Monday, December 29, 2025
Home Blog Page 5730

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आता तिसरं पत्र; म्हणाले..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकट काळात पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटासंदर्भात मोदींचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे मागील ३ महिन्यांपासून देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. काम ठप्प असल्यानं या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असं पवारांनी या पत्रात नमूद केलं आहे.

देशाच्या जीडीपीमध्येही बांधकाम व्यवसाय मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं आणि आवश्यक पावलं उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे. याआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मे रोजी आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मे रोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीतही पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

गुड न्यूज! मान्सून १ जूनला केरळात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली । शेतकरी वर्गासाठी एक खुशखबर मिळत आहे. भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण असून मान्सून १ जूनला केरळ दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याआधी हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये ५ जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे वादळी वारे वाहण्याती शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

याचबरोबर यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागने गेल्या महिन्यात वर्तवला होता. देशात अजूनही निम्म्याहून अधिक शेती सिंचनाखाली आहे. त्यामुळं अशी कोरडवाहू शेती  ही मान्सूनच्या पाण्यावर होते. या शेतजमिनी कुठल्याही सिंचन योजनांखाली नाही आहे. यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पावसावर जमिनींवरील शेती अवलंबून आहे.

शेतजमिनींवर खासकरून भात, मका, ऊस, कापूस आणि सोयिबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळे मान्सून वेळत दाखल होत असल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. सध्या देश करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. अशा वेळी मान्सून वेळेत दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह सरकार आणि जनतेलाही दिलासा मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या याच कामाचं राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फोन करून कौतुक केलं आहे.

राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. राज्यपपाल कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दरम्यान, मजूरांना घरी पाठवण्याच्या उपयोजनांवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू असले तरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याला ‘नायक’म्हटलं आहे. तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी देखील त्याला सलाम ठोकला आहे.

गेले काही दिवस सोनू रोज सुमारे १८ तासांहून अधिक काळ तो फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करण्यात व्यग्र असतो. परंतु, अशा परिस्थितीतही परवानगी मिळण्यात काही प्रमाणात अडचणी येत असल्याचं तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. बसमधून श्रमिकांना पाठवताना सुरक्षितत्याचे नियम तो पाळतो. आसनक्षमता ६० असलेल्या बसमधून तो ३५ प्रवाशांना पाठवतो. या प्रवाशांच्या जेवण-खाण्याची व्यवस्थाही तो करतो आहे. सोनूची मैत्रीण निती गोयलच्या बरोबरीनं त्याने मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यामुळे तो सर्वांसाठी त्यांचा लाडका सुपरहिरो बनला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे म्हणाले,’भारत-चीन वादात आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,’ भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये श्रीलंका कोणाचीही बाजू घेणार नाही. उलट ते त्यापासून दूरच राहतील. राजपक्षे म्हणाले की,’ या दोन्ही देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते स्वत: ला या प्रकरणापासून दूर ठेवेल. तामिळ चळवळीबद्दल राजपक्षे म्हणाले की,’ त्या लोकांना हे समजले गेले पाहिजे की, वेगळा देश निर्माण करण्याचा पर्याय हा योग्य नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या इस्लामिक किंवा तामिळीं दहशतवादावर कडक कारवाई करण्याविषयीही राजपक्षे यांनी सांगितले.

श्रीलंकेबरोबर चीनच्या संबंधांशी निगडित एक प्रश्नाला उत्तर देताना राजपक्षे म्हणाले- ‘श्रीलंका निर्बंधित परराष्ट्र धोरण राबवित राहिल. चीन आणि भारत हे दोघेही आपले जवळचे मित्र आहेत. श्री जवाहरलाल नेहरू आणि चिनी पंतप्रधान झोउ एनलाई यांनी जी पंचशील तत्त्वे मांडली होती. ज्यात प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व, आक्रमकता धोरण, एकमेकांच्या खाजगी कामात हस्तक्षेप न करणे, समानता आणि शांततापूर्ण सहजीवन यासारखी मूल्ये होती. श्रीलंका देखील या तत्त्वांवर विश्वास ठेवते आणि त्यानुसार ते आपले परराष्ट्र धोरण कायम ठेवतील.

इस्लामिक दहशतवादाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना राजपक्षे म्हणाले- ‘ही नक्कीच फार गंभीर समस्या आहे. मागील सरकार हे नियंत्रित करण्यात अपयशी ठरले हे स्पष्ट आहे. जर ते लोक सत्तेत राहिले असते तर भारत आणि बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या इतर शेजारच्या देशांनाही धोका वाढला असता. श्रीलंकेतील इस्टरच्या दिवशी चर्चवरील हल्ला हा आशिया खंडातील किंवा जगातील नागरिकांना लक्ष्य करणार्‍या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. सर्व आत्मघाती हल्ले करणारे चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण होते. त्या सरकारकडे अशा हल्ल्यांची आधीच माहितीदेखील होती परंतु त्याला रॊखण्यात ते अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले. राजपक्षे म्हणाले की, तमिळ असो की इस्लामिक असो, दहशतवादाविरूद्ध नेहमीच कठोर कारवाई केली जाईल.

तामिळ समस्येशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात राजपक्षे म्हणाले- ‘तमिळ नेत्यांशी यासंबंधात दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहेत. त्यांना हे समजायला हवे की हे शक्य नाही. या देशात त्यांनी स्वतंत्र तमिळ देशाच्या मागणीच्या आधारे बराच काळ राजकारण केले आहे. बहुतेक तमिळ लोक उत्तर आणि पूर्वेच्या बाहेर राहतात. पूर्वेला तामिळ आणि अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्या अजूनही आहे. कोलंबो शहराची बहुतेक लोकसंख्या ही तामिळ आणि मुस्लिम आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या ईशान्य भागात तमिळ देशाची मागणी करणे योग्य ठरणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि झुकरबर्गला ट्विटरच्या सीईओने दिला ‘हा’ इशारा

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटची सत्य पडताळणी (फॅक्ट चेक) केल्यानंतर ट्विटरवर ट्रम्प आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी टीका केली होती. त्यानंतर आता ट्विटरचा सीईओ जॅक डोर्सी यांनी यापुढेही ट्विट्सची सत्य पडताळणी करणार असल्याचे ठणकावले आहे.एखाद्या ट्वीटच्या सत्यतेबाबत शंका आल्यास युजरना ट्विटर त्याविषयी सावध करते. मात्र, हा नियम अमेरिकेच्या अध्यक्षांना लावण्यास ट्विटर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नकार देत आहे. मात्र, मंगळवारी प्रथमच ट्विटरने आपले धोरण बदलत चक्क अमेरिकन अध्यक्षांच्या ट्वीटच्या सत्यतेबाबतही शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, लोकांनी सोशल मीडियावर काय लिहावं, याबाबत सोशल मीडिया चालवणाऱ्या एखाद्या खासगी कंपनीने या प्रकरणात पंच अथवा मध्यस्थ बनू नये असं मार्क झुकरबर्गने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होत.यावर ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. एक कंपनी म्हणून सत्यता पडताळणीबाबत (फॅक्ट चेक) मी स्वत: जबाबदार आहे. त्यामुळे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना या वादापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भविष्यात जगभरातील विविध देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये चुकीच्या, खोट्या आणि भ्रम पसरवणाऱ्या माहितीबाबत आम्ही पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटबाबत ट्विटर कंपनीने प्रथमच सावधगिरीचा इशारा दिला. ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या दोन ट्विटबाबत ट्विटरने इशारा झळकवला आहे. या दोन्ही ट्वीटच्या अखेरीस ट्विटरने एक लिंक दिली आहे. ‘मेल इन बॅलट्सची सत्यता तपासा’ अशी ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यास युजर ट्विटर मोमेंट्स पेजवर पोहोचतात व तेथे ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटच्या विषयाची सत्यता तपासता येते. तसेच ट्रम्प यांच्या दाव्याबाबतच्या नव्या बातम्याही वाचता येतात. ट्विटच्या वादानंतर सोशल मीडिया कंपन्यांना नियंत्रित करण्यासाठीच्या एका आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती व्हाईट हाउसने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बर्गर साठी काही पण…केला तब्बल २५० मैलांचा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी आहे. काही ठिकाणी काटेकोर तर काही ठिकाणी नियम शिथिल केले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही आहे. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाता येत नाही तर आवडीचे पदार्थही खाता येत नाही आहेत. ब्रिटनमधील दोन गृहस्थांना यावेळी फास्ट फूड खायची ईच्छा झाली. तर त्यासाठी त्यांनी चक्क २५० मैलांचा प्रवास केला.

