‘या’ ३ बॅट्समनला बॉलिंग करणं सर्वात अवघड, ब्रेटलीचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीची गणना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. मात्र असे असूनही काही फलंदाज त्याच्याविरुद्ध सहज खेळू शकले. आपल्या रिटायर्डमेंटच्या अनेक वर्षांनंतर या माजी वेगवान गोलंदाजाने खुलासा केला आहे की, कोणत्या फलंदाजासमोर त्याला गोलंदाजी करण्यास अडचण व्हायची. झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पोम्मी बांगवाने ब्रेट ली साठी ज्या तीन फलंदाजांना गोलंदाजी करणे कठीण होते त्याबद्दल बोलायला सांगितले.

४३ वर्षीय ब्रेट लीने सचिन तेंडुलकरचे ऑल टाइम बेस्ट असे वर्णन करताना म्हटले की, ‘आपले शॉट्स खेळण्यासाठी त्याने नेहमीच जास्त वेळ घेतला. तो म्हणाला, “मी सचिनचे नाव पहिले घेईन. का, तर त्याच्याकडे शॉट्स खेळायला अतिरिक्त वेळ असायचा. आपल्याला माहित असे की, आपण सर्वोत्तम खेळाडूंसह खेळत आहोत. आपल्याला वाटते की तो पॉपिंग क्रीझमध्ये खेळत आहे, परंतु शॉट खेळण्यासाठी तो वेगाने परत येत असे. माझ्या मते सचिन हा जगातील सर्वोत्तम फलंदाज होता.

ब्रेट लीने दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लारा याची निवड केली. तो म्हणाला, “लारा एकाच षटकात वेगवेगळ्या ठिकाणी षटकार मारू शकतो या अत्यंत हुशार फलंदाजासाठी तुम्ही सहाच्या सहा चेंडू एका जागीच टाका, तो ते प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दिशेने खेळू शकतो.”

ऑस्ट्रेलियाच्या या माजी क्रिकेटपटूने जॅक कॅलिस याची तिसरा बेस्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. तो म्हणाला की,’ दक्षिण आफ्रिकेचा हा ऑल राउंडर एक कंप्लीट क्रिकेटर होता. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हटले आहे की सचिन हा ऑल टाइम बेस्ट होता, परंतु क्रिकेटने पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू गॅरी सोबर्स होता. मी त्याला खेळताना पाहिले नाही, मात्र मी जॅक कॅलिसला खेळताना पाहिले आहे आणि मी त्याच्याविरूद्ध खेळलोही आहे. तो एक महान कंप्लीट क्रिकेटर होता.

जॅक कॅलिसचे कौतुक करताना ब्रेट ली म्हणाला की, “तो गोलंदाजीने डावाची सुरुवात करू शकत होता, फलंदाज म्हणूनही सलामी देऊ शकत होता तसेच बरेच कॅचही पकडू शकत होता.” खेळाडूंच्या टेक्निकच्या बद्दल बोलताना त्याने भारताच्या स्टार खेळाडूंसह अ‍ॅडम गिलख्रिस्टचेही कौतुक केले.

ब्रेट ली म्हणाला, “मला त्याची आठवण येते. गिलख्रिस्ट यष्टीरक्षक म्हणून ग्रेट होता, परंतु तांत्रिकदृष्ट्या कॅलिस माझ्यासाठी बेस्ट होता.” ब्रेट ली म्हणाला, “टेक्निकच्या दृष्टीने राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण हे उत्तम होते. तसेच वीरेंद्र सेहवागही होता जो की कसोटी सामन्यातही कोणत्याही चेंडूवर षटकार मारू शकत होता.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment