आहे . वाधवान याला सेट झवेयीर्समध्ये पाहुनचार दिला असल्याने . प्रशासनावर पावशेर असल्यामुळे परम प्रसाद चारीटेबल ट्रस्टच्या सेट झवेयीर्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजने . निवासी विद्यार्थी बोलवुन शाळा व काॅलेज सुरु केला असल्याची धक्कादायक बाबा . पाचगणीतील सेट झवेयीर्स हायस्कुल व ज्युनिअर काॅलेज सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे . प्रशासनाची कोव्हीड १९ रुग्नाच्या माहमारीत आरोग्याची मदत करण्याच्या साठमारीच्या मोबदल्यात . परम प्रसाद चारीटेबल ट्रस्ट आपात्कालीन परीस्थितीत महसुलच्या अधिकार्याना हाताशी धरत . राज्यशासनाचा कोणताही निर्णय झाला नसताना खुलेआम शाळा सुरु केली आहे . यासर्वप्रकारात महसुल विभाग मुग गिळुन गप्प का ? असा संशय व्यक्त होणारा प्रश्न सर्वसामान्यानकडुन व्यक्त होत आहे .

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु केली आहे .करोनाच्या जागतिक महामारीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर हायस्कूलने निवासी शाळा सुरु केली . ९ सप्टेंबर रोजी परम प्लीज चारीटेबल ट्रस्ट च्या लेटर पॅडवर पालकांना पत्र पाठवून २१ सप्टेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्याचे कळवले. त्यामुळे निवासी विद्यार्थी ताबडतोबीने शाळेत दाखल करावेत असे पत्र पालकांना पाठवले.त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळा सुरु होण्या आगोदर शाळेच्या हवाली केले.वास्तविक शाळा सुरु करण्याआधी विद्यार्थी, पालक शिक्षक आणि शासन यंत्रणा याच्यात एकमत होणे गरजेचे होते. मात्र प्रांत व तहसिलदार परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टच्या खिशात असल्याने . करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याआधीच कोव्हीड हाँस्पिटल असणाऱ्या परिसरात शाळा सुरू करण्याचा घाट घातल्याने व वसतिगृहात विद्यार्थी दाखल झाले आहे.

करोनाच्या धास्तीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास राजी नसतानाही शाळा प्रशासन मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची भिती दाखवून व मुले निवासी शाळेत दाखल करून घेण्यास हरकत नाही असे लेखी घेऊन शाळेत पाठवण्यास भाग पाडले. करोग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता इतक्यात शाळा उघडण्यासाठी पोषक वातावरण नसताना निवासी शाळा सुरू केल्याची माहिती मिळताच महाबळेश्वर तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत तपासणी केली. पाचगणीतील सर्व निवासी व बिगर निवासी शाळा बंद असताना .

राज्यात सर्वत्र शाळा बंदचे शासनाचे धोरण असताना, पाचगणीतील सेंट झेवियर निवासी शाळेने वसतिगृह सुरु केले. समाजसेवेचा आव दाखवुन शाळा सुरु करण्याच्या उद्देशाने पालकांना परस्पर पत्र पाठवून निवासी शाळा सुरू करण्याचे धोरण ठरविले. त्याप्रमाणे वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना आणून ठेवले.याबाबत माहिती मिळताच या निवासी शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.या ठिकाणी विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थ्यांना निवासी वस्तीगृहात दाखल करून घेण्यासाठी पालकांकडून लेखी निवेदन घेण्यात आले आहे. अधिक चौकशी करता हे आमच्या कर्मचाऱ्यांचे विद्यार्थी असल्याचे खोटे सांगण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाचे नियम आणि कायदा मोडण्यात आल्याचे दिसून आले संबंधितांवर कठोर कारवाई करणार का ? अस प्रश्न निर्माण झाला आहे .
पाचगणीतील परम प्रसाद चारीटेबल ट्रस्टच्या सेट झवेयीर्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजवर मेहरनजर करत .वाधवानचा पाहुनचार करणार्या सेट झवेयीर्स फक्त चैाकशी करणार्या महसुल या आपात्कातील परीस्थीत नेहमी संशयाची भुमीका राहीली आहे . पाचगणीत नियम डावलून शाळा सुरु करणार्या सेट झवेयीर्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होवु लागली आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे.

या परीक्षेसाठी दोन वर्षापर्यंतचा कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या शिक्षण घेत असणारेकोणत्याही शाखेतले विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान(आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएस या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सर्वांसाठी ही सामाईक परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून ही परीक्षा देता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नसतील ते नजीकच्या “टीसीएस आयओएन सेंटर” मध्ये जावून परीक्षा देवू शकतात.

दर तिमाही ला ही परीक्षा होणार असून यामध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांच्या आधारवर गुणांकन केले जाणार आहे. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून हे गुणांकन कार्पोरेटस ना सादर केले जाणार आहेत. आपले गुणांकन सुधारण्यासाठी उमेदवार अनेक वेळा परीक्षा देवू शकतात. प्रत्येक तिमाहीत होणाऱ्या परीक्षेतील गुणांकन हे पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षा २४ त २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करायची आहे. https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/ या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.