Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5256

भारतीय मिठात आढळले ‘हे’ विषाणू द्रव्य

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतात मीठ हे सर्वात महत्वाचे अन्न मानले जाते. कारण प्रत्येक पदार्थांमध्ये मीठ हे वापरलं जातं. कारण मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. मीठ नसेल तर कितीही चांगला पदार्थ बनवला असेल तर त्याची चव मात्र हे बेचवच राहते. भारत हा मिठाच्या उत्पनात अग्रेसर देश आहे . अनेक विविध देशांमध्ये भारतातून मिठाची निर्यात केली जाते. अनेक वेळा मिठामध्ये आयोडीन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा पदार्थ शरीरातील आयोडीनची कमतरता भरून काढण्याचे काम करते. भारतामधून निर्यात होणाऱ्या मिठामध्ये काही प्रमाणात विषाणू घटक मिळाल्याचे समजत आहे. भारतातून निर्यात होणारे मीठ हे अमेरिकेमध्ये चेक करण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार नजरेस आला आहे.

भारतातील नामांकित कंपनीच्या आयोडीनयुक्त मिठाची चाचणी केली असता. त्यावेळी हा धक्का दायक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या मिठाची चाचणी हि अमेरिकेतल्या वेस्ट अनोलोटिकेल या कंपनीने केली होती. या मिठामध्ये कॉरसेनोजेनिक आणि सायनठ यासारखे विषाणू द्रव्य आढळले आहेत. या मिठामध्ये १. ८५ इतक्या प्रमाणात सायनात चे प्रमाण आहे. गोधाम ग्रेन्स आणि फार्म प्रॉडक्ट चे जनक असलेले शिव शंकर गुप्ता यांनी भारतातील विविध मोठाच्या नमुन्याची तपासणी केली होतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोडिनययुक्त मिठाचा समावेश करण्यात आला होता.

सायनात हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत . त्याचा वापर त्या बिनधास्त पणे करत आहेत. पोटॅशियम फेरोसायनाइट हा विषारी पदार्थ हा भारताव्यतिरिक्त कोणत्याही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सायनाइड वापर करण्याची मुभा नाही. ९१ वर्षाच्या गुप्ता यांनी आयोडीन युक्त मिठाचा समावेश करण्यासाठी पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे कॅन्सर तसेच हृदयाचे आजार संभवतात. त्यामुळे मिठामध्ये आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करण्यात आला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

अनिल अंबानी दिवाळखोरीच्या वाटेवर! वकिलांच्या फीसाठी विकले दागिने, घरखर्चासाठी मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ

मुंबई । डोक्यापासून पायापर्यंत कर्जत बुडालेल्या उद्योपती अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. अनिल अंबानी यांनी शुक्रवारी लंडन येथील न्यायालयाला ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे.

चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात अनिल अंबानी यांच्यावर खटला सुरु आहे. अंबानी यांनी चीनमधील तीन बँकांकडून जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये कर्ज घेतल आहे. . त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली आहे.

चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडे थकीत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचे या बँकाचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल अंबानी यांनी आपण सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असल्याचे सांगितले. मी धूम्रपान आणि मद्यसेवनही सोडले आहे. मी अलिशान जीवन जगत असल्याच्या गोष्टी ही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे.

वकिलांची फी आणि इतर कायदेशीर खर्चासाठी जानेवारी ते जून या कालावधीत घरातील सर्व दागिने विकावे लागले. दागिन्यांच्या विक्रीतून आपल्याला ९.९ कोटी रुपये मिळाले होते. यानंतर आता माझ्याकडे देण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. तसेच माझ्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा असल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते ही अतिरंजित आहेत. माझ्याकडे कधीच रोल्स रॉईस कार नव्हती. सध्या माझ्याकडे केवळ एकच कार उरली आहे. तसेच रोजच्या खर्चासाठीही मी मुलाकडून कर्ज घेतल्याचा खुलासा अनिल अंबानी यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप आमदाराचे खळबळजनक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. राज्यातही कॉग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीने या विधेयकाला विरोध केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. खासदारांच्या निलंबनावरून त्यांनी अन्नत्याग पण केल होत. पण, दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे.

