Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5234

आता हाथरस प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांना यूपीला पाठवा ; शिवसेनेचे मागणी

shivsena and yogi adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. इतर राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अस आवाहनही जनतेतून व्यक्त होत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाबद्दल विनंती केली आहे.

देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस  घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे.  उत्तर प्रदेशातील हाथरसमधील निर्भयाचा अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमधील पाटनामध्ये पोलीस तक्रार दाखल करून बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचले होते. एवढंच नाहीतर या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती. आता शिवसेनाही भाजपला शह देण्याची एकही संधी सोडत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं ते पाहता उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

“देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत,” अशी टीका त्यांनी केली आहे. “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारने स्वत:ची चूक कबूल करावी,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली. “उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” असंही त्या म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन

मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय अशी खंत व्यक्त केली आहे.

काय म्हटलं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये 
आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरु झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरुर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. करोनाच्या या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

देशभरात मिठाईसाठी लागू झाला नवीन नियम, पालन न केल्यास आकारला जाणार 2 लाखांचा दंड

हॅलो महाराष्ट्र । 1 ऑक्टोबरपासून भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणने (FSSAI-Food Safety and Standards Authority of India) देशभरात स्वीट्सवर एक नवीन नियम लागू केला आहे. पूर्वी हा नियम जूनमध्ये अंमलात येणार होता, परंतु कोरोना संसर्गामुळे तो आता लागू झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी बर्‍याच दुकानांत मिठाईच्या ट्रे वर एक्सपायरी डेट (Sweets Expiry Date) लिहिलेली नव्हती. यावर अन्न नियामक FSSAI ने सध्यातरी कोणतीही मोठी कारवाई केली नाही. या नव्या नियमानुसार जुन्या मिठाईची विक्री करणाऱ्या मिठाईच्या दुकानांवर जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद आहे.

हे पाऊल का उचलले?

FSSAI म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI-Food Safety and Standards Authority of India) ने सर्वसामान्यांच्या आरोग्यास होणार्‍या धोक्यांमुळे हे पाऊल उचलले आहे. शिळे / खाण्याची मुदत संपल्यानंतरही मिठाई विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यासंदर्भात एक निर्देश जारी करण्यात आलेला आहे.

छोट्या उद्योजकांना नियमांचे पालन करणे अवघड आहे? 

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील व्यापारी कमलेश भाई म्हणाले की, हा निर्णय लघु उद्योजकांमध्ये चिंतेचा विषय आहे. कारण मिठाई कधीही खराब होऊ शकते. कोणत्याही व्यावसायिकाला कधीही खराब वस्तू विकायच्या नसतात. कमलेश भाई म्हणतात की, आता मिठाईची एक्सपायरी डेट तयार झाल्याच्या वेळीच निश्चित केली गेली आहे आणि ती मिठाईच्या ट्रे वर लिहिलेली आहे.

मिठाईची एक्सपायरी डेट निश्चित

एका दिवसात वापरल्या जाणाऱ्या मिठाई – कलाकंद आणि तत्सम उत्पादने बटर स्कॉच कलाकंद, गुलाब कलाकंद, चॉकलेट कलाकंद.

2-दिवसात वापरल्या जाणाऱ्या मिठाई –  रसगुल्ला, रसमलाई, रबड़ी, शाही टोस्ट, राजभोग, मलाई रोल, बंगाली रबड़ी, हिरमानी, हरिभोग, अनारकली, माधुरी, पाकीजा, रसकदम, रस काटा, खीर मोहन, गुड़ रसमलाई, गुड़ रबड़ी, गुड़ रसगुल्ला.

4 दिवसात वापरल्या जाणाऱ्या मिठाई: दुधाचा केक, पेडा, साधा बर्फी, दूध बर्फी, पिस्ता बर्फी, नारळ बर्फी, चॉकलेट बर्फी, पांढरा पेडा, बूंदी लाडू, नारळ लाडू, लाल लाडू, मोतीचूर मोडक, खोया बदाम, मेवा भाटी, फळ केक, खोया तीळ, केशर नारळ लाडू, मलाई घेवर, व्रत केशर नारळ लाडू, मेवा लाडू, गुलाबी बर्फी, तीळ बग्गा, ड्राय फ्रूट तीळ बग्गा, शाही घेवार, खोया केशर बदाम रोल, तिल भाटी, खीर कदम, काकडी बियाणे नारळ बर्फी, मोतीपाक.

7 दिवसात वापरल्या जाणाऱ्या मिठाई: तूप आणि ड्रायफ्रूटचे लाडू, काजू कटली, घेवार, साखर पारा, गूळ पारा, शाही लाडू, मुंग बर्फी, पीठाचा लाडू, ड्राय फ्रूट गुजिया, बंडी लाडू, काजू केसर बर्फी, काजू बेक्स गुजिया, बदाम लवंग, बाळूशाही, बदाम बर्फी, केशर बडी मलाई, चंद्रकला, केशर गुजिया, मैदा गुजिया, काजू तारखा, पिस्ता लवंग, छोटा केशर घेवार, केशर चंद्रकला, काजू लाडू, बेसन बर्फी, काजू गुलाब कटली.