ऐकावं ते नवलच म्हणतात ते असे काहीसे असते. रायन हॉल आणि पॅस्ले हॅमिल्टन या परिसरात राहणाऱ्या दोन गृहस्थांना फास्ट फूड खावेसे वाटत होते. पण संचारबंदीमुळे आजूबाजूची सर्व दुकाने बंद होती. पण कोणत्याही परिस्थितीत फास्ट फूड खायचेच म्हणून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जायचे ठरवले आणि चक्क २५० मैलांचा प्रवास केला आणि बर्गर खाल्ले. पीटरबर्गला जाऊन रांगेत थांबून त्यांनी बर्गर खाल्ले. यासाठी त्यांनी वाहनाच्या इंधनावर २७ युरो खर्च केले आहेत.

फास्ट फूडचे दुकान सापडल्यावर त्यांनी चिकन मॅकनट मील, लार्ज बिग मॅक मील, दोन केक, दोन डबल चीजबर्गर अशा वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत चाखली. ज्यासाठी त्यांना एकूण २० युरो खर्च आला आणि हे खाण्यासाठी त्यांना १५ मिनिटे वेळ लागला. यासाठी त्यांनी ७ तासांचा प्रवास आणि २७ युरो खर्च केले. संचारबंदीमुळे काही दिवस फास्ट फूड ना खाल्लेले हे दोघे जणू वर्षानुवर्षे फास्टफूड न खाल्ल्यासारखे प्रवास करून परतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

१ जून नंतर काय? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्च मध्ये जगातील आणि देशातील रुग्णसंख्या पाहून सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. देशातील परिस्थिती बिकट होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने संचारबंदीची मुदत वाढवत नेली. आता ३१ मे पर्यंत वाढविलेली संचारबंदी १ जूनला हटवली जाणार की संचारबंदी अशीच सुरु राहणार आणि नियम शिथिल केले जाणार का? याबाबतअनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता माहिती दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या वेबिनार मध्ये ठाकरे यांनी याबाबत उत्तरे दिली आहेत.

महाराष्ट्रातील पुढची संचारबंदीची स्थिती काय असेल यावर ठाकरे यांनी भाष्य केले आहे. आहे त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन वावरायला शिका असे सांगितले आहे. तसेच “कोरोनाबरोबर जगायला शिका म्हणणे अपरिहार्य आहे. त्यामुळे संचारबंदी हा शब्द वापरणे बंद करायला हवे. कोरोनानंतरचे जग तसेही बदललेले असणार आहे. त्या जगाशी मिळते जुळते घेऊन स्वतःला बंद करून फिरा” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपण आपली जीवनशैली आता बदलली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक विलगीकरणाचे सर्व नियम पाळत, मास्क चा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सतत तोंडाला हात न लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा प्रकारची सर्व खबरदारी घेऊन वावरणे शिकले पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाचे संक्रमण भारतात सुरु झाल्यावर पुढील परिस्थितीची राज्य सरकारला कल्पना होती, त्यानुसार आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी लष्कराचे मार्गदर्शन घेणे, ते कशा पद्धतीने तातडीने हॉस्पिटल आणि सुविधा उभ्या करतात यांची माहिती घेणे या सगळ्याच्या तयारी सुरु होत्या. पण अचानक केंद्र सरकारने संचारबंदी जाहीर केली. त्याआधीच राज्य सरकारने एक एक गोष्ट बंद करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता संचारबंदी लवकर उठवता येणार नाही. परिस्थिती बघून हळूहळू गोष्टी सुरु केल्या जातील असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकूणच संचारबंदी उठणार नसली तरी हळूहळू तिचे नियम शिथिल नक्कीच शिथिल केले जातील असे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. स्थलांतरीत मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तसंच जे मजूर चालत निघाले आहेत त्यांना रोखून शिबिरांमध्ये दाखल करावं आणि त्यांच्या जेवणासह मूलभूत सुविधा त्यांना पुरवाव्यात असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