कृषी विधेयक जेव्हा राज्यसभेत सादर करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यांच्या प्रश्नाची री ओढत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’ असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आल आहे.

तसंच, ‘केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी सुरक्षित आहे’, असंही नितेश राणे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

कोरोना होऊ नये म्हणून तरुणाने केला भन्नाट जुगाड ; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Corona Treatment in Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही वाढत जाणारी आकडेवारी पाहता लोकांच्या मनात त्याबद्दल अधिकच भीती निर्माण होत आहे. स्वतःला कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येक जण आपली काळजी वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेत आहेत. सहा फुटांचं अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि गरम पाणी पिणे, तसेच वाफारा घेणे यामुळे कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं दावा केला जात आहे. Corona Treatment in Marathi

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुण भाजीवरील असलेल्या विषाणू आणि किटाणूंचा नाश करण्यासाठी कुकरच्या मदतीनं वाफ देत होता. त्यानंतर आता वाफ घेण्यासाठी तरुणानं अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

https://twitter.com/vineet10/status/1308752026096943104?s=20

काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता व्यक्तीनं वाफ घेण्यासाठी चक्क कुकरचा वापर केला आहे. कुकरच्या वॉलला त्यानं एक नळी लावून त्याद्वारे वाफ घेत असल्याचं दिसत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी वाफ घेणं किती महत्त्वाचं आहे ते या तरुणाच्या जुगाडातून दिसत आहे. या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. Corona Treatment in Marathi

कुकरचा जुगाड करून वाफ घेणाऱ्या या तरुणाच्या व्हिडीओला 25 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 150 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. या तरुणानं केलेल्या जुगाडासाठी नोबेल पुरस्कार द्यावा असंही काही युझर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

खरीप हंगाम जाणार दणक्यात!! यंदा खरीप पिकाची  पेरणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात  यंदा सर्वात जास्त खरीपाखालील क्षेत्राची नोंदणी झाली असून , चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सर्वाधिक उत्पादन  देणारा  ठरणार आहे.  कोरोना आणि  मोठया प्रमाणात उदभवलेली पूर परिस्थितीत देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची आशा निर्माण झाली आहे. घटलेल्या  सकल  राष्ट्रीय  उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर  ही  बातमी  देशाला  दिलासा देणारी ठरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागच्या वर्षीच्या  तुलनेत यावर्षी  खरिपाच्या पीक क्षेत्रामध्ये ७% वाढ झालेली आहे. तसेच हे वाढलेले  क्षेत्र  हे भात,डाळी,  आणि तेलंबियामुळे वाढलेले आहे.  काही  दिवसांपूर्वी, सोयाबीन  उत्पादक  संघटनेने सोयाबीनचे पीक  यावर्षी वाढणार असल्याचे सरकारला सांगितले  होते आणि तेलाच्या वाढीव आयातीला  निर्बंध घालण्याची मागणी केली  होती.

देशात २९ ऑगस्ट २०२० च्या रोजी १०८२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.  हेच प्रमाण मागच्या वर्षी  १०१० लाख  हेक्टर होते. मागच्या वर्षीच्या  तुलनेमध्ये हे प्रमाण ७० लाख हेक्कटरने अधिक आहे.  मागच्या पाच वर्षांमध्ये  खरिपाचा पेरा १०६६ लाख  हेक्टर राहिला होता.  सन २०१६  चा खरिपाचा पेरा हा सर्वाधिक १०७५ लाख  हेक्टर होता.  राज्यात हंगाम चांगला झाल्यास बाजार समित्यांमध्ये दरवर्षी  होणारी अंदाजे ४५ ते ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल या खरीपामध्ये  ५५ हजार कोटींच्या पुढे पोहचू शकते. तथापि काढणीपर्यंत निसर्गाने  साथ देणे अपेक्षित आहे, असे मत पणन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले.

राज्यात ऑगस्ट मध्यपर्यंत २२७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.  समाधानाकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे. खरिपात  कापूस, सोयाबीन, तूर, भात आणि मका ही प्रमुख पिके सजमली जातात. कपाशीचा पेरा साधरण ४१.५७ लाख हेक्टरवर होतो. सध्या हाच पेरा ४२ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. गेल्या हंगामात हाच पेरा ४२.६८ लाख हेक्टरच्या पुढे झाला होता. कपाशीचा पेरा सध्या सरासरी क्षेत्राच्या १०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारांच्या जेडीयुमध्ये प्रवेश; बिहार विधानसभा निवडणूक लढणार

पाटणा । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्रकाश झोतात आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत.

स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. बिहार निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण गुप्तेश्वर पांडे यांनी सुरुवातीला आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी त्यात चूक काय असं म्हणत संकेत दिले होते.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करताना या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं त्यांच्या राजकीय वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबदल बोलायची रिया चक्रवर्तीची लायकी काढल्यानेही ते वादात अडकले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी आहे खूप उपयुक्त ; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक ठिकाणी आहारात भाकरी या पदार्थांचा समावेश केला जातो. भाकरी या अनेक प्रकारच्या असतात. सामान्यतः महाराष्ट्रा मध्ये बाजरी ज्वारी आणि नाचणी या भाकरी प्रसिद्ध आहेत. भाकरी खाण्याचे अनेक महत्व आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत भाकरी ला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शहरी भागात भाकरी खाल्ली जात नाही. तेथे आहारात जास्त प्रमाणात चपाती चा वापर केला जातो. अनेक वेळा लहान मुले सुद्धा चपाती खाण्याचा अट्टाहास पकडतात.कारण त्यांना भाकरी हा प्रकार आवडत नाही. पालकही मुलांचा हा हट्ट अगदी लाडाने पुरवत असतात. आहारात चपाती खाणचं अंगवळणी पडलेलं असत. या सवयीचा परिणाम मात्र आपल्या आरोग्यावर पडत असतो. ज्वारीची भाकरी खाल्ल्यास आपल्या आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत .

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

ज्वारी शरीरातील साखरेची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साखर वाढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ज्वारीमध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते.

त्वचेच्या सुरक्षेसाठी

सुंदर त्वचेसाठी ज्वारी वरदान ठरते. ज्वारीमुळे त्वचेतील मेलनॉमा सेल्सची अधिक निर्मिती होण्यावर नियंत्रण ठेवलं जातं. हे सेल्स त्वचेच्या कर्करोगासाठी जबाबदार मानले जातात. या अनेक वेळा ज्वारीच्या पिठाचा वापर केला जातो. ज्वारीचे पीठ भिजवून त्याचा लेप चेहऱ्यावर दिला जातो.

पोषक घटक मिळतात

ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असतो. जास्त मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स चा सुद्धा समावेश असतो. एवढंच नव्हे तर पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्य असे भरपूर घटक ज्वारीत असतात. काॅलेस्टराॅल नियंत्रीत ठेवण्यासाठीही ज्वारीची भाकरी खाल्ल्यास मदत होते. ज्या लोकांना वजन करण्याचे असते. त्या लोकांनी आहारात भाजरीच्या भाकरीचा समावेश करणे गरजेचे असते. यामुळे थोडसं खाऊनही पोट भरल्यासारखं वाटत आणि शरीराला आवश्यक ऊर्जा ही मिळते.

पोटाच्या समस्यांपासून बचाव

भाकरीया अन्नपदार्थ पचायला जास्त कालावधी लागत नाही. ज्वारी पचायला फारच हलकी असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशा व्यक्तींना ज्वारीची भाकरी लाभदायी ठरते. ज्या लोकांना पोटाचा तसेच गॅस च्या समस्या आहेत त्या लोकांनी भाकरी खाणे आरोग्यास खूप चांगले आहे. पोटाच्या इतर तक्रारींपासूनही भाकरीच्या सेवनाने फरक पडू शकतो

मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या

वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. यासाठी आहारात भाकरीचे सेवन असल्याने त्या काळात जास्त रक्तस्राव होत नाही. गर्भाशयात असलेल्या महिलांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने बाळाला दुधाची कमतरता निर्माण होत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली । जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ८५३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या १०८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ०३,९३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,६०,९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील ४८,४९,५८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर बिकट आव्हान निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हा आकडा ९० हजाराखाली आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जवळपास तितकेच आहे. याशिवाय कालपर्यंत (२५ सप्टेंबर) देशात एकूण ७,०२,६९,९७५ नमूने तपासण्यात आले. त्यातील १३ लाख ४१ हजार ५३५ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

