Monday, December 29, 2025
Home Blog Page 5734

साताऱ्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ४२२ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा शनिवारपासून रेड झोन बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून मागील ४ दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २०० ची भर पडल्याने जिल्हावासी हैराण झाले आहेत. आज कोरोनाबाधितांच्या संख्येत ८० ची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा ४२२ वर जाऊन पोहचला आहे. साताऱ्यातील ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय पसरले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कम्युनिटी स्प्रेडचा प्रकार जिल्ह्यात सुरु झाल्याने गावं पूर्णपणे सील करण्यात येत आहेत. कराडमधील शेणोली गावात एकाच घरातील ७ व्यक्ती बाधित आढळल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याच संख्येत रात्री उशिरा आलेल्या २८ पॉझिटिव्ह अहवालांची भर पडली. साताऱ्यातील एकूण परिस्थिती पाहता लॉकडाऊन आणखी कडक करुन वाढवण्याची घोषणा ३१ मे पूर्वी करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुंबईवरून गावाकडे आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळत असून या लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात यावं अशी मागणीही जोर धरत आहे.

बेलवडे येथील अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला 68 वर्षीय पुरुष 19 मे रोजी मुंबईवरून आलेला होता. घरात विलगीकरणात कक्षात असतानाच तो तिथे चक्कर येऊन पडला. या अपघातातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा स्त्राव अगोदर घेण्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सातारा जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी
वाई तालुका – जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे – 1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय-1.
महाबळेश्वर तालुका – देवळी-2, पारुट-3, गोरोशी-1 .
जावळी तालुका – तोरणेवाडी-1, बेलवडी-1 (मृत).
खटाव तालुका – बनपूरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी-2,
सातारा तालुका – वावदरे-1
कराड तालुका – शेणोली स्टेशन -7

 

कोरोनातून बरे झालेल्या युवकाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय व्यक्ती भारतातील केरळ या राज्यातील आहे. तो दुबईच्या या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये आपले नातेवाइक आणि इतर ६ जणांसह राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी दुबई पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आणि हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले.

७ मे रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले
सदर घटनेची माहिती देताना अधिकारी म्हणाले, “तो मानसिकदृष्ट्या स्वस्थ नव्हता. त्याच्या मृत्यूमागे कुठल्याही घातपाताची देखील शंका नाही. ही घटना रविवारी घडली. ”नीलाथ मोहम्मद फिरदौस नाव असलेली ही व्यक्ती दुबईच्या देयरा भागातील इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. १० एप्रिल रोजी तो कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे फिरदोसचे काका नौशाद अली यांनी सांगितले. नंतर तो ७ मे रोजी ठीक झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

बाल्कनीत जाऊन मारली ऊडी
मृताच्या नातेवाईकाने सांगितले की, “तो सकाळी प्रार्थना करण्यासाठी उठला, त्यावेळी घरातील सर्वजण नेहमीप्रमाणे रोजच्या कामात व्यस्त होते, मग तो बाल्कनीत गेला आणि तेथून उडी मारली. त्याची मानसिक प्रकृती ठीक नव्हती, काही काळापासून तो अस्वस्थ होता. त्याला भीती वाटायची की कोणीतरी त्याच्यावर हल्ला करेल . काही दिवस त्याने खाणेही बंद केले होते. त्याला वाटत होते की त्याला मारण्यासाठी त्याच्या अन्नामध्ये कोणीतरी विष मिसळले आहे, त्यामुळे तो पाणी पिण्यासही नकार देत होता. ‘

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खूषखबर! आता २०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी, तासाभरात अहवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चपासून काही प्रमाणात आलेल्या कोरोना संक्रमणाने आता वेग धरला आहे. गेले अनेक दिवस सतत रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची चाचणी करणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही आहे. खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. पण आता एक नवी पद्धत संशोधित केली आहे. त्यामुळे लवकरच चाचणीचे मूल्य कमी होणार आहे. केवळ २०० रुपयात आता कोरोनाची चाचणी करता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने के किट विकसित केले आहे. यामध्ये रिलायन्स ने मदत केली आहे.

कोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification) परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी माहिती दिली आहे.  “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक असिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” अशी माहिती मांडे यांनी दिली आहे. आता सामान्य माणसालाही आपल्या खिशाला परवडेल अशी कोरोनाची चाचणी करता येणार आहे.

“आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे.  टेस्टसाठी लागणारे साहित्यही बिनखर्चाचे आहे. आणि ती कमी वेळातही करता येणार आहे. सध्या चाचणीचे अहवाल येण्यास बराच उशीर लागतो आहे. लोकांचे अहवाल पेंडिंग राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना परवडू शकेल आणि वेळही वाचवेल अशा या चाचणीने दिलासा मिळणार आहे. या चाचणीसाठी सीएसआयआर ने रिलायन्ससोबत करारही केला आहे.  जम्मूतील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीन आणि रिलायन्स उद्योग एकत्र येऊन कोरोनाचे  निदान करणारी एक नवीन आरटी-लॅम्प किट विकसित करणार आहे अशी माहिती दिली होती. या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच करोना चाचणीचा अहवाल आपल्याला मिळू शकेल. अशी माहिती देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही यासंदर्भात एक व्हिडीओ बनविला होता. आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे दवे असल्याचे आज सांगितले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीमी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील असे सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते सातत्याने महाविकास आघाडीचे सरकार कोरोना काळात उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याचा दावा करीत आहेत. तसेच केंद्र सरकारने निधी देऊनही सरकार उपाययोजना करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारकडून आलेला निधी आणि त्याची वर्गवारी स्पष्टीकरणासह सांगितली होती. यावर विविध नेत्यांनी फडणवीसांचे दावे चुकीचे असल्याचे सांगितले होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्यक्ष रोख रक्कम आणि प्रत्यक्ष कर्ज यांची आकडेवारीसहित माहिती द्या तर चर्चा करू असे म्हंटले होते.

 

आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत सरकारला जाणीवपूर्वक निष्कामी भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे असे म्हंटले होते. तसेच पत्रकारांना याबद्दल माहिती घेण्यास सांगितले होते. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी मला उत्तरे देण्यासाठी इतक्या बैठका घेतल्या त्याच कोरोनाशी लढण्यासाठी  घेतल्या असत्या तर राज्याला या टप्प्यातून जावे लागले नसते. असा टोलाही त्यांनी मारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत का लग्न केले? जाणून घ्या खरे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकची आपला जोडीदार म्हणून निवड केली. सानिया मिर्झाने आपल्या देशाची सीमा ओलांडून एका पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न का केले, हे तिने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान उघड केले. सानिया मिर्झाने पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर झैनाब अब्बास याच्याशी बोलताना सांगितले की,’ शोएब मलिकने तिला लग्नासाठी ज्या पद्धतीने प्रपोज केले होते ते खूप मजेशीर होते. त्यामुळे ती शोएबला नाही म्हणू शकली नाही.’

शोएब मलिकने सानिया मिर्झाला असे केले होते प्रपोज
झैनाब अब्बासशी बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, ‘काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर शोएब मलिकने मला थेट विचारले की, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. शोएब म्हणाला की, मला भारतात यायचे आहे आणि तुझ्या घरच्यांना भेटायचे आहे. जर तुझे उत्तर होय असेल तर मला कळंव.’

सानिया मिर्झा पुढे म्हणाली, “शोएबच्या बोलण्यात मला बरेचसे सत्य दिसले. मला असे वाटले की त्यात कुठलाही देखावा नाही आहे. या त्याच्या खऱ्या भावना होत्या, ज्या त्याने माझ्याशी व्यक्त केल्या. सानिया म्हणाली की,’ शोएबची हि गोष्ट मला आवडली की तो देखावा करत नाही. त्याने मला गुडघ्यावर बसून प्रपोज केला नाही, जी त्याची स्टाईल नाही. शोएब मलिक खूप साधा आणि सरळ आहे. सानिया मिर्झाने या मुलाखतीत झैनब अब्बास यांना सांगितले की,’ तिला शोएब मलिकच्या एका सवयीचा तिरस्कार आहे. जेव्हा त्यांच्यात भांडण होते तेव्हा शोएब आपल्या मनातले तिला काहीच सांगत नाही, तो त्या स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतो.

