Monday, December 29, 2025
Home Blog Page 5728

माझ्यावर बॅन नसता तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता – श्रीसंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने गुरुवारी HELO अ‍ॅपवर लाईव्हमध्ये दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भारतीय संघाबद्दल आणि क्रिकेटबद्दल आपले विचार मांडलेत. या लाईव्हमध्ये त्याला डिव्हिलियर्सच्या फलंदाजीबद्दल विचारले असता. तो म्हणाला की,’जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की,’ कदाचीत माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता. कारण मी त्याला वारंवार बाद केले असते.’

श्रीसंतने धोनीच्या नीवृत्तीबाबत बोलताना सांगितले की,’ माहि भाई अजूनही खूप क्रिकेट खेळणार असून त्याला कोणाच्याही सल्यांची गरज नाहीय. बेन स्टोक्सने आपल्या ‘ऑन फायर’ या पुस्तकात धोनीवर टीका करत म्हटले होते की,’ वर्ल्ड कपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनी निरूत्साही दिसला होता. यावर बोलताना श्रीसंत म्हणाला की,’ बेन स्टोक्सने धोनीबाबत उगाच काहीतरी बोलू नये. जर धोनीने मनात आणलं तर तो स्टोक्सची कारकीर्द संपुष्टात आणु शकतो.’

टी -२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या आठवणानंतर श्रीशांत म्हणाला की, वर्ल्ड कप २००३ पासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांची त्याला इतकी चिड होती की, त्याला त्यांना मारण्याची इच्छा व्हायची. श्रीशांत पुढे म्हणाला, ‘मला आठवतेय की, मला मॅथ्यू हेडनला यॉर्करचा चेंडू टाकण्याची इच्छा होती पण त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. जर तुम्ही त्या सामन्याकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की, मी त्या सामन्यात मोठ्या उत्कटतेने खेळत होतो. मला फक्त ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा होता. २००३ मध्ये वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे भारताला पराभूत केले ते माझ्या मनात नेहमीच होते आणि त्यामुळे मला त्यांना ठार मारण्याची इच्छा होती. ‘

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली । जवळपास २ महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. सध्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे हळूहळू रुळावर येत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी तिकीट आरक्षण प्रक्रियेत एक बदल केला आहे.

येत्या १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाकडून हे नवे नियम लागू करण्यात येणार असून, आरक्षित तिकिटांनीच प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी १२० दिवस आधी आगाऊ प्रवासी आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. यापूर्वी २२ मे पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

३ महिने आगाऊ तिकीट काढण्याची मुभा असल्यामुळं आता प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची आखणी करणं शक्य होणार आहे. ३ महिन्यांसाठी तिकीटाचं आरक्षण करण्यासोबतच करंट सीट बुकींग, तात्काळ कोटा आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या स्थानांसाठीच्या तिकीट आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात जवळपास २३० रेल्वे गाड्यांसाठी ही आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यासाठी शासनाकडून देशभरात दोन लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरुनही तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचं कळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘तो’ दिवस उजाडायलाचं नव्हता पाहिजे; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुडेंची भावुक पोस्ट

मुंबई । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्दल पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंकजा यांनी याबाबत एक पोस्ट शेअर करत यामध्ये त्यांनी आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पंकजा मुंडे यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंकजा यांनी म्हटले आहे की, 3 जून’ तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही!! अगदी 2 जून 2014 ला जाऊन जग थांबावं असं वाटतं मनात आनंद, उत्साह, समाधान होतं 2 जून ला… बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते.. शाहू म्हणाला, “आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला”.. “खाऊ दे रे शाहू” असं त्याला तेच म्हणाले.. तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी.. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही.. म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते, असे पंकजांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावर्षी गोपीनाथ गडावर दर्शनासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करु नका, अस पंकजांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे. त्याऐवजी घरीच मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी पोस्टमधून केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

खुशखबर! मान्सून ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

पुणे । यंदा उन्हाच्या प्रकोपामुळे रेकॉर्ड ब्रेक तापमान महाराष्ट्रातील काही भागात नोंदवले गेले आहे. विशेषकरून विदर्भांत पारा ४७ अंशांच्या पार पोहोचला आहे. अशा वेळी लोकांना लवकरच या उष्ण वातावरणापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते. दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काही प्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडे चार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो. अशातच यंदा राज्यावर कोरोनासारखे भीषण संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यास अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. हवामान खात्याने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदाचे पर्जन्यमान १०० टक्के असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शेतकरी, कामगार यांना सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आज देशव्यापी ‘स्पीक अप इंडिया’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारला काही सूचना दिल्या होत्या. देशभरात कांग्रेस च्या नेत्यांनी या अभियानाला प्रतिसाद देत आपले व्हिडीओ सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक ट्विटरवर शेअर केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे. शेतकरी, कामगार यांना केंद्र सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत अशी मागणी चव्हाण यांनीही फेसबुकवर एक व्हिडीओ शेयर करत केंद्र सरकारकडे केली आहे.

आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोशल मीडियावर एक देशव्यापी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकारात्मक होते. यामध्ये पंतप्रधानांना काही विनंती केल्या होत्या. त्यातील सर्वात महत्वाची विनंती म्हणजे, शेतमजूर, गरीब, कामगार यांना ताबडतोब १०,००० रु द्यावेत आणि नंतर सहा महिने दरमहा ७ हजार ५०० रु द्यावेत.” अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ही  मागणी उचलून धरली आहे.

https://www.facebook.com/prithvrj/videos/253138452441433/

तसेच, सर्व कामगारांना सरकारच्या खजिन्यातून खर्च करून घरी पोहोचवावे, तसेच मनरेगा च्या उपक्रमांअंतर्गत मजुरांसाठी १०० दिवसांच्या रोजगार योजनेत वाढ करीत २०० दिवस करावी अशा मागण्या करण्यात आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओद्वारे या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारला घेरण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हे आंदोलन केले होते. याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सोलापुरात १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ८२२ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील १२ तासात ७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामध्ये ६० पुरुष तर १४ स्त्रियांचा समावेश आहे अशी माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. यातील अनेक जण पुण्य मुंबईहून आलेले असून बाहेरून प्रवास करून आलेल्यांनी क्वारंटाईन मध्ये राहावे आणि नियमांचे कडक पालन करावे असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८२२ वर पोहोचली आहे. एकुण बाधितांपैकी ३२१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे,
उर्वरित रुग्णांवरती उपचार सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्याती आत्तापर्यंत एकुण 72 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

१ जून नंतर लोकडाऊन वाढणार? अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई । कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. देशातील लॉकडाउनच चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र आता १ जून नंतर काय याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा फोनवरून चर्चा केली आहे. पीटीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन ३ मे आणि त्यानंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसात सरकार याबाबत काहीतरी घोषणा करण्याची शक्यता आहे. १ जून नंतर देशातील काही भागात हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो असं सूत्रांकडून समजत आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम अजून शिथिल केले जातील असंही बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देवळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण

नाशिक प्रतिनिधी ।  मुंबईतील नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे देवळालीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदर सरोज अहिरे मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या.  तेथून उपस्थित राहून आल्यापासून काही दिवस त्या स्वत:च क्‍वारंटाइन झाल्या होत्या. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट द्वारे कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट केले.

“नमस्कार, मी व माझ्या कुटुंबातील इतर 03 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत व कुटुंबाच्या पाठीशी आहेच. मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.” अशी माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दिवसभरात ३२ कोरोनाबाधीत रुग्ण  तर नाशिक शहरात १३ बाधित रुग्ण आढळलेत.दिवसभरात जिल्ह्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील संख्या ११०८ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय राऊत 

मुंबई । भारतीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन हे अनेक आक्षेपांनी भरले आहे. त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या अंगानी आक्षेप घेतले जात असतात. अनेक वाद घातले जातात. तर एकीकडे सावरकरांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. सावरकर विरोधी आणि सावरकर प्रेमी असे यद्ध नेहमीच जुंपलेले असते. आज त्यांच्या जनदिनानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे . केंद्र सरकारने तेवढे तरी काम करावे असे ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून त्यांनी सावरकरांना अभिवादन केले आहे. सावरकर हे खरे भारत रत्न असे ते म्हणाले आहेत. ते म्हणतात, ‘वीर सावरकर हे खरे भारत रत्न! पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी. इंग्रज सरकारने सावरकरांची ही पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे. केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे.’ अशा पद्धतीने त्यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकार्यात सहभागी होते. त्यांनी काही ग्रंथ, कविता, गझल लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे साहित्यही प्रसिद्ध आहे. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला….’ हे त्यांचे स्वातंत्र्यगीत सर्वज्ञात आहे. २८ मे १८८३ साली त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटिश सरकारविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग होता.

राज्यात दिवसभरात २ हजार ५९८ नवे कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ५९ हजार ५४६ वर

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक-१ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला -४, औरंगाबाद -३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३५,४८५), बरे झालेले रुग्ण- (८६५०), मृत्यू- (११३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५६९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (८२२०), बरे झालेले रुग्ण- (२३००), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६५)

पालघर: बाधित रुग्ण- (८२५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)

रायगड: बाधित रुग्ण- (९४४), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

जळगाव: बाधित रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६८९६), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३५३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)

सातारा: बाधित रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१४)

सांगली: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८७९), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३१)

जालना: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

लातूर: बाधित रुग्ण- (१०७), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

बीड: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

अकोला: बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

अमरावती: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधित रुग्ण- (४९५), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

एकूण: बाधित रुग्ण-(५९,५४६), बरे झालेले रुग्ण- (१८,६१६), मृत्यू- (१९८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३८,९३९)