वातरोग या आजारासंबंधी असलेले समज-गैरसमज जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा वात हा फक्त म्हताऱ्या माणसांना होतो. असे समजले जाते. परंतु असे काही नाही वात हा आजाराचा प्रकार हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा आजार कोणालाही होऊ शकतो. वात या आजाराचा त्रास हा जास्तीत जास्त हिवाळ्याच्या दिवसात होतो. वातरोगावरील उपचारांमध्ये ‘गैरसमज’ हा मोठा अडथळा ठरतो. त्या अनुषंगाने वातरोगासंबंधीचे ‘समज-गैरसमज’ काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

वातरोग हा वृद्धांना होणारा आजार आहे का ? असे मुळीच नाही हा आजार कोणालाही होऊ शकतो. विविध प्रकारचे वातरोग वेगवेगळ्या वयात होऊ शकतात. लहान मुलांना जेआयए , जेडीएम , असे वातरोग होतात. तर तरुण व प्रौढ वयात संधिवात व अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार निर्माण होऊ शकतो. आणि ज्येष्ठांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस व गाउटसारखे वातरोग आढळून येतात. त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी हि वयस्कर व्यक्तींनी घेतली पाहिजे.

आधुनिक वातरोगशास्त्रानुसार शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. शोग्रेन सिंड्रोमसारख्या वातरोगांचा समावेश आहे.संधिवातावर कोणताही उपचार नाही , असा एक गैरसमज आहे. आधुनिक औषधांच्या साह्याने वातरोगावर उपचार होतो. त्याचप्रकारे वातरोगग्रस्त रुग्णांना सामान्य जीवनही जगता येते. व्यायाम करणे उपचारांना पूरक असले तरी वातरोग एक प्रकारचा आजार असल्यामुळे औषधोपचार करणे आवश्यक असते. औषधोपचारांसह जीवनशैलीत बदल केला, तरच फायदा होईल. केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसा नाही.या गैरसमजापोटी अनेक जण वेदना अंगावर काढतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, संधिवात शरीरातील सगळ्या अवयवांवरती प्रादुर्भाव करू शकतो आणि त्यामुळे अन्य अवयवांना हानी पोहचू शकते.

वातारोगांमध्ये डोळ्यात कोरडेपणा, फुप्फुसांना इजा होऊन श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो.आरए फॅक्टर आणि एक्स-रे तपासण्या मुख्यत्वे होत असल्या, तरी केवळ यामुळेच प्रत्येक वेळी वातरोगाचे निदान शक्य नाही. अनेक वातरोगाचे निदान शारीरिक तपासणी आणि वातरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या चाचण्यांच्या आधार घेऊन केले जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रात वातरोगांवर उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, ती रोगाच्या मुळाशी काम करीत असतात. त्यामुळे औषधांचा प्रभाव सुरू होण्यास तीन ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. बारा आठवड्यांमध्ये फायदा दिसू लागतो. त्यामुळे धीर धरणे फार महत्त्वाचे आहे. वातरोग हा सामन्य आजार आहे. त्यामुळे कोणीही जास्त टेन्शन ना घेता. घरगुती पद्धतीने त्याच्यावर उपाय आणि काळजी घेतल्यास हा आजार काही प्रमाणात हा आजार कमी होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

धूम्रपानावर लगाम! राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी

मुंबई । राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे.

राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

मात्र, आता या आदेशाची राज्यात कितपत अंमलबजावणी होणार, याबाबत अद्याप साशंकता आहे. कारण, सुटय़ा सिगारेट्स विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सिगारेटचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. हा ‘वैधानिक’इशारा सिगारेट शौकीन मनावर घेत नाहीत. एक किंवा दोन अशा सुटय़ा स्वरूपात सिगारेट्सची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्या विकत घेणाऱ्याला अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा ‘वैधानिक इशारा’ लेखी स्वरूपात देता येत नाही. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे या सगळ्याला आळा बसण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.