सानिया मिर्झाची मोडली होती एंगेजमेंट
शोएब मलिकच्या आधी सानिया मिर्झाच्या आयुष्यात सोहराब मिर्झा होता. सोहराब आणि सानिया हे बालपणीचे मित्र होते आणि दोघांनी २००९.साली एंगेजमेंट केली होती. मात्र, काही कारणांमुळे ही एंगेजमेंट मोडली गेली, त्यानंतर शोएब मलिक सानिया मिर्झाच्या आयुष्यात आला. दोघांनी एकमेकांना ५ महिने डेट केले आणि १२ एप्रिल २०१० रोजी दोघांनी लग्न केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सेक्रेड गेममधील ‘या’ अभिनेत्रीकडे मोलकरणीला द्यायलाही पैसे उरले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लादलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गरीब, मध्यमवर्गीय लोकांसोबत आता फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीवर आर्थिक संकट आल्याच्या बातम्या आहेत. सेक्रेड गेममधील अभिनेत्री एलनाज नौरोजी सध्या आर्थिक संकटात आहे. ती साध्य जर्मनीत आहे.

सेक्रेड गेम्स' फेम एलनाज़ नौरोजी का ...

भारतापेक्षा जास्त बिकट स्थिती असल्याने जर्मनीतील स्थिती खराब आहे. अशा परिस्थितीत हाताला कोणतेच काम नाही. जी कामे केली आहेत त्यांचे पैसे अजून मिळाले नाहीत. त्यामुळे मोलकरणीला, ड्रायव्हरला अगदी पीआर एजन्सीलाही द्यायला तिच्याकडे पैसे नाहीत. तिने निरहुआ चलल लंडन, मान जाओ या सिनेमात काम केले आहे. सेक्रेड गेम्स मध्ये तिने झोया मिर्झा ही भूमिका केली होती.

Elnaaz Norouzi Photo Shoot - Photogallery - Page 8

एलनाज नौरोजीला या काळात कोणते काम मिळालेले नाही. नुकत्याच एका जरनल ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले आहे. कोरोनामुळे बऱ्याच कलाकारांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते आहे. भारतात हळूहळू नियम शिथिल होण्याची शक्यता आहे.

Elnaaz Norouzi is making her place in Bollywood

Elnaaz norouzi 1 | भारत नहीं ईरान की हुस्न ...

सेक्रेड गेम्स” की 'जोया' दिखने लगी है ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

साऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कन्नड मधील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मेबीना मायकल हिचे वयाच्या २२ व्य वर्षी निधन झाले आहे. एका रस्तेअपघातात ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ती आपल्या गावी मैदिकरी येथे जाण्यास निघाली होती. पण तिच्या गाडीची आणि समोरून येणाऱ्या एका ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला होता. अपघातात मेबीनाचे निधन झाल्यामुळे कन्नड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कन्नडमधील Pyaate Hudugir Halli Life हा शो मेबीनाने जिंकला होता. त्यामुळे तिच्या जाण्याने या शोचे निवेदक अकुल बालाजी यांना धक्का बसला आहे. तिला श्रद्धांजली वाहत त्यांनी ती माझी आवडती स्पर्धक होती आणि ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही असे ट्विट केले आहे. मेबीनासोबत असणाऱ्या मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड येत आहेत. त्यातलाच एक ट्रेंड साध्य गुजरातमधील बिल्लू शर्मा या फोटोग्राफरनी सुरु केला आहे. त्यांनी नागरिकांना त्यांच्या चेहऱ्याची प्रिंट असणारा मास्क बनवून देण्याचे काम सुरु केले आहे.

गुजरातमधील हे फोटोग्राफर लोकांच्या चेहऱ्यानुसार मास्कवर प्रिंट करून देतात. हा एक नवीन ट्रेंड आला आहे. आपल्या जीवनमानाचा एक भाग होणार असलेल्या या मास्कचा वापरही वेगळ्या पद्धतीने होणार आहे. ते सांगतात, ‘या लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या चेहऱ्यासारखे मास्क बनवायला केवळ १०-१५ मिनिटे वेळ लागत असून आम्ही त्यासाठी केवळ ५० रु घेतो’ भलेही पुढच्या काळात खूप सावधगिरीने वावरावे लागणार आहे. पण या अशा कल्पक संकल्पनांनी पुढील काळ सुकर नक्कीच होईल.

