हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI- Reserve Bank of India) ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’ (OBC-Oriental Bank of Commerce) आणि ‘अलाहाबाद बँक’ (Allahabad Bank ) सहित या सहा सरकारी बँकांना RBI कायद्याच्या दुसऱ्या वेळापत्रकातून वगळले आहे. म्हणजेच आता या बँकांना RBI चे नियम लागू होणार नाहीत. वास्तविक या बँका अन्य बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. म्हणूनच या बँकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. या सहा बँकांमध्ये सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही. कारण, विलीनीकरणानंतर या बँकांचे ग्राहक विलीन झालेल्या बँकेचे ग्राहक झाले आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने 10 राज्य-बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. या योजनेनुसार युनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाले आहेत. विलीनीकरणानंतर PNB देशातील दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक बनली आहे. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होत आहे. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन होईल. तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाले आहे.
27 मार्चपासून सिंडीकेट बँकेने आपला व्यवसाय बंद केला आहे – रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगितले गेले आहे की, 27 एप्रिल 2020 च्या अधिसूचनेमुळे रिझर्व्ह बँकेच्या अधिनियम 1934 च्या दुसऱ्या वेळापत्रकातून सिंडिकेट बँकेला वगळण्यात आले आहे. त्यानुसार, 1 एप्रिल 2020 पासून त्याचा बँकिंग व्यवसाय बंद झाला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील अन्य पाच बँकांच्या संदर्भात अशीच एक अधिसूचना जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्याच्या दुसर्या वेळापत्रकात समाविष्ट केलेली बँक शेड्यूल्ड कमर्शियल बँक म्हणून ओळखली जाते. या सहा बँका 1 एप्रिलपासून सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.
विलिनीकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला – ओबीसी आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडिया तर अलाहाबाद बँक यांचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाले आहे. या विलीनीकरणानंतर आता देशात सात मोठ्या आणि पाच लहान सरकारी बँका आहेत. सन 2017 मध्ये देशात 27 सरकारी बँका होत्या, आता विलीनीकरणानंतर त्या 12 झालेल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.
















