Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5235

खळबळजनक! पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची सपासप वार करून निर्घृण हत्या

पुणे । पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळजनक उडाली आहे. दीपक मारटकर (वय ३६) असे या युवा नेत्याचे नाव आहे. दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा होता. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. रात्री १ वाजता घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी धारदार हत्याराने दीपकवर सपासप वार केले.

गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ५ ते ६ हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटरसायकलवर नंबर प्लेट नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

केंद्र सरकारने बदलले नियम! ज्याने रस्ता अपघात झालेल्यास मदत केली आता त्याला Personal Details देण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार नाही. जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घायचे असेल तर आता आपण कोणत्याही भीतीशिवाय एखादी दुर्घटना आणि रस्ते अपघातातील पीडितांना मदत करू शकता.

मदत करणाऱ्याला वाटले तरच तो आपले डिटेल्‍स अधिकाऱ्यांसह शेअर करू शकेल
या नवीन नियमांनुसार आता लोकांना मदत करणार्‍या चांगल्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागवले जाईल. ते धर्म, जाती आणि राष्ट्रीयतेपेक्षा वरचढ ठरतील. तसेच, यात हे देखील स्पष्ट केले गेले आहे की, जर मदत करणाऱ्याला स्वत: ला वाटत असेल तरच तो अधिकाऱ्यांना आपले पर्सनल डिटेल्‍स देऊ शकेल. या व्यतिरिक्त, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना आपले प्रवेशद्वार, त्यांची वेबसाइट आणि विशेष ठिकाणी हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील एक चार्टर ठेवावा लागेल. यात अपघातात मदत करणाऱ्या चांगल्या नागरिकांच्या अधिकारांचा (Rights of Good Samaritan) तपशील असेल.

साक्षीदार बनण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची नवीन कायद्यानुसार चौकशी केली जाईल
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये अपघात झाल्यास एखादी व्यक्ती साक्षीदार बनण्यास तयार असेल तर नव्या कायद्यातील तरतुदींनुसारच त्याची चौकशी केली पाहिजे. त्यासाठी मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, 2019 मध्ये कलम 134 A जोडले गेले आहे. या अंतर्गत, मदत करणार्‍यास संरक्षण दिले जाते. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, पीडित व्यक्तीस मदत करणार्‍याला पीडिताला (Victim) झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी किंवा मृत्यूसाठी जबाबदार धरले जाणार नाही. त्याच्याविरोधात कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटला (Civil/Criminal Case) दाखल होऊ शकणार नाही.

मंत्रालयाने हे स्पष्ट केले की,’Good Samaritan’ कोणाला म्हटले जाईल
यावेळी मंत्रालयाने ‘Good Samaritan’ ची व्याख्या देखील स्पष्ट केली आहे. त्यानुसार, चांगल्या हेतूने, आपत्कालीन आणि वैद्यकीय सेवा किंवा अपघातग्रस्त व्यक्तीची वैद्यकीय उपचारात, त्याच्या इच्छेनुसार आणि बक्षीस किंवा भरपाईची अपेक्षा न करता, मदत करणारी व्यक्ती म्हणजे ‘Good Samaritan’. देशातील रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे 1.5 लाख जणांचा मृत्यू होतो. ही संख्या जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा खूपच जास्त आहे. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे रस्ते अपघातातील पीडितांना तातडीने मदत करणे शक्य होईल आणि मृत्यूचे प्रमाणही काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने महागले, चांदी 915 रुपयांनी घसरली; आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 37 रुपयांनी वाढून 51,389 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मात्र, मजबूत रुपये मौल्यवान धातूंमध्ये मर्यादित राहिले. या आधीच्या व्यापारात पिवळ्या धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,352 रुपयांवर बंद झाली. मात्र, चांदीचा दर 915 रुपयांनी घसरून 61,423 रुपये प्रति किलो झाला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 63 पैशांनी मजबूत होऊन 73.13 वर बंद झाला आणि सकारात्मक देशांतर्गत इक्विटी आणि कमकुवत अमेरिकन चलनामुळे गुंतवणूकदारांच्या संवेदनावर परिणाम झाला.

सोन्याचे नवीन दर
आज सोन्यात वाढ झाली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव किरकोळ 37 रुपयांनी वाढून 51,389 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आधीच्या व्यापारात पिवळ्या धातूची किंमत 10 ग्रॅम 51,352 रुपयांवर बंद झाली.

चांदीचे नवीन दर
आज चांदीच्या किंमतींमध्ये किंचित घट नोंदली गेली आहे. गुरुवारी चांदी प्रति किलो 915 रुपयांनी घसरून 61,423 रुपये झाली आहे. मागील व्यापारात चांदीचा भाव प्रति किलो 62२,33338 रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1,895 डॉलर होता, तर चांदीची किंमत 23.60 डॉलर प्रति औंस होती. पटेल म्हणाले की, अमेरिकन प्रोत्साहन आणि डॉलरच्या चढउतारांच्या अनिश्चिततेमुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती वाढल्या.

01 ऑक्टोबर 2020 रोजी एमसीएक्स गोल्डचे अपडेट
आज एमसीएक्स वर चांदीचा वायदा 60,680 रुपये किलोवर स्थिर होता. तर सोन्याचा भाव आज 49,260 रुपये झाला. आजपर्यंत एमसीएक्सच्या भविष्यातील किंमतीत कोणताही बदल झाला नाही आणि त्याची किंमत 50,081 रुपये होती. कालच्या तुलनेत आज जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती वाढतच राहिल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Amazon ने सुरू केली एक खास पेमेंट सिस्टम ! आता हात हलवताच केले जाईल पेमेंट, कार्डची देखील भासणार नाही गरज

हॅलो महाराष्ट्र । ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉनने एक विशेष बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम सुरू करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने अॅमेझॉन वन ही नवीन बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम बाजारात आणली आहे. या बायोमेट्रिक पेमेंट सिस्टमची खास गोष्ट म्हणजे आपण फक्त हात दाखवून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. याद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंट सहज केले जाऊ शकते.

कार्डशिवाय केली जाईल शॉपिंग
अॅमेझॉनचे उपाध्यक्ष दिलीप कुमार म्हणाले की, आता तुमची शॉपिंग कार्डलेस होईल, म्हणजे वस्तू खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. आपण फक्त आपला हात स्कॅन करून खरेदी करण्यास सक्षम असाल. या नवीन सिस्टम बद्दल कंपनी ग्राहकांकडून अभिप्राय घेत आहे, त्यानंतर त्याची सिएटलमधील अॅमेझॉनच्या दोन फिजिकल स्टोअरमध्ये चाचणी घेतली जाईल.

गेट पासचे काम करेल ही योजना
याशिवाय कोणत्याही गेटवर हे गेट पासचे कामही करेल. अॅमेझॉनच्या या पेमेंट सिस्टममुळे आता ऑफिस आणि स्टेडियममध्ये एन्ट्री करणे सुलभ होईल. अॅमेझॉन आपल्या वॉशिंग्टनमधील रिटेल स्टोर्स मध्ये याचा वापर करेल.

स्माइल टु पे सिस्टम सुरु केली होती
अॅमेझॉनने यापूर्वीच चीनमध्ये अलिपेची स्माईल टू पे सिस्टम सुरू केली होती. या सिस्टम अंतर्गत, आयपॅडच्या आकाराचे एक उपकरण वापरले गेले आहे, ज्याद्वारे युझर्स आपला चेहरा दाखवून पेमेंट देऊ शकतात. अशा बायोमेट्रिक पेमेंट सिस्टममुळे लोकांच्या प्रायव्हसीबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की अशी सिस्टम हॅकर्सचा मार्ग आणखी सुलभ करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

उत्तर प्रदेशात जंगलराज ; अटकेनंतर राहुल गांधींचा योगी आदित्यनाथांवर घणाघात

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात जंगलराज आहे अशी टीका करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर घणाघात केला आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी ही ट्विट करत ही टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणले की उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या माणसांना आधार देण्यासाठी आपण जातो. मात्र शोकसागरात बुडालेल्या एका कुटुंबाला भेटायला गेलो तरीही सरकार घाबरतंय . एवढं घाबरु नका मुख्यमंत्री महोदय अस ट्विट करत राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

तत्पुर्वी आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. राहुल गांधींच्या अटकेनंतर देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी – Manufectring Activity मध्ये झाली गेल्या 8 वर्षांतील सर्वात मोठी वाढ

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. यावेळी देशातील उत्पादन क्रियाकार्यक्रम (Manufectring Activity) परत सुरु झाला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षातील ही सर्वात मोठी तेजी नोंदली गेली आहे. आयएचएस मार्किटच्या (IHS Markit) मते, सप्टेंबरमध्ये पीएमआय निर्देशांक 56.8 टक्के होता (India’s PMI Manufacturing Index) जो ऑगस्टमध्ये 52 टक्के होता. गेल्या साडे आठ वर्षातील PMI निर्देशांकातील ही सर्वात मोठी वाढ आहे. IHS मार्किटच्या मते, जानेवारी 2012 मधील पीएमआय निर्देशांक 56.8 वर पोहोचला होता.

