Monday, December 29, 2025
Home Blog Page 5733

‘या’ ३ बॅट्समनला बॉलिंग करणं सर्वात अवघड, ब्रेटलीचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीची गणना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. मात्र असे असूनही काही फलंदाज त्याच्याविरुद्ध सहज खेळू शकले. आपल्या रिटायर्डमेंटच्या अनेक वर्षांनंतर या माजी वेगवान गोलंदाजाने खुलासा केला आहे की, कोणत्या फलंदाजासमोर त्याला गोलंदाजी करण्यास अडचण व्हायची. झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पोम्मी बांगवाने ब्रेट ली साठी ज्या तीन फलंदाजांना गोलंदाजी करणे कठीण होते त्याबद्दल बोलायला सांगितले.

४३ वर्षीय ब्रेट लीने सचिन तेंडुलकरचे ऑल टाइम बेस्ट असे वर्णन करताना म्हटले की, ‘आपले शॉट्स खेळण्यासाठी त्याने नेहमीच जास्त वेळ घेतला. तो म्हणाला, “मी सचिनचे नाव पहिले घेईन. का, तर त्याच्याकडे शॉट्स खेळायला अतिरिक्त वेळ असायचा. आपल्याला माहित असे की, आपण सर्वोत्तम खेळाडूंसह खेळत आहोत. आपल्याला वाटते की तो पॉपिंग क्रीझमध्ये खेळत आहे, परंतु शॉट खेळण्यासाठी तो वेगाने परत येत असे. माझ्या मते सचिन हा जगातील सर्वोत्तम फलंदाज होता.

ब्रेट लीने दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लारा याची निवड केली. तो म्हणाला, “लारा एकाच षटकात वेगवेगळ्या ठिकाणी षटकार मारू शकतो या अत्यंत हुशार फलंदाजासाठी तुम्ही सहाच्या सहा चेंडू एका जागीच टाका, तो ते प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दिशेने खेळू शकतो.”

ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने जॅक कॅलिस याची तिसरा बेस्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. तो म्हणाला की,’ दक्षिण आफ्रिकेचा हा ऑल राउंडर एक कंप्लीट क्रिकेटर होता. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हटले आहे की सचिन हा ऑल टाइम बेस्ट होता, परंतु क्रिकेटने पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू गॅरी सोबर्स होता. मी त्याला खेळताना पाहिले नाही, मात्र मी जॅक कॅलिसला खेळताना पाहिले आहे आणि मी त्याच्याविरूद्ध खेळलोही आहे. तो एक महान कंप्लीट क्रिकेटर होता.

जॅक कॅलिसचे कौतुक करताना ब्रेट ली म्हणाला की, “तो गोलंदाजीने डावाची सुरुवात करू शकत होता, फलंदाज म्हणूनही सलामी देऊ शकत होता तसेच बरेच कॅचही पकडू शकत होता.” खेळाडूंच्या टेक्निकच्या बद्दल बोलताना त्याने भारताच्या स्टार खेळाडूंसह अ‍ॅडम गिलख्रिस्टचेही कौतुक केले.

ब्रेट ली म्हणाला, “मला त्याची आठवण येते. गिलख्रिस्ट यष्टीरक्षक म्हणून ग्रेट होता, परंतु तांत्रिकदृष्ट्या कॅलिस माझ्यासाठी बेस्ट होता.” ब्रेट ली म्हणाला, “टेक्निकच्या दृष्टीने राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण हे उत्तम होते. तसेच वीरेंद्र सेहवागही होता जो की कसोटी सामन्यातही कोणत्याही चेंडूवर षटकार मारू शकत होता.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसने उघडली ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम

नवी दिल्ली । विरोधकांच्या मागण्याकडे कानाडोळा करणाऱ्या भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसकडून ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला आज सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते समर्थक आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. या मोहिमेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा तसंच काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मोठे नेते सहभागी झाले आहेत.

काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, या मोहिमेत ५० लाखांहून अधिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होत आहेत. आर्थिक परिस्थिती, स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न तसंच बेरोजगारी या संकटांवर ‘स्पीक अप’मध्ये चर्चा केली जाणार आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेस मोदी सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या मांडत आहे. स्थलांतरीत मजुरांना मोफत त्यांच्या घरी पोहचवण्यात यावं तसंच त्यांना १० हजार रुपयांची तत्काळ मदत पुरवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

तर दुसऱ्या मागणीद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तत्काळ आर्थिक सहाय्य देण्याची मागणी काँग्रेसनं मांडली आहे. याशिवाय मनरेगामध्ये कामाचे दिवस वाढवून वर्षातून २०० दिवस करण्याची मागणीही विरोधी पक्षानं केली. सुरुवातीला वर्षांत १०० दिवसांची रोजगार हमी देणाऱ्या या योजनेत दिवसांची वाढ करून अगोदर वर्षात १२० दिवस आणि नंतर वर्षाला १५० दिवसांची रोजगार हमी या योजनेद्वारे देण्यात आली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, यांच्यासहीत पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पीपीई किट खरेदी घोटाळा: भाजप प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

शिमला । पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये २ व्यक्ती ५ लाखाची लाच देण्यासंदर्भात बोलत होत्या. या क्लीपच्या आधारे दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत हिमाचल प्रदेशातील आरोग्य यंत्रणेचे संचालक ए.के. गुप्ता यांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीत राजीव बिंदल यांच्याभोवती फिरत असल्यानं काल बुधवारी राजीव बिंदल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला.

हा राजीनामा तात्काळ मंजूरही करण्यात आला. मात्र, आपण नैतिक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचा दावा बिंदल यांनी केला आहे. जेणेकरुन या प्रकरणाच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये, असे बिंदल यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

परंतु, बिंदल यांनी या घोटाळ्याशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पेशाने डॉक्टर असलेले राजीव बिंदल हे ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशात भाजप पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे. जे.पी. नड्डा यांनी जानेवारी महिन्यात राजीव बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या १४३ दिवसांत त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले,’ आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादात हस्तक्षेप करत म्हंटले की,’ जर दोन्ही देश सहमत असतील तर यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी तयार आहेत. ५ मे रोजी सुमारे २५० चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली त्यावरून लडाखमध्ये या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय आणि चीनी बाजूचे सुमारे १०० सैनिक जखमी झालेत. या घटनेनंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर सिक्कीममध्येही ९ मे रोजी अशीच एक चकमक झाल्याचे उघडकीस आले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की,’आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना याबाबत माहिती दिली आहे. आता अमेरिका या दोन्ही देशांमधील सीमावादात मध्यस्थी करण्यास सज्ज, इच्छुक आणि सक्षम आहे. जर दोन्ही देशांनी यावर सहमती दिली तर आपण तसे करू शकतो. धन्यवाद.’

 

कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हंटले की, नरेंद्र मोदींच्या भारताकडे आता कोणी वाईट हेतूने पाहू शकत नाही. पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चिनी सैन्याच्या तणाव वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांची बैठक घेतली. असे मानले जाते की, या बैठकीत बाहेरील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराच्या तयारीवर चर्चा झाली.

पॅनयाँग लेक, गॅलवान व्हॅली, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डि येथे गेल्या २० दिवसांपासून भारतीय आणि चिनी सैन्य आक्रमकता दाखवत आहेत. अधिकृत सूत्रांनी काल सांगितले कि,’चीनबरोबरच्या या ३५०० कि.मी. सीमेवरील धोरणात्मक भागात भारत आपले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प थांबविणार नाही. तसेच चीनही त्यांना रोखण्यासाठी कुठल्याही दबावात येणार नाही.

चीनने बुधवारी म्हटले की, भारताच्या सीमेवरची परिस्थिती पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात आहे. दोन्ही देशांकडे संवाद आणि विचारविनिमयातून प्रश्न सोडविण्यासाठी योग्य यंत्रणा आणि संचार वाहिन्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान सुरू असलेल्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की,’ सीमेवरील मुद्द्यांबाबत चीनची भूमिका स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आहे. ते म्हणाले की,’आम्ही दोन्ही देशांमधील कराराचे काटेकोरपणे पालन करीत आहोत.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मोठी बातमी! टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शिक्कामोर्तब; वेळापत्रक जाहीर

मुंबई । कोरोना विषाणूच्या महामारीने गेले दोन-अडीच महिने क्रिकेटविश्व ठप्प झालेलं आहे. मात्र, आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळेच कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० क्रिकेट लीग स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक क्रिकेट मालिकांच्या तारखादेखील आता निश्चित केल्या जात आहेत. याच दरम्यान ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर करून भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का दिला आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली होती. आज त्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बॉर्डर-गावसकर कोसोटी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

झोया मोरानीने पुन्हा एकदा केले प्लाझ्मा डोनेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच ते कोरोनामुक्त ही होत आहेत. काही दिवसांपासून अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी येऊ शकणार असल्याची खात्री झाली आहे. काही ठिकाणी या थेरपीचे प्रात्यक्षिकही करण्यात आले होते. त्यामुळे अधिक धोका असणाऱ्या रुग्णांना या थेरपीपासून कोरोनामुक्त करण्याची आशा निर्माण झाली आहे. बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी झोया मोरानी हिला कोरोना झाल्याची माहिती मिळताच बॉलिवूड मध्ये खळबळ झाली होती. मात्र झोया कोरोनमुक्त झाली आहेच पण तिने आपल्या प्लाझ्मा डोनेट केल्या आहेत. त्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे. आता तिने पुन्हा एकदा आपल्या प्लाझ्मा डोनेट केल्या आहेत.

झोयाने याआधी एकदा प्लाझ्मा डोनेट केल्या होत्या. कोरोनामुक्त झाल्यापासून तिने कोरोना रुग्णांना मदत करण्याचे ठरवले आहे. ती शक्य तशी मदत या रुग्णांना करत असते. तिने तिच्या प्लाझ्मा डोनेट केल्या होत्या. आता पुन्हा एकदा तिने तिच्या प्लाझ्मा डोनेट केल्याचे तिने तिच्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना बरे करता यावे यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे.

मानवी शरीरामध्ये विविध रोगांशी लढण्यासाठी अँटीबॉडीज असतात. या अँटीबॉडीज पेशींमध्ये असतात. रक्तातील या पेशींना प्लाझ्मा म्हणतात. या प्लाझ्मा आजारी रुग्णाच्या शरीरात घातल्यास त्या रुग्णाला बरे करण्यास मदत करतात. पुण्यातही ससून रुग्णालयात नुकतीच प्लाझ्मा थेरपी यशस्वी करण्यात आली आहे. हळूहळू विविध उपचारपद्धती विकसित होत आहेत. मागच्या वेळी मी प्लाझ्मा डोनेट केला तेव्हा एक रुग्ण आयसीयू मधून बाहेर आला होता असे झोयाने सोशल मीडियातून सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशभरात मागील २४ तासांत ६,५६६ कोरोनाचे नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ।  भारताभोवती दिवसागणिक कोरोनाचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते आता ४२.४ टक्क्य़ांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१३ देशात कोरोना व्हायरस या महामारीने विळखा घातला आहे. जगात आतापर्यंत ५७ लाख ८९ हजार ८४३ जणांना संसर्ग झाला आहे. तर तीन लाख ५७ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत २४ लाख ९७ हजार ६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतात जुलैच्या सुमारास करोना विषाणूची शिखरावस्था गाठली जाऊन मृतांची संख्या १८ हजारापर्यंत जाऊ शकते, असे साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसेच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी म्हटले आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, अजूनही करोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. भारतातील कोरोनाची साथ जुलैत शिखरावस्थेत राहील व तेव्हा भारतातील बळींची संख्या १८ हजार असू शकते. सध्या जी वेगवेगळी प्रारूपे सादर करण्यात आली आहेत त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात रुग्णांची संख्या चार ते सहा लाख राहील त्यात मृत्युदर तीन टक्के राहील. त्यामुळे अंदाजे १२ ते १८ हजार बळी जातील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पुलवामा सारखा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी एका रात्री उधळून लावला; पहा व्हिडीओ