प्रशासकीय पातळीवर मजुरांच्या व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने हजारो स्थलांतरीत मजूर चालत आणि मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी निघाले आहेत. मजुरांची नोंदणी, वाहतूक आणि त्यांना पुरेसं जेवण मिळत नसल्याचं यातून स्पष्ट होतं. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं मजुरांवर ही परिस्थिती ओढवली आहे. यामुळे जे मजूर गावी चालत निघाले आहेत, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. पायी निघालेल्या मजुरांना राज्यांनी रोखावं. त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. तसेच रेल्वेने प्रवासादरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असं सुप्रीम कोर्टाने निर्देशात स्पष्ट केलं आहे. स्थलांतरीत मजुरांसबंधीच्या या प्रकरणावर आता ५ जूनला सुनावणी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

कराड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीकरांना दिलासा; ८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत असतानाच, दहा-बारा दिवसांपूर्वी म्हासोली येथे नव्याने कोरोना साखळी निर्माण झाल्याने तालुका पुन्हा हादरून गेला. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने म्हासोली अल्पावधीत हॉटस्पॉट बनले. १८ व १९ मे रोजी म्हासोली येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या निकट सहवासातील ५० वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवक, १६ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय मुलगा, ६२ वर्षीय वृद्ध गृहस्थ, ४८ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष व ३५ वर्षीय महिला अशा एकूण ८ रूग्णांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांच्या स्वॅबची तपासणी केली असता, सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

या कोरोनाग्रस्त रूग्णांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून यशस्वी उपचार करण्यात आले. तसेच नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे आठही रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकूण ६८ रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

प्रियकराला घरी बोलवत असे मुलगी, वडिलांनी विरोध केला तर उचलले हे भयावह पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये नुकतेच एक प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये एका मुलीने तिच्या प्रियकरासह मिळून आपल्या वडिलांची हत्या केली. कारण असे आहे की त्यांनी तिला आपल्या आवडीनुसार लग्न करण्याची परवानगी दिली नव्हती. ‘डेली औसाफ’च्या वृत्तानुसार, ही मुलगी एका मुलावर प्रेम करीत होती, परंतु तिचे वडील याविरोधात होते, त्यानंतर या मुलीने हे भयानक पाऊल उचलले आणि तिच्या प्रियकरासह मिळून आपल्या वडिलांना इलेक्ट्रिक करंट देऊन हत्या केली.

असं सांगण्यात आलं आहे की, ही मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिच्या घरीच संबंध ठेवत असे आणि हे कळू होऊ नये म्हणून ती आपल्या वडीलांना झोपेच्या गोळ्या देत असे. अल्लाह रक्‍खी नावाची ही मुलगी सांगते की ‘आम्ही पाच भावंड असून मी सर्वात मोठी आहे. मी माझ्या प्रियकराच्या बोलण्यात आले होती. जेव्हा माझी लहान भावंडे झोपायचे आणि वडील कामावर जायचे, तेव्हा मी माझ्या प्रियकराला माझ्या घरीच भेटायचे. आमची मैत्री तीन वर्षे टिकली. जेव्हा मी माझ्या वडिलांबरोबर इर्शादशी लग्न करण्याविषयी बोलले तेव्हा त्यांनी नकार दिला, त्यानंतर आम्ही त्यांना ठार मारण्याची योजना आखली. मुलीचे असे म्हणणे आहे की तिच्या वडिलांनी नकार दिल्यानंतरही आम्ही एकमेकांना भेटतच राहिलो.

तिचे म्हणणे आहे की, इर्शाद म्हणाला ‘मी सर्व काही ठीक करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तुझ्याशीच लग्न करेन.’ आणि एक दिवस इर्शादने मला झोपेच्या पाच गोळ्या दिल्या, मग मी त्या दुधात मिसळून हे दूध वडिलांना दिले. हे दूध पिऊन माझे वडील बेशुद्ध झाले. मग इर्शाद माझ्या खोलीत आला. त्याने माझ्याशी संभोग केला, नंतर मला वायर मागितली आणि त्यानंतर माझ्या वडिलांना इलेक्ट्रिक करंट दिला. ती म्हणते की ‘मी त्याला असे करण्यास नकार दिला, पण इर्शाद म्हणाला की, माझे वडील या जगात नाहीत, आणि तुझे वडील नसले तरी काहीच फरक पडणार नाही.’ त्याच बरोबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की इर्शादचे कॅरेक्टर चांगले नव्हते आणि म्हणूनच तिच्या वडिलांना तो आवडत नव्हता आणि त्यामुळेच ते त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.