PMI मधील या वाढीचा अर्थ काय आहे?
PMI अधिकृत आकडेमोडीपूर्वी अर्थव्यवस्थेविषयी निश्चित माहिती देते. हे आगाऊ अर्थव्यवस्थेबद्दल अचूक संकेत देते. PMI 5 प्रमुख घटकांवर आधारित आहे. यात ऑर्डर, इन्‍वेंटरी स्‍तर, प्रोडक्‍शन, सप्‍लाय डिलिव्हरी आणि रोजगाराचे वातावरण यांचा समावेश आहे.

PMI च्या सर्वेक्षणानुसार Manufectring Activity मध्ये गेल्या 8 वर्षांतील सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच तयार वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ जास्त इनपुट खर्चांमुळे होते. या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, उत्पादक पुढील 12 महिन्यांसाठी आणखी उत्पादन वाढीची अपेक्षा करीत आहेत. त्याच वेळी, 8 टक्के उत्पादकांनी ते खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे.

PMI मध्ये प्रचंड वाढ का दिसून आली आहे ?
सप्टेंबरमध्ये बाजाराची मागणी सुधारल्यामुळे Manufectring Activity ही गेल्या 8 वर्षांच्या शिखरावर पोहोचली आहे. IHS मार्किटच्या प्रधान अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांचे म्हणणे आहे की, निर्यातीसाठी नवीन ऑर्डर 6 महिन्यांच्या सतत घसरणीनंतर वाढू लागल्या आहेत. म्हणूनच सप्टेंबरच्या PMI च्या आकडेवारीमुळे खरेदीचा दर वाढला आणि व्यवसायाचा आत्मविश्वास बळकट झाला. मात्र, ऑर्डर बुकिंगच्या प्रमाणात जोरदार वाढ झाली असूनही भारतीय व्यावसायिक वेतन कमी करण्याच्या विचारात आहेत. बर्‍याच प्रकरणांमध्ये, सोशल डिस्टंसिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्मचार्‍यांची संख्या कमी केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

नटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता रस्त्यावर बसून पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत एका नटीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी आमच्या विरोधात उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन मृत झालेल्या पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हाथरसच्या घटनेवरून भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी काही लोकांनी आकांडतांडव केलं होतं. आता त्यांनी हाथरसला जाऊन दलित, शोषित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढवली पाहिजे. जेव्हा दलित, शोषित समाजातील मुलगी आक्रोश करते तेव्हा तिचा आवाज जगापर्यंत पोहोचू नये म्हणून दडपशाही केली जाते, असं सांगतानाच पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की हे अत्यंत दुर्देवी-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं मी पाहिलं. हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रातही अनेक आंदोलने झाली. पण असा प्रकार कधी घडला नाही आणि घडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

भारत सरकार केव्हाही करू शकते दुसऱ्या मदत पॅकेजची घोषणा, यावेळी काय खास असेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी पुढील मदत पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील मदत पॅकेज हे आधीच्या तुलनेत लहान असू शकते. यामध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणारी क्षेत्रे हॉटेल, पर्यटन, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी यावर सर्वाधिक जोर देतील. या बातमीनंतर स्पाइस जेट, डेल्टाकॉर्प सारख्या शेअर्सनी चांगली कमाई केली आहे.

पुढील मदत पॅकेज कसे असेल?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील मदत पॅकेजची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हे कधीही घोषित केले जाऊ शकते. आधीच्या पॅकेजपेक्षा पुढील पॅकेज हे खूपच लहान असेल. या आगामी मदत पॅकेजमध्ये हॉटेल्स, पर्यटन, एव्हिएशन अशा क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि अर्थ मंत्रालयात यावर 3-4 फेऱ्यात बैठक झाली.