 

कोरोनाचे हे संकट जगभरात वाढले आहे. हळूहळू या विषाणूंसोबत राहण्याची सवय जगाला करून घेतली पाहिजे. पुढे जाऊन खूप काळ सामाजिक अलगाव ही पाळावा लागणार आहे. पण अशा परिस्थितीतही सकारात्मक राहणे गरजेचे आहे. या विषाणूच्या तडाख्यातून लवकरच सुटका होईल हा आत्मविश्वास ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या अशा संकल्पना नक्कीच हा काळ सुसह्य करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन एकमेकांच्या संधी आहेत. ते एकमेकांना कोणताच धोका पोहोचवणार नाहीत. असेही म्हंटले आहे.

त्यांनी म्हंटले आहे, ‘चीन आणि भारत एकत्र covid -१९ च्या विरोधात लढत आहेत. त्याचबरोबर सीमेच्या स्थितीवर देखील वाद घालत आहेत. मला आशा आहे कि दोन्ही देशातील तरुण भारत आणि चीन यांच्या नात्यामध्ये सुधारणा होण्याचे महत्व समजून घेतील. आपण एक एक लक्षात घेतली पाहिजे. की भारत आणि चीन एकमेकांच्या संधी आहेत. ते एकमेकांना कोणताच धोका पोहोचवणार नाहीत. आपण एकमेकांचा विकास योग्य मार्गाने पाहणे गरजेचे आहे. तुम्ही आमचे मतभेद योग्यरितीने पहा. आपण सहकार्याने हे मतभेद मिटवू शकतो. तसेच आपल्यातील रणनीतीपुर्वक परस्पर विश्वास वाढवू शकतो.

 

सन वेडोंग येथून हा व्हिडिओ चीनी दूताने पाठविला असून आता भारताकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे लवकरच कळेल. भारत चीनमधील वाद रोज नवनवी वळणे घेत आहे. युद्ध होऊ नये म्हणून अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. तर भारत-चीन मधील कमांडर्स मध्येही चर्चा होत असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता गृह जिल्ह्यातूनच देता येईल परीक्षा

नवी दिल्ली । CBSE बोर्डाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे जेथे आहेत, तेथूनच त्यांना परीक्षा देता येणार आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जाहीर केलं. त्यामुळे लॉकडाऊनमुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत, त्यांना आता आपापल्या घराजवळ परीक्षा देता येणार आहे. डॉ. पोखरियाल यांनी ट्विटरवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली.

‘CBSEच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधी दरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या शाळांशी संपर्क साधत राहा. तुमच्या शाळा तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात, त्याची माहिती बोर्डाला देतील. तुम्ही ज्या भागात आहात, त्या भागातूनच तुम्हाला परीक्षा देता येईल. त्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यास करा,’ असे पोखरियाल यांनी सांगितलं.

CBSEच्या परीक्षांसाठी यापूर्वी ३ हजार परीक्षा केंद्रे होती. आता त्यातही वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात डॉ. पोखरियाल म्हणाले, ‘सीबीएसई दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षांसाठी केंद्रांची संख्या वाढवली जात आहे. लॉकडाऊनआधी देशभरात ३ हजार केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार होती. आता या परीक्षा १५ हजार केंद्रांवर आयोजित केल्या जातील. म्हणजेच परीक्षा केंद्रांची संख्या पाचपट वाढवली आहे.’ असं पोखरियाल म्हणाले.

दरम्यान, देशभरात लॉकडाउनच्या काळात राहिलेल्या सर्व पेपरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात दहावीचे चार पेपर शिल्लक राहिले हेाते, त्यात समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, इंग्रजी संभाषण या पेपरांचा समावेश आहे. तर, बारावीचे तब्बल विविध विभागांतील २३ पेपर शिल्लक राहिले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील पेपरचा समावेश आहे. यात होम सायन्स, रसानशास्त्र, बिझनेस स्टडी, बायो टेक्नॉलॉजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांचा समावेश आहे.

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”