श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने पुन्हा एकदा कारमध्ये आयईडी भरून बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी कट उधळून लावला आहे. पुलवाम्यातील आइनगुंड परिसरात आयईडीने भरलेली एक सँट्रो कार सुरक्षा दलाने जप्त केली. या कारवर कठुआची नंबर प्लेट आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा पोलिसांना काल रात्री विश्वासार्ह माहिती मिळाली की स्फोटकांनी भरलेल्या कारने एक दहशतवादी फिरत आहे. बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलाचे (एसएफ) रात्रीत सदर कार शोधून काढली. पुलवाम्यातील राजपोरा येथील आइनगुंडमधून ही कार जप्त करण्यात आली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात आयईडी होते. सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्याचा कट होता अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

कारवर कठुआची नंबर प्लेट
या कारवर जेके-०८ १४२६ नंबरची प्लेट होती. हा कठुआचा नंबर आहे. कठुआचा हीरानगर हा परिसर पाकिस्तानी घुसखोराचा विचार करता अतिशय संवेदनशील मानला जातो. हे पाहता या कटामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पुलवामा हल्ल्यात अशाच कारचा वापर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पुलवाम्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आयईडीने भरलेल्या अशाच एका कारचा वापर केला होता. ही कार सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर धडकली होती.

 

राज्यात दिवसभरात २ हजार १९० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५६ हजार ९४८ वर

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ०३ हजार ९७६ नमुन्यांपैकी ५६ हजार ९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३, सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५० रुग्ण आहेत तर ४५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३४,०१८), बरे झालेले रुग्ण- (८४०८), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,५०७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७७८१), बरे झालेले रुग्ण- (२२२४), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७७१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)

रायगड: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०१२), बरे झालेले रुग्ण- (७५०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०५), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६६१४), बरे झालेले रुग्ण- (३०८६), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२३७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (२८७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)

सातारा: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३४६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)

सांगली: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३३५), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)

जालना: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (२३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)

परभणी: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

बीड: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

अकोला: बाधित रुग्ण- (४८७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधित रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

भंडारा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधितरुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

एकूण: बाधित रुग्ण-(५६,९९८), बरे झालेले रुग्ण- (१७,९१८), मृत्यू- (१८९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,१२५)

सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी : मोहरेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी तिसरा बळी गेला असून शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय व्यक्तीची मागील तीन दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असताना दुपारी त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. खानापूर तालुक्यातील सुलतानगादेतील महिला, आंबेगाव येथील 36 वर्षीय तरुण, करुंगली मधील 33 वर्षीय तरुण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडीतील आठ वर्षीय मुलीचा त्यामध्ये समावेश आहे. या चौघांना मिरजेतील कोरोना रुग्णालयातील दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत ४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. सध्या मुंबई तसेच अन्य राज्यातून आलेले प्रवासी दाखल होत आहेत. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यामध्ये सध्या कोरोना रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिराळा तालुक्यातील मोहरे येथील 50 वर्षीय व्यक्ती मुंबईतून आली होती. त्या व्यक्तीमध्ये कोरोना लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. त्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मिरज येथील आयसोलेशन कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु मागील तीन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड निर्माण झाला होता. ती व्यक्ती 3 दिवस ऑक्सिजनवर होती. सकाळपासून त्या व्यक्‍तीची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक त्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवून होते, मात्र दुपारी मोहरे येथील त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोहरेतील व्यक्तीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या बळीची नोंद झाली. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ९२ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी तीन व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४८ जण कोरोनामुक्त रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४१ कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, सुलतानगादे, करंगुली व आंबेगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तिन्ही ठिकाणी कंटेनमेंट झोनची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.