दुसर्‍या मदत पॅकेजेसमध्ये काय खास असेल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कर सवलतींवर अधिक जोर दिला जाऊ शकतो म्हणजेच दुसर्‍या मदत पॅकेजमध्ये करात सूट मिळेल. अनेक क्षेत्रात कर सवलत जाहीर केली जाऊ शकते. तसेच कर्जाची परतफेड करण्याची मुदतही वाढवली जाऊ शकते. याशिवाय इतरही अनेक उपाययोजना करण्याच्या तयारी सरकार करत आहे. या पॅकेजमध्ये लोकांची खरेदी क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणारी क्षेत्रे हॉटेल, पर्यटन, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी यावर सर्वाधिक जोर देण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

नुकत्याच संमत कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

agriculture law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या कायद्यांमुळे समांतर अनियंत्रित बाजार व्यवस्था निर्माण होणार असल्याचा आरोप त्यात केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष या कायदाचा विरोध करत आहे. विरोध होत असतानाही सरकारने तीनही कायदे मंजूर केले. याच विरोधात आता विरोधकानी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. केरळमधील त्रिशूर येथील खासदार असलेल्या प्रतापन यांनी असा आरोप केला की, शेतकरी सक्षमीकरण व संरक्षण, दर हमी व कृषी सेवा कायदा २०२० यामुळे राज्यघटनेतील समानतेचा अधिकार, भेदभावास प्रतिबंध, जगण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार या अनुक्रमे अनुच्छेद १४, १४ व २१ यांचे उल्लंघन झाले आहे. राष्ट्रपतींनी रविवारी ज्या कायद्यांना मंजुरी दिली ते घटनाबाह्य़, बेकायदा व अवैध आहेत.

नव्या कायद्यांमध्ये कृषी करारांसाठी व शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी करारांवर भर देण्यात आला आहे. यात कृषी उद्योग व अन्न संस्करण आस्थापने, घाऊक विक्रेते, निर्यातदार, मोठे किरकोळ विक्रेते यांचा समावेश असलेली किमान हमी भाव देणारी कृषी सेवा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. प्रतापन यांचे वकील जेम्स पी. थॉमस यांनी याचिकेत म्हटले आहे की, भारतीय कृषी क्षेत्रात आता जमिनीचे तुकडे पडले असून जमीन धारणा कमी आहे. शेती क्षेत्र हवामान, उत्पादनाची अनिश्चितता, अनिश्चित बाजारपेठ यावर विसंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्र हे जोखमीचे असून त्याचे व्यवस्थापन कठीण आहे.

हवामान व इतर अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा शाश्वत उपाय नाही, तर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्फतच मजबूत करावे लागेल. किमान हमी भाव व्यवस्थापन सुधारून आणखी भांडवल ओतण्याच्या कृतीतून हे साध्य होईल. नवे वादग्रस्त कायदे लोकहितासाठी रद्द करून १४.५ कोटी लोकांना त्यांचा रोजीरोटीचा अधिकार मिळवून द्यावा कारण या कायद्यांमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

ITR Filling: Tax भरण्यापूर्वी तुमचे किती रुपयांचे उत्पन्न हे करपात्र आहे ते कॅल्क्युलेट करून घ्या

हॅलो महाराष्ट्र । इनकम टॅक्स फ़ाइल (Income Tax File) शी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर, पुढचे पाऊल म्हणजे कर कपात वाचविण्यासाठी एकूण उत्पन्न शोधणे. इनकम टॅक्सच्या नियमांनुसार, ग्रोस सॅलरीचे पाच भाग केले जातात. त्यामध्ये पगार, हाउस प्रॉपर्टी, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, प्रोफेशन आणि इतर माध्यमांचा समावेश आहे. आपल्या उत्पन्नाची साधने गृहीत धरून आपल्याला 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर भरावा लागेल. आपल्या 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मोजण्यासाठी येथे काही गोष्टी सांगितल्या आहेत.

इन हँड सॅलरीखालील उत्पन्न
वार्षिक उत्पन्नाबद्दल कंपनीकडून भरण्यात येणाऱ्या फॉर्म 16 द्वारे आपल्याला कळेल की, आपला टॅक्स कट केला आहे की नाही. यामध्ये इन हँड सॅलरीवर किती टॅक्स कट केला जातो याबद्दल सांगितले जाते. टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी करदात्यास त्याच्या गुंतवणूकीची काही कागदपत्रे सादर करावी लागतात. घरभाडे, स्टँडर्ड डिडक्शन, रजा किंवा प्रवास भत्ता यावर कर सवलत उपलब्ध आहे. घराचे भाडे एका वर्षात एक लाखापेक्षा जास्त झाल्यास कर बचतीसाठी आपल्याला घराच्या मालकाचे पॅन कार्ड ऑफिसला द्यावे लागेल. 50 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. आपल्या ऑफिसमधून फॉर्म 16 न मिळाल्यास टॅक्स कपातीटची माहिती सॅलरी स्लिपवरुन कळेल.

हाउस प्रॉपर्टीतून उत्पन्न
जर आपण आपले घर भाड्याने दिले असेल तर ते उत्पन्न त्या अंतर्गत दर्शविले जावे. जर एखाद्याचे असे घर असेल ज्यामध्ये ते स्वतः राहत असेल तर उत्पन्न शून्य होईल. याशिवाय जर गृह कर्ज चालू असेल तर त्याच्या व्याजासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कपात केल्याचा दावा केला जाऊ शकतो. दोन किंवा तीन घरात स्वत: राहत असल्यास त्यांच्यावर कर आकारला जात नाही. ही व्यवस्था 2019-20 या आर्थिक वर्षापासून अंमलात आली आहे. घराच्या उत्पन्नावरील टॅक्सची गणना अशी असेल.

  1. अपेक्षित भाडे आणि नगरपालिकेच्या मूल्यांकनांची तुलना करा आणि दोघांना अधिक किंमत मिळवा. याला अपेक्षित भाडे असे म्हणतात.
  2. वास्तविक भाड्याची अपेक्षित मूल्याशी तुलना करा आणि त्यामध्ये जे जास्त असेल त्यास वार्षिक ग्रोस व्हॅल्यू मानले जाईल.
  3. ग्रोस एन्युअल व्हॅल्यूच्या दरम्यान नगरपालिका कर वजा करून निव्वळ वार्षिक मूल्याची गणना करा.
  4. वार्षिक मूल्याच्या तीस टक्के घराची देखभाल करण्यासाठी कापा आणि त्यामध्ये कागद दाखविण्याची गरज नाही. जर तुम्ही कर्जात व्याज दिले असेल तर तेही काढून टाका. यानंतर येणारी रक्कम हीं मालमत्तेतून होणार मिळकत असेल, जी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकते.

व्यवसायाच्या नफ्यातून उत्पन्न
घरे, म्युच्युअल फंड इत्यादी मालमत्तांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही टॅक्स असतो. यामध्ये संबंधित व्यक्तीने या मालमत्तेची किती दिवसात विक्री केली हे देखील पाहिले जाते. शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्मसाठी दोन प्रकारचा भांडवली नफा असतो. जर इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर एका वर्षापेक्षा जास्त काळ असतील तर ते LTCG अंतर्गत येईल निर्देशांकाशिवाय त्यावर दहा टक्के कर कपात केली जाईल. जर एका वर्षापूर्वीच विक्री केली गेली तर त्यावर STCG अंतर्गत 15 टक्के कपात केली जाईल. म्युच्युअल फंड टॅक्स हा इक्विटी फंडापेक्षा वेगळा आहे.

प्रॉपर्टीतून उत्पन्न
दोन वर्षांच्या खरेदीनंतर जर एखादे घर विकले गेले तर ते LTCG अंतर्गत येईल. मिळालेल्या बेनिफिटचे मूल्यांकन केल्यानंतर 20.8 टक्के कर वजा केला जाईल. दोन वर्षापूर्वीच विकल्यास ते STCG अंतर्गत येईल आणि टॅक्स स्लॅबनुसार वजा केला जाईल.

बिझनेस आणि प्रोफेशनल उत्पन्न
वकील किंवा अशा इतर व्यावसायिक व्यक्तींनी देखील आपला नफा दाखविला पाहिजे. याशिवाय शेअर बाजाराचे व्यवहारही दाखवावे लागतात. कॅश सिस्टम आणि एक्रुअल सिस्टम कडून टॅक्स काउंट होतो. कॅश सिस्टममध्ये खर्च कधी झाला आणि नफा कधी मिळाला हे पहिले जाते. एक्रुअल सिस्टममध्ये वे ड्यू होतो, पेमेंट दिले गेले आहे की नाही याच्याशी काही संबंध नसतो.

उत्पन्नाचे इतर स्रोत
वरील चार पर्यायात जे दाखवले गेले नाही ते या प्रकारात येतात. त्यामध्ये बचत खात्यातील व्याज, फिक्स्ड डिपोजिट, डिवायडेड इनकम, कमिशन इनकम इ. या अंतर्गत येतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.