20 दिवसात वापरल्या जाणाऱ्या मिठाई- पीठाचे लाडू, बेसनचे लाडू, चणा लाडू, चना बर्फी, अंजीर खजूर बर्फी, कराची हलवा, सोहन हलवा, चिक्की.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! डिझेल पुन्हा झाले स्वस्त, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. आज डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची कपात करण्यात आली आहे. त्याचवेळी पेट्रोलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. गेल्या 10 दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 7 पैशांनी कमी होऊन 70.46 रुपये प्रतिलिटर झाले. खरं तर, पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्रूड तेलाच्या किंमतीतील घट हे आहे.

नवीन दर हे दररोज सकाळी 6 वाजेपासून लागू असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी,, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत आणि रुपया जोरात परतला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पेट्रोल 1.02 रुपयांनी झाले स्वस्त
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात आज पेट्रोलच्या दरात निरंतर वाढ झाली. राजधानी दिल्लीतच पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 16 हप्त्यांमध्ये एकूण 1 रुपये 65 पैशांची वाढ झाली. तथापि, काही काळ ते देखील कमी झाले आहे. 21 सप्टेंबरपर्यंत तो प्रतिलिटर अंदाजे 1.02 रुपयांनी कमी झाला आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.63 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 रुपये आणि डिझेलची किंमत 77.04 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल 74.15 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये तर डिझेलची किंमत 76.10 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये तर डिझेल 71.14 रुपये प्रति लिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 71.05 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.24 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.33 रुपये प्रति लिटर आहे.

अशा प्रकारे आपल्या शहरातील आजचे दर तपासा
पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील. इंडियन ऑईल ग्राहक RSP वर सिटी कोड लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि त्यास 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत कळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राहुल गांधींसोबतची वर्तणूक म्हणजे लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार – संजय राऊत

Rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्की म्हणजे या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, “राहुल गांधी खासदार आहेतच परंतु ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे.याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही”.

“ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. “आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

मराठा आरक्षणावर पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत एक ट्विट केलं होतं. बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार कुटुंबात दुमत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये रंगू लागले होते. दरम्यान, पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात अजित पवार यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपली भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, “माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. आता अलिकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं, तुमच्या मुलाने ते ट्वीट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो-तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला-त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”

नेमकं काय म्हणाले होते पार्थ पवार
मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट करुन मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं म्हणाले. ”मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप’- संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस खासदार यांना राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. यानंतर देशभरात काँग्रेस आणि सहयोगी पक्षांकडून या घटनेचा निषेध होत आहे. दरम्यान, राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या वागणुकीचा निषेध करतो, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी म्हटलं की, मी ती दृश्यं पाहिली, ते थांबवता आलं असतं. मात्र ज्या पद्धतीनं राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली गेली, ते ठीक नव्हतं, असं संजय राऊतांनी म्हटलं. हाथरसमध्ये पीडितेवर रेपनंतर हत्या केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कार देखील परिवाराला करु दिले नाहीत. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाहीत, पीडित परिवाराचा आवाज दाबताय तर तुम्हाला ‘बेटी बचाओ’ ची घोषणा करण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की
हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल आणि प्रियांका यांना अटक केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण; पत्नी मेलानियादेखील कोरोनाबाधित

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कोरोनाची लागण झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.

ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

चौकारांपेक्षाही षटकार जास्त मारणारा मुंबईचा ‘हा’ धडाकेबाज खेळाडू

keiron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडिअन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा दणदणीत पराभव केला. रोहित शर्मा च्या धडाकेबाज खेळीने मुंबईने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९१ धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. परंतू सर्वात लक्षवेधी खेळी ठरली ती कायरन पोलार्डची.पोलार्डने जबरदस्त खेळी खेळून मुंबईला 191 धावापर्यंत पोचवले.

पोलार्डने या सामन्यात २० चेंडूत ४७ धावांची धुंव्वादार खेळी केली. यात त्याने ४ षटकार व ३ चौकार मारले. याबरोबरच सर्व प्रकारच्या व्यावसायिक ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये मिळून त्याने एकूण ६८२ षटकार मारण्याचा पराक्रम केला. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ख्रिस गेल (९७८)नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

चौकारांपेक्षाही मारले जास्त षटकार-

कायरन पोलार्डने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. ५१६ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळलेल्या पोलार्डने ३१.३५च्या सरासरीने या प्रकारात १०३५५ धावा केल्या आहेत. हे करताना त्याने ६६४ चौकार तर तब्बल ६८२ षटकार मारले आहेत. ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात कमीत कमी